Posts

Showing posts from January, 2026

बार्शिटाकळी तहसीलदारांची मस्ती! राष्ट्रगीताचा अवमान करून पत्रकारांशी 'उद्धट' वर्तन; कारवाई होणार की पाठीशी घातले जाणार? -: श्याम ठक

Image
बार्शिटाकळी तहसीलदारांची मस्ती! राष्ट्रगीताचा अवमान करून पत्रकारांशी 'उद्धट' वर्तन; कारवाई होणार की पाठीशी घातले जाणार? -: श्याम ठक बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- प्रजासत्ताक दिनाचे पावित्र्य राखण्याऐवजी बार्शिटाकळी तहसील कार्यालयात प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळस पाहायला मिळाला. ज्या राष्ट्रगीताने भारतीयांची मान अभिमानाने उंच होते, त्याच राष्ट्रगीताचा अवमान स्वतः तहसीलदार रवींद्र कापशीकर यांच्या उपस्थितीत झाला. राष्ट्रगीत अर्धवट वाजवून त्याचा अपमान तर झालाच, पण यावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांशी तहसीलदारांनी एखाद्या मुजोर नेत्याप्रमाणे अर्वाच्य भाषेत हुज्जत घातल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. नेमका प्रकार काय? आज २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे राष्ट्रगीत गाण्याऐवजी 'युट्युब'च्या जीवावर सोहळा उरकला गेला. तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रगीत अर्ध्यावरून सुरु झाले. नियमानुसार राष्ट्रगीत पूर्ण होणे बंधनकारक असतानाही, ते पुन्हा पूर्ण न करता राष्ट्रगी...

भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम संपन्न....

Image
भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम संपन्न..... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  : - सामाजिक समतेचे महान पुरस्कर्ते, ओबीसी समाजाचे कैवारी व बिहारचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अकोला येथे भव्य जयंती समारंभ व जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य भवन, अकोला येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकरी जागर मंचचे श्री. प्रशांत गावंडे यांचे जाहीर व्याख्यान झाले. त्यांनी कर्पूरी ठाकूर यांचे विचार, शिक्षण व आरक्षण क्षेत्रातील त्यांचे ऐतिहासिक योगदान तसेच सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष यावर सविस्तर प्रकाश टाकला. लहान समाज सत्तेचे वाटेकरी झाल्याशिवाय त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक समस्या सुटू शकत नाहीत, यावर त्यांनी विशेष भर दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रकाशजी नागपुरकर (संस्थापक अध्यक्ष, आस्था नागरी सहकारी पतसंस्था, अमरावती) उपस्थित होते. त्यांनी शिक्षण, प्र...

अनिष्ट चालीरीतींना तिलांजली देत परिवर्तनाचा संदेश;कमी खर्चाचे लग्न, कमी खर्चाची शेती—काळाची हाक!मराठा योद्धा गजानन हरणे यांचे समाजाला आवाहन...

Image
अनिष्ट चालीरीतींना तिलांजली देत परिवर्तनाचा संदेश; कमी खर्चाचे लग्न, कमी खर्चाची शेती—काळाची हाक! मराठा योद्धा गजानन हरणे यांचे समाजाला आवाहन बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी : समाजाच्या प्रगतीला अडसर ठरणाऱ्या अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा व अवाजवी खर्चाच्या प्रथांना मूठमाती देत नव्या सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी मराठा पाटील समाज सज्ज झाला आहे. कमी खर्चाचे लग्न आणि कमी खर्चाची, शाश्वत शेती ही काळाची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन करीत मराठा योद्धा गजानन हरणे यांनी समाजाला साद घातली आहे. मराठा पाटील संघाच्या वतीने आयोजित समाज संवाद पदयात्रा सध्या बाळापूर तालुक्यात गावागावांतून मार्गक्रमण करीत असून, या यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आठ वाजता सुरू होणारी ही संवादयात्रा रात्री उशिरा दहा–अकरा वाजेपर्यंत अविरत चालू राहते. दररोज आठ ते दहा गावांमध्ये थांबून थेट जनतेशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्न–समस्या जाणून घेत चर्चा व उपाययोजना मांडल्या जात आहेत.या पदयात्रेच्या माध्यमातून मराठा पाटील समाज जागृत, संघटित व परिवर्तनाभिमुख करण्याचे...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता / अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत अंगणवाडी सेविकांना सुचना........

Image
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता / अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत अंगणवाडी सेविकांना सुचना......... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग पत्र क्रमांक मबाबि २०२५ । प्रक्क २३९ का ०२ दिनांक २०.१.२०२६ सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून e-KYC प्रक्रिया दि. ३१.१२.२०२५ पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रिया पार पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्यानुषंगाने योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र/अपात्र आहेत याची फेर पडताळणी होणे गरजेचे आहे. सदर योजनेंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याच्या नोकरी/सेवानिवृती संदर्भातील निकष खालील प्रमाणे आहेतः- १) लाभाथ्यांचे वय वर्ष २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त नसावे. २) लाभार्थी केवळ पात्र महिला (Female) असावी. ३) लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ/भार...

बार्शिटाकळी नगरपंचायतच्या सभापती, उपसभापतींची निवड....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

Image
बार्शिटाकळी नगरपंचायतच्या सभापती, उपसभापतींची निवड.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शीटाकळी :-  नगरपंचायतच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया 20 जानेवारी रोजी पार पडली. बार्शिटाकळी नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष अख्तरखातून अलीमोद्दीन व उपाध्यक्ष है. अबरार सै. मीर यांच्या उपस्थितीत 20 जानेवारीला सभा पार पडली. यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ, तहसीलदार कापशीकर, यावेळी वंचित नेते शे. नईमोद्दीदीन, नगरसेवक श्री. रमेश वाटमारे, सौ.सविता वरगट, सौ.आरती केदारे, करीम मास्टर (जमदार), मो. शोएब, अजहर पठाण, इमरान खान, गोवा शेठ, सुनील शिरसाट, सादिक लीडर, राजीव, जैनुद्दीन, श्रीकांत जामनिक, असे अनेक जण यावेळी उपस्थित होते. यावेळी शुभम इंगळे पाणीपुरवठा सभापती, मो. फरहान शे. जमील बांधकाम सभापती, नवेद अहेमद खान आरोग्य सभापती, सै. रुबीना परवीन मो. रिजवान महिला व बालकल्याण सभापती आणि आम्रपाली नागसेन वानखडे यांचीमहिला व बालकल्याण उपसभापती पदावर निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा उपस्थित त्यांनी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.

माणूस माणसाशी जोडला गेला की, देश आपोआप एकसंध होतो.”👉— ह. भ. प. अमोल महाराज घुगे. 👉अकोला नगरीत संत श्री भगवानबाबा पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात संपन्न....

Image
माणूस माणसाशी जोडला गेला की, देश आपोआप एकसंध होतो.” 👉— ह. भ. प. अमोल महाराज घुगे 👉अकोला नगरीत संत श्री भगवानबाबा पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात संपन्न बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- ऐश्वर्य, त्याग आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंजारी समाज सेवा फाऊंडेशन, अकोला यांच्या वतीने आयोजित स्मृतिसोहळा रविवारी जानोरकर मंगल कार्यालय, अकोला येथे अत्यंत भक्तीमय, भावपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. अकोला शहरासह परिसरातील विविध स्तरातील नागरिक, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांच्या चरणी आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पालखी सोहळ्याने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात वातावरण भक्तीरसाने भारून गेले. त्यानंतर संत श्री भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. ह. भ. प. अमोल महाराज घुगे (आळंदी) यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थितांना भावविवश केले. शिक्षण, संस्कार व सामाजिक एकात्मतेचे महत्त्व त्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी कथांमधून मांडले. “मा...

होमगार्ड नागेश ठाकरे यांचा असाही प्रामाणिकपणा..... 👉1 लाख रूपयाचा मोबाईल केला परत.....

Image
होमगार्ड नागेश ठाकरे यांचा असाही प्रामाणिकपणा.....  👉1 लाख रूपयाचा मोबाईल केला परत. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- महानगरपालिका बंदोबस्त साठी खदान पोलीस स्टेशनला ड्युटी वर असणारे सैनिक नागेश ठाकरे सनद क्र. 460 व सैनिक विकास राठोड 1579 व सैनिक राजेश ढवळे 421 व दोन नागपूर येथील महिला कॉनस्टेबल प्रशिक्षणनार्थी हे विजयी उमेदवार यांचा रॅली सोबत ड्युटी वर होते राजेश हार्डवेअर समोर सिंधी कॅम्प खदान अकोला या ठिकाणी रॅली मध्ये युसूफ अली या मुलाचा मोबाईल पडला असता तो मोबाईल बार्शिटाकळी येथील सैनिक नागेश ठाकरे यांना रस्त्यावर खाली पडलेला दिसला त्यांनी तो जवळ घेतला, व काही वेळाने मोबाईल वर फोन आला असता त्यानी त्याला ओळखिचे पुरावे घेऊन बोलावले व तो आला असता त्याची शहानिशा करून मोबाईल त्याच्या स्वाधीन केला आपला मोबाईल पाहून त्यांनी अकोला होमगार्ड चे विशेष आभार मानले व तुमच्या सारखे इमानदार होमगार्ड सैनिक आहेत म्हणून आम्ही आहोत असे उदगार काढले या साठी सैनिक नागेश ठाकरे यांचे व सोबतच्या सर्वांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे, आपण ज्या निष्काम सेवा करणारी ...

आकोट शहरातील अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या अन्यथा लखन इंगळे यांचा 26 जानेवारी ला अतिक्रमण लाभार्थ्यांसह न.प.आकोट येथे आंदोलनाचा इशारा......

Image
आकोट शहरातील अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या अन्यथा लखन इंगळे यांचा 26 जानेवारी ला अतिक्रमण लाभार्थ्यांसह न.प.आकोट येथे आंदोलनाचा इशारा......          प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- बऱ्याच वर्षापासुन आकोट शहर मध्ये अधुरे राहिलेले अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या नाहीतर आंदोलन करू वंचित चे लखन इंगळे यांचा 26 जानेवारी ला अतिक्रमण लाभार्थी सह न.प.आकोट येथे आंदोलनाचा इशारा आकोट शहर मधील गोरगरीब व सामान्य लोकांच्या हितासाठी नेहमी सक्रिय असलेले वंचित बहुजन आघाडी चे व आकोट तालुका अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ आकोट चे लखन इंगळे यांनी आकोट शहर मधील सर्व जाती धर्माचे लोकं राहतात अस्या अतिक्रमण जागा नियमानुकूल करून त्या जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल चा लाभ देण्यासाठी वंचित चे लखन इंगळे यांनी शासन निर्णय 2018 निघाला त्या वर्षा पासुन तर लगातार आज परियंत विविध प्रकारे निवेदन अकोला जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आकोट नगर परिषद तत्कालीन मुख्यअधिकारी वाहूरवाघ साहेब यांना देऊन कार्यालयात आंदोलन करून मो...

बार्शिटाकळी नगरपंचायत वर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला....

Image
बार्शिटाकळी नगरपंचायत वर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी नगरपंचायतेवर वंचित बहुजन आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अख्तर खातून अलीमुद्दीन यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारला.  या पदग्रहण सोहळ्यानिमित्त बार्शिटाकळी शहरात वंचित बहुजन आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन केले. बार्शिटाकळी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अख्तर खातून अलीमुद्दीन यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज झालेल्या पदग्रहण सोहळ्यासाठी सुजात आंबेडकर यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नगरपंचायतच्या माध्यमातून शहराचा विकास आणि वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. या सोहळ्याला वंचित बहुजन युवा आघाडीचे राजेंद्र पातोडे (प्रदेश महासचिव, वं...

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस ठाण्यातील कामकाज!........ 👉संकटाच्या काळात पोलीस दलाशी तत्काळ संपर्क साधा ठाणेदार प्रवीण धुमाळ

Image
  विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस ठाण्यातील कामकाज!...   👉संकटाच्या काळात पोलीस दलाशी तत्काळ संपर्क साधा ठाणेदार प्रवीण धुमाळ बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून बार्शीटाकळी, पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा आणि कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील कामकाजाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी बार्शी टाकळी, पोलिसांतर्फे विद्याच्यर्थ्यांसाठी पोलिस ठाण्यांत माहिती सत्राचे आयोजन आज ता. (०२ जानेवारी) रोजी केले होते.    यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यांतील विविध विभाग, वायरलेस यंत्रणा, सीसीटीएनएस यंत्रणा, पोलिस कोठडी, पासपोर्ट व्हेरिफिकेशन या सर्वांची माहिती दिली. तसेच, पोलिस ठाण्यातील विविध शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबत मोकळा संवाद साधत त्यांना पोलिसांचे कामकाज सांगण्यात आले आणि त्यांच्या शंकांचे निरसन या वेळी केले,        या प्रसंगी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुम...

स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!

Image
स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी येथे स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बार्शिटाकळी तालुका खरेदी विक्री येथे साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष योगेश पाटील लाहोडकर, सचिव संतोष म्हैसने, कर्मचारी गोपाल काळे, लिंक वर्कर बाळकृष्ण उताने, अनिल राठोड सह शेतकरी उपस्थित होते. सावित्रीमाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....

Image
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला :- अकोला येथील वंचित बहुजन आघाडीचे पक्ष कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आयोजक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांनी केले होते  यावेळी बाळापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय उमाळे, प्रा. सुरेश मोरे सर, रूग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ, पराग भाऊ गवई , गोपाल ढोरे, माजी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, सरपंच गोपाल चव्हाण, माजी सरपंच अशोक लोणाग्रे, सतिष चोपडे, प्रा. प्रदिप चौरे, कृष्णा भातखडे, यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

बार्शिटाकळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य पदाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार! 👉राजकीय घडामोडीला वेग!

Image
बार्शिटाकळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य पदाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार! 👉राजकीय घडामोडीला वेग! बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : बार्शिटाकळी नगरपंचायतच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाकरीता राजकीय घडामोडीला वेग आला असून, कोणाला कोणते पद मिळणार यापेक्षा सदर निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बार्शिटाकळी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबरला पार पडली. नगराध्यक्ष पदावर वंचित बहुजन आघाडीच्याच्या अख्तरखातून अलीमोद्दीन यांची तर नगरसेवक पदावर वंचित बहुजन आघाडीचे शेख साबीर शेख अमीन, सै. अबरार सै. मीर, मो. जफर मो.हाशम, राष्ट्रीय काँग्रेस मधून मुमताजबी मो. सिद्दीक, रफिया खातून अन्सार उल्लाह खान,  अजगरी अंजुम सय्यद असद अली, भारतीय जनता पार्टी मधून रमेश मनोहर वाटमारे, आरती अनंत केदारे, सविताताई शंकर वरगट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून मोहम्मद रुबीना परवीन रिजवान, मोहम्मद सफिया बेगम रफिक, एम आय एम मधून मोहम्मद फरहान शेख जमील असे विविध पक्षाचे तर अपक्ष शुभम मोहन इंगळे, इफ्ते खारोद...