मुलभूत सोयी सुविधा मिळण्याकरिता एकता नगर वाशियांचे पालकमंत्री व मुख्याधिकारी यांना साकडे.....
मुलभूत सोयी सुविधा मिळण्याकरिता एकता नगर वाशियांचे पालकमंत्री व मुख्याधिकारी यांना साकडे बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : नगरपंचायत बार्शिटाकळी मधील वार्ड क्रमांक २ च्या समस्त एकता नगर वासीयांची अकोला जिल्ह्यांचे पालकमंत्री व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना आज दिनांक ८ जुलै रोजी अर्ज सादर केला त्या अर्जा मध्ये त्यांनी असे म्हटले आहे की एकता नगर मध्ये जसे लेआउट झाले तेव्हापासुन येथे रस्ता झाला नाही व या वस्ती मध्ये भौतीक सोई सुविधाचा अभाव असल्यामुळे समस्त एकता नगर मधील रहवासी नागरीक त्रस्त झालो आहोत. यापुर्वी देखील ऐथील नागरीकांनी आपणास विनंती अर्ज दिलेले आहेत. तसेच तक्रारी केल्या आहेत यावर अद्याप पर्यंत काहीच काम झाले नाही, सर्वात जास्त त्रास हा पावसाळयामध्ये होतो आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. या ठिकाणी सहज चालत जाणे शक्य नाही तसेच दुचाकी घरापर्यंत जात नाही, या कारणामुळे दुचाकी चोरीला जात आहेत संपुर्ण खाली जागे मध्ये गवत पसरले आहे. यामध्ये दर दिवशी साप विंचु निघत आहेत यामुळे नागरीक भयभित झाले आहेत. सर्वत्र चिखल व घाणिचे साम्रा...