बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना तूर पिकाची नुकसान भरपाई द्या ! अन्यथा तीव्र आंदोलन : भारत कृषक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन
बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना तूर पिकाची नुकसान भरपाई द्या ! अन्यथा तीव्र आंदोलन : भारत कृषक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : दि. १ जुन तालुक्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील तूर पिकाची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी भारत कृषक समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर व शेतकऱ्यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांची समस्या मांडली. बार्शीटाकळी तालुक्यात माहे नोव्हेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे तूर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र महसूल व कृषी विभागाने तूर पिकांचे पंचनामे करण्यात दिरंगाई केली. यामुळे संपूर्ण बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिला आहे. तसेच लगतच्या मूर्तिजापूर, पातूर, अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तुरीचे पंचनामे करण्यात आले, तसेच त्यांना नुकसान भरपाईची रकम देखील मिळालेली आहे. शासनाचे आदेश असल्यानंतरही बार्शीटाकळी तालुक्यातील अधिकाऱ्यांनी तूर पिकांचे पंचनामे का केल...