Posts

Showing posts from October, 2025

राजंदा गावात एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी....

Image
राजंदा गावात एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी :– राजंदा गावातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (MSRTC) गावात नियमित एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन आज जिल्हा नियंत्रक आणि महाव्यवस्थापक (MSRTC), कार्यालय अकोला यांना सादर करण्यात आले. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व शहर अध्यक्ष सौरभ भगत ह्यांच्या नेतृत्वाखाली गावातील नागरिक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या गावात कोणतीही सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या शहरात ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णांना वैद्यकीय सेवांसाठीही खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे आर्थिक बोजा वाढतो. ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, राजंदा गावातून दररोज सकाळी ९.०० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजता बससेवा सुरू करण्यात यावी, ज्यामुळे गावातील लोकांना सहज प्रवास करता येईल. या मागणीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांपर्यंत, तसेच...

बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा....

Image
बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी :- शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली परंतु ती वितरित करण्याचा हुकूम मात्र अधिकाऱ्यांना दिला नाही, म्हणून म्हणतो अधिकाऱ्यांची वाहने फोडून काही फायदा नाही, वाहने फोडायची असतीलच तर सत्ताधारी आमदार व मंत्र्यांची फोडा, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) येथे जाहीर सभेत केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून आधी ३१ हजार कोटी व नंतर वाढीव ११ हजार कोटी रुपये असे एकूण ४२ हजार कोटी मंजूर केले, मात्र वितरित करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत दिला नाही, ॲड प्रकाश आंबेडकर, म्हणाले भाजप सरकार केंद्राचे असो वा राज्याचे ते सर्व स्तरावर अपयशी झाल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमाला माजी आमदार ॲड. खतीब साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, प्रतिभा सिरसाट, बळीराम चिकटे, अनुराधा ठाकरे, आयोजक अशोक कोहर, मंदा अरुणराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, ॲड. आशिष देशमुख, ॲड. गोपाल देशमुख, गोपाल चव्हाण, सती...

"चला एकतेसाठी चालु या" बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचा उपक्रम......

Image
" चला एकतेसाठी चालु या" बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचा उपक्रम.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ३१ आक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता रन फॉर युनिटी ३ किलोमीटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते  हि रॅली बार्शिटाकळी पोलीस स्टेशन येथुन पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन सुरूवात केली . सदर रॅली अकोली वेस मज्जीद जवळुन, सोमवार पेठ, भोईपुरा, जामा मज्जीद, शिवाजी चौक, बाजार लाईन, उर्दू शाळा, नगरपंचायत चौक, संताजी नगर, आठवडी बाजार मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आली या रॅलीत पोलीस उपनिरीक्षक श्री चाटे साहेब, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, संजय इंगळे, गोपाल महल्ले, संकेत राठोड, अनंता केदारे, दिनेश रत्नपारखी, मदन धात्रक, राजेश साबळे, सौरभ अग्र...

बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज सभागृहाचे भुमिपुजन संपन्न......

Image
बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज सभागृहाचे भुमिपुजन संपन्न.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : येथील वार्ड क्रमांक ३ न्हावी पुरा येथे विधानपरिषद सदस्य मा. वसतजी खंडेलवाल यांच्या विकास निधी मधुन संत सेना महाराज सभागृहाचे भुमिपुजन संपन्न करण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष अजहर पठाण, गटनेते सुनिल सिरसाठ, माजी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, इमरान खान, ह.भ.प. नागोराव भातखडे, गोपाल निबोकार, रमेश भातखडे, नागोराव भातखडे, भगवंत भातखडे, सुनील भातखडे, अंकुश पळसकार, ॲड मंगेश भातखडे, शुभम मानेकर, अरविंद भातखडे, प्रविण पाडे, पांडुरंग भातखडे, संतोष भातखडे, लखन भातखडे, रवि भातखडे,अक्षय भातखडे, भोलेनाथ भातखडे, कृष्णा भातखडे, सुनील पळसकार, नागेश भातखडे, व नाभिक समाजाचे नागरिक उपस्थित होते.  

दारूच्या नशेत खाली पडलेल्या इसमाच्या अंगावरून गेले वाहन ! 👉सूरज वाइन बारसमोर घडला अपघात....

Image
दारूच्या नशेत खाली पडलेल्या इसमाच्या अंगावरून गेले वाहन ! 👉सूरज वाइन बारसमोर घडला अपघात बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी -: शहरातील सूरज वाइन बारमधून एक जण दारूच्या नशेत बाहेर निघाला. चालत जात असताना तो अचानक खाली पडला. यावेळी त्याच्या अंगावरून वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना २७ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यातील मृत व्यक्तीचे नाव अफसर खॉ रशिद खाँ (३३) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बार्शिटाकळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज वाइन बारसमोरच्या मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती रविवारी मिळाली, तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, काळ्या रंगाचे कपडे घातलेला इसम मृतावस्थेत आढळून आला. चौकशीत मृतकाची ओळख अफसर खाँ रशीद खाँ (३३), रा. इंदिरा आवास बार्शिटाकळी अशी पटली. या प्रकरणी सूरज वाइन बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रविवार, २६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास अफसर खाँ हे बारमधून दारूच्या नशेत बाहेर येताना दिसत होते, त्याचवेळी बारचे मालक संतोष शंकरराव काळदाते आपल्या चारचाकी वाह...

बहुचर्चित अक्षय नागलकर हत्येचा उलगडा — मुख्य आरोपीसह चौघांच्या मुसक्या आवळल्या!

Image
बहुचर्चित अक्षय नागलकर हत्येचा उलगडा — मुख्य आरोपीसह चौघांच्या मुसक्या आवळल्या! बार्शिटाकळी  : शहरातील बहुचर्चित अक्षय नागलकर मिसींग प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, पोलीसांनी मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. तब्बल ४८ तासांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आणले. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शिला विनायक नागलकर यांनी दि. २३ ऑक्टोबर रोजी डाबकी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांचा मुलगा अक्षय विनायक नागलकर (वय २६, रा. मारोती नगर, जुने शहर, अकोला) दि. २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.१५ वाजता बाहेर गेला असून तो अद्याप परत आलेला नाही. त्यावरून मिसींग क्र. ४४/२०२५ नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी तात्काळ तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या ८ विशेष पथकांची नियुक्ती केली. या पथकांनी जिल्हा व जिल्हा बाहेरील विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे संशयित चंद्रकांत बोरकर यास ताब्यात...

निराधार वृद्धांना मदतीचा हात देऊन दिवाळी साजरी! 👉5 वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे....

Image
निराधार वृद्धांना मदतीचा हात देऊन दिवाळी साजरी! 👉5 वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे वृद्ध महिलेला साडी-चोळी व मिठाई देऊन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : तालुक्यातील चोहोगाव येथील इंगळे कुटुंबीयांनी दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त गरजू, अनाय, निराधार आणि वृद्ध नागरिकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला तसेच मुख्य दिवशी इंगळे कुटुंबीयांनी घरोघरी जाऊन कपडे, फराळ, मिठाई आणि किराणा किटचे वाटप केले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी प्रकाशमय झाली.  चोहोगाव (सायखेड) येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बबन इंगळे, आशा स्वयंसेविका छाया इंगळे, हिमांशू इंगळे, साक्षी इंगळे आणि कमलाबाई बोरकर हे उपक्रमाचे प्रमुख शिल्पकार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी दिवाळीपूर्वीच दुर्गम व आदिवासी भागांतील गरजू कुटुंबांची ओळख करून त्यांना मदत पोहोचवली जाते. विविध स्तरातून कौतुक ! यंदाच्या उपक्रमाचा प्रारंभ २० ऑक्टोबर रोजी धाबा येथे करण्यात आला. यावेळी राजेश धाबेकर, उमेश करवले, अन...

बार्शिटाकळीत शेतकऱ्यांची काळी दिवाळी; चटणी भाकर खाऊन केले आंदोलन....

Image
बार्शिटाकळीत शेतकऱ्यांची काळी दिवाळी; चटणी भाकर खाऊन केले आंदोलन.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी :- दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी देश विदेशात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना बार्शिटाकळीत मात्र चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली. शेतकरी एल्गार समिती बार्शिटाकळी यांच्या कडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चटणी भाकर खाऊन, काळी दिवाळी साजरी करण्याच्या अभिनव अशा आंदोलनात, दिवाळीचा दिवस असूनही तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपास्थित होते. यावेळी शेतकरी नेते प्रशांत गावंडे, सुप्रसिद्ध व्याख्याते अक्षय राऊत, किरण ठाकरे महादेव गावंडे, ॲड. महेश घनगाव, भारतभाऊ बोबडे, शुभम राजुरकर, जनार्दन ठोकळ, भारत चांभारे, गणेश ताठे मंगेश अंधारे पंडित चांभारे, संतोष सोनटक्के जीवन राऊत गजानन मानतकर, अक्षय वैराळे, रुद्राक्ष राठोड, राजाबापू देशमुख श्रीकृष्ण जानोरकर, गोपाल भटकर, उमेश राऊत अविनाश ठाकरे, फारूकभाई यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थीत होते. शेतकरी एल्गार समितीच्या वतीने बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे चटणी भाकर खाऊन या सरकारचा निषेध क...

फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे समाजसेवक गजानन हरणे यांचे आवाहन....

Image
फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे समाजसेवक गजानन हरणे यांचे आवाहन.... बार्शिटाकळी (प्रतिनिधी श्रावण भातखडे ) :- दिवाळीच्या उत्सवाचे दिवस जवळ येत असताना बाजारपेठा उजळल्या आहेत. सर्वत्र फटाक्यांची दुकाने लागली असून मुलांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसते. मात्र, या उत्साहामध्ये प्रदूषण, धोकादायक अपघात व आरोग्याच्या समस्या दडलेल्या आहेत. त्यामुळेच या वर्षीची दिवाळी फटाके मुक्त साजरी करण्याचे आवाहन समाजसेवक गजानन हरणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.“दिवाळी ही प्रकाशाची, आनंदाची आणि ऐक्याची असावी. फटाक्यांच्या धुरामुळे आणि कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्ण त्रस्त होतात. आगी लागून अनेकदा जीवित व आर्थिक हानी होते. यामुळे दिवाळीचा खरा आनंद हरवतो,” असे मत गजानन हरणे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, “फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण हा गंभीर पर्यावरणीय प्रश्न आहे. या समस्येवर उपाय म्हणून कुटुंबानेच पुढाकार घेत ‘फटाके मुक्त परिवार’ निर्माण करावा. शाळा, महाविद्यालये व पालकांनी मुलांना प्रबोधन देणे हीच काळाची गरज आहे.” गजानन हरणे, समाजसेवक तथा संयोजक निर्भय ब...

ना शिधा, ना आनंद! गोरगरिबांनी चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी का? :– समाजसेवक गजानन हरणे,

Image
ना शिधा, ना आनंद! गोरगरिबांनी चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी का? :– समाजसेवक गजानन हरणे,  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : "गरीबाचे दिवाळीने दिवाळ काढले" अशी बोचरी प्रतिक्रिया यावर्षी समाजामध्ये उमटत आहे. कारण, दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांसाठी शासनाकडून मिळणारा आनंदाचा शिधा यंदा गायब झाला आहे. स्वस्त धान्य दुकानांतून फक्त ज्वारी व तांदूळ देण्यात आल्याने गोरगरिबांच्या ताटात दिवाळीच्या सणाला केवळ चटणी-भाकरच उरली आहे.गोरगरिबांना दिलासा देणारा दिवाळी शिधा यंदा थांबवल्याने सर्वसामान्यांच्या नाराजीला खतपाणी मिळाले आहे. मतदानाचा काळ असेल तर शिध्याचे वेगळे वाटप केले जाते. मात्र, यावर्षी राज्यात निवडणुका नसल्याने गरीब जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप समाजातून होत आहे.स्वतःला "हिंदूचे सरकार" म्हणवणाऱ्या भाजप-प्रणित फडणवीस सरकारने हिंदूंच्या पवित्र दिवाळी सणाला कोणतेही महत्त्व न देता गोरगरिबांना शेतकरी शेतमजुरांना अडचणीत आणले आहे, अशी तीव्र टीका विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच निर्भय बनो जन आंदोलन व राष्ट्रीय लोक आंदोलन यां...

हवामान संकटाचा मुकाबला : अकोल्यात नागरिक, संस्था व मनपाचा एकत्रित प्रयत्न.... 👉क्लायमेट ॲक्शन प्लानसाठी कार्यशाळेत सामूहिक चिंतन व दिशादर्शक निर्णय....

Image
हवामान संकटाचा मुकाबला : अकोल्यात नागरिक, संस्था व मनपाचा एकत्रित प्रयत्न.... 👉क्लायमेट ॲक्शन प्लानसाठी कार्यशाळेत सामूहिक चिंतन व दिशादर्शक निर्णय.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  हवामान बदल ही केवळ जागतिक समस्या नाही, तर प्रत्येक शहराच्या भविष्यासमोर उभी ठाकलेली तातडीची जबाबदारी आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक, संस्था आणि प्रशासन एकत्र आल्यासच परिणामकारक दिशा मिळू शकते. या उद्देशाने अकोला शहरात आयोजित कार्यशाळेतून ‘क्लायमेट ॲक्शन प्लान (CCAP)’ तयार करण्याचा मार्ग आखण्यात आला.अर्बन ऑक्टोबरचा भाग म्हणून कार्यशाळा.शहरी संकट प्रतिसाद, हवामान बदल आणि नागरी लवचिकता या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित कार्यशाळा युवा संस्था आणि अकोला महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘हॉटेल कृष्णा इम्पीरियल’ अकोला येथे आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा ‘अर्बन ऑक्टोबर – हैबिटॅट मंथ २०२५’चा भाग होती व संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अर्बन क्रायसिस रिस्पॉन्स’ या जागतिक उपक्रमाशी सुसंगत होती. या कार्यशाळेत बदलत्या पर्यावरणामुळे शहरांपुढे निर्मा...

बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या चर्चा दौऱ्याने - सुजात दादा आंबेडकर यांनी नवी ऊर्जा दिली...

Image
बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या चर्चा दौऱ्याने - सुजात दादा आंबेडकर यांनी नवी ऊर्जा दिली बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी:-  २०२५ च्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका - नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका - वंचित बहुजन आघाडीने गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी पिंपळखुठा रोडवरील प्रभु पार्वती मंगलकार्यालया मध्ये एका भव्य चर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुजात दादा आंबेडकर, राजेंद्र भाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे, महिला जिल्हाध्यक्षा आम्रपाली ताई खंडारे आणि युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे हे प्रमुख नेते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराची रणनीती, युवकांची भूमिका, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला बळकटी देण्याची प्रतिज्ञा केली.  यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष गोरशिग राठोड, अजय अरखराव, ज्येष्ठ नेते नइमोद्दीन शेख, गोबा शेठ, सैय्यद रागीब हाजी,अनुराधाताई ठाकरे, महिला तालुक...

प्रकाशातून परिपूर्णतेकडे नेणारी सांस्कृतिक यात्रा म्हणजे दिवाळी..!! गजानन हरणे ,समाजसेवक

Image
प्रकाशातून परिपूर्णतेकडे नेणारी सांस्कृतिक यात्रा म्हणजे दिवाळी..!! गजानन हरणे ,समाजसेवक. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- भारतीय संस्कृतीची परंपरा ही पर्व-पर्वाण्यांनी सजलेली आहे. या पर्वांमध्ये दिवाळी म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर आत्मोन्नतीचा प्रवास आहे. दीपप्रज्वलन करून जीवनाचा अंधःकार घालवणे, समाजजीवनातील बंध दृढ करणे, श्रमांचा सन्मान करणे, नात्यांतील ऊब वाढवणे आणि देवतेच्या स्मरणातून मूल्यांची शिकवण घेणे या सर्वांचा संगम म्हणजे दिवाळी,दीपावली होय. १. दिवाळीची उत्पत्ती : कोकणातील आरंभ लोकपरंपरांनुसार कोकण प्रांतात दिवाळीचे मूळ स्वरूप आढळते. शरद ऋतूतील पिकाची कापणी झाल्यावर शेतकऱ्यांच्या घराघरात भरभराट येई. पीकघरात धान्य भरले, अंगणात गाई-गुरे खूश झाली, तर आनंदोत्सव साजरा होणे साहजिकच होते. या आनंदाला धार्मिक रंग देऊन दीपोत्सवाची सुरुवात झाली. “दीप लावा, अंधार पळवा” हा संदेश कोकणातून संपूर्ण भारतात पोहोचला. पुढे पुराणकथा, पौराणिक आख्यायिका, सामाजिक संस्कार यामुळे दिवाळीचे रूप अधिक वैविध्यपूर्ण झाले. २. धनत्रयोदशी : आरोग्यसंपन्नतेचा दिवस दिवाळीची सुरु...

कलियुगात 5 वर्षाच्या चिमुकल्या उत्कर्ष क्षीरसागर ने केली एक उब जाणीवची ट्रस्टला केले ७११रु. ची मदत....

Image
कलियुगात 5 वर्षाच्या चिमुकल्या उत्कर्ष क्षीरसागर ने केली एक उब जाणीवची ट्रस्टला केले ७११रु. ची मदत..... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- मंगरूळपीर आगरातील रवींद्र क्षीरसागर यांच्या उत्कर्ष क्षीरसागर लहान चिमुकल्या मुलाने . आपल्या बचत मधून जमा केलेले पैसे. एक उब जाणिवेची या ट्रस्टला देऊन आपल्या निरागसपणाचा एक आदर्श समाजाला दिला आहे.   एक वेळेस उत्कर्ष हा पोलिस स्टेशन कारंजा येथील श्री.गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी गेला असता तेथे उत्कर्षाच्या वडिलांचे मित्र जे पोलिस खात्यात नोकरीला आहे श्री. नरेंद्र खाडे यांची भेट झाली की जे बऱ्याच वर्षापासून एक उब जाणिवेची या ट्रस्ट च्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करतात त्यावेळी उत्कर्षाच्या वडिलांनी त्याला सांगितले की जो KG2 ला RJC Kids कारंजा येथे शिक्षण घेतो त्याला सांगितले की,बाळा हे नरेंद्र काका आहेत हे गरजू लोकांना मदत करतात तेव्हा माझ्या मुलाने मला प्रश्न केला की " जे चांगलं कार्य नरेंद्र काका करतात त्यांना आपण पण मदत का करू शकत नाही?" तेव्हा मी त्याला सांगितले की हो बाळा आपण पण मदत क...

आश्वासने पूर्ण करा, अन्यथा जागा दाखवू - अक्षय राऊत यांचा शेतकरी मेळाव्यात सरकारला इशारा!

Image
आश्वासने पूर्ण करा, अन्यथा जागा दाखवू - अक्षय राऊत यांचा शेतकरी मेळाव्यात सरकारला इशारा!  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : शहरातील अकोली वेस परिसरात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे आयोजन इमरानोद्दिन ग्यासोद्दिन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. नुरसलीम जमदार यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सुप्रसिद्ध युवा व्याख्याते शेतकरीपुत्र अक्षय राऊत उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना अक्षय राऊत यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीबाबत सरकारवर प्रखर टीका केली. त्यांनी सांगितले की,“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून इतिहास घडविला होता. त्याची पुनरावृत्ती करून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बरोबरी करून दाखवावी.” राऊत यांनी पुढे म्हटले की, “संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात यावी. सोयाबीनच...

अकोला-मूर्तिजापूर, बार्शिटाकळी तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त घोषित करा, अन्यथा जनआंदोलन !! -समाजसेवक गजानन हरणे यांचा शासनाला इशारा...

Image
अकोला-मूर्तिजापूर, बार्शिटाकळी तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त घोषित करा, अन्यथा जनआंदोलन !!  -समाजसेवक गजानन हरणे यांचा शासनाला इशारा. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत अकोला व मूर्तिजापूर तालुक्यांचा समावेशच केला नाही. तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील फक्त एकच मंडळ घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे अतोनात झालेले नुकसान पाहता हा निर्णय केवळ अन्यायकारक नव्हे तर क्रूर ठरतो. या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आपले पिके डोळ्यादेखत वाहून जाताना पाहिली, मात्र शासनाने त्यांचे दु:खच नजरेआड केले, अशी संतप्त प्रतिक्रिया समाजसेवक गजानन हरणे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिनाभरात पावसाने या तालुक्यांवर अक्षरशः थैमान घातले. सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके पाण्यात बुडून गेली. शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले, खिशाला आधीच कर्जाचा डोंगर आहे, त्यात भर म्हणून बँका वसुलीसाठी नोटिसा बजावत आहेत. अधिकारी दडपण टाकत असल्याने अनेक शेतकरी नैराश्यग्रस्त होत आहेत."शेतकऱ्यांचा हा आक्रोश ...

बार्शिटाकळी न.पं. आरक्षण सोडतीत महिलांचे वर्चस्व.....

Image
बार्शिटाकळी न.पं. आरक्षण सोडतीत महिलांचे वर्चस्व... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी, ता. ८ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत नगरपंचायत सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडली. या सोडतीसाठी संदीपकुमार अपार उपविभागीय अधिकारी, मुर्तीजापूर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर राहुल कंकाळ मुख्याधिकारी, नगरपंचायत यांनी सोडतीसंबंधी नागरिकांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. या विद्यार्थ्यांमध्ये अनंत क्षीरस्वगर, अमन तायडे, शे. अपफान शे. राजु कुरेशी, अलिना अनम मो, साकीब, आमेना आयत खान आतोफ खान यांचा समावेश होता. सोडतीच्या प्रारंभी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर महिलांसाठी असलेले प्रवर्गीय आरक्षण निश्चित करण्यात आले. महिलांचे वर्चस्व आणि बदलते राजकीय गणित या वर्षीच्या आरक्षण सोडतीत महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, एकूण १७ पैकी ८ प्रभाग महिला प्रवर्गात मोडतात. त्यामुळे बार्शिटाकळी नगरपंचायतीच्...

दुर्गा देवी महोत्सवात आरोग्य शिबिराचा उपक्रम प्रशंसनीय: ठाणेदार प्रवीण धुमाळ

Image
दुर्गा देवी महोत्सवात आरोग्य शिबिराचा उपक्रम प्रशंसनीय: ठाणेदार प्रवीण धुमाळ बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : दुर्गा देवी महोत्सवात जनतेच्या हिताकरिता रोगनिदान शिबिराचे आयोजन, हा उपक्रम प्रशंसनीय आहे, असे मत बार्शिटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांनी व्यक्त केले. बार्शिटाकळीच्या संताजी नगर तेलीपुरा येथील रुग्णसेवक नितेश वाघमारे यांच्या पुढाकाराने जय जगदंबा मंडळ व न्यूट्रे जीनिकम यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव काळात देवी मातेच्या निमित्ताने, विविध प्रकारच्या रोग निदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती 3 ऑक्टोबरला दिली. यावेळी विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर मंदार वाघमारे, आशीष समित तुळजापुरे, अनुपमा भेंडे तुळजापुरे, पूजा खेतान, प्रणव चेरखे, तुषार मोरे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विविध आजाराच्या रुग्णांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर विनामूल्यउपचार करण्यात आले. सदर कार्यक्रमाला बार्शिटाकळी चे ठाणेदार प्रवीण धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव केदारे, दीपक अंबाडे, संजय कुरोडे, ओमप्रकाश उखळकर, शेखर काटेकर, संतोष आपुणे, अनंत केदारे, बबन ढेंगळे, प्...