Posts

Showing posts from January, 2024

निंबा गावाचे सरपंच सौ. ज्योतीताई पुरुषोत्तम सोनवणे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश...

Image
निंबा गावाचे सरपंच सौ. ज्योतीताई पुरुषोत्तम सोनवणे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी:  बाळापुर तालुक्यातील  ठाकरे गटाचे कार्यकर्ते ज्योतीताई पुरुषोत्तम सोनवणे (सरपंच निंबा गाव) संजय रामकृष्ण उन्हाळे, सय्यद राजू सय्यद शौकत,शिवसेना (ठाकरे गट) यांची वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.प्रमुख मार्गदर्शन जिल्हा परिषद सदस्य पती श्री संजय बावणे, मा.बाळापुर ता.महासचिव श्री सुभाष तायडे,माझी पंचायत समिती सदस्य नामदेव मास्कर, देवानंद तायडे, नागेश तायडे मा.सरपंच निंबा,ग्रा.पं.सदस्य निंबा नानासाहेब तायडे, किशोर बोदडे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे यांना 2024 चा कार्यगौरव पुरस्कार

Image
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे यांना 2024 चा कार्यगौरव पुरस्कार    बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : अकोला तालुक्यातील माझोड येथील स्वामी विवेकानंद ग्रूप ऑफ ऑर्गनाईजेशन माझोड ग्रूप च्या दशकपूर्ती सोहळा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे    यांना 2024 चा स्वामी विवेकानंद ग्रूप चा कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पुरस्काराचे मानकरी संजय देशमुख,हिम्मत धाळे ,विशाल राखोंडे,गजानन काळे यांचा सुद्धा समावेश आहे .स्वामी विवेकानंद ग्रूप ऑफ ऑर्गनायजेशन गेल्या 10 वर्षापासून शैक्षणिक , सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम करीत आहे त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाव तेथे वाचनालय ही संकल्पना घेऊन गावागावात पुस्तक वितरण, आणि बरेचश्या गावात वाचनालय सुद्धा सुरू करण्यात आली ग्रूप चे अध्यक्ष प्रा.राजेश पाटील ताले व त्यांची संपूर्ण टीम त्यांचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त विद्यार्थांना वाचन करावे आणि वाचन करून शिक्षित व्ह...

बार्शिटाकळी येथील सिंगल फेज वीज सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्या...

Image
 बार्शिटाकळी येथील सिंगल फेज वीज सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्या...  बार्शिटाकळी ता प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शीटाकळी : गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेली सिंगल फेज वीज सुरू करण्याची मागणी स्थानिक वीज विभागाच्या सहाय्यक अभियंता यांच्याकडे  बार्शिटाकळीची सिंगल फेज वीज सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मो. रिजवान उर्फ बाबा मो . रफिक व प्रकाश खाडे यांनी मंगळवार 30 जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्याला प्रथम समस्या येत असल्याचे दिलेल्या निवेदनात कुठे म्हटले आहे अशा परिस्थितीत शेतात पेरलेल्या हरभरा, गहू, रब्बी पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे. अशा स्थितीत पिके वाचवण्यासाठी विनाकारण बंद झालेली सिंगल फेज वीज त्वरित पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण पिंजर येथे संपन्न - सरकटे

Image
ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण पिंजर येथे संपन्न - सरकटे बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांचे प्रशिक्षण यशदा पुणे जिल्हा परिषद अकोला व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव मंदिर सभागृह येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्या शितल मेटकर, निर्देशक नागसेन बागडे, गटविकास अधिकारी ताणी साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिता इंगळे मॅडम ,विस्तार अधिकारी रमेश चव्हाण साहेब दिपक इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली सत्र समन्वयक सुधीर सरकटे यशदा प्रशिक्षक रोहिदास भोयर, गणेश पोटे, विशाल बकाल किरण हिवराळे यांनी गावाचा पर्यायाने ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळतांना उपयुक्त ठरणारी माहिती क्षमता बांधणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत असताना कार्यात गतिमानता येण्याकरिता सरपंच उपसरपंच सदस्यांचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय तसेच वैयक्तिक स्तरावरील योगदान असण्याकर...

👉पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी.... 👉पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

Image
👉पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी.... 👉पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : तालुक्यातील पोलीस पाटलांचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने ते त्वरित भरण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी अकोला यांना महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील श्रमिक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. तालुक्यातील पोलीस पाटील सुनील खाडे , सुभाष नानोटे, भास्कर उन्हाळे, गजानन पारधी, संतोष वक्ते आदींनी १३ जानेवारीला जिल्हाधिकारी का अकोला यांच्याकडे निवेदन दिले आहे त्यांनी यावेळी जिल्ह्यात ७९९ पोलीस पाटील पदे असताना २८७ पोलीस पाटील कार्यरत आहे या पोलीस पाटलांवर ५१२ अतिरिक्त गावांचा पदभार असल्याने काम करणे कठीण होत आहे. ग्रामपंचायत पोलीस पाटील हे महत्त्वाचे काम करणारे व्यक्ती असून गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना अनेक गावातील हे पण रिक्त आहे ही पदवी त्वरित भरण्यात यावी अशी मागणी पोलीस पाटील संघटनेने निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे

👉त्या विद्यार्थ्यांनीला मिळाला ध्वजारोहणाचा मान.....👉जिल्हा परिषद शाळा बोरमळीचा उपक्रम....

Image
👉त्या विद्यार्थ्यांनीला मिळाला ध्वजारोहणाचा मान... 👉जिल्हा परिषद शाळा बोरमळीचा उपक्रम... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी: धाबा केंद्रातून पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र एकमेव विद्यार्थिनी भावना कमलदास राठोड हिच्या हस्ते जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे २६ जानेवारी रोजी ध्वज फडकविण्यात आला नावीन्यपूर्ण उपक्रम पाहून आलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये व नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरला .  बोरमळी जिल्हा परिषद शाळा आयएसओ नामांकित असल्यामुळे सरपंच वंदना राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीने शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनी भावना राठोड करण्याचा ठराव मंजूर करण्याचा मुख्याध्यापक केशव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श शाळा,  डिजिटल शाळा,  संगणक लॅब, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा यासाठी लोकवर्गणीतून विशेष फंड उभा केला जात आहे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींसह शिक्षण हेमंत पद्मने , इंदिरा राठोड , देवकर , घडविण्याचे कार्य करीत आहेत.  ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा ...

👉आशा स्वयंसेविकांची पदभरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात...👉निवड झालेल्यांपैकी ३ महिला उमेदवार व निवड समीतीवर कारवाईची मागणी

Image
👉आशा स्वयंसेविकांची पदभरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात... 👉निवड झालेल्यांपैकी ३ महिला उमेदवार व निवड समीतीवर कारवाईची मागणी बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : स्थानिक नगरपंचायत क्षेत्रात आशा स्वयंसेविकांची निवड शासनाच्या परिपत्रकानुसार झाली नसल्याने दिनांक २१ ते २७ सप्टेंबर २०२३ या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निवड प्रक्रिया महिला उमेदवार अपात्र असून निवड झालेल्या तीनही आशा स्वयंसेविकांची निवड खोट्या व दिशाहीन कागदपत्राच्या आधारे करण्यात आली आहे त्या कागदपत्राची चौकशी करून खोट्या व दिशाहीन कागदपत्रे सादर करणाऱ्यावर कलम १९३, १९९, व २०० संबंधित कायद्यानुसार कारवाई करून घेण्यात आलेली निवड प्रक्रिया रद्द करण्याचे मागणी सह चुकीच्या पद्धतीने निवड झालेल्या निवड समितीच्या पाचही अधिकारी कर्मचाऱ्यांवर म.ना.से शिस्त व अपील अधिनियमन १९७९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याची मागणीची तक्रार पदवीधर महिला उमेदवार मीनाक्षी संदीप शिरसाठ व वैशाली हेमंत वानखडे रा. अशोक नगर बार्शिटाकळी यांनी दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला , सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिष...

इंदिरा नगर येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर संपन्न....

Image
इंदिरा नगर येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर संपन्न.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी  : येथील वार्ड क्र. १६ इंदिरा नगर  येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर घेण्यात आले. शिबिर घेण्यासाठी परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.या शिबिरात एकूण २०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड काढून दिली जात आहे त्या अंतर्गत शनिवारी दिनांक २७ जानेवारी रोजी इंदिरा नगर येथे सदर शिबिराचे आयोजन माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ईमरान खान इरफान खान यांनी केले होते. परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सदर आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन व आयोजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तथा माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान इरफान खान यांनी केले, सदर शिबिरामध्ये आरोग्य कर्मचारी डॉ शेळके सर, राम बायस्कर, डॉ विनोद चव्हाण,डॉ. सागर घोटेकर, डॉ.मनोज बागुल, डॉ गजानन देवकाते,डॉ.प्रशांत म्हस्के, ईमरान खान ईरफान खान माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य ...

बलुतेदारीतून झालेली घुसमट 'गोंडर' कादंबरीतून आली आहे - अशोक कुबडे

Image
बलुतेदारीतून झालेली घुसमट 'गोंडर' कादंबरीतून आली आहे - अशोक कुबडे बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  ___________________________________ -स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भाषा संकुलात चर्चासत्र - मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा __________________________________ बारा बलुतेदारी पध्दतीतून आलेले वेदनादायी अनुभव मांडताना गोंडर या कादंबरीचे कथानक उभ राहिले आहे. गाव गाड्यात बारा बलुतेदारांनी आपल्या वाट्याला आलेले काम इमानेइतबारे करून समाजाची सेवा केली पण या व्यवस्थेमध्ये बलुतेदाराच्या वाटयाला बलुत्यात गोंडरच मिळाले असल्याने या बारा बलुतेदारी पद्धतीत बलुतेदार असलेल्या वारिक समाजाची घुसमट झाली ती घुसमट माझ्या 'गोंडर' या कादंबरीत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. असे मत 'गोंडर' कादंबरीचे लेखक अशोक कुबडे यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भाषा वाड़:मय आणि अभ्यास संकुल आणि ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 'मुक्त चर्चा कादंबरीकारांशी' या कार्यक्रमात 'मी आणि माझे कादंबरी लेखन' य...

👉डॉक्टर वेलुक्युर असोसिएशन बार्शिटाकळी च्या वतीने भव्य रोग निदान शिबिर संपन्न... 👉४०० च्या वर रूग्णांनी घेतला शिबीराचा लाभ

Image
👉डॉक्टर वेलुक्युर असोसिएशन बार्शिटाकळी च्या वतीने भव्य रोग निदान शिबिर संपन्न... 👉४०० च्या वर रूग्णांनी घेतला शिबीराचा लाभ  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : बार्शिटाकळी शहरात भव्य रोग निधन व व उपचार शिबिर संपन्न आपल्या देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिवसाच्या पर्वावर आपण समाजाला काही देण आहे या भावनेतून बार्शिटाकळी  येथील डॉक्टर वेलुक्युअर असोसिएशनने दिनांक 26 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी स्थानिक दयावान फंक्शन हॉलमध्ये भव्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजित केले होते सदर शिबिरात अकोल्यातील नामांकित वैद्यकीय मंडळींनी विविध प्रकारचे आजाराचे निदान व उपचार केले आज रोजी पार पडलेल्या रोगनिदान व उपचार शिबिरात विविध आजाराच्या ४००  रुग्णांनी लाभ घेतल्याचे आयोजकांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले या शिबिराला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर वेलुक्युअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सैय्यद तनवीर जमाल , डॉ. माजिद अली ,डॉ. नासिर काजी , डॉ .जूनेद अली, डॉ . काशीफ खान , डॉ. तहसीन,  डॉ. वासिल, डॉ. रवी कापकर, डॉ . डी. एम. काकड, डॉ .सुनील जाधव , डॉ. शशी जाधव,  ड...

प्रजासत्ताक दिना निमित जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी..

Image
प्रजासत्ताक दिना निमित जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज शुक्रवारी जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान येथे विविध उपकर्माचे आयोजन करण्यात आले होते प्रथमता शाळाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक शफिक अहमद खान राही यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शासनाचे निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी मा केंद्रप्रमुख शाहिद इकबाल खान सरफराज खान यांची उपस्थिती होती यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र महान यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शाळेत करण्यात आले होते यावेळी महान प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी डॉ किरण महादेवराव साबे डॉ प्रियंका बोचरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र महान यांनी वर्ग एक ते आठ मधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे मोफत उपचार बाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छताचे मूलमंत्र देऊन हात धुण्याची विव...

बार्शिटाकळी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा...

Image
बार्शिटाकळी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .  आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शहरातील विविध शासकीय कार्यालयात तथा सामाजिक व राजकीय मंडळींनी मोठ्या उत्साहाने 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला यामध्ये नगरपंचायतला प्रशासक तथा प्र. मुख्याधिकारी विजय लोहकरे , बाबासाहेब धाबेकर विद्यालय , सावित्रीबाई फुले विद्यालय, गुलाम नबी आझाद महाविद्यालय, पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती तदनंतर सकाळी ९:१५ मिनिटांनी स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले . यावेळी पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवंदना दिली यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे , निवासी नायब तहसीलदार श्रीमती हर्षदा काकाड, महसूल नायब तहसीलदार आर बी, डाबेराव, निवडणूक ना. तहसीलदार विनोद ...

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला उत्तर..

Image
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला उत्तर.. श्री. नाना पटोले, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री. रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात. तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चामध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा INDIA आघाडीच्या युतिसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आल...

👉अतिक्रमण धारक रहिवासी यांना जागेचे पट्टे बहाल करण्यासाठी राहिलेले पेंडिंग काम पूर्ण करा....! 👉नाहीतर 12 फेब्रुवारीला उपविभागीय कार्यालय येथे जनआंदोलन करू वंचितचे लखन इंगळे यांचा इशारा...

Image
👉अतिक्रमण धारक रहिवासी यांना जागेचे पट्टे बहाल करण्यासाठी राहिलेले पेंडिंग काम पूर्ण करा....! 👉नाहीतर 12 फेब्रुवारीला उपविभागीय कार्यालय येथे जनआंदोलन करू वंचितचे लखन इंगळे यांचा इशारा... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोट : गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आंदोलन कर्ते वंचित चे लखन इंगळे यांनी उपविभागीय अधिकारी आकोट यांना निवेदन देऊन रहिवाशी अतिक्रमण धारक यांच्या संदर्भात साहेबांसी चरच्या करण्यात आली निवेदन मध्ये मागणी अशी होती कि आकोट शहरातील रहिवाशी अतिक्रमण धारक हे 1995 च्या अगोदर पासुन त्यांच्या आजोबा पणजोबा पासुन रहिवाशी आहेत अस्या अतिक्रमण धारक यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी त्यांना जागेचे पट्टे बहाल करण्यात यावे असे निवेदन लखन इंगळे यांनी 2019 पासुन तर 2023 परियंत देऊन वारंवार आंदोलन केले त्याचा पाठपुरावा केला त्या निवेदन ची दखल नगर परिषद आकोट यांनी घेतली व एजेंशी मार्फत काही वार्डात न. प.आकोट यांनी कॅमेरा द्रोण द्वारे काही वार्डात सर्वे करण्यात आला व अतिक्रमण धारक यांचे फायली मागून नजूल शीट नकासे तयार करण्या...

वंजारी पुरा येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर संपन्न....

Image
वंजारी पुरा येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर संपन्न.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी  : येथील वार्ड क्र. 13 वंजारीपुरा पंचमाढी येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर घेण्यात आले. शिबिर घेण्यासाठी माजी नगर उपाध्यक्ष सौ. मनीषा भारत बोबडे यांनी सहकार्य केले. एकूण 188 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड काढून दिली जात आहे त्या अंतर्गत बुधवार व गुरुवार वंजारी पुरा येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सदर आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्याचे आवाहन व आयोजक भारत बोबडे यांनी केले असून , सदर शिबिरामध्ये आरोग्य कर्मचारी डॉ शेळके सर, राम बायस्कर, डॉ विनोद चव्हाण,डॉ. सागर घोटेकर, डॉ.मनोज बागुल, डॉ गजानन देवकाते,डॉ.प्रशांत म्हस्के, गजानन धाईत, प्रल्हाद पिंजरकर, संदीप करणकर, प्रशांत बडोदेकर, अंकित बोबडे ,गजानन आखाडे, भास्कर ग्याने,दिनकर सावळे, शिवानंद खोडके, राजू ठाकूर, प्रल्हाद कपकर,दामू करपे ,रामदास सांगळे, गुड्डू कापकर, दीपक कळसाइत, राम धाईत, वर्षा रमायाने, हरिद...

अवैध धंदे बंद करण्याची मागणी वंचित युवक आघाडीने बार्शीटाकळी पोलीस निरीक्षकांना निवेदन.....

Image
अवैध धंदे बंद करण्याची मागणी वंचित युवक आघाडीने बार्शीटाकळी पोलीस निरीक्षकांना निवेदन.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शीटाकळी : मंगळवार 23 जानेवारी रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, महिला शहराध्यक्षा सुनीता धुरंधर, तालुका महासचिव अक्षय राठोड व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व गावांमध्ये देशी-विदेशी, गावरान दारू, झन्ना-मन्ना, पाटा आणि पट्टा का डाव, ऑनलाइन मटका, कल्याण-मुंबई-वरळी मटका, पेट्रोल, गुटखा पुडीचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे सांगण्यात आले. गांजा आदी अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे गावातील लहान मुले व तरुण व्यसनाधीन झाले आहेत. या अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे घराघरात रोज मारामारी होत असून त्यामुळे महिलांचे जगणे विस्कळीत होत आहे. अवैध धंदे करणाऱ्या धंदे वाल्यांना गावातील नागरिक समजाविण्यास गेल्यास अवैध धंदेवाल्याकडुन सर्व सामान्य जनतेला दहशत पसरवीली आहे. पोलीस आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत असे सांगुन नागरीकांना परेशान करीत आहेत. याकरिता बार्श...

प्रभु श्रीराम यांची भव्य दिव्य शोभायात्रा बार्शिटाकळी शहरात संपन्न....

Image
प्रभु श्रीराम यांची भव्य दिव्य शोभायात्रा बार्शिटाकळी शहरात संपन्न.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्या धाम येथे श्रीराम नवनिर्माण मंदिरामध्ये प्रभु श्रीराम यांच्या मुर्तीसह श्रीराम, लक्ष्मण,भरत,क्षतृगुण, रामभक्त हनुमानजी यांच्या रामदरबारात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अवचित्त साधुन दिनांक २२ जानेवारी २०२४ ला ऐतिहासिक संतांच्या वास्तव्याने पावन असलेली नगरी मा कांलका देवीच्या खोलेश्वर नगरी मध्ये महाप्रसाद व महाआरती व भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली हि शोभायात्रा संपुर्ण बार्शिटाकळी शहर तसेच बार्शिटाकळी तालुक्यांच्या वतीने करण्यात आली. हि शोभायात्रा हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.  या शोभायात्रेत हे.भ.प. नामदेव महाराज शिंदखेडराजा व मेहकर येथील टाळकरी व मृदगाचार्य सांप्रदायिक भजन दिंडी , गजानन नगर मधील गुरूदेव महिला भजनी मंडळ, यां सोहळ्यात होते. हिवरा आश्रम येथील चांदीचा रथ व त्या रथा मध्ये राम, लक्ष्मण,सिता, हनुमान यांच्या वेशभूषा धारण करून रथामधे विराज मान होते  ...

शेगाव येथे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर संपन्न...!

Image
शेगाव येथे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर संपन्न...! बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  :महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आरोग्य विभागातील  वेगवेगळ्या पदावर काम करा कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर दिनांक 21 जानेवारी रोजी शेगाव येथे पंचायत समिती भवन येथे संपन्न झाला. 1नोव्हेंबर २००५ पुर्वी अस्थायी सेवेच्या आधारावर १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचारी यांचे जुनी पेंन्शन संबंधित २१ जानेवारी २०२४ शेगांव  पंचायत समिती परिसर येथील सभेचे नियोजन  करण्यात आल होते.. महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना रजिस्ट्रेशन नंबर 38 81 आमचे राज्य अध्यक्ष अशोकराव जयसिंगपूरे साहेब. सदर सभेला प्रमुख मार्गदर्शक होते.  क्षेत्र कार्यकर्ता/ नियमीत क्षेत्र कार्यकर्ता,  बंधपत्रीत तसेच जाहिरात पुर्वी ची , नियुक्ती नंतर असलेल्या आरोग्य सेविका A.N.M/ अधिपरीचारीका GNM ,... १ नोव्हेंबर २००५ नियुक्ती पुर्वी ग्रामपंचायत मध्ये काम करीत असलेले कर्मचारी व नंतर समायोजन झालेले कर्मचारी....

अल फलाह उर्दू शाळेत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर उत्साहात.....

अल फलाह उर्दू शाळेत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर उत्साहात.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या सत्पाहभरापासून वर्षाकडे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे याकरिता आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मोफत वाटप करण्यात येत आहे शुक्रवार व शनिवार अल फलाह उर्दू प्राथमिक शाळा खडकपूरा येथे सदर शिबिर उत्साहात पार पडले. आतापर्यंत संपूर्ण शहरात अकराशे नागरिकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने काढून देण्यात आले यामध्ये खडकपूरा येथील 200 नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला नगरसेविक लायका खान सरफराज खान व उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.शाहीद इक्बाल खान सर्फराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये आरोग्य कर्मचारी डॉ .विनोद चव्हाण , डॉ .सागर गोठेकर, आरोग्य सेवक राम बायस्कर , डॉ. मनोज बागुल, डॉ. गजानन देवकते, आरोग्य सेविका आठवले यांनी योगदान दिले यावेळी मोहम्मद अय्यन ,नासिरूद्दीन, वकार खान, शेख मकसुद व मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती होती . तांत्रीक अ...

👉गावात रोजगार नाही ; मजुरांचे स्थलांतर..... 👉 बार्शिटाकळी तालुक्यातील शेतशिवारावर संकट.... 👉 उद्योग धंद्याची वानवा...

👉गावात रोजगार नाही ; मजुरांचे स्थलांतर 👉 बार्शिटाकळी तालुक्यातील शेतशिवारावर संकट  👉 उद्योग धंद्याची वानवा  बार्शिटाकळी : नाही नैसर्गिक संकटात शिवरायाची बिकट परिस्थिती तालुक्यात एकही उद्योग नसल्याने रोजगारांची वनवा व लोकप्रतिनिधी शासनाच्या सुदर्शन धरणामुळे बार्शीटाकळी तालुक्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे बार्शीटाकळी तालुक्यात अनेक वर्षापासून रोजगाराची ओरड सुरू आहे ग्रामस्थ रोजगार नसल्याने सेट सावकाराकडे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतात तर काही छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यावर कुटुंबाचा खर्च भागवत आहेत परंतु आता जानेवारीत रोजगाराच्या समस्या जाणू लागल्या आहेत त्यामुळे मजुरांची भटकती होत आहे.  तरूणाईचीही पावले कामाच्या शोधात पद भरतीच्या आता फारसा शासकीय जाहिराती निघत नाहीत पर्याय कचराटी भरती देखील नाही तसेच छोट्या व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होत नसल्याने कामाच्या शोधा येत आहेत अल्पशिक्षित तरुण तरुणी मोल मजुरी करीत आहेत तर बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण झालेले तरूण शहरात छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करीत आहेत यामध्ये उच्च शिक्षित तरुणही आहेत.  बार्शिटाक...

ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण बार्शिटाकळी येथे संपन्न अभिसरणाच्या माध्यमातुन शास्वत विकास साधावा - सत्र समन्वयक सुधीर सरकटे

Image
ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण बार्शिटाकळी येथे संपन्न अभिसरणाच्या माध्यमातुन शास्वत विकास साधावा - सत्र समन्वयक सुधीर सरकटे  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत बार्शिटाकळी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांचे प्रशिक्षण यशदा पुणे जिल्हा परिषद अकोला व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्या शितल मेटकर, निर्देशक नागसेन बागडे, गटविकास अधिकारी ताणी साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिता इंगळे मॅडम ,विस्तार अधिकारी रमेश चव्हाण साहेब दिपक इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली सत्र समन्वयक सुधीर सरकटे यशदा प्रशिक्षक रोहिदास भोयर, गणेश पोटे, विशाल बकाल किरण हिवराळे यांनी गावाचा पर्यायाने ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळतांना उपयुक्त ठरणारी माहिती क्षमता बांधणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत असताना कार्यात गतिमानता येण्याकरिता सरपंच उपसरपंच सदस्यांचे...

अमरावतीच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सल्ला !

Image
अमरावतीच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सल्ला ! श्रावण भातखडे  अमरावती : काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर, जेल मध्ये जातील. काँग्रेस – राष्ट्रवादी – उध्दव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समझोता करावा. समझोता नाही झाला तर, तुम्ही जेल मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथील लोकशाही गौरव महासभेतून महाविकास आघाडीला दिला आहे. दोन वर्ष ओलांडली तरीही, काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना यांच्यात समझोता झाला नाही. अजूनही लोकसभेच्या 48 जागा यांना वाटता आल्या नाहीत. मला राहून राहून शंका येते की, यांना खरचं मोदी आणि भाजपला हरवायचं आहे का ?असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही कुरबानीचा बकरा नाही. तुम्ही तुमच्या जागा वाटून घ्या. आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या आम्ही ज्यांच्याकडे गेल्यात त्यांच्यासोबत वाटाघाटी करू घेऊ आणि नाही जमलं तर 48 च्या 48 जागा आम्ही लढवायला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. वंचित बहुजन आघडीपैकी जेल मध्ये एकही जाणार नाही मात्र, जेल मध्...

मनसेचे प्रदेश चिटणीस विजय पोहनकर यांचा आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश....

Image
मनसेचे प्रदेश चिटणीस विजय पोहनकर यांचा आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे राज्य चिटणीस, बारा बलुतेदारांच्या जीवनाचा सखोल अभ्यासक.८०० वर्षाचे बलुतेदार त्यांचे जीवनमान ह्यावर लिखाण. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे दिग्दर्शक, बारा बलुतेदार महासंघाचे राज्य प्रवक्ता, मनसे माथाडी कामगार सेनेचे माजी विदर्भ संपर्क नेते, भाकर मराठी चित्रपट चे लेखक/दिग्दर्शक/निर्माता, १९९३ पासून शैक्षणिक चळवळीत सहभाग .आदिवासी अतिक्रमण वनजमीन धारक चळवळीचे नेते.छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आई सावित्रीबाई, राजमाता जिजाऊ ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनावर उत्तम व्यख्यान करणारे मा. विजय सहदेवराव पोहनकर यांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज यशवंत भवन अकोला येथे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते आपल्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ महासचिव बाल...

बार्शिटाकळी येथे शेतकरी विकास मंच शाखेची स्थापना....

Image
बार्शिटाकळी येथे शेतकरी विकास मंच शाखेची स्थापना.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शेतकरी विकास मंच शाखेचे बार्शिटाकळी येथे आज दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी शेतकरी विकास स्थापन झाली . ह्या नवनिर्वाचित शाखेच्या अध्यक्षपदी रिजवान खान, उपाध्यक्ष पदी प्रकाश माणिकराव, डिगाबंर जाधव, सचिव शरद ढोरे, सहसचिव नदीम उल हक, तर बार्शिटाकळी तालुका प्रशिध्दी प्रमुख मुर्तुजा बेग व सदस्य म्हणून नासिरोद्दीन शेख, फरहान खान, फैजान खान, नदीम पठाण, फय्याज काजी, शेख जुनेद, मुजीब जागीरदार , मोहम्मद अनीस, इलियास खान , वसीम खान, लुकमान खान , संतोष खडसे , नासिर खान , तौशिफ खान, मुसब्बीर जावेद, जामनिक, यांची सर्वानुमती निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रिजवान खान यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश माणिकराव यांनी केले सुत्रसंचलन मुर्तुजा बेग यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले

👉सैन्य दलाच्या नावाचा वापर करून जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न.... 👉औषधी विक्रेत्यांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे संघटनेचे आवाहन....

Image
👉सैन्य दलाच्या नावाचा वापर करून जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न 👉औषधी विक्रेत्यांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे संघटनेचे आवाहन  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : मागील कित्येक दिवसापासून अज्ञात व्यक्ती स्वतःला सैन्य दलाचा अधिकारी सांगत फोन कॉल आणि व्हाट्सअप द्वारे औषधी पाहिजेत म्हणून औषधी विक्रेत्यांना बोलून त्यांना व्हाट्सअप यादी टाकत पेमेंट करण्याच्या नावावर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड व फोन पे, गुगल पेची काही गोपनीय माहिती विचारून लुबाडण्याचे काम करत होता .  अकोला जिल्हा केमिस्टं ड्रगिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना पूर्ण प्रकरणाची माहिती दिली व त्यांनी लगेच या विषयाची गंभीरता घेऊन तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण सुपूर्द करून चौकशीचे आदेश दिले गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत चौकशी सुरू केली पदाधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांनी सायबर सेलची मदत घेऊन लोकेशन घेतले त्यातून असे दिसून आले की सदर कॉल्स करणारी टोळी ही ...

बार्शिटाकळीच्या जि. प. उर्दू कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात....

Image
बार्शिटाकळीच्या जि. प. उर्दू कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : स्थानिक जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत १८ जानेवारीला आनंद मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मेळाव्याचे उद्घाटन शाळेतील दिव्यांग विद्यार्थी अक्सीम खान अरिफ खान व अलविना आयात यांच्या हस्ते करण्यात आले .  बाल आनंद मेळाव्याचे आयोजन बार्शिटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बार्शिटाकळीच्या सभापती सुनंदा मानतकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपसभापती संजय चौधरी , विस्तार अधिकारी प्रमोद जानोरकर , केंद्रप्रमुख शफिक अहमद खान,  शिक्षक नेते अरुण धांडे , माजी केंद्रप्रमुख शाहिद इक्बाल खान, मुख्याध्यापक राहुल्हा खान , शरद राठोड,  निलेश बनसोडे, मुख्याध्यापक अक्तर उल अमीन हे होते प्रास्ताविक मुख्याध्यापक रिजवानोद्दीन काजी यांनी केले विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावे व त्यांची व्यवसा...

बार्शिटाकळी येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थिती मध्ये युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश.......

Image
बार्शिटाकळी येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थिती मध्ये युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश..... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी : आज दिनांक 18/01 /2024 रोजी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय बार्शिटाकळी येथे मुर्तीजापुर मतदार संघाचे आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे,भाजप मुर्तिजापूर विधानसभा निवडणुक प्रमुख राजू पाटील काकड,भाजप तालुका अध्यक्ष बार्शिटाकळी संजय पाटील इंगळे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संदीप राठोड, नवनियुक्त भाजप शहर अध्यक्ष प्रवीण धाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शिटाकळी येथील भारतीय जनता पक्षामध्ये गोपाल कापकर, राम भडांगे ,संतोष आखाडे ,सचिन भडांगे, रवी हिराळे ,अमोल मुळे ,अक्षय रामायणे, गणेश कापकर, सचिन वराडे ,जगदीश वराडे ,पांडुरंग वानखडे ,भारत चांगले ,आकाश वराडे ,संतोष सांगळे, राहुल कापकर, संदीप बोबळे संजय मोहोकार ,विजय तंबोकार,सागर करपे, अस्पाना बी खान इत्यादी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला . यावेळी जोगदंड गुरुजी,पंचायत समिती उपसभापती संदीप चौधरी, पुष्पाताई रत्नपारखी, महफुज उल्ला खान, गजानन लुले विस्तार...

डॉ. सै. गरीब उर्दु प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न....

Image
डॉ. सै. गरीब उर्दु प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : बेरार तालीमी कारवा व डॉ सैय्यद गरीब उर्दू शाळा बार्शिटाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन साहेब, प्रमुख उपस्थिती मध्ये बार्शिटाकळीचे नगराध्यक्ष हाजी महेफूज खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे साहेब , संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सैय्यद जहागीर , जेष्ठ नेते सैय्यद मीर साहेब , अहमद सेठ उपस्थीत होते  या कार्यक्रमात २० विद्यार्थाना प्रमाणपत्र व शिल्ड व पुच्छ गुच्छ देऊन पुरस्कार वितरीत करण्यात आले या कार्यक्रमासाठी असद खान , मोहम्मद शोहेब , शेख अजहर, सैय्यद असद अली , अय्युब खान , रईस शेख व मुखाध्यापक व शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते

वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवस बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा.....

Image
वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवस बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा..... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : दिनांक १५ जानेवारी  रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते मा. सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने  बार्शिटाकळी बालकशा बाबा दर्गा येथे चादर चढवण्यात आली व खोलेश्वर मंदिर येथे दूध अभिषेक करण्यात आले यावेळेस प्रमुख उपस्थिती श्रीकांत भाऊ घोगरे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष ,राजकुमार भाऊ दामोदर जिल्हा महासचिव , कोषाध्यक्ष दादाराव भाऊ पवार तथा पंचायत समिती सदस्य , जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ इंगळे , ऍड सुबोध भाऊ डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष , आनंद भाऊ खंडारे जिल्हा सचिव, सचिन भाऊ शिराळे माजी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व यावेळेस आमचे संविधान आमचा स्वाभिमान लोकशाही गौरव महासभेला शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी वेळ दुपारी २ वाजता या ठिकाणी सायन्स स्कोर मैदान अमरावती येथे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने नागरिकांना उपस्थित ...

पोलिसाच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या ! 👉पोलीसांवर हल्ले करणाऱ्यांची खैर नाही..

Image
👉पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या !  👉पोलीसांवर हल्ले करणाऱ्यांची खैर नाही.... 👉“पोलीसांवर हल्ले करणाऱ्यांची खैर नाही, पोलीस अधीक्षक यांचे भेटी नंतर सतत २० तासांच्या शोध मोहीमे दरम्याण, पोलीस गाडीवर गोळीबार करणारे ०५ आरोपीना विविध ठिकाणाहून जेरबंद करण्यास स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांना मिळाले यश.” 👉पोलीस अधीक्षका यांचे भेटीनंतर १८ तास राबवीली जम्बो शोध मोहीम. 👉०४ अधिकारी आणि २८ अमंलदार यांचा सहभाग. ➤ रात्र भरात शेगाव, हातरून, नखेगाव, नेर थामना, वाशिम जिल्हयातील रिसोड येथून असे एकुण ०५ आरोपी ताब्यात. 👉गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकली जप्त. 👉शिकारीच्या उद्देशाने फिरत असलेले आरोपी पोलीस गाडी पाठलाग करीत असल्याचे आणि आपण पकडले जणार या भितीने एका आरोपीने केला पोलीस गाडीवर गोळीबार.... दिनांक ३०/१२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील रात्रगस्त करणारे अधिकारी हे त्यांचे सहकारी सोबत कर्तव्य बजावीत असतांना रात्री ०३:०० वाजताच्या सुमारास ग्राम मांजरी वरून हातरून कडे जात असतांना पोलीस गस्त वाहनाला दोन मोटार सायकलीवर असलेल्या ईसमांवर संशयीत ईसम द...

👉दगडपारवा येथे नमो चषक कबड्डी सामन्यातील प्रेक्षक गॅलरी कोसळून ५० हुन जास्त जखमी...

Image
👉दगडपारवा येथे नमो चषक कबड्डी सामन्यातील प्रेक्षक गॅलरी कोसळून ५० हुन जास्त जखमी. 👉जखमींना अकोल्यातील रुग्णालयात दाखल केले .. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : बार्शीटाकळी शहरालगत असलेल्या दगडपारवा स्थित तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या नमो चषक कबड्डी सामना दरम्यान प्रेक्षक गॅलरी तुटल्याने ५० हुन जास्त नागरिक जखमी झाले हकीकत अशाप्रकारे आहे की मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक १२ जानेवारी २४ ते १४ जानेवारी २४ पर्यंत नमो चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत राज्यभरातून महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. गत दोन दिवसापासून स्पर्धा सुरळीतपणे सुरू होती आणि आज दिनांक १४ जानेवारी हा शेवटचा दिवस त्यातच रविवार असल्यामुळे सदर स्पर्धेतील कबड्डी सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी मैदानावर तीन प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आल्या होत्या परंतु लाकुड व बांबूचा वापर करून बनवण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीपैकी सर्वात मोठी गॅलरी आज दिनां...

🏘️ 'गोंडर' कादंबरी चा महाराष्ट्राच्या राजधानीत सन्मान...... 📚 ________________________________________

Image
🏘️ गोंडर' कादंबरी चा महाराष्ट्राच्या राजधानीत सन्मान...... 📚  ________________________________________ महाराष्ट्राची राजधानी तथा मायानगरी म्हणून ओळखली जाणारी स्वप्ननगरी मुंबई मध्ये माझ्या 'गोंडर' या कादंबरीचा "मराठा मंदिर" या नामवंत संस्थेकडून प्रथम पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या संस्थेचे अध्यक्ष असून ही संस्था गेल्या ७७ वर्षापासून महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मराठा मंदिरच्या साहित्यातील कादंबरी प्रकारातील प्रथम पुरस्कार 'गोंडर'या माझ्या कादंबरीला प्रदान करण्यात आला. मी आणि माझा बाप या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव डॉक्टर अजय काकोडकर आदी मान्यवरांची उपस्थित कार्यक्रम झाला. आजवर कधीही न गेलेला मी मुंबईला "गोंडर" या कादंबरीच्या निमित्ताने गेलो. माझ्यासाठी मुंबई ही नवीन होती. अनेक काम आली होती..पण जाण्याचा योग आला नाही.. पण "गोंडर" कादंबरीने मला थेट मुंबई दाखवली.असेही म्हणायला हरकत नाही.म्हणूनच मुंबईला पाहून. अबब...मुंबई...! हे शब्द तोंडातून बाहेर पडणं काही नवीन न...

👉25 हजारांचे बक्षीस जाहीर... 👉पोलीस अधीक्षक गोळीबारीच्या ठिकाणी पोहोचले...

Image
👉25 हजारांचे बक्षीस जाहीर...  👉पोलीस अधीक्षक गोळीबारीच्या ठिकाणी पोहोचले... अकोला - पोलीस ठाणे उरळ येथील मांजरी फाटा ते कंचनपूर  रस्त्यावर ३१ डिसेंबर रोजी गस्त घालत असताना मोटारसायकलवरून आलेल्या संशयिताचा पोलिसांनी पाठलाग केला असता संशयिताने पोलीस वाहनावर गोळीबार केला. त्यामुळे उरळ पोलीस ठाण्यात कलम 432/2023, कलम 353, 336, 34 भादंवि कलम 3, 25 आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा आजपर्यंत खुलासा न झाल्याने पोलीस अधीक्षक बच्चन सिंग व अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी एएसपी गोकुळ राज, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह गोपाल जाधव व एस.टी.जी.एस. या पथकात सहा प्रवर्तनकर्ते आणि उरळ पोलीस ठाण्याचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि मा. पोलिस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना गुन्ह्याचा पर्दाफाश करून तपास करण्याचे निर्देश दिले.  पोलिस प्रशासनाने पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. क...