अकोला जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक करा -संघटनेच्या अध्यक्ष संगीता जाधव यांची मागणी.....
अकोला जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक करा -संघटनेच्या अध्यक्ष संगीता जाधव यांची मागणी              बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना करावी लागतात अनेक प्रकारच्या डाटा एन्ट्री अकोला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रावर  डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नेमणूक करा  अशा मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद अकोला श्रीमती अनिता मेश्राम मॅडम यांना महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील आरोग्य सेविका , सेवक,ग्रामीण भागात आरोग्य सेवा देतात, आरोग्य विभाग हा अतिदक्षतेचा विभाग असून कुठल्याही प्रकारचे कर्तव्य जबाबदारीत काटकसर राहणार नाही याची सुद्धा आरोग्य विभागाच्या कार्यालयातून त्या बाळगून सर्व संवर्ग तांत्रिक पद्धतीने कर्तव्य जबाबदारी पार पाडण्याची मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेले आहेत परंतु गेल्या कित्येक वर्षापासून विविध संगणक कामे अन्यायकारक लादुन वरिष्ठांच्या स्थानिक प्रशासनाच्या सक्तीमुळे...