∆निंभोरा येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींवर 307 या गुन्ह्याची वाढ करुन तात्काळ अटक करण्यात यावी........... ∆मुख्य सुत्रधार आरोपी शांताराम दाणे हा राज्याच्या सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष.......

∆निंभोरा येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींवर 307 या गुन्ह्याची वाढ करुन तात्काळ अटक करण्यात यावी....... ∆मुख्य सुत्रधार आरोपी शांताराम दाणे हा राज्याच्या सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष........ अकोला - तेल्हारा तालुक्यातील निंभोरा बु. येथील बौद्ध समाजातील दामले परिवारावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जिल्हाधिकारी अकोला यांना आरोपींवर 307 या गुन्ह्याची वाढ करुन तात्काळ अटक करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन दिले. तेल्हारा तालुक्यातील निंभोरा बु. येथील बौद्ध समाजातील दामले परिवारावर 21 जानेवारी 2023 ला मध्यरात्री 11:30 वाजताच्या दरम्यान जातीवादामुळे आरोपी शांताराम दाणे याने आपल्या 30 ते 40 सह आरोपींसमवेत प्राणघातक हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्याला आजपर्यंत 10 दिवस उलटून गेले तरी अटक करण्यात आली नाही. ह्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हा राज्याच्या सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याने त्याला व त्या सहकाऱ्यांना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने व सदर गुन्ह्...