तीन कोटी पंचवीस लाखाच्या रस्त्याची वंचित बहूजन युवा आघाडीची शोध मोहीम.....
तीन कोटी पंचवीस लाखाच्या रस्त्याची वंचित बहूजन युवा आघाडीची शोध मोहीम..... कुठल्याही प्रकारचे उद्घाटन झालेले नसताना सिंदखेड ते बार्शीटाकळी ह्या मागील वर्षी तयार केलेल्या रस्त्यावर साईट भराव टाकून सव्वातीन कोटींचा बनावट काम सुरू असून बुलढाणा मधील आंबेटाकळी पासून कापशी ते बार्शीटाकळी ह्या एक वर्षापूर्वी झालेल्या रस्त्यावर साइट भरून तीन कोटी पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याने वंचित बहूजन युवा आघाडी ने आज शोध मोहीम राबविली. उद्घाटनाची तारीख न टाकता उदघाटन जाहीर करणाऱ्या भाजप जनप्रतिनिधी च्या रस्ताकामातील भ्रष्टाचार बाबत वंचित बहूजन युवा आघाडी कडून पोलखोल करीत काही दिवसांपूर्वी झालेल्या वृक्ष रोपीत झाडे देखील कंत्राटदार कडून काढून घेण्याचा संतापजनक प्रकार उघडकिस आला आहे.वनविभागाने हे वृक्ष लावले होते, परंतु त्यांना ह्या घटनेची जाणीव असताना वन विभाग मूग गिळून गप्प बसून आहे.आंबेटाकळी हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव असून भरतपूर ते वाडेगाव दिंडी मार्ग तयार झाला आहे, सोबतच कापशी भरतपूर रस्ता काम सुरू आहे.कापशी मार्गे सिंदखेड हा रस्ता अगदी वर्षे भरा आधी झालेला असून...