Posts

Showing posts from June, 2022

जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक कन्या शाळा बार्शीटाकली येथे शाळा पूर्व तयारी कार्यक्रमा मध्ये सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व पुस्तके वाटप....

Image
जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक कन्या शाळा बार्शीटाकली येथे शाळा पूर्व तयारी कार्यक्रमा मध्ये सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व पुस्तके वाटप.....  बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी. स्थानिक जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा येथे प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.       कार्यक्रमा चे प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार संजय सोळंके हे होते. जिल्हा परिषद मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या उर्दू कन्या  शाळे च्या पहिल्या दिवशी बार्शीटाकली येथील शाळेत विध्यार्थ्यांन मध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव पहा याला मिळाला. जिल्हा परिषद उर्दू कन्या प्राथमिक शाळा मध्ये प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जावेद अथर खान हे होते.यावेळी पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पुस्तक देऊन तसेच बिस्कीट देऊन स्वागत करण्यात आला.शाळेचा पहिला दिवस प्रवेश उत्सव म्हणून मान्यवरांची उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वी होईल यासाठी वर्ग शिक्षक मोहम्मद शाकीर व मोहम्मद खलील यां...

मोझरी खु.शिवारात मृत अवस्थेत आढळला पट्टेदार वाघ

Image
*मोझरी खु.शिवारात मृत अवस्थेत आढळला पट्टेदार वाघ* बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  *डीसेंबर 2018 मध्ये याच शिवारात वाघ दिसत असल्याने या परिसरातील शेतकरी बांधवानी शेतात जाणे बंद केले होते.या चार पाच महीण्यात ब-यापैकी गुरांची शिकार केली असल्याने या परिसरात वाघाचा वावर असल्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. यामुळे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपल्या सहका-यांसह वनविभागासोबत शेतकरी बांधवांच्या सांगण्यावरून या पातुर नंदापुर, सोनखास, दुधलम,मोझरी बु., मोझरी खु.,या जंगलात सर्च ऑपरेशन राबवुन संपुर्ण जंगल पिंजुन काढले होते.यामुळे शेतकरी बांधवांना भयमुक्त केले होते. हे विशेष*   ▶️ अकोला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पो.स्टेशन हद्दीतील मोझरी खु. व सोनखास शेत शिवारा जवळील जंगलात नाल्यालगत आज सकाळी एक पट्टीदार वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली,या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी आणी पिंजर पो.स्टेशन चे ठाणेदार आणी पोलीस कर्मचारी तसेच सं...

ग्रामीण भागात एस टी बसेस सुरू करण्यात याव्यात - मनसेचे निवेदन

Image
ग्रामीण भागात एस टी बसेस सुरू करण्यात याव्यात - मनसेचे निवेदन बार्शीटाकळी                महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका बार्शीटाकळी कडून ग्रामीण भागातही बस चालू करण्याकरता अकोला विभाग नियंत्रक यांना निवेदन दिल्या गेले असून संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष सचिन पाटील गालट यांनी अकोला विभागिय नियंत्रक रा. प. म.यांना निवेदन सादर केले असून निवेदनानुसार बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा मार्गे जाणाऱ्या अकोला ते धानोरा तसेच अकोला ते चिखलगाव आणि अकोला ते मालेगाव ह्या तीन बसेस त्वरित चालू करण्यात याव्या ही विनंती केली असून शाळकरी , महाविद्यालयीन विद्यार्थी , रोजगारासाठी रोज ये जा करणारे आणि रूग्न यांचे हाल होत असून त्यासाठी बसेस लवकर सुरू करण्यात यावा असा निवेदनात उल्लेख केला असून लवकर बसेस सुरु होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे .                सदर निवेदन देते वेळी गजानन काळे , कल्पनाताई राठोड , उमेश कोकाटे , शिवप्रताप मेघाडे...

वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने निवासी नायब तहसीलदार यांची तहसिदार बार्शिटाकळी यांच्या कडे तक्रार

Image
निवासी नायब तहसीलदार यांची तहसिदार बार्शिटाकळी यांच्या कडे तक्रार वंचित बहुजन आघाडी व युवक आघाडी च्या वतीने तहसील कार्यालय बार्शीटाकळी येथे निवासी नायब तहसीलदार काकड मॅडम यांच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली. आज रोजी विद्यार्थी शाळेच्या ऍडमिशन साठी,स्रावण बाळ योजनेसाठी, उत्पन्न दाखला याची गरज पडते बरेच दाखले मॅडमच्या टेबलवर असून सुद्धा माझ्याकडे नाहीत, बाहेर चौकशी करा अशी उत्तर दिली जातात.आज पर्यंत पं समिती जिल्हा परिषद मार्फत बऱ्याच योजना शेतकऱ्यांना दिली जातात. परंतु प्रत्येक योजनेची तारीख दिली असते बऱ्याच दाखल्याची पूर्तता वेळेवर होतं नसल्याने आजही जनता योजनेपासून वंचित राहातात वेळेवर दाखला देण्यात मॅडम टाळतात. लहान मुलं, म्हातारे, यांना बराच त्रास सहन करावा लागतो. आम्ही एका दाखल्याची चौकशी केली असता मॅडम म्हटल्या माझ्या जवळ नाही. पण तो दाखला त्याच्याच टेबलवर निघाला. काकड मॅडमची बोलण्याची शैली सुद्धा व्यवस्तीत दिसून येत नाही. जा कॅबिन च्या बाहेर अश्या प्रकारचे उत्तर मिळतात. तारीख देऊन सुद्धा दाखला मिळत नाही म्हणून पैसा खर्च करून आलेला माणसाला परत जावे लागते. म...

नवनिर्वाचित वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी यांचा बार्शिटाकळी येथे सत्कार

Image
नवनिर्वाचित वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी यांचा बार्शिटाकळी येथे सत्कार  बार्शिटाकळी प्रतिनिधी  ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये,वंचित बहुजन युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष आ.निलेशजी विश्वकर्मा व प्रदेश महासचिव आ. राजेंद्र दादा पातोडे यांच्या मार्गदर्शनात बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष पदी आ. अमोल भाऊ जामनिक महासचिव पदी अक्षय राठोड, संघटक पदी श्रीकृष्ण दहात्रे, कोश्याधक्ष पदी नितेश खंडारे, यांची नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ पं समिती बार्शीटाकळी येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला उपस्तित पं समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, प्र. ता. अध्यक्ष दादाराव सुरडकर,पं समिती सदस्य , रोहिदास राठोड,दादाराव पवार दिनेश मानकर, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन, गोबा शेठ, सै रियासत, नगर पं उपाध्यक्ष सुरेश जामनिक, नगर सेवक अनिल धुरंधर, आरोग्य सभापती सुनील शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, माजी सभापती भारत भाऊ निकोशे, गोर सेना जिल्हा अध्यक्ष रतन आडे,मिलिंद करवते, प्रा विलास वाहूरवाघ,अजहर भाई, अनिल खंडारे,वसंता चव्हाण, गजानन जाधव, श्रीकृष्ण भगत, श्रीकृष्ण...

वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनियुक्त बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष अमोल जामनीक यांच्या निवडीचा जल्लोष

Image
वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनियुक्त बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष अमोल जामनीक यांच्या निवडीचा जल्लोष  *वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अमोल काशीराम जामनीक यांची नियुक्ती झाल्याबद्दल बार्शिटाकळी बायपास येथे स्वागत करण्यात आले त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत ते त्यांच्या निवडीचे श्रेय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हा अध्यक्ष, व तालुक्यातील व शहरातील सर्व कार्यकर्ते यांना देतात.   यावेळी पंचायत समिती चे सभापती प्रकाश वाहुरवाघ, प.स.सदस्य दादाराव पवार, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, गोबा शेठ, माजी तालुकाध्यक्ष भारतभाऊ निकोसे, श्रावण रामदास भातखडे नगरसेवक, समाज सेवक अनील धुरंधर, शुध्दोधन ईगळे, उमेश गंवई, ईमरान खान,अजहर पठाण, श्रीकृष्ण देवकुणबी, सै‌ . रियासत, रतन आडे, शिलवंत ढोले, हरिश रामचवरे, रक्षक जाधव,  आदि कार्यकर्ते उपस्थित होते . 

अल फ्लाह उर्दू प्राथमिक बार्शीटाकळी येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

Image
अल फ्लाह उर्दू प्राथमिक  बार्शीटाकळी येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी  बार्शीटाकळी प्रतिनिधी खलिद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्था द्वारा संचालित अल फ्लाह उर्दु प्राथमिक शाळा खडकपुरा बार्शिटाकळी येथे आज दिनांक 26.06.2022  रोजी रविवारी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन व समता दिंडी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक बिस्मिल्ला खान हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक उपाध्यक्ष शाहिद इकबालखान अलिमुद्दिन बेपारी आदी प्रमुख यांना उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमेला हार अर्पण करण्यात आली यावेळी अध्यक्षीय भाषण संपन्न झाले सदर कार्यक्रमाला मोहम्मद भाई राजेश अवचार मंगेश इंगळे ज्ञानेश्वर आवचार नासिरुद्दीन मोहम्मद रियान अब्दुल खलील गोहर अली खान अबे खान वकार खान खान अफजल खान शाळेचे मुख्याध्यापक गुलाम फारुख शाळेतील शिक्षक शब्बीर अहमद शेख मनांन सखा उल्लाखान समिउल्ला अब्दुल रशीद समाजातील प्रतिष्ठित नागरिक उप...

बार्शिटाकळी येथे विविध ठिकाणी राजश्री छ्त्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी च्या वतीने विविध कार्यक्रम घेवुन साजरी करण्यात आली

Image
बार्शिटाकळी येथे विविध ठिकाणी राजश्री छ्त्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली  प्रतिनिधी , बार्शिटांकळी , स्थानिक बार्शिटाकळी शहरात गौतम नगरात वचीत बहूजन आघाडीच्या वतीने विविध लोकहीत   कार्यक्रम राबवून राजश्री छ्त्रपती शाहू महाराज यांची जंयती वंचीत बहूजन आघाडी चे ज्येष्ठ नेते नई मोदीन शेख यांच्या अध्यक्ष स्थानी जंयती साजरी करण्यात आली , सदर कार्यकमात प्रारभी, छ्त्रपती शाहू महाराज य़ाची प्रतिमे ले ज्येष्ठ  नेते शेख नईमोद्दीन यांचे हस्ते हारार्पण करुन मानवंदना देण्यात आली , त्या कार्यक्रमात  वंचीत बहुजन आघाडीचे ता ,निरिक्षक सनी भाऊ धुरंधर ने आयोजन केल्या प्रमाणे त्या शिबीरात गोर गरिब गरजू मंजुर महिला व नागरिका' ना रोजगार कामासाठी . मोफत ई , श्रम कार्ड वाटप करण्यात आले , इतर वंचीत नागरिका चे मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यात आले त्या दोन्ही कार्यक्रम बदल नागरिकानी उत्साहाने भाग देऊन सहभागी होऊन उत्कृष्ठ प्रतीसाद दिला. त्यावेळी राजश्री छ्त्रपती शाहू महाराज यांनी प्रत्येक . सामाजीक कार्या बदल लोकाचे  विकास साठी केलेले कार्याची ...

परवाज़ एज्युकेशन गाईडन्स फोरम तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कैरियर गाइडेंसवर चर्चा

Image
परवाज़ एज्युकेशन गाईडन्स फोरम तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कैरियर गाइडेंस वर चर्चा. बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी २६ जून,          स्थानिक दयावान फंक्शन हॉल मध्ये परवाज एज्युकेशन गाईडन्स फोरम बार्शिटाकळी तर्फे सत्कार समारंभ व कैरियर गाइडेंस कार्यक्रम घेण्यात आला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद इरफान अली सर हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये नगर अध्यक्ष हाजी महफूज खान,नईम फराज, जमिअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम, मुफ्ती साद खान,डॉ, मुजाहिद, शफीक अहमद खान राही सर, मुनज्जीर अली खान ,हे हो, कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठण करून करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आला नुकत्याच दहावी आणि बारावी मध्ये प्रथम द्वितीय आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शील्ड मेडल व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला, सत्कार मूर्ती मध्ये बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शिटाकळी सावित्रीबाई फुले विद्यालय बार्शिटाकळी गुलाम नबी आझाद विद्यालय बार्शिटाकळी व इतर शाळांचे विद्यार्थी होते, सत्कार समारंभा नंतर प्रमुख पाहुण्यांनी...

बार्शीटाकळी मध्ये अवैध रित्या प्रतिबंदित गुटखा वाहतुक व देशीदारु वाहतुक करणाऱ्या 2 अरोपीसह कार्यवाहीत 1,07,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

Image
बार्शीटाकळी  मध्ये अवैध रित्या प्रतिबंदित गुटखा वाहतुक व देशीदारु वाहतुक करणाऱ्या 2 अरोपिसह कार्यवाहीत  1,07,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त   विशेष पथकाची कार्यवाहि  आज दि, 24, 06,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की धाबा ते  बार्शिटाकळी रोडावर 2 इसम हे मोटरसायकल वरुन प्रतिबंदित गुटखा व देशीदारु वाहतूक करून पुरवठा करण्याचे कामकाज करीत आहेत त्यावरून  धाबा गावासमोरिल रस्त्यावर नाकाबन्दी केली असता मोटरसायकल नम्बर MH 30AR 7990 फॅशन प्रो गाड़ीवर 2 पोते प्रतिबंदित गुटखा ज्यमध्ये  प्रतिबंदित गुटखा  विमल , सितार, कालिबहार, वाह ज्यांची कीमत  24,000 रुपये, 1 देशीदारु चा बॉक्स ज्यात 100 नग देशीदारु च्या बॉटल कीमत 3000 रुपये 3 मोबाइल कीमत 30000 रुपये असा ऐकून 1,07,000 रूपयांचे गुटखा व देशीदारु विनापरवाना बाळगुन वाहतूक करताना मिळून आल्याने अरोपी (1), रोशन माणिक जाधव 23, रा लोहगड , ( 2) महादेव रामराव खराट्टे वय 50 वर्ष रा  लोहगड  यांच्या विरुद्ध पो स्टे बरषिताक़ली येथे कलम 328...

बार्शीटाकळी शहरवासीयांना स्वच्छ , सुरक्षीत पिण्याचे पाणी देण्याकरिता डॉक्टर वेलक्युअर असोसिएशन तर्फे नगराध्यक्षांना निवेदन

Image
*बार्शीटाकळी शहरवासीयांना स्वच्छ , सुरक्षीत पिण्याचे पाणी लवकर मिळून देणे डॉक्टर वेलक्युअर असोसिएशन तर्फे नगराध्यक्षांना निवेदन*  बार्शीटाकळी (तालुका प्रतिनिधी)22 जून  बार्शीटाकळी डॉक्टर वेलक्युअर असोसिएशन तर्फे नगराध्यक्ष नगरपंचायत बार्शीटाकळी यांना निवेदन देण्यात आले यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार आहे की त्याला सुरक्षीत व स्वच्छ पिण्याचे पाणी वैयक्तिक आणि घरगुती वापरासाठी मिळावे . मात्र कित्येक वर्षापासून बार्शीटाकळीवासी आपले हक्काचे पाणी मिळण्यापासून वंचीत आहेत . बार्शीटाकळी शहरातील पाणी पुरवठा योजनेकरीता शासनाने नगर पंचायतला २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे वर्तमानपत्रातून वाचण्यात आले आहे . बार्शीटाकळीत पाणीटंचाई आहे जे पाणी शहरातील लोकांना मिळते ते मोठ्या प्रमाणात दुषित पाणी असून बार्शीटाकळी शहरामध्ये अतिसार ( Diarrhoea ) , आमांश ( Dysentery ) , विषमज्वर ( Typhoid ) इत्यादी आजार मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत , त्यामुळे सार्वजनिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे . तरी बार्शीटाकळी शहरातील नागरीकांना स्वच्छ , शुध्द पाण्याअभावी होणाऱ्या आरोग्याच्या ...

श्री संत सेना प्रतिष्ठान तर्फे नाभिक समाजाच्या गुणवंताचा होणार गौरव..

श्री संत सेना प्रतिष्ठान तर्फे नभिक समाजाच्या गुणवंताचा होणार गौरव अकोला प्रतिनिधी श्री संत सेना प्रतिष्ठान खदान या संस्थेतर्फे अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवार दिनांक 11 जुलै रोजी घेण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावी या परीक्षा मध्ये 75 टक्के आणि त्याहून अधिक अधिक मास विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत 8 जुलै पर्यंत द्यावी . अनंतराव वाठुरकर, विवेकानंद वाठुरकर, हर्षद वाटुरकर , भास्कर वायकर,  गणेश रुद्रकार,  देविदास पिंजरकर लहान उमरी यांच्याकडे पाठवावे असे प्रतिष्ठानचे सचिव नंदूभाऊ बोपुलकर यांनी आवाहन केले आहे .  सहायता साहित्य प्राप्तीसाठी मागविले अर्ज तसेच श्री संत सेना महाराज नाभिक समाज शैक्षणिक सहायता मंडळातर्फे अकोला तालुका व अकोला शहर येथील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्ग एक ते बारा पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मंडळाचे तयार केलेले सहायता साहित्य प्राप्तीसाठीचे अर्ज पाच जुलै पर्यंत जमा करावे असे आवाहन नाभिक समाज शैक्षणिक...

शाफिक राही यांची उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार

Image
शाफिक राही यांची उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार  बार्शीटाकळी प्रतिनिधी अकोला जिल्हा परिषद च्या वतीने नुकताच पदोन्नती प्रक्रिया पार पडली असून यामध्ये अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ शिक्षकांना विस्ताराधिकारी उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली आहे त्यामध्ये जग प्रसिद्ध कवी डॉक्टर मेहबूब राही यांचा मुलगा अकोला जिल्हा परिषद मध्ये विषय शिक्षक या पदावर कार्यरत असलेले शफीक अहमद खान राही यांची महान जिल्हा परिषद शाळेवर उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली आहे त्याबद्दल बार्शी टाकळी येथील उर्दू शिक्षक संघटना कडून त्यांचे निवासस्थानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या वेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद उर्दू शाळा इंद्रा नगर येथील मुख्याध्यापक काजी रिजवानउद्दीन हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून खालीद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्था ची उपाध्यक्ष डॉ शाहिद इक्बाल खा जिल्हा परिषद शाळा, बिहाड माता महानचे मुख्याध्यापक सैफुद्दीन जिल्हा परिषद उर्...

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष पदी अनिसोद्दीन तर कार्य अध्यक्ष पदी शाहिद इक्बाल खान

Image
*अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्हा अध्येक्ष पदी अनिसोद्दीन तर कार्य अध्यक्ष पदी शाहिद इक्बाल खान* बार्शीटाकली अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्हा शिक्षक कार्यकारणी नुकताच राज्य कार्यकारणी ची वतीने घोषित करण्यात आली आहे या मध्ये अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे जिल्हा अध्येक्ष पदी बार्शीटाकळी इंद्रा आवास येथील जी प शाळेचे मुख्याध्यापक अनीसोद्दीन कुतबोद्दीन यांची निवड करण्यात आली असून जिल्हा कार्य अध्येक्ष पदी डॉ शाहिद इक्बाल खान यांची तसेच जिल्हा सचिव पदी रइस अहेमद निसार अहेमद यांची एक मताणे निवड करण्यात आली आहे उपरोक्त तिन्ही शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांवर  अकोला जिल्हा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे अकोला जिल्हा अध्यक्ष अनीसोद्दिन , कार्यअध्यक्ष शाहिद इक्बाल खान , सचिव राईस अहेमद निसार अहेमद यांना सादर पद निवडी बाबत चे पत्र अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे राज्य अध्येक्ष इल्हाजुद्दीन फारुकी अमरावती विभाग प्रमुख एहसन अहेमद शेख चांद यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे उपरोक्त तिन्ही नवनिर्वाचित पदाधिकारी...

एकनाथ शिंदेसह या ४० आमदारांचा खर्च करतोय कोण ?…सामान्यांना पडलेला प्रश्न…

Image
एकनाथ शिंदेसह या ४० आमदारांचा खर्च करतोय कोण ?…सामान्यांना पडलेला प्रश्न… June 22, 2022 फोटो -सौजन्य सोशल मिडिया काल पासून राज्यात एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवून आणला आहे, मुंबई ते सुरत आणि तेथून गुवाहटी प्रवास प्रत्येक मिनिटांची घडामोड आपल्याला न्यूज च्या माध्यमांतून पाहायला मिळत आहेत. गुवाहाटी पोहचल्यावर भाजपचे आमदार, खासदार हे बंडखोर आमदारांचे स्वागत करायला हजर होते. त्याच बरोबर आमदारांना घेवून जाणाऱ्या बस मध्ये भाजपचे आमदार संजय कुटे व मनोज कम्बोज दिसले. मात्र या दोन दिवसात फडणवीस कुठेच दिसले नाहीत, ना कोणत्याच मीडिया समोर आले नाहीत…मात्र प्रत्येक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते या बंडखोर आमदारांच्या पाठीमागे खास लक्ष देवून होते. तर एकीकडे शिंदे म्हणतात मी पक्ष सोडला नाही, सोडणारही नाही, भाजपा सोबत गेलो नाही असे जरी सांगत असले तरी राज्यातील जनतेला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही. अगदी सर्व काही सुरळीत सुरु असताना आताच तुम्हाला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण झाली. तर एकनाथ शिंदे यांच्या काही आमदारांना भाजपच्या एका बड्या नेत्याने मुंबईहून सुरत गाठण्यासाठी मदत केली. यातील काही...

बेपत्ता असलेले आमदार नितीन देशमुख ग्रुप फोटोत…सोबतच अकोल्याचे पालकमंत्रीही…

Image
बेपत्ता असलेले आमदार नितीन देशमुख ग्रुप फोटोत…सोबतच अकोल्याचे पालकमंत्रीही… June 22, 2022 फोटो -सौजन्य सोशल मिडिया बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख बंडखोर आमदारांच्या ग्रुप फोटोत दिसले याच बरोबर मध्यरात्री सुरतच्या विमानतळावरही मिडीयाच्या कॅमेऱ्यात दिसले आहेत. याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शेजारी बसून असलेले अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू हेही दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. काल अकोल्यात माझे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी दिली होती. नितीन देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरतला आल्यामुळे देशमुख नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांचे शिंदे यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. देशमुख यांना सध्या सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. विशेष म्हणजे रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना हॉटेलमधून बाहेर जायचे होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांची पोलिसांशी बाचाबाची ...

परवाज करिअर गाईडअन्स तर्फे 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी.......

Image
परवाज करिअर गाईडअन्स तर्फे 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी.....  बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी. स्थानिक परवाज गाईडअंस तर्फे दयावान फांक्शन हाॅल येथे दिनांक 25 जुनं रोजी शनिवारी दुपारी 2 वाजता 10 वी व 12 वी कक्षा मध्ये चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले ल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात बार्शी टाकळी शहरातील बाबासाहेब धाबेकर विद्यालय,गुलाम नबी आझाद महाविद्यालय तसेच सावित्री बाई फुले विद्यालय येथील चांगले गुण घेतलेल्या विद्यार्थी सहभाग घेणार असून सदर कार्यक्रमात प्रमुख मार्ग दर्शक महणून पातूर येथील कमरुझ्झामा सर हे लाभणार आहे.     परमुख अतिथी म्हणून तहसीलदार गजानन हामद साहेब, नगरअध्यक्ष हाजी मेहफूज खान, पोलिस निरीक्षक संजय सोळंके, जमिअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम,मुस्लिम पर्सनल ला चे मुफ्ती साद खान, जमात ए इस्लामी हिंद चे तालुका अध्यक्ष डॉ मुदासिर उल्ला खान हे राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन परवाज चे कनविनर सय्यद नाशित आली यांनी केले आहे...

स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांची कारवाई;अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई, एक देशी कट्टा मॅगझिनसह जप्त

Image
स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांची कारवाई; अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई, एक देशी कट्टा मॅगझिनसह जप्त   आज दिनांक २०/६/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि गोपाल जाधव व त्यांचे तपास पथकातील कर्मचारी यांना गोपनिय माहिती मिळाली की पो. स्टेशन बार्शिटाकळी हद्दीतील खडकपुरा येथील राहणारा शेख वसीम उर्फ कचौडी  शेख नवाब वय २५ हा लोकांमध्ये दहशत पसरविण्याचे उद्देशाने त्याचे जवळ अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून आहे. अशा खात्रीलायक माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि गोपाल जाधव यांनी पोलीस स्टाप व पंचासह जुने बस स्थानक ता बार्शिटाकळी जिल्हा अकोला येथे सापळा रचून एक देशी कट्टा व मॅगझीन किंमत १२००० ₹ मिळुन आल्याने आरोपी याचे जवळुन जप्त करण्यात आला असून त्याचे विरूद्ध पो. स्टेशन बार्शिटाकळी येथे अप. क्र. ३१८/ २२ कलम ३ , २५ आर्म ऑक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक साहेब जी श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक मॅडम श्रीमती मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष महल्ले स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पोउप...

गरजूंना आवश्यक वस्तू देउन डॉ मधुकर पवार यांचा वाढदिवस साजरा

Image
गरजूंना आवश्यक वस्तू देउन डॉ मधुकर पवार यांचा वाढदिवस साजरा गरजूंना आवश्यक वस्तू देउन डॉ मधुकर पवार यांचा वाढदिवस साजरा करताना   निराश्रितांना सोलापूर चादरचे वितरण बाघातली देवी मंदिर , शनी मंदिर येथे प्राचार्य डॉक्टर मधुकरराव पवार यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त फळं व आवश्यक वस्तुचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे वार्ड मध्ये जाऊन रुग्णांना फळवाटप करण्यात आले मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला चे संस्थापक अध्यक्ष व गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी जिल्हा अकोला चे प्राचार्य ज्यांनी २८ वर्ष सतत प्रचार्यची धुरा सांभाळणारे महाराष्ट्रातील एकमेव प्राचार्य व १९८० - ८१ पासून सतत ४२ वर्ष सेवा देणारे प्राचार्य बार्शीटाकळी तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणणारे आज पर्यंत जवळपास आठ हजार पाचशे विद्यार्थी या महाविद्यालयातून निघून वेगवेगळ्या हूद्यावर डॉक्टर इंजिनीयर वकील प्राध्यापक सैनिक शिक्षक व महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या अनेक नोकऱ्यांमध्ये ...

मुस्लिमांचा सांस्कृतिक एकटेपणा घालवायला हवा’

Image
*मुस्लिमांचा सांस्कृतिक एकटेपणा घालवायला हवा’*  मुस्लिमांच्या रोजगार, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, या सर्वच प्रश्नांवर काम करत संघर्ष आणि रोजगार असे काम करणाऱ्या नांदेडच्या फारुख अहमद सर यांच्या वर हेंरब कुळकर्णी यांचा लेख *  गेल्या महिन्यात नांदेड शहराच्या गोदावरी नदीकाठची जीएम कॉलनी नावाची मुस्लिम वस्ती बघितली. दर पावसाळ्यात पाणी शिरून तिथले संसार पाण्यावर तरंगतात... सगळीकडे बाभळींचं रान आणि डुकरांचा सुळसुळाट...प्यायला पाणी नाही...रोजगार नसल्यानं पुरुष आणि महिला जे मिळेल ते काम करतात...शाळेत न जाणारी मुलं...बालविवाह होणाऱ्या मुली...लहान वयातच मुलं-मुलींना करावं लागणारं काम...दिवसभर कष्ट उपसूनही महिलांना मिळणारा अल्प मोबदला...त्या वस्तीची ही स्थिती बघून खूप निराशा आली. नांदेड शहरात अशा अनेक मुस्लिम वस्त्या आहेत आणि त्यांत हजारो मुस्लिम राहतात. शिक्षण घेऊनही नोकरी लागत नसल्यानं हातगाडी, फळविक्री, फेरीवाले, रिक्षा चालवणं, घरकाम करणं, पानपट्टी, बिगारी अशी कामं पुरुष करतात आणि महिला घरेलू कामगार म्हणून काम करतात. अशा कष्टकरी मुस्लिम समुदायाला आधार देणारे, दिशा देणारे का...

वंचित बहुजन आघाडीचे जलसमाधी आंदोलन

Image
वंचित बहुजन आघाडीचे जलसमाधी आंदोलन यवतमाळ:- ढाणकी ते गांजेगाव तालुका उमरखेड येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रमुख रस्ता तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसंदर्भात वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम तसा उमरखेड तालुक्याच्या वतीने पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या वेळी जिल्हा अध्यक्ष धनंजय गायकवाड जिल्हा महासचिव डी.के दामोधर, जॉन्टी विंनकरे मौलाना सय्यद हुसेन नगरसेवक संबोधी गायकवाड संतोष जोगदंड यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनास प्रशासनाच्या वतीने प्रचंड पोलिस बंदोबस्त लावून पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी ने यशाची परंपरा ठेवली कायम

Image
बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी ने यशाची परंपरा कायम बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 17 जुन        स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाला मध्ये दर वर्षी प्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली अहे, राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून विद्यालयात ९३.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात मराठी माधयमचे ९६. ६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच उर्दू माधयमचे ९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात उर्दू माध्यमातून प्रथम क्रमांक जावेरीया अनम सैय्यद अन्सार, आणि सुमय्या सदफ या विद्यार्थिनी ९१.८० टक्के गुण प्राप्त केले तसेच लिजा फिरदौस शेख मतलूब याने ९१.४० टक्के गुण प्राप्त करून व्दितीय क्रमांक आली, तर तृतीय क्रमांक मानिया अरमिन साजिद उल्लाह खान, मिसबा सादिया वाहिद खान , नजमुस्सहेर मुर्तुजा बेग या तीनही विद्यार्थ्यांना समान टक्केवारी ९१.११ टक्के गुण प्राप्त केले तसेच मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक शरयू संतोष वाटमारे यांनी ९३.०० टक्के द्वितीय क्रमांक अथर्वा रामेश्वर ढोरे ...

गृहमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यामुळे उद्याचा अमन मार्च तूर्तास स्थगित करण्यात येत आहे - ॲड. प्रकाश आंबेडकर

Image
गृहमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यामुळे उद्याचा अमन मार्च तूर्तास स्थगित करण्यात येत आहे - ॲड. प्रकाश आंबेडकर  16, जुन रोजी  मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करावी आणि राज्य सरकारने मोहम्मद पैगंबर बिल पास करावे या मागणीसाठी १७ जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमन मार्च चे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्यामुळे मदनपुरा ते आझाद मैदान निघणारा अमन मार्च तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित अमन मार्चला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत होता. मोठ्या संख्येने लोक या अमन मार्च मध्ये सहभागी होणार होते. मात्र काही समाजविरोधी घटक या मोर्चाला वेगळे वळण देऊन वातावरण बिघडवू शकतात त्यामुळे हा मार्च काढू नये अशी विनंती पोलिस आयुक्त संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यां...

गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय वर भव्य जनआंदोलन मोर्चा

Image
गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय वर भव्य जनआंदोलन मोर्चा   गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या संदर्भात आज लखन इंगळे यांच्या नेतृत्वात भव्य जनआंदोलन मोर्च्या काढण्यात आला.आकोट शहारातील व ग्रामीण भागातील घरकुल,अतिक्रमण जागेचे,श्रावणबाळ योजनेचे विधवा,संजय गांधी,निराधार,अपंग दिव्यांग,पगार मिळाला नाही असे वृद्ध कलावंत यांचे यांचे मानधन मंजूर झाले नाही असे लाभार्थी गुंठेवारक, तहसीलदार लेआउट,घर टॅक्स जास्त आकरलेले,एपिएल राशनकार्ड वर धान्य मिळत नाही असे अनेक लाभार्थी यांच्या हक्काच्या मागण्यासाठी भव्य जनआंदोलन मोर्च्या लाभार्थी सह उपविभागीय अधिकारी,तहसीलदार आकोट यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,मा. जिल्हाधीकारी साहेब अकोला यांना विविध मागणीचे संधर्भात तहसील वर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.या मोर्चाला काही संघटनेनी पाठींबा दिला महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती व गट ग्राम पंचायत आडगाव खु. एकता युवा मंच आकोट यांचा विशाखा महिला मंडळ आकोट यांचा पाठींबा देण्यात आला व मोर्च्या शांततेत काढण्यात आला.जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्...

बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व मस्जिद चे इमाम व मौलवी यांची सभा संपन्न.........

Image
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व मस्जिद चे इमाम व मौलवी यांची सभा संपन्न.........  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.      स्थानिक पोलिस स्टेशन येथे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व मस्जिद चे इमाम व मौलवी यांची सभा आज सायंकाळी 6 वाजता घेण्यात अली.       सभे मध्ये शुक्रवार ची नमाज पठण बद्दल तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त असे आवाहन यावेळी करण्यात आले. सभे मध्ये जमिअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम, जामा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अजीज उललाह खान, मौलाना एजाज,मौलाना सईद बेग,मौलाना अब्दुल सालिम,हाफीज खालिद उर रहेमान, अब्दुल समद इमाम, मुफीज खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खुपिया विभाग प्रमुख किशोर पींजरकर यांनी केले. 

लखन इंगळे यांच्या नेतृत्वात गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या साठी भव्य जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला

Image
लखन इंगळे यांच्या नेतृत्वात गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्यासाठी भव्य जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला......  आज दिनांक 16 जुन 2022 रोजी अकोट येथे भारिप बहुजन महासंघाचे तालुका उपाध्यक्ष लखन इंगळे यांच्या नेतृत्वात गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या संदर्भात भव्य जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला व त्या मध्ये सर्व आकोट शहारातील व ग्रामीण भागातील घरकुल चे लाभार्थी , अतिक्रमण जागेचे लाभार्थी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी , विधवा,संजय गांधी निराधार , अपंग दिव्यांग , पगार मिळाला नाही असे लाभार्थी वृद्ध कलावंत यांचे मानधन मंजूर झाले नाही असे लाभार्थी गुंठेधारक लाभार्थी, तहसीलदार यांचे लेआउट लाभार्थी, घर टॅक्स जास्त आकरलेले लाभार्थी ए.पि.एल राशनकार्डावर धान्य मिळत नाही असे लाभार्थी यांच्या हक्काच्या मागण्यासाठी भव्य जनआंदोलन मोर्च्या लाभार्थी सह उपविभागीय अधिकारी साहेब आकोट /तहसीलदार साहेब आकोट यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र राज्य मुंबई व मा. जिल्हाधीकारी साहेब अकोला यांना विविध मागणीचे लाभार्थी सह निवेदन देण्यात आले या मोर्चाला विविध संघटनांनी पाठींबा ...

गुलाम नबी आझाद महाविद्यालयात दिक्षांत समारंभ संपन्न

Image
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात दिक्षांत समारंभ संपन्न  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवीदान ( दिक्षांत ) समारंभ नुकतेच डॉ पंजाबराव देशमुख सभागृह अमरावती येथे महाराष्ट्राचे राज्यपाल व कुलपती श्री भगतसिंग कोशारी व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा नामदार श्री उदय सामंत  व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांच्या उपस्थितीमधे संपन्न झाला. या पदवीदान समारंभात गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी चे एकुण ८ विद्यार्थी प्रथम मेरिटमध्ये आलेत तेव्हा त्यांना त्याठिकाणी पदवी बहाल करण्यात आली . तेव्हा उर्वरित विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आज दिनांक 16 जून गुरुवारला प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. यावेळी मंचकावर प्राचार्य डॉ मधुकरराव पवार ,डॉ विनोद खारोडे ,प्राचार्य भाऊसाहेब लहाने महाविद्यालय पिंजर डॉ वाय पी सिंग,उप प्राचार्य डॉ आर आर राठोड उपप्राचार्य डॉ अमित वैराळे  हे उप...

पिंजरच्या मानसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन ने गिरविले मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Image
🚣‍♂️ *पिंजरच्या मानसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन ने गिरविले मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे* *पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणचा पुढाकार* *नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी त्या संबंधित आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन ग्रामस्थ तसेच युवा वर्गांनी प्रशासनासोबत सहभागी होऊन मदतीसाठी सामोरे जाण्यासाठी सरसावले पाहीजे हे आजच्या काळासाठी अतिशय महत्वाचे आहे.* दिपक सदाफळे पिंजर (जिवरक्षक) ▶️ *पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणसह हद्दीतील सर्व पो.क. आणी होमगार्ड तसेच पो.पा.व ईतर विभागाचे शासकीय प्रतिनिधी कर्मचारी यांना एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व उपाययोजना आणी सज्जता याविषयावर रंगीत तालीमसह मार्गदर्शन कार्यक्रमातुन दीले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे* ⏩ *वाशिम दि.7 जुन 2022 रोजी पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणच्या पि.एस.ओ. महक स्वामी मॅडम प्रोबेशनल (IPS) यांच्या आदेशाने मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने वाशीम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर मान्सून परीस्थितीत उद्भवणा-या आपात्कालीन घटनांमध्ये पूर परिस्थितीत करावयाच्या कार्यवाही आणी त्यावर उपाययो...

जुने शहर ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी कागदपत्रांची शहानिशा करूनच मला न्याय द्यावा

Image
जुने शहर ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी कागदपत्रांची शहानिशा करूनच मला न्याय द्यावा   08, 2022 जुने शहर ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी कागदपत्रांची शहानिशा करूनच मला न्याय द्यावा! प्रतिनिधी अकोला=शेत सर्वे नंबर 25/२ मध्ये बी एस एन एल चे केबिन नंबर 37 याची कुठल्याही प्रकारची कागदोपत्री चौकशी न करता पोलिस प्रशासनाला हाताशी धरून वरील गैरअर्जदार क्रमांक 1 2 3 4 व 5 हे सर्व सरकारी जागेला नुकसान पोचवीत असून सदर जागेवर ताबा मिळत असून तेथील सरकारी जागेचे नुकसान करीत आहेत सदर बांधकाम हे दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस रोजी दुपारी एक ते तीन दरम्यान काही पोलीस कर्मचारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांची शहानिशा न करता बांधकाम पाडण्यात आले सदर बाब याची कल्पना आधी गोवर्धन वाघाडे व त्यांचे भाऊ अरुण वाघाडे या दोघांनी जुने शहर पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची योग्य ती कार्यवाही करण्यात आली नसून उलट वरील गैरअर्जदार यांना मदत करीत असून जुने शहर ठाणेदार वानखडे साहेब मला दमदाटी व धमकी देत ...

बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी ने यशाची प्रथा ठेवली कायम

Image
बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी ने यशाची प्रथा ठेवली कायम. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी         स्थानिक बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाला मध्ये दर वर्षी प्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली अहे, राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी चा निकाल आज जाहीर झाला असून कनिष्ठ महाविद्यालयात ९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात विज्ञान शाखेचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच मराठी कला शाखेचे १०० टक्के तर उर्दू कलाचा निकाल ९९ टक्के लागला त्यात विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक सोबिया अहजाम काजी निसारउद्दीन , या विद्यार्थिनी ८६.३०% टक्के गुण प्राप्त केले तसेच नगरसेवक बबलु काजी यांचा मुलगा  काजी अशरोद्दीन बबलू काजी याने ८५.८३ टक्के गुण प्राप्त करून व्दितीय क्रमांक आला, तर तृतीय क्रमांक अमिमा तसनिम अब्दुल मोहसीन ८५.५० टक्के गुण प्राप्त केले तसेच मराठी कला शाखेतून प्रथम क्रमांक निलखन किरण परशुराम यांनी ७८.१६ टक्के द्वितीय क्रमांक सावळे पल्लवी किशोर याने ६९.६६ टक्के तर तृतीय क्रमांक राठोड शालिनी अविनाश ...

शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तक बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांना पुस्तकाचे वितरण

Image
*शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तक* बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांना पुस्तकाचे वितरण बार्शिटाकळी प्रतिनिधी :-  बार्शिटाकळी पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत गट शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक मिळावी सदर बाब समोर ठेवून आज बुधवारी बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी आस्थापनेवरील शाळांना शालेय पुस्तकाचे वितरण करण्यात आले यावेळी बार्शीटाकळी तालुक्यातील महान बार्शी टाकळी पिंजर ज मकेश्वर परंडा कान्हेरी आळंदा पिंपळकोटा गोरवा बिजोरा राहित कातखेळ इत्यादी ग्रामीण भागातील शाळेतील शिक्षकांनी बुधवारी बाबासाहेब धाबेकर विद्यालय येथील सभागृह मधून पुस्तकाचे वितरण करण्यात आले बार्शीटाकळी पंचायत समिती च्या वतीने शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच पुस्तकाचे वितरण करण्यात आल्यामुळे शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे हाती पुस्तक मिळण्याचे मार्ग सुकर झाले आहे विदर्भातील शाळा येत्या 26 जून पासून हुं सुरू होणार आहे पंचायत सम...

झाडे लावा,पर्यावरण वाचवा, ऑक्सिजन वाढवा. शब्बीर शहीद

Image
झाडे लावा,पर्यावरण वाचवा, ऑक्सिजन वाढवा. शब्बीर शहीद....      बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.     स्थानिक मिनारा मस्जिद चौक अकोली बेस येथे पर्यावरण दिनी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शब्बीर शाहिद यांनी गावातील शाळे करी मुलांना सोबत घेऊन परिसरात झाडे लावण्यात आले.तसेच पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले.      या वेळी झाडे लावा व झाडे जगवा या बद्दल होणारे फायदे व याचे महतत्व या ची सखोल माहिती देण्यात आली.       या वेळी शब्बीर शाहिद यांनी १०१ झाडांची भेट शाळे मुलांना देऊन ते आपापल्या परिसरात लाऊन त्यांना जगवण्या विषयी सुद्धा माहिती दिली.प्रमुख अतिथी म्हणून मोहम्मद नासिरोड्डीन नासीर,मोहम्मद सादिक, रौशन आली शाह आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नगर सेवक श्रावण भातखडे यांनी केले. कार्यक्रमात शाडेकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरकुल चे राहिलेले चेक लाभार्थी यांना तोरीत देऊन इतर मागण्या पुर्ण न केल्यास 16/6/2022 ला लाभार्थी सह नगर परिषद व उपविभागीय कार्यालय येथे मोर्च्याचा लखन इंगळे यांचा इशारा

Image
*घरकुल चे राहिलेले चेक लाभार्थी यांना तोरीत देऊन इतर मागण्या पुर्ण करा नाहीतर 16/6/2022 ला लाभार्थी सह नगर परिषद व उपविभागीय कार्यालय येथे मोर्च्या लखन इंगळे यांचा इशारा*  आज दिनांक 7 जुन 2022 रोजी लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साहेब आकोट मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना काही मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले मागण्या अस्या होत्या  1)प्रधानमंत्री घरकुल योजनेचा मंजूर DPR 514,180,206,101,याचा निधी उपलब्ध करून लाभार्थी यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा  2)रमाई घरकुल चे लाभार्थी यांचे अर्ज 2011पासुन तर आज 2022 परियंत निधी अभावी रखडून पडले आहेत त्या करिता नवीन निधी मागवुन गरजु लोकांना घरकुलचा लाभ देण्यात यावा 3)गुंठेवारी धारक लाभार्थी यांचे अर्ज निकाली काढण्यात यावे कारण त्यांना घरकुल योजनेचा लाभ तोरीत घेता यावा 4)आकोट शहारातील निवासी अतिक्रमण धारक लाभार्थी यांच्या जागा कायम स्वरूपी पट्टे बहाल करण्यासाठी लाभार्थी यांनी दिलेल्या फायली /अर्ज नगर परिषद आकोट येथे पडून आहेत ते निकाली काढण्यात याव्या व काही वॉर्डाचे ...