बार्शिटाकळीत सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी... जिल्हा पोलीस अधीक्षक
बार्शिटाकळीत सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी... जिल्हा पोलीस अधीक्षक बार्शिटाकळी प्रतिनिधी...श्रावण भातखडे बार्शिटाकळी : बार्शीटाकळी येते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा कारणावरून नगरपंचायतने ठराव नामंजूर केल्यामुळे शहरात शांतता पुर्व तनावाचे वातावरण होऊ नये , यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत २८ एप्रिल रोजी शनिवारी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत त त्यांनी सर्व समाजातील नागरिकांना आपल्या गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी व दोन्ही गटाच्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन त्यावर चर्चा करावी आणि योग्य निर्णय घ्यावा बार्शिटाकळी शहरात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत त्यासाठी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि शहराच्या हिताचा निर्णय घ्यावा असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शांतता समितीच्या प्रसंगी केले . यावेळी बार्शिटाकळी शहरातील सर्व हिंदू मुस्लिम समाजातील बांधव , लोकप्रतिनिधी , नगरपंचायतचे नगराध्यक्ष , महिला पदाधिकारी , पत्रकार मंडळ...