Posts

Showing posts from March, 2023

केंद्रीय स्तरीय अधिकारी महेंद्र भगत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मानित.....

Image
केंद्रीय स्तरीय अधिकारी महेंद्र भगत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मानित...... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी तालुक्यातील टिटवा नवीन जिल्हा परिषद शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक व विषय शिक्षक महेंद्र भगत हे नुकताच अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मानित झाले आहे बार्शिटाकळी तालुक्यात केंद्रीय स्तरीये अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महेंद्र भगत यांना अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे केंद्रस्तरीय अधिकारी महेंद्र भगत यांनी अकोला जिल्ह्य़ातून टिटवा नवीन येथील प्रथम शंभर टक्के काम पुर्ण केले असून निवडणूक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून बार्शीटाकळी तालुक्याचे नाव उज्वल केले आहे त्यामध्ये मतदारांचे आधार कार्ड अपडेट नवीन मतदार नोंदणी व इत्यादि सर्व कार्य त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण केले आहे बार्शीटाकळी चे निवडणूक नायब तहसीलदार शिवहरी थेंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवडणूक लिपिक सांगळे अनिल चहाकर यांच्या सहकार्याने त्यांनी सदर कार्य यशस्वीरिते पूर्ण केले आहे त्यांच्या उत्कृष्ट कामग...

शाहिद इक़बाल खान यांची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती....

Image
शाहिद इक़बाल खान यांची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती.... तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी  अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार महान केंद्राचे मा केंद्रप्रमुख तत्कालीन जिल्हा कार्याध्यक्ष अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला शाहिद इक़बाल खान यांची महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनांचे प्रदेशाध्यक्ष इलाजोद्दीन फारुकी साहेब यांचे आदेशान्वये व तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनिसोद्दीन कुतुबुद्दीन यांच्या संमतीने शाहिद इकबाल खान यांना अकोला जिल्हा अध्यक्ष पदाचा प्रभार देण्यात आला आहे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे अकोला जिल्हाध्यक्ष पदांवर आणिसोदिन कुतबोद्दीन हे गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होते परंतु सध्या ते मुस्लिम समाजाचे पवित्र स्थान मक्का मदीना येथे जाणार असल्याने सदर पदाचा प्रभार जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद इक्बाल खान यांच्याकडे सोपविण्यात आला आहे याबाबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाची एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली यामध्ये सर्वच कोर कमिटीतील सदस्यांनी शाहिद इक्बाल खान यांच्या नावाला पसंती दर्शविल्यामुळे प्रभारी जिल...

बार्शिटाकळी येथील नागरिक उमराह ( हज ) यात्रे साठी रवाना......

Image
बार्शिटाकळी येथील नागरिक उमराह ( हज ) यात्रे साठी रवाना...... बाशिटाकळी येथील प्रतिष्ठित नागरिक भारतीय जनता पक्षाचे सदस्य अतीकभाई जमादार हे मुस्लिम समाजाचे पविञ स्थान उमरा येथे जात आहेत त्या निमित्तानेे मुर्तिजापूर मतदार संघाचे आमदार हरिष भाऊ पिपंळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी ता अध्यक्ष राजु पाटील काकड ता अध्यक्ष युवा योगेश कोदंणकर शहर अध्यक्ष श्रीराम येळवणकार , चंदु भाऊ वाटमारे , अनंत केदारे , गोपाल वाटमारे , प्रविण धाईत , राम पाटील आंबेकर सरपंच , निलेश भाऊ हांडे , रूग्ण कल्याण समिती सदस्य मो सादीक लीडर गजानन भाऊ वाटमारे आणी भाजपा पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

लाच घेतांना ग्रामसेवक विजय रिंढेला पकडले........ ◼️रक्कम आहे 3 हजार....

लाच घेतांना ग्रामसेवक विजय रिंढेला पकडले.... ◼️रक्कम आहे 3 हजार.... बुलढाणा, 29 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी ): देऊळगाव मही ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला 3 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी ग्रामसेवक 42 वर्षाचा असून त्याचे नांव विजय साहेबराव रिंढे आहे. विशेष म्हणजे बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र परिसरात हा सापळा यशस्वी झाला. देऊळगाव मही येथील एकाचे काम ग्रामसेवक यांच्याकडे होते. शेतजमीन अकृषक नसताना ग्रामपंचायतने काही अतिक्रमण धारकांना नमुना 8 दिलेले होते. हे रद्द करण्यासाठी ग्रामसेवक विजय रिंढे यांनी फिर्यादीला 3 हजार रुपये मागितले होते. रिंढे बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात होते. इथेच पैसे घेऊन या, असे रिंढे यांनी म्हटल्यानंतर फिर्यादीने सदर बाब अँटी करप्शन ब्युरो ला सांगितली. एसिबीच्या पथकाने सापळा रचला. रिंढे आले आणि त्यांनी फिर्यादीकडून लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी पथकाने रिंढे यांना रांगेहाथ पकडले. ही कारवाई पिआय सचिन इंगळे यांच्या नेतृत्वात कर्मचारी विलास साखरे, प्रविण बैरागी, विनोद लोखंडे, जगदीश पवार, स्वाती वाणी यांच्या पथकाने केली....

शेतकरी परिवर्तन पॅनल व वंचित बहुजन आघाडी सोबत लढविणार कृषी उत्पन्न बाजार समिती.....

शेतकरी परिवर्तन पॅनल व वंचित बहुजन आघाडी सोबत लढविणार कृषी उत्पन्न बाजार समिती......   आज दिनांक 29/ 3 /2023 रोजी बार्शीटाकळी विश्रामगृह मध्ये बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रमोदजी देंडवे होते. बैठकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात परिपूर्ण चर्चा होऊन शेतकरी परिवर्तन पॅनल सोबत वंचित बहुजन आघाडी एकत्रित लडेल अशी चर्चा झाली. जागावाटपाची चर्चा सुद्धा एकत्रितपणे पार पडली. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे, आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी युती झाल्याचे घोषित केले आणि निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले या बैठकीला उपस्थित  प्रमोदजी देंडवे वं. ब.आ अकोला जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, अकोला पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंद डोंगरे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष रतन आडे, महासचिव अजय अरकराव, युवा अध्यक्ष अमोल जामनिक, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, आनंदराव मते, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड पंचायत समिती माजी सभापती प्रकाश वाहूरवाग, शेख नईमोद्दीन, गो...

वंचित बहुजन आघाडीची सांत्वन भेट......

वंचित बहुजन आघाडीची सांत्वन भेट....  दिनांक 28 /3 /2023 रोजी रात्री 9 वाजता बार्शीटाकळी अशोक नगर येथील रहिवासी प्रदीप तुळशीराम इंगळे व व त्यांची पत्नी सविता प्रदीप इंगळे हे दोघे मोटरसायकलने अकोला जात असताना कान्हेरी जवळ रानटी डुक्कर आडवे आल्याने त्यांचा अपघात झाला या अपघातात प्रदीप तुळशीराम इंगळे यांचा जागेवर मृत्यू झाला व त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. ही माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे,अकोला पंचायत समितीचे माजी सभापती आनंद डोंगरे, सोबतच बार्शीटाकळी तालुक्याचे तालुका महासचिव अजय अरकराव, युवा अध्यक्ष अमोल जामनिक, ज्येष्ठ नेते गोबा शेठ, नगरसेवक श्रावण भातखडे, गोरसिंग राठोड, तालुका प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, ऋषिकेश खंडारे आधी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  आणि पीडितांच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने योग्य ती मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले .

धाबा व महान केंद्राचे विद्यार्थी बचाव आणि सुरक्षितता उपक्रम कार्यक्रम संपन्न........

Image
*धाबा व महान केंद्राचे विद्यार्थी बचाव आणि सुरक्षितता उपक्रम कार्यक्रम संपन्न.....*  प्रतिनिधी बार्शीटाकळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद महाराष्ट्र शासनामार्फत शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता उपक्रम योजना अंमलबजावणी करिता कार्यशाळा घेण्यात येत आहे त्या अंतर्गत बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रत्नसिंग पवार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महान व धाबा केंद्राची संयुक्त विद्यार्थी सेफ्टी अँड सेक्युरिटी कार्यशाळाची आयोजन तालुक्यातील लोहगड येथील जिल्हा परिषद शाळा येथे 29 मार्च रोजी बुधवारी करण्यात आले होते यावेळी सदर कार्यक्रमाचे निमंत्रक धाबा व महानचे केंद्रप्रमुख विनोद गणपत पिंपळकर हे होते यावेळी महान व धाबा केंद्रातील मुख्याध्यापकांना विद्यार्थी सेक्युरिटी एंड सेफ्टी या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले असून याविषयी मुख्याध्यापकांकडून प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून घेण्यात आली आहे तसेच व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून याबाबत सविस्तर माहिती मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आली असून सदर माहिती शाळा स्तरावर पोहोचविण्याची जबाबदा...

वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवा - अंजलीताई आंबेडकर

Image
वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवा - अंजलीताई आंबेडकर पुणे - वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवा असे प्रतिपादन अंजलीताई आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडी पुणे शहर समन्वयक बैठक अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 मार्च 2023 रोजी पुण्यात पार पडली. वंचित बहूजन आघाडी पुणे शहर, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या सर्व पदाधिकारी यांची समन्वयक बैठक झाली. यावेळी अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, पदाधिकारी हा पक्षापेक्षा मोठा नसतो, हे सांगताना वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय धोरणेनुसार संघटक वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी एकमेकांना विचारात घेऊन संवाद साधला पाहिजे. तसेच पदाधिकारी यांचा सोशल मिडिया हा व्यक्तीगत नसुन पक्षाची भूमिका समोर ठेऊन पोस्ट कराव्यात अशा सुचना केल्या.     बैठकीत युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील, पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर भाई कुरेशी, महिला आघाडी महासचिव ॲड रेखाताई चौरे, युवक आघाडी अध्यक्ष परेश शिरसंगे, माथाडी कामगार...

बार्शिटाकळी इंदिरा नगर येथील दोघी बहिणी नी ठेवला उपवास (रोजा)....

Image
बार्शिटाकळी इंदिरा नगर येथील दोघी बहिणी नी ठेवला  उपवास (रोजा)....  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी , बार्शिटाकळी : २४ मार्च पासून मुस्लिम बांधवांचा प्रवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली तेव्हा पासूनच मुस्लिम बांधवांच्या लहान मुला मुलींनी उपवास ( रोजा ) करण्याचा सपाटा चालविला असून आज सोमवारी स्थानिक इंदिरा नगर येथील रायना फातेमा इरशाद खान वय १० वर्ष व मायरा फातेमा इरशाद खान वय ८ वर्ष या दोघा बहिणींनी उपवास ( रोजा ) ठेवल्याने परीसरात त्यांचे कौतुक होत आहे. दोन लहान मुलींनी दि , २७ , मार्च सोमवारी पवित्र रमजान चा ४था (रोजा) एकदिवसीय संकाळ पासून संध्याकाळ पर्यत १४ तास उपवास ( रोजा ) ठेवला. वरील दोन्ही चिमुकले स्थानिक वंचित बहुजन आघाडी चे रूग्ण कल्याण समिती सदस्य इमरान खान इरफान खान फ्रूट वाले यांचे पुतण्या आहे. दोन्ही मुलींनी उपवास ठेवल्या च्या खुशीत त्यांनी परिसरातील लोकांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये नगर पंचायत चे सर्व पक्षीय सदस्य,प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मंडळी आदींनी सहभाग घेऊन मुलींना पुढील आयुष्यात अशी अनेक...

राम मंदिर येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहराच्या वतीने श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.....

Image
राम मंदिर येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहराच्या वतीने श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली..... अकोट: येथे बारी समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी राम मंदिर मोठे बारगन आकोट येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहर तर्फे साजरी करण्यात आली सर्व प्रथम श्री संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेला हरार्पण करून पूजा करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ सुभाष तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप उपाध्यक्ष भारीप सदानंद तेलगोटे नितीन वाघ वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष लखन इंगळे मयूर जुनघरे डी.एम.बोडखे उमेश बोडखे यांनी मिळून श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली

व्हाट्सअप च्या माध्यमातून गरीब मुलीचा उपचाराला मदत करण्यासाठी सरसावले शेकडो हात.....

Image
व्हाट्सअप च्या माध्यमातून गरीब मुलीचा उपचाराला मदत करण्यासाठी सरसावले शेकडो हात.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी     बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डा खुर्द या छोट्याशा गावातील लहान मुलगी कु. गोपी विजय राऊत ही छोटीशी दहा वर्षाची मुलगी इयत्ता चौथ्या वर्गामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खेर्डा खुर्द येथे शिकणारी मुलगी ग्रामपंचायत च्या परिसरात शाळेच्या व ग्रामपंचायतच्या परिसरात खेळत होती. तिथे बांधकाम सुरू असल्याने तिथे असलेले बसण्यासाठीचे सिमेंट बेंच उलटे करून ठेवले होते. त्यातील एक सिमेंट बेंच कोणीतरी सरळ करून त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न केला असेल तो तसाच ठेवून दिला. आणि कु. गोपी त्याच सिमेंट बेंच वर खेळत होती. मग ती त्या सिमेंट बेंच च्या मागून जाऊन खेळू लागली खेळता खेळता ती त्या सिमेंट बेंच ला मागून लटकली आणि जशी लटकली तसेच तो सिमेंट बेंच तिच्या तोंडावरती आदळला. त्यात कु. गोपी ही गंभीर जखमी झाली. तिची नाक व तोंड दबल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने तिच्याकडे धाव घेऊन सिमेंट रपटा उचलण्याचा प्रयत्न केला....

नवनिर्वाचित न. प. उपध्यक्ष हसन शाह यांचा सत्कार.....

Image
नवनिर्वाचित न. प. उपध्यक्ष हसन शाह यांचा सत्कार..... प्रतिनिधी , बार्शिटा कळी ,  बार्शीटाकळी नगरपंचायतच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदांवर मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये काँग्रेसचे हसन शाह अनवर शाह यांची उपाध्यक्षपदी निवड झाली ,या वेळी सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष यांच्या खडकपुरा येथील निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा डॉ प्रा बिस्मिल्लाह खान शाहिद इक़बाल खान यानीशाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला , यावेळी नगरसेवक गटनेते सुनील शिरसाठ , नगरसेवक श्रावण भातखडे , नगरसेवक अब्दुल अकील अब्दुल अजीज, इमदाद हुसैन ,तौकीर हुसैन, अशफाक शाह सय्यद फारूक . गौबा सेठ ,सय्यद नईम मुक्तसीर खान ,गोहर अली खान ,न्यामत शाह ,वकार खान ,अब्दुल जब्बार, मुस्तफा खान ,असजल खान, आतिक इनामदार .भोला इनामदार , आदि ची उपस्थिति होती कार्यकरकर्माचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल्लाह खान ,यानी केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती तसेच माऊली कृषी सेवा केंद्राांचे संचालक  श्री लबडे साहेब व त्यांचे सुपुत्र याां...

बार्शिटाकळी येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा......

Image
बार्शिटाकळी येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा......           बार्शिटाकळी : २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शिटाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी येथे क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष शर्मा, डॉ भावना हाडोळे, डॉ महेश राठोड, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रूग्णालय बार्शिटाकळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला फनाह -ए -आम ट्रस्ट महाराष्ट्र बार्शिटाकळी शहराचे अध्यक्ष डॉ. मुदश्शीर खान, हुशेन खान,हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच रूग्ण कल्याण सदस्य मो. सादिक लीडर, भा.ज.पा. महिला शहर अध्यक्षा तथा रूग्ण कल्याण समिती सदस्य श्रीमती पुष्पाताई रत्नपारखी, महेफुज खान. याची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अमोल पाचाडे, शिराज खान, यांनी केले तर सुत्रसंचलन प्रभाकर तिडके यांनी केले. या  कार्यक्रमासााठी ग्रामीण रुग्णाल...

हसन शाह अन्वर शाह यांची न. प. बार्शिटाकळी च्या उपाध्यक्ष पदी निवड.....

हसन शाह अन्वर शाह यांची न. प. बार्शिटाकळी च्या उपाध्यक्ष पदी निवड..... बार्शिटाकळी : बार्शिटाकळी नगरपंचायत मध्ये आज दिनांक 21 मार्च रोजी उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय कॉग्रेस पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये हसन शाह अन्वर शाह यांना वंचित बहुजन आघाडीचे माजी उपाध्यक्ष शुरेश जामनिक, गटनेते तथा नगरसेवक सुनील विठ्ठलराव शिरसाट, नसीम खान अमजद खान बांधकाम सभापती, कमलाबाई शंकर धुरंधर महिला बालकल्याण सभापती, लाइका खातुन सरफराज खान नगरसेविका, असे पाच व कॉग्रेस पक्षाचे हसन शाह अन्वर शाह स्वतः, अ. अकील अ.अजीज आरोग्य सभापती, नुसरत परवीन सै. मुजफ्फर, शबनम परवीन अशफाक अली शाह हे चार व अपक्ष नगरसेवक इफ्तेखारोद्दीन काजी असे दहा सदस्य यांनी मतदान केले. व दसरे उमेदवार राऊत मिनाबाई बबन यांना कॉग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष महेफुज खॉ , मनीषा भारत बोबडे नगरसेविका, व स्वतः श्रीमती राऊत मिनाबाई बबन, असे तीन व भाजपचे दोन सौ जयश्री रमेश वाटमारे, छाया राजेश साबळे, व दोन अपक्ष ॲड विनोद राठोड, अर्शद उल्ला खान अन्सार उल्ला खान नगरसेवक,  व वंचित च्या साबिया परवीन सै अबरार नगरसेविका असे एकुण आ...

तुलंगा खु.येथील सरपंच व सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीत पातुर मध्ये जाहीर प्रवेश.....

Image
तुलंगा खु.येथील सरपंच व सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीत पातुर मध्ये जाहीर प्रवेश..... अकोला: श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गर्शनाखाली सुजित दाभाडे, सरपंच विकास पाचपोर, उपसरपंच राष्ट्रपाल दाभाडे ग्रा.प.सदस्य, सुमेध वानखडे सा. कार्यकर्ते ,यांचा तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ वंचित बहुजन आघाडी पातुर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला. यावेळी ॲड.किरण सरदार,राजू बोरकर,चंद्रकांत तायडे,दिनेश गवई,प्रकाश शिरसाट,अनिल राठोड, शरद सुरवाडे, मिलिंद धाडसे,मंगल तेलगोटे, विजय गवई, अक्षय ऊपर्वट, राहुल घनमोडे, धनंजय उपर्वट, निलेश उपर्वट, धम्मपाल इंगळे, सतीश गवई, विकास कीर्तने,स्वप्नील सदार आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कामे मार्गी नाही लावल्यास न.प.कार्यालयात गटार घेऊन गटार आंदोलन करणार वंचित चे लखन इंगळे व नागरिकांचा संबंधित अधिकारी यांना इशारा......

Image
कामे मार्गी नाही लावल्यास न.प.कार्यालयात गटार घेऊन गटार आंदोलन करणार वंचित चे लखन इंगळे व नागरिकांचा संबंधित अधिकारी यांना इशारा....... अकोट : दि.5 एफ्रिल रोजी नगर परिषद कार्यालय समोर गटार घेऊन आंदोलनाचा इशारा  नगर परिषद कार्यालय वर वंचित चे आंदोलन करते गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले समाजसेवक लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन नगर परिषद येथे हल्ला बोल केला नागरिकांनी संतप्त होऊन लहान मुलं बाळ यांना सोबत घेऊन अधिकारी यांच्या वर राडा करून निवेदन दिले व अधिकारी यांना सोबत नेऊन प्रभागातील सांडपाण्याची समसश्या सांगितल्या निवेदनात मागणी अशी होती की प्रभाग क्रं.9मधील प्रभाग क्रं3.प्रभाग क्रं.4 प्रभाग 14 मधील रहिवाशी वस्तीत मोठया प्रमाणात सांडपाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे लहान मुलं बाळ व नागरिक आजारी पडत आहेत काही नागरिकांनी अगोदर सुद्धा या अगोदर उपोषण केले होते त्यावर नगर परिषद येथील संबंधित अधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले व संबंधि...

ॲड विनोद राठोड यांचा सत्कार.....

Image
ॲड विनोद राठोड यांचा सत्कार.... प्रतिनिधी , बार्शिटाकळी , संत गाडगेबाबा अमरावती विधापीठ येथे नविन कार्यकारणी साठी बैठक घेण्यात आली त्या बैठकीत नविन सिनेट सदस्य पदा ची निमणूक करण्यात आली त्या सिनेट पदावर बार्शिटाकळी शहराचे ॲड विनोद राजाराम राठोड यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ चे सिनेट सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली त्या बदल बार्शिटाकळी नगरपंचायत येथे भव्य संत्कार करण्यात आले , हकीकत अशा प्रकारे आहे की संत गाडगेबाबा अमरावती विधापीठ येथे नविन सदस्य कार्यकारणी साठी एक सभा घेण्यात आली  संत गाडगेबाबा अमरावती विधापीठ सभेत संत गाडगेबाबा विधापीठाचे संचिव तुषार देशमुख च्च्च्या  स्वाक्षरी ने बार्शिटाकळी शहराचे प्रभाग क्रं दोन चे नगरसेवक आणी तालुक्यातील नामांकित विधी तज्ज्ञ ॲड विनोद राजाराम राठोड यांना पत्र देऊन संत गाडगेबाबा अमरावती विधापीठ चे सिनेट सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली , सदर प्रकरणाची दखल घेऊन बार्शिटाकळी नगर पंचायत येथे ॲड विनोद राठोड याचे संत गाडगेबाबा अमरावती विधापीठाचे सिनेट सदस्य नियुक्ती बदल बार्शिटाकळी नगरपंचायतचे नगराध्यक्ष मा. मेहफुज खान यांच...

आमदार हरीश पिंपळे ह्यांनी जनतेची दिशाभूल करू नये - राजेंद्र पातोडे.

Image
आमदार हरीश पिंपळे ह्यांनी जनतेची दिशाभूल करू नये - राजेंद्र पातोडे. बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी जवळील विद्रूपा नदीचे अरुंद पुला जवळ मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.गेली पंधरा वर्षे मूर्तिजापूर मतदारसंघात आमदार असलेले हरीश पिंपळे ह्यांनी कमालीची निष्क्रियता दाखवली म्हणून वंचित बहूजन युवा आघाडी बार्शीटाकळी तालुक्याचे वतीने त्या अपघात प्रवण स्थळाचे नामकरण 'आमदार हरिश पिंपळे ऍकसिडेंट स्पॉट' केले होते.आपल्या सुमार कामगिरी वर युवा आघाडीने बोट ठेवल्याने आमदार पिंपळे अस्वस्थ झाले असून 'रस्ता मंजूर झाला होता, त्यावेळेस भारिपवाल्यांनी चिपको आंदोलन करून, चौपदरी करण्याचं काम बंद पाडल्याचा' हास्यास्पद खुलासा त्यांनी केला आहे. मुळात मुद्दा रस्त्याचा नव्हे तर अरुंद पुलाचा आहे.त्या एकाच ठिकाणी होणारे अपघात अरुंद पुलामुळे होत आहेत.१५ वर्षात पूल झाला असता तर अनेक नागरिक सुरक्षित राहू शकले असते मात्र आपली निष्क्रियता लपविण्यासाठी आमदार पिंपळे ह्यांनी वंचित मुळे रस्ता झाला नसल्याची सांगून जनतेची दिशाभूल सुरू केली आहे.मात्र आमदार पिंपळे हे धडधडीत खोटे बोलत असल्याचे त्याचे स्...

अकोट तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने मा.आमदार स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबीर तसेच गरजूंना मोफत औषधे वितरणाचा कार्यक्रम संपन्न......

Image
अकोट तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने मा.आमदार  स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबीर तसेच गरजूंना मोफत औषधे वितरणाचा कार्यक्रम संपन्न......  दिनांक १६ मार्च २०२३      अकोट तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने मा.आमदार दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.स्थानिक गजानन नगर परीसरात डाॅ.वैभव पाटिल यांनी व टीम ने नागरिकांची तपासणी करून योग्य तो उपचार व मोफत गोळ्या व औषधांचे वाटप यावेळी करण्यात आले.    सदर कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांनी दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक अभिवादन करून केली.     प्रसंगी दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिक,हितचिंतक व युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रामाभाऊंना अभिवादन अर्पण केले.यासोबतच शहरातील गरजूंना यावेळी मोफत औषधे वितरणाचा कार्यक्रम देखील यशस्वीपणे संपन्न झाला.     यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी...

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले नामकरण.....

Image
वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले नामकरण..... बार्शिटाकळी - मंगरूळपीर राज्य महामार्गावरील विद्रुपा नदीवर कान्हेरी सरप जवळील आणि शिवम जिनींग फॅक्ट्री जवळील पुलावर मागच्या वर्षीपासून कठडे नाहीत, तसेच त्याठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे सतत येथे अपघात होत असतात. त्याबाबतीत वारंवार संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन काहीच कारवाई झाली नाही. याबाबत मुर्तिजापूर मतदार संघाचे आमदार हरीष पिंपळे यांना काहीच देणेघेणे नाही. ते बार्शिटाकळी तालुक्यात दिसतही नाहीत. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्यावतीने दोन्ही अपघात स्थळांचे आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट असे फोटोसहीत बॅनर लावत नामकरण करुन निषेध नोंदवला. फ्लेक्सवर १५ वर्ष आमदार कामगिरी एकदमच सुमार , असे सुविचार ही टाकण्यात आले.. यावेळी युवा तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुणबी,तालुका संघटक हरीश रामचवरे, रोशन चोटमल, गणेश कवळकर, रक्षक जाधव, सनी धुरंदर, ऋषिकेश खंडारे, भूषण सरकटे, अमोल वकील जामनिक, रत्नपाल डोंगरे, रोशन इंगळे, शैलेश शिरसाट, प्रविण वानखडे ...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आंदोलकांची भेट !!

Image
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आंदोलकांची भेट !!  अकोला : जुनी पेंशन योजना लागू करावी म्हणून राज्यात गत तीन दिवसापासून सुरू असलेल्या अकोल्यातील आंदोलनात सहभागी होऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा व्यक्त करत आंदोलकांचे मनोधैर्य वाढविले. सत्ता आली तर आम्ही जुनी पेंशन योजना पुर्ववत लागू करू असा शब्द बाळासाहेब आंबेडकरांनी यापुर्वीच दिला आहे. केवळ शाब्दिक पाठिंबा नाही तर कृतीतून त्यांनी दाखवून दिले की, कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून वंचित बहुजन आघाडी आंदोलनकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सत्तेत असले की, अनेक कारणे दाखवून प्रश्न न सोडवता प्रश्नाला बगल द्यायची,कर्मचारी असो वा शेतकरी, शेतमजूर, कामगार असो त्यांना न्याय द्यायचा नाही. मात्र सत्तेबाहेर फकले गेले की आपली पुर्वीची भूमिका बदलवून विरोधी पक्षात असताना तोंड फाटेस्तोर भूमिकेचे समर्थन करणारे आजी माजी सत्ताधारी जेंव्हा बोंबलतात तेंव्हा दोघांच्याही भूमिकेची किव करणेच आपल्या हातात नसते तर सत्तेत बदल घडवून आपल्या हक्काचे रक्षण करणारी व्यक्ती आपण सत्तेत बसवली पाहिजे....

जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोट मधील कर्मच्यारी संघटनेला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठींबा......

Image
जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोट मधील कर्मच्यारी संघटनेला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठींबा...... दि.16.3.2023 ला ग्रामीण रुग्णालय आकोट मधील सर्व कर्मच्यारी यांनी जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन केले असुन जवळपास 17 लाख कर्मच्यारी यांचा संप राज्यभर चालु आहे करीता वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असुन आकोट शहरातील वंचित बहुजन आघाडी यांनी ग्रामीण रुग्णालय आकोट कर्मच्यारी संघटनेला राष्ट्रीय नेते श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी आकोट मधून पाठींबा जाहीर करण्यात आला व पुढे जर का जुनी पेन्शन योजना चालु नाही केल्यास या मध्ये वंचित बहुजन आघाडी कर्मच्यारी यांच्या पाठीशी राहून रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी यांनी दिला या वेळेस उपस्थित सुभाष तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप माजी नगर सेवक सिद्धेश्वर बेराड वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ सदानंद तेलगोटे उपाध्यक्ष भारीप आकोट इम्रान ख...

न.प.आकोट मधील कर्मचारी संघटनेला जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठींबा......

Image
न.प.आकोट मधील कर्मचारी संघटनेला जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठींबा...... दि.14.3.2023 ला नगर परिषद आकोट मधील सर्व कर्मच्यारी यांनी जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन केले असुन जवळपास 17 लाख कर्मच्यारी यांचा संप राज्यभर चालु आहे करीता वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असुन आकोट शहरातील वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी यांनी आकोट नगर परिषद कर्मच्यारी संघटनेला राष्ट्रीय नेते श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे यांच्या आदेशानुसार सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी आकोट मधून पाठींबा जाहीर करण्यात आला व पुढे जर का जुनी पेन्शन योजना चालु नाही केल्यास या मध्ये वंचित बहुजन आघाडी कर्मच्यारी यांच्या पाठीशी राहून रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी यांनी दिला या वेळेस उपस्थित असलेले माजी जिल्हा उपाध्यक्ष दिपक बोडखे वरिष्ठ नेते सै.शरीफ राणा साहेब माजी नगर सेवक सिद्धेश्वर बेराड वंचित बहुजन आघाडी आकोट ...

∆भाजपचे भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गोरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा........ ∆३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार......

Image
∆भाजपचे भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गोरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.... ∆३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार..... दि.१३ – भाजपचे खासदार, आमदार आणि महापौर ह्यांचे भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली आज शोकसभा ३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार असल्याचा इशारा देण्यात आला. वंचित बहूजन युवा आघाडी अकोला महानगर पूर्व आणि पश्चिम च्या वतीने गौरक्षण संस्थाच्या बाजूला असलेला रोड एका वर्षात मरण पावल्याने ह्या मेलेल्या रस्त्यासाठी मा प्रदेश महासचिव राजेंद्रदादा पातोडे ह्यांचे अध्यक्षतेखाली “श्रद्धांजली सभा” आयोजित करण्यात आली होती.वंचित बहूजन अकोला पूर्व पश्चिम युवा आघाडी कार्यकर्ते पांढरे कपडे घालून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.७०० फुटाच्या रस्त्यावर ५९० खड्डे मोजून त्यांना चुन्याचे मार्किंग करण्यात आले.त्यानंतर अकाली मरण पावलेल्या ह्या रस्त्याला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. ३१ मार्च २०२३ पर्यंत हा रस्त...

जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीणच्या बार्शिटाकळी शहर अध्यक्ष पदी माजी उपसभापती सय्यद फारुक यांची निवड.....

Image
अकोला जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीणच्या बार्शिटाकळी शहर अध्यक्ष पदी माजी उपसभापती सय्यद फारुक यांची निवड.......   बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  बार्शिटाकळी : जिल्ह्यातील युवक काँग्रेस ग्रामीणची नुकतीच अकोला स्वराज भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीला प्रदेश महासचिव यज्ञावल्क्य जिचकार , प्रदेश सचिव तथा अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रभारी नितेश वानखडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली .बैठकीमध्ये बार्शी टाकळी शहर अध्यक्ष पदी माजी उप सभापती सय्यद फारूख यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. सदर बैठकी मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निनाद मानकर, प्रदेश महासचिव अरमानजमा,प्रदेशसचिव अभिलाष तायडे,जि.प चे माजी सदस्य आलमगीर खान,जिल्हा युकॉ चे उपाध्यक्ष साजिद इकबाल,मूर्तिजापूर विधानसभा अध्यक्ष गोपाल ढोरे,अकोट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश अग्रे,जिल्हामहासचिव रोशन चिंचोळकर,बार्शीटकली शहराध्यक्ष सैय्यद फारूक,बाळापूर विधानसभा महासचिव स्वप्नील पाठक,अकोट शहराध्यक्ष अनिकेत कुलट,पातूर शहराध्यक्ष चंद्रकांत बारताशे,वाडेग...

आकोट मधे जगतगुरु तुकाराम बिज उत्साह जगतगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आकोटच्या वतीने साजरी....

Image
आकोट मधे जगतगुरु तुकाराम बिज उत्साह जगतगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आकोटच्या वतीने साजरी.....  आकोट : शहरात नरसिग महाराज झोपडी येथे  जगतगुरु तुकाराम महाराज बिज उत्साह साजरा करणायात आला दि  8 ला सायकाळी नरसिग महाराज झोपडी येथे तिर्थस्थापना सागर भाउ हागे  सहपन्नीसह  करण्यात आली यावेळी सह व दि 9 ला नरसिग  महाराज  झोपडी येथे श्री ह भ प गणेश महाराज शेटे याचे  काल्याचे किर्तन झाले यावेळी महाराजांनी श्री संत तुकाराम महाराज यांच्या जिवनपटावर आपल्या किर्तनात युवक बाधवांनि अयोजीत करुन युवा पीढींनी यापुढे साप्रादायिक या विषयात सहभाग घावा ही काळाची  गरज  आहे  या कार्यक्रमाला  प्रदीपभाउ वानखडे आनोख राहणे डां गजानन महल्ले रामदास काळे विठ्ठलराव गुजरकर गजानन खडेंराव  शाम जवजांळ  विजय ढेपे राजेश भालतिलक शाम गावंडे  अमित मानकर शिवाजी चादुरकर  निनाद मानकर  गजाननभाउ हागे  श्रीकांत मानकर देवद्र गावंडे धीरज गावंडे अनोख गहले संजय राहाटे पकंज मानकर सचिन फाटकर सचिन वडतकार आनंद पाचबोले अमोल काळणे  श्रीकां...

जागतिक महिला दिना निमित्त वंचित बहुजन महिला आघाडीचे वतीने नेत्रदान शिबीराचे आयोजन.,....

Image
जागतिक महिला दिना निमित्त वंचित बहुजन महिला आघाडीचे वतीने नेत्रदान शिबीराचे आयोजन.... अकोट: जागतिक महिला दिना निमित्त वंचित बहुजन महिला आघाडी अकोट यांच्या वतीने राहुल नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला  सर्व प्रथम मातारमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हरार्पण करण्यात आले व ज्या महिला ज्यांचे पक्षात खुप मोठे योग दान आहे अस्या महिलांचा सत्कार करून लोकांसाठी नेत्रदान शिबीर तपासनी करण्यात आली महिला जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला माजी पंचायत समिती सभापती कांतीरामभाऊ गहले व त्यांच्या पत्नी राजकन्या गहले यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला देऊडगाव येथील नव नियुक्त महिला सरपंच पूजा सागर गहले यांचा सत्कार करण्यात आला निलोफर शहा जिल्हा महासचिव सूर्यकांता घणबहादूर माजी पंचायत समिती उपसभापती,सुनीता हेरोडे ता.अध्यक्ष महिला आघाडी लता कांबळे महिला शहर अध्यक्ष उपाध्यक्ष अर्चना वानखडे , करुणा तेलगोटे , वर्षा बेराड , ललिता तेलगोटे , चित्रा तेलगोटे , गयामुखे ताई या संपुर्ण महिला...

भेंडी महाल येथे गुलाम नबी आझाद महाविद्यालयात श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.....

Image
भेंडी महाल येथे गुलाम नबी आझाद महाविद्यालयात श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.....   बार्शिटाकळी : स्थानिक बार्शिटाकळी येथील गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी च्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचा समारोपिय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. संपूर्ण सात दिवसीय निवासी  श्रमसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.आर. पवार यांच्या मार्गदर्शनात भिंडीमहल येथे पार पाडला.  शिबिराच्या शेवटच्या दिवशी लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ. आर आर राठोड़ तथा मुख्य अतिथि गांवचे प्रथम नागरिक सरपंच श्री. संदीपजी राठोड़, सोबतच रासयो चे जिल्हा समन्वयक प्रा.रतनलाल येउल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची रूपरेखा आखण्यात आली. गांवचे उपसरपंच श्री. दिनेशभाऊ है सुध्दा कार्यक्रमाला उपस्थित होते. संत शिरोमणी  सेवालाल महाराज मंदिर प्रांगणात कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात अयोजन करण्यायात  आले. संत गाडगेबाबाच्या प्रतिमेचे दीप प्रज्ज्वलन व पुष्प अर्पण केल्यानंतर प्रास्ताविक भाषना मध्ये ...

क्रांतिकारी चळवळीचे महानायक ----राष्ट्रसंत सेना महाराज......

Image
क्रांतिकारी चळवळीचे महानायक ----राष्ट्रसंत सेना महाराज..... -------------------------------  ✒️  जयंती विशेष ✒️ ------------------------------- ------------------------------- भारत देश हा असंख्य नररत्नाची खाण आहे.या खाणीतील हिरे आपल्या अलौकिक कर्तृत्वाने जनसामान्यांच्या हृदयात कायम घर करून बसले आहेत. त्यात महाराष्ट्र भूमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे  या भूमीने संपूर्ण भारत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे ही दिशा देतांना समाजाला एकत्रित ठेवण्याचा मोठा संदेश महाराष्ट्र भूमीतूनच उदयास आला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. समाजसुधारना व समाज जागृती या क्षेत्रात महाराष्ट्रातील साधुसंत जणांचे मोठे योगदान आहे. अशा अलौकिक साधू- संतांमध्ये मध्य प्रदेशातील बांधवगड येथे जन्मलेल्या राष्ट्रसंत सेना महाराजांचे नाव मोठया आदराने घेतल्या जाते त्यांचे समाजप्रबोधन त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. सेना महाराजांच्या काळात समाजात मोठया प्रमाणात अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा याचे प्रस्थ वाढले होते समाजात या माध्यमातून अनिष्ठ रूढी ,परंपरांचा उदय झाला  त्याने पछाडलेला समाज हा पुर्णतः ...

संत शिरोमणि सेना महाराज....

Image
संत शिरोमणि सेना महाराज सत्य-अहिंसा और प्रेम की मिसाल थे संत सेना महाराज जब-जब भारत भूमि पर आदमी अज्ञान के अंधेरे में भटका है, तब-तब इस पवित्र धरती पर महान आत्माओं ने जन्म लेकर ज्ञान की रोशनी बिखेरी है। जिससे मनुष्य जाति सही रास्ते पर चल सके और जीवन सार्थक बना सके। ये आत्माएं मनुष्य के रूप में धरती पर जन्मी, मगर इनके सत्कर्मों के कारण इनको भगवान का दर्जा देकर पूजन शुरू कर दिया।   लगभग पांच सौ वर्ष पहले इस धरती पर एक महान संत सेन महाराज का अवतरण हुआ जिससे बांधवगढ़ की प्रसिद्धि और बढ़ गई। भक्तमाल के सुप्रसिद्ध टीकाकार प्रियदास के अनुसार संत शिरोमणि सेन महाराज का जन्म विक्रम संवत 1557 में वैशाख कृष्ण-12 (द्वादशी), दिन रविवार को वृत योग तुला लग्न पूर्व भाद्रपक्ष को चन्दन्यायी के घर में हुआ।   बचपन में इनका नाम नंदा रखा गया। नंदा बचपन से ही विनम्र, दयालु और ईश्वर में दृढ़ विश्वास रखते थे। सेन महाराज ने गृहस्थ जीवन के साथ-साथ भक्ति के मार्ग पर चलकर हमें यह संदेश दिया कि मनुष्य दृढ़ संकल्प करके अपने लक्ष्य को प्राप्त करना चाहे तो भक्ति के कर्म पर अटूट विश्वास के साथ अपना जीवन...

∆पातूर येथे लोकल थीमवर आधारित एक दिवसीय कार्यशाळा संपन्न...... ∆नेहरू युवा केंद्र व साने गुरुजी मंडळ पातूर द्वारे आयोजन......

Image
∆पातूर येथे लोकल थीमवर आधारित एक दिवसीय कार्यशाळा संपन्न...... ∆नेहरू युवा केंद्र व साने गुरुजी मंडळ पातूर द्वारे आयोजन...... बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )               युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार नेहरू युवा केंद्र,अकोला संलग्नित साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती मंडळ,पातूर तसेच स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण,पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकल थीम आधारित एक दिवसीय कार्यशाळा ही दि.०४ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते ०५ वाजे पर्यंत नगर परिषद कार्यालय सभागृह, पातूर येथे आयोजित करण्यात आली होती.          यावेळी कार्यशाळेचे उदघाटक पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हरिष गवळी यांचा हस्ते कार्यशाळेची सुरवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आळी. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक व ठाणेदार हरिष गवळी यांनी कार्यशाळेतील युवांना मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुणे अ.कुद्दुस शेख यांनी युवकांना व कार्यशाळेला शुभेच्छा देऊन भाषण कौशल्य व स...

अकोला येथे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न....

Image
अकोला येथे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न.... बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )         नेहरू युवा केंद्र अकोला आणि नेहरू युवा मंडल शिलोडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे दि. 1/3/2023 रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत युवकांसाठी कबड्डी, व्हॉलीबॉल व कबड्डी, तरूणांसाठी 100 धावणे व लांब उडी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा युवा अधिकारी महेशजी शेखावत यांच्यासह नेहरू युवा मंडळ शिलोडा च्या अध्यक्षा नाजिया खान उपस्थित होत्या. 18 ते 29 वयोगटातील युवकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजेत्या संघटनेला ट्राफी व प्रमाणपत्र, तसेच धावणे, लांब उडीतील विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.पवन देशमुख, निशांत वानखडे, अश्विन शिरसाट, यज्ञेश अकोटकर, स्वराज मिरजे, अभिजीत गोमस, विकी पवार, सागर गवई, अभिजित भारसाकळे, लक्ष्मीकांत उगवेकर गजानन चट्टे, यांनी पंचाची भूमिका निभावली . स्पर्धेला यशस्वी करण्या साठी नम्र...

प्रा. भाऊसाहेब गायकवाड उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराने सन्मानित.....

Image
प्रा. भाऊसाहेब गायकवाड उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराने सन्मानित..... बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )          महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला उपक्रम करिअर कट्टा या अंतर्गत उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार स्थानिक गुलाम नबी आझाद कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी जिल्हा अकोला महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक प्रा. भाऊसाहेब गायकवाड यांना सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एन. राजशेखर पिलाई, सचिव लेफ्टनंट जनरल जगवीर सिंग, केंद्रशासन पावर सेक्टर स्किल सेंटरचे सचिव प्रफुल्ल पाठक, कौशल्य आणि उद्योजक विकासचे सहसचिव नामदेव भोसले, के .जी. सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रज्ञा प्रभुणे आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नुकतेच के. जे. सोमय्या मुंबई येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण संचालक डॉ.श...

भेंडीमहाल येथे अंधश्रद्धा निर्मूलन तथा आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व तपासणी शिबीर.......

Image
भेंडीमहाल येथे अंधश्रद्धा निर्मूलन तथा आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व तपासणी शिबीर...... बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल          स्थानिक बार्शीटाकळी येथील गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी जिल्हा अकोला, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिराच्या तिसऱ्या दिवसाच्या बौद्धिक सत्रा मध्ये लाभलेले गावचे पोलिस पाटील राजकुमारजी महल्ले यांच्या अध्यक्षतेखाली अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज या विषयावर समितीचे अध्यक्ष ॲड. अनिल लव्हाळे, चंद्रकांत झटाले तथा धर्मदीप इंगले यांची उपस्थिति होती. सोबतच दुसऱ्या विषयावरती शासकीय आयुर्वेदिक विज्ञान महाविद्यालय तथा रुग्णालय, अकोला येथील आयुर्वेद तज्ञ डॉ. अश्विन इंगळे, डॉ.शुभम माळी व संपूर्ण टीम यांनी गुदविकार व उपाय योजना आणि तपासनी शिबिर करिता उपस्थित होते.          अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज या विषयावर आजचे ज्वलंत प्रश्न यावर ॲड. अनिल लव्हाळे यांनी प्रकाश टाकला. अंधश्रध्दे वर बोलतांना आजही समाजात डिजिटल युगा मध्ये, अंधश्रध्दे मध्ये गु...

∆महान बार्शीटाकळी मार्गावरील पुलाला पडले मोठे भगदाड...... ∆जीवित हानी होण्याची शक्यता......

Image
∆महान बार्शीटाकळी मार्गावरील पुलाला पडले मोठे भगदाड...... ∆जीवित हानी होण्याची शक्यता...... बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी     बार्शिटाकळी : पिंजर महान मार्गे तिवसा दगडपारवा या मार्गांवरील पुलाला मोठे भगदाड पडले असुन पुलाच्या खालील भागाला किनार पडली आहे . सदर किनार येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना अजिबात दिसत नाही . याच ठिकाणी यापूर्वी अनेक वेळा अपघात झालेले आहेत .हे अपघात ग्रस्त ठिकाणी असून या ठिकाणच्या पुलाची लवकर दुरुस्ती करावी तसेच पुलाला कठडे बसवावे, अन्यथा येथे केव्हाही जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. अपघात होऊन जिवीत हानी झाल्यास या बाबीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील,असा इशारा नागरिकांनी दिला आहे. पिंजर महान मार्गे तिवसा हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडला असून अतिशय वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावर रात्री बे रात्री सुध्दा मोठ्या संख्येने वाहने धावतात. सद्या त्या पुलाला भगदाड पडल्याने त्या ठिकाणी कधी जिवीत हानी होईल,हे सांगता येणार नाही. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोप उघडून आधी त्या पुलाची दुरुस्ती करावी,अन्यथा या ठिकाणी ज...

भेंडीमहाल येथे रा.से.यो. श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन संपन्न.........

Image
भेंडीमहाल येथे रा.से.यो. श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन संपन्न....... बार्शिटाकळी : बार्शीटाकळी येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाब नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी जि. अकोला, राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे 2022-23 सत्रातील आयोजन पिंजर मार्गावरील भेंडीमहाल येथे दि. 26-फेब्रुवारी ते दि. 5 मार्च, दरम्यान संपन्न होत असून, उद्‌घाटनाचा समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या उत्सुकतेने पार पडला. गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ उमीताताई स.राठोड, उपसरपंच दिनेश.वि.राठोड, पोलिसपाटिल राजकुमार म.महल्ले, मुख्याध्यापक शाम गुगळे, तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीतील सर्व सन्माननीय सदस्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिबिराची उत्तरोत्तर प्रगती सुरू आहे, दुसऱ्या दिवशी उद्‌घाटनाच्या प्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्तिथित उद्घाटनाचा दिमागदार संभारभ संपन्न झाला. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांची आदर्श शिकवण ग्रामविकासाला प्रेरणादायी ठरत आहे, संत गाडगे बाबाची ...