Posts

Showing posts from June, 2023

∆बार्शिटाकळीत आशाढी एकादशी निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तालुका मेळावा संपन्न.....∆कु.शुभ्रा शरद घोगरे व कु.परी मोहन राऊत या चिमुकल्यांनी साकारली होती विठ्ठल रुक्मिणी ची भुमिका....

Image
∆बार्शिटाकळीत आशाढी एकादशी निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तालुका मेळावा संपन्न..... ∆कु.शुभ्रा शरद घोगरे व कु.परी मोहन राऊत या चिमुकल्यांनी साकारली होती विठ्ठल रुक्मिणी ची भुमिका.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत, बार्शिटाकळी तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तालुका महिला प्रमुख सौ पुष्पाताई रत्नपारखी यांचे नेतृत्वात, गुरुवार दिनांक २९ जून रोजी बार्शिटाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना मंदिर येथे दुपारी तीन वाजता, तालुका महिला कार्यकारिणी चा मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याला तालुका सेवाधिकारी श्री देविदास कावरे, प्रचार प्रमुख श्री धनंजय ढोरे, तालुका महिला सचिव सौ ज्योतीताई सरप, तालुका संघटक तथा बार्शिटाकळी नगर पंचायत च्या नगर सेविका सौ मनिषाताई बोबडे, कोमल लुंगे, पार्वती कावरे, रुक्मीणी चांदणे, सौ. रत्नप्रभा सरप, सौ सुनिताताई ठाकरे, रुपाली कोणप्ते, मिराताई बंड, सौ प्रमिलाताई काकड ,निलुताई सराटे, कु शिवाणी कावरे,त्याच बरोबर जिवन प्रचारक डॉ अशोक रत्न...

मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्त करा... जि आई ओ युनिट चे मुख्याधिकारी यांना निवेदन......

Image
मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्त करा.....जि आई ओ युनिट चे मुख्याधिकारी यांना निवेदन......  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी 27 जून 2023 जि आई ओ युनिट बार्शीटाकळीच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत बार्शिटाकळी यांना निवेदन देण्यात आले. सध्या मान्सूनचे आगमन झालेले आहे. शाळा महाविद्यालय सुध्दा सुरु झालेली आहेत. दरवर्षीचा अनुभव आहे की, बार्शिटाकळी शहरातील जिल्हा परिषदेच्या मराठी उर्दू माध्यमाच्या मुला मुलींच्या शाळा तसेच शहरात असलेले परफेक्ट इंग्लिश स्कुल, बाबासाहेब धाबेकर विद्यालय येथे सोमवार पेठ, दहँड वेस, काजी पुरा, मौला अली पुरा, अशोक नगर, काळा मारोती, हालोपुरा, मुजावर पुरा, गुलजार पुरा, वंजारी पुरा, खडकपुरा, इमलीबन परिसर इत्यादि वस्त्यांतून सर्वधर्मिय विद्यार्थी मुले-मुली शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्या जाण्याकरीता बार्शिटाकळी शहरातील एकमेव रोड मेन रोड हाच आहे. मात्र सदर मेन रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने पावसाळ्याच्या दिवसात सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो व विशेष करून जामा मस्जिद चौक, करव...

बार्शिटाकली शहरात ईद-उल-अजहा शांततेत साजरी करण्यात आली.......

Image
बार्शिटाकली शहरात ईद-उल-अजहा शांततेत साजरी करण्यात आली..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  गुरुवार, 29 जून रोजी सकाळी ठीक 8.15 वाजता ईदगाह येथे जामा मस्जिददीचे इमाम व खतीब मौलाना अजीज उल्लाह खान यांनी यावेळी ईदची नमाज अदा केली. संपूर्ण देशतील.परिस्थिती पाहता देशात शांतता राहावी आणि सर्वत्र शांतापूर्ण वातावरण राहावे व बंधुभावासाठी प्रार्थना करण्यात आली.  ज्यामध्ये शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी शहरातील इतर मस्जिददींमध्ये सुध्दा ईदची नमाज अदा करण्यात आली. ज्यामध्ये मिनारा मस्जिद अकोली बेस येथे जमीयत-ए-उलामाचे तालुकाध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम, मस्जिद ए अक्सा खडकपुरा येथे मौलाना एजाज, मस्जिद उमर फारूक बस स्टँड येथे हाफिज नुरुद्दीन, दहेंद बेस मस्जिद येथे सय्यद अब्दुल समद इमाम, खिडकीपुरा मस्जिद येथे हाफिज अन्वर यांनी तर गुलजारी मस्जिद बाजार लाईन येथे कारी अब्दुल हकीम यांनी ईदची नमाज अदा केली. ईदच्या नमाजानंतर शहरातील सर्व रस्त्यांवर सर्व हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराचे प्रथम नागरि...

बार्शिटाकळी पोलीसांची दबंग कारवाई दोन दिवसातच आरोपीना अटक करुन दोन गुन्हे केले उघड.....

Image
बार्शिटाकळी पोलीसांची दबंग कारवाई दोन दिवसातच आरोपीना अटक करुन दोन गुन्हे केले उघड..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : येथील कसाब पुरा परिसर निवासी नज़ाकत उल्ला खान किफायत उल्ला खान यांचे मालकीची वाहन मैक्स पिकअप क्रमांक MH-34 -M-4402 किंमत अंदाजे दोन लाख रुपये त्यांचे राहते घरा पासुन रात्रिचा फ़ायदा घेवुन अज्ञात आरोपींनी चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन बार्शिटाकळी मध्ये फिर्यादी नज़ाकत उल्ला खान किफायत उल्ला खान यांनी दिली होती पोलीस निरिक्षक श्री संजय सोळंके साहेब आणी त्यांचे पथकांनी कोणताही विलंब न करता तपासाची चक्रे फिरवून आरोपी नामे सोहेल खान मगफंर खान काजीपुरा बार्शिटाकळी निवासी आणी एक विधी संघर्ष ग्रस्त बालक असे दोन आरोपींना अमरावती जिल्ह्याच्या दर्यापुर येथून वाहनांसह ताब्यात घेण्यात आले व बार्शिटाकळी पोलीस स्टेशन मध्ये गून्हा दाखल करण्यात आला आरोपींना अटक करण्यात आली दोघांना न्यालयात हजर केले असता एक आरोपी विधी संघर्ष ग्रस्त असलयाने न्यायालय ने त्याची सुटका केले आणी दूसरा आरोपी मुख्य सुत्रधार सोहेल खान मगफेर खान याची अकोला जिला ...

चोरीचा प्रयत्न करणार्या आरोपींना काही तासांतच केली अटक.....

Image
चोरीचा प्रयत्न करणार्या आरोपींना काही तासांतच केली अटक.....  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : शहरातील जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा ढोरे वेटाळ येथे दिनांक 28/6/2023 च्या रात्रीच्या वेळेस अंदाजे 1.32 च्या दरम्यान शाळे मधील डिजीटल रूमचा लोखंडी दरवाजा लोखंडी राॅडचा वापर करून तेडा करून शाळेतील रूमच्या अंदर शाळेतील साहित्य चोरी करन्याचा अज्ञात आरोपीने प्रयत्न करन्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापीका कु नंदा मालवे यांनी पोलीस स्टेशन बार्शिटाकळी मध्ये तक्रार केल्यानंतर बार्शिटाकळी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरूद्ध अपराध नंबर 318/2023 कलम 361-461-511 भारतीय दंड संहिता अनूसार गुन्हा दाखल केला गेला व बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरिक्षक श्री संजय सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी पोलीस पथकामध्ये पोलीस उप निरीक्षक निलेश तारक साहेब , हेड कांस्टेबल राजेश जौंधरकर , नायक पोलीस नागसेन वानखडे , पोलीस नायक पंकज पवार , पोलीस कांस्टेबल मनीष घुगे यांनी अथक परिश्रम घेऊन काही तासांमध्ये तांत्रिक तपास करून चोरीचा प्रयत्न कर...

दगडपारवा येथील क्रीडा संकुलास मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी.....

Image
दगडपारवा येथील क्रीडा संकुलास मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : बार्शिटाकळी पंचायत समिती यांच्या दिनांक २२-०७-२०२२ सर्वसाधारण सभे मध्ये दगडपारवा येथील क्रिडा संकुल इमारतीस हरित क्रांती चे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यासाठी ठराव क्र. ०४ घेण्यात आला असून सदर ठरावा मध्ये दगडपारवा येथील तालुका क्रिडा संकुलास स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे जर दिनांक एक जुलै. 2023 पूर्वी तालुका क्रीडांगणाला वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव न दिल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल अन्यथा 1 जुलैला शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने स्वतःहून क्रीडांगणाला स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी यासाठी बार्शिटाकळी चे तहसीलदार श्री दिपक बाजड साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, महासचिव अक्षय राठोड, दादाराव पवार प.स. सदस्य...

नवनियुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ.......

Image
नवनियुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  २५ जून रोजी डॉ.  सैयय्द तनवीर जमाल यांच्या निवासस्थानी नवनियुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले.  नवनियुक्त पदाधिकार्‍यांमध्ये शोएब खान तौसीफोद्दीन खान पठाण शहर अध्यक्ष बार्शीटाकळी काँग्रेस कमिटी, सैयद फारूक सैयद मुश्ताक शहर अध्यक्ष युवा कांग्रेस बार्शिटाकळी, जैनुद्दीन इसामोद्दीन शेख उपाध्यक्ष बार्शिटाकळी तालुका कांग्रेस कमेटी हे सत्कार मूर्ती होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अशोक अमानकर साहेब अध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य तथा मा.सुनील भाऊ धाबेकर साहेब यांची उपस्थिती लाभली. मा. अशोक अमानकर साहेब, सुनील भाऊ धाबेकर साहेब व इतर मान्यवरांनी आपले मनोगत या सत्कार समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नेते सैय्यद मिर साहेब, नगराध्यक्ष महफूज खान , भूषण गायकवाड, अतुल अमानकार, तालुका अध्यक्ष रमेश बेटकर, उपाध्यक्ष हसन शाह अन्वर शाह, नगरसेवक सैयद जहांगीर ,सैयद नासिर सर ,संत...

वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार व परिचय मेळावा संपन्न.....

Image
वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार व परिचय मेळावा संपन्न..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शीटाकळी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशान्वये व जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याची विस्तारीत कार्यकारणी गठित झाली. यामध्ये नवीन पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला बार्शीटाकळी तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी गोरसिंग भाऊ राठोड यांचे नियुक्ती करण्यात आली असून या कार्यक्रमाला उपस्थिती मध्ये तालुक्यातील पदाधिकारी महासचिव अजय आरखराव, संघटक हरीश रामचवरे, ता.प्रसिद्ध प्रमुख मिलिंद करवते, युवा तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, माजी ता. प्रवक्ता शुद्धोधन भाऊ इंगळे, युवक आघाडी जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुणबी,माजी तालुका प्रसिद्धी प्रमुख राजेश खंडारे, युवा कोषाध्यक्ष नितेश खंडारे, अरविंद राठोड, साहिल गवई, धर्मवीर गवई,राजदीप वानखडे, जेष्ठ कार्यकर्ते सावद,ज्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली त्यामध्य...

बार्शीटाकळी मध्ये नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न....

Image
बार्शीटाकळी मध्ये नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  आज बार्शीटाकळी शहरा मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी चे अकोला जिल्हा अध्यक्ष आद.प्रमोदभाऊ देंडवे, महासचिव आद. मिलिंद भाऊ इंगळे तसेच जेष्ठ नेते नईमोददीन भाई यांचे मार्गदर्शन खाली नगर पंचायत बार्शीटाकळी गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये आज दि. २५/६ /२०२३ रोजी आयोजन केले होते,  सदर कार्यक्रमाला बार्शीटाकळी शहर चे जेष्ठ नेते नईमोददीन भाई, तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, युवा तालुका अध्यक्ष अमोल जामणीक, नगरसेवक सुरेश जामनिक, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, शहर अध्यक्ष अझहर पठाण, अनिल धुरंधर, दादाराव जामनिक, हरीश रामचवरे, श्रीकृष्ण देवकुणबी, शुद्धधोन ईंगळे, शुभम ईंगळे, ईमरान खान, शोएब खान, इब्राहिम खान, जावेद शेख, राजकुमार खाडे, अमित तायडे,मिना ताई जंजाळ (बि एल वो.), सिताराम बलखंडे, देवेंद्र खाडे, धम्मपाल जामनिक, मनिष वाहुळे, बाळु जामनिक, भारत मोरे, शैलेष शिरसाठ, निपुल ठोले, अमोल खाडे, अमिर खान, रुषीकेष...

दगडपारवा येथे गतिरोधक बसवण्याची गावकऱ्यांची मागणी.......

Image
दगड पारवा येथे गतिरोधक बसवण्याची गावकऱ्यांची मागणी....... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : आज दिनांक 23/6/2023 रोजी सन्माननीय तहसीलदार श्री दिपक बाजड साहेब यांना निवेदन देण्यात आले . या निवेदनामध्ये दगडपरवा येथे गतिरोधक बसवण्याची मागणी केलेली आहे महान ते बार्शिटाकळी मार्गे अकोला हा नवीन रोड बनवल्यापासून गतिरोधक बसवलेले नाही या कारणाने हा रोड गावाच्या मधोमध असल्याकारणाने लहान शाळकरी मुलं, मुली व वयोवृद्ध व्यक्ती हा रस्ता ओलांडावा लागतो तसेच लहान मुलांची शाळा रस्त्याला लागून असल्याकारणाने येथे अपघात (एक्सीडेंट) होण्याची दाट शक्यता आहे तसेच अकोला ते मंगरूळ जाणारा हा रस्ता समृद्धी या रस्त्याला मिळत असल्याने या रस्त्यावर बरीच वाहन वाहत असल्याकारणाने येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे या कारणास्तव आम्ही काल गावातील सर्व मंडळींनी तहसीलदार श्री दिपक बाजड साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे नाहीतर आम्ही सर्व गावकरी मंडळी उपोषणाला बसण्याची तयारी आहे यावेळी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी डॉ ...

आगामी आषाढी एकादशीच्या तसेच बकरी ईदच्या निमीत्त बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन.....

Image
आगामी आषाढी एकादशीच्या तसेच बकरी ईदच्या निमीत्त बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  आगामी आषाढी एकादशी , तसेच बकरी ईद निमीत्त बार्शिटाकळी शहरात शांतता रहावी यासाठी व कुठल्याही प्रकारे शहरात शांतता भंग होणार नाही यासाठी बार्शिटाकळी पोलिसांनी शहरात पथसंचलन केले यावेळी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक यांनी व त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन मधुन अकोली वेस मज्जीद मार्गे ढोरे वेटाळ, खिडकी पुरा मज्जीद, काळा मारोती, जामा मज्जीद चौक, बाजार लाईन, खडकपुरा चौक, नगरपंचायत चौक मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत पथसंचलन केले असे खुपिया विभागाचे प्रमुख श्री कीशोर पिंजरकर यांनी कळविले

कानडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापा...... दाहा जणांना अटक;पाच हजार दोनशे विस रुपये जप्त...

Image
कानडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची  छापा..... दाहा जणांना अटक;पाच हजार दोनशे विस रुपये जप्त....  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी तालुक्यांतील ग्राम पिंजर पोलिस स्टेशन हद्दीतील कानडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १० आरोपींना मुद्देमालासह अटक केली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कानडी येथे बावन पत्याचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कानडी गाठून जुगार अड्ड्यावर छापा टाकला जुगार खेळत असताना आरोपी नितेश पवार वय (३५) अमोल पवार वय (३३) एकदास जाधव वय(३५) आशिष पवार वय (३७) रामेश्वर जाधव वय (६५) शंकर अवचार वय(६५) दादाराव खाडे वय(६०) अनिल राठोड वय (३५) गिरधारी जाधव वय (४५) संजय राठोड वय(४०) ज्ञानेश्वर जाधव वय (३५) हे राहणार कानडी यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला, आरोपी कडून पाच हजार दोनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई ठाणेदार अजय कुमार वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बंन्डू मेश्राम सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजु वानखडे,नामदेव मोरे, अभिजित...

मान्सूनपूर्व तयारीनिशी आसेगाव पोलीस विभागाची आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम....

Image
मान्सूनपूर्व तयारीनिशी आसेगाव पोलीस विभागाची आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम.... बार्शिटाकळी तालुक्यांतील पिंजर अकोला येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे (जिवरक्षक) ToT प्रशिक्षक यांनी गिरवीले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*  आसेगाव पोलीस ठाणे जिल्हा वाशिम यांनी मोतसावंगा धरणावर केले जोरदार आयोजन... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  ✍.. 23 जुन रोजी आसेगाव जिल्हा वाशिम येथील पोलीस ठाण्याचे वतीने वाशिम जिल्ह्यातील दुर्गमभागात असलेल्या मोतसावंगा धरणावर मान्सूनपूर्व तयारीनिशी पाण्याच्या निघटित आपात्कालीन घटनांमध्ये शोध व बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन आणी सुरक्षा या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले. याकरिता लाभलेले नामांकित प्रशिक्षक अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी मान्सून कालावधीत उद्भवणा-या आपात्कालीन घटनांमध्ये करावयाच्या कार्यवाही...

बार्शिटाकळी तालुक्यात गरिबांच्या हक्काच्या राशन वर गदा आणणाऱ्या २५ अपात्र शिधापत्रिकाधारकांवर गुन्हा दाखल.....

बार्शिटाकळी तालुक्यात गरिबांच्या हक्काच्या राशन वर गदा आणणाऱ्या २५ अपात्र शिधापत्रिकाधारकांवर गुन्हा दाखल..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  :अंत्योदय समुहाचा गैरफायदा घेणारे सरकारी व निम सरकारी नोकऱ्यांमध्ये गुंतलेल्यांसाठी आणि पेन्शनधारक आणि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी क निश्चित करण्यात आलेल्या उत्पन्न पेक्षा जास्त उत्पन्न धारकांना गिव्ह इट अप मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या शिधापत्रिका धारकांनी योजनेचा लाभ सोडण्या चे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे बार्शीटाकळी तालुक्यात गिव्ह इट अप मोहीम राबवून जनजागृती करून शासकीय रेशनचा लाभ सोडण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच मुनादीच्या माध्यमातून शहरातील लोकांपर्यंत माहितीही पोहोचवण्यात आली होती. 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अपात्र शिधापत्रिकाधारकांनी गिव्ह इट अप मोहिमेअंतर्गत शासकीय शिधापत्रिका योजनेचा लाभ सोडावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, शहर व तहसीलच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या 25 अपात्र राशन धारकांनी गिव्...

माजी जि. प. सभापती सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश......... ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश....

Image
माजी जि. प. सभापती सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश.......  बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश...... अकोला - श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकमेव माजी जि. प. सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांनी वंचित बहुजन आघाडीत यशवंत भवन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश केला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या मोठ्या प्रमाणात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आठवडाभरापुर्वा प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रवेश केला होता. यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निखील गावंडे यांनीही आपल्या सहकाऱ्यांनासह प्रवेश केला होता परंतु त्यांच्या पत्नी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकमेव माजी जिल्हा परिषद सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ. स्फुर्तीताई निखील गावंडे यांचा प्रवेश झाला नव्हता. परंतु वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर हे दोन दिवसांपासून अक...

देशाचे रक्षण करते मेजर मंगेश तेलगोटे यांनी रक्त देऊन वाचविले महिलेचे प्राण....महिला पेसेंटची तब्बेत नाजूक असल्यामुळे लखन इंगळे व मेजर मंगेश तेलगोटे यांनी अकोला जिल्हा रुग्णालयात घेतली तात्काळ धाव......

Image
देशाचे रक्षण करते मेजर मंगेश तेलगोटे यांनी रक्त देऊन वाचविले महिलेचे प्राण.... महिला पेसेंटची तब्बेत नाजूक असल्यामुळे लखन इंगळे व मेजर मंगेश तेलगोटे यांनी अकोला जिल्हा रुग्णालयात घेतली तात्काळ धाव.... अकोट तालुका प्रतिनिधी अकोट : गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आंदोलन कर्ते वंचित चे आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी आकोट वरून अकोला येथे एका 28 वर्षीय महिला पेसेंट ला ऍडमिट केले असता पेसेंट ची तब्बेत फार हलाकीची नाजूक व कमजोर असल्यामुळे ब्लड देणे गरजेचे होते ही माहिती लखन इंगळे यांना पेसेंट चे नातेवाईक यांनी सांगितले  लखन इंगळे व त्यांचे मित्र मेजर मंगेश तेलगोटे हे सुट्टीवर आलेले असतांना यांना सांगितली असता त्यांनी मिळून अकोला जिल्हा रुग्णालय येथे धाव घेतली व महिला पेसेंटला रक्त देऊन जीवदान दिले रूग्णांचे नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले व मेजर मंगेश तेलगोटे व वंचित चे लखन इंगळे यांचे आभार मानले 

स्वतः उपाशी राहून गोमातेची सेवा करणाऱ्या अवलिया रामराव चव्हाण यांना गायत्री परिवार ; "निर्भय बनो" च्या वतीने पाण्याच्या टाकीचे दान....! दानशूर लोकांनी मदतीचा हात द्यावा! समाजसेवक......!गजानन हरणे

Image
स्वतः उपाशी राहून गोमातेची सेवा करणाऱ्या अवलिया रामराव चव्हाण यांना गायत्री परिवार ; "निर्भय बनो" च्या वतीने पाण्याच्या टाकीचे दान....!                                दानशूर लोकांनी मदतीचा हात द्यावा! समाजसेवक......! गजानन हरणे  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे .बार्शीटाकळी : तालुक्यातील काजळेश्वर दगडपाडवा येथील बंजारा समाजाचा गोसेवक स्वतः उपाशी तापाशी राहून गोमातेची सेवा निष्ठेने प्रेमाने व आपुलकीने गेली कित्येक वर्षापासून करीत आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दुर्गाम अशा भागामध्ये श्रीसेवा गौशाळा काढून त्या गौरक्षण मध्ये शेकडो गाईंना ज्या गाईना कोणी वाली नाही ,कोणी वागवण्यास तयार नाही ,शेतकरी कशायला ज्या गाई विकतात किंवा मोकाट सोडून देतात. किंवा लोकांनी चारा नसल्यामुळे अनेक गाई त्यांना दिलेली आहे .अशा अनेक गाईची सेवा हा वेडा झालेला अवलिया कित्येक वर्षापासून करीत आहे .बंजारा समाजातील अत्यंत गरीबित जीवन जगत असलेले स्वतः कष्ट  मजुरी करून आपला कुटुंबाचा व आपल्या गौशाळेमध्ये असलेल्या...

दोन वाहनांच्या धडकेत तीन जण जखमी...पिंजर ते बार्शिटाकळी रोडवरील जयस्वाल पेट्रोल पंप जवळील घटना....

Image
दोन वाहनांच्या धडकेत तीन जण जखमी....   पिंजर ते बार्शिटाकळी रोडवरील जयस्वाल पेट्रोल पंप जवळील घटना... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोस्ट.स्टे हद्दीत 17 जुन रोजीची सायंकाळी अंदाजे 6:30 ते 7:00 वाजताचे दरम्यान ची घटना *पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची तत्परता अवघ्या दहा मिनिटात रुग्णवाहीकासह जवान घटनास्थळी दाखल*  -- 17 जुन रोजी सायंकाळी अंदाजे 6:30 वाजता पिंजर येथील जयस्वाल पेट्रोल पंप चे मालक पवनकुमार जयस्वाल यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना फोनवर दोन वाहनाची धडक होऊन अपघात झाल्याची माहीती दीली लगेचच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार,अंकुश सदाफळे,सुरज ठाकुर, महेश वानखडे,अमित ठाकुर,ज्ञानेश्वर वेरुळकार यांना घटनास्थळी रवाना केले शणीवार असल्याचे लक्षात येताच तो पर्यंत दिपक सदाफळे यांनी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन डाॅक्टरांना माहीती देऊन बोलून घेतले लगेच पंधरा मिनिटात अपघातातील तीनही ...

अकोल्यात खून ! प्रा.रणजीत इंगळे यांची हत्या : ६ दिवसात दुसरी घटना.....

Image
अकोल्यात खून ! प्रा.रणजीत इंगळे यांची हत्या : ६ दिवसात दुसरी घटना..... अकोला : राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे पालकत्व असलेल्या अकोला शहरात काल शनिवारी रात्रीला सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या झाल्याने अकोला हादरले आहे. मृतक इंगळे हे दिव्यांग असून त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी सातत्याने कार्य केले आहे.त्यांच्या हत्येच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, राज्याचे गृहमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांचे आज रविवार १८ जून रोजी अकोला शहरात आगमन होत आहे. जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खामगाव रोड वरील गंगानगर परिसरात राहणारे प्रा.रणजीत इंगळे रात्री ११ वाजताच्या सुमारास घराकडे जात असताना, मोबाईलवर कॉल आला. तेव्हा मोटारसायकल उभी करून, मोबाईलवर बोलत असताना, अज्ञात व्यक्तीने मागून येवून इंगळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा वार घातला. जोरदार वार घातल्याने डोक्यातून रक्तस्राव होवून इंगळे रस्त्यावर कोसळले. मारेक-याने जखमी इंगळेला ओढून उभ्या असलेल्या एका ट्रकच्या मागे नेऊन टाकले आणि घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळाने ही घटना...

स्वाभिमानी पर्व कॅम्प चे जनक चंदू भाऊ बोरसे यांना रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद.......

Image
स्वाभिमानी पर्व कॅम्पचे जनक चंदू भाऊ बोरसे यांना रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद..... तेल्हारा :  तालुक्यातील बाभुळगांव वांगेश्वर येथे स्वाभिमानीपर्व कॅम्प गुरुवार व शुक्रवार 15 व 16 जुन 2023 ला आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे जनक चंदू भाऊ बोरसे व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या मध्ये नवीन आधार कार्ड काढणे व दुरुस्ती पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड पि एम किसान योजना राशन कार्ड, श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना , राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर , राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र सर्व प्रमाणपत्र काढून देण्यात आले , या कॅम्पमध्ये आधार विभाग, संजय गांधी विभाग, श्रावणबाळ विभाग, पुरवठा विभाग, शेतु विभाग, जातीचे प्रमाणपत्र, ऑनलाईनची कामे एकाच छताखाली करण्यात आली बाभुळगाव, तळेगाव पा, तळेगाव ड, वांगरगाव उकळी वरुडा येथील बहुतांच नागरिका चे वेळेत काम व प्रमाणपत्र कार्यक्रमाचे जनक चंदू भाऊ बोरसे यांच्या हस्ते वितरण करण्यात आली पंचक्रोशीतील नागरिकांना आनंदाचे वातावरण तयार झाले विश...

आलेगावचे नाव रोशन करणारा शेख शिबान चा शाहिद इकबाल मित्र मंडळाकडून सत्कार.....

Image
आलेगावचे नाव रोशन करणारा शेख शिबान चा शाहिद इकबाल मित्र मंडळाकडून सत्कार..... ता प्रतिनिधि बार्शिटाकळी  शेख शिबान शेख राजिक यांचा नुकताच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाहिद इक़बाल खान मित्र मंडळाकडून सत्कार करण्यात आले बार्शिटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पिंजर येथे सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत शेख राजीक शेख हातम यांचा मुलगा शेख शिबान शेख राजिक यांनी नुकताच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत घव-घवीत यश प्राप्त केले असून त्यांनी अल मेहमूद इंटरनॅशनल विद्यालय आकोला येथून 92 टक्के गुण घेऊन तो उत्तीर्ण झाला आहे शेख राजिक शेख हातम हे मूळ आलेगाव येथील रहवासी आहे शेख शिबान हा लहानपणापासून अत्यंत हुशार होता दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये आल्याबद्दल सर्वत्र त्याची परीक्षांचा होत आहे तो आपले यशाचे श्रेय आपल्या आई व वडील शेख राजिक यांना देत आहे दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वती अध्येक्ष शाहिद इक़बाल खान यांनी त्यांचा कार्यक्रम आयोजित करून सत्कार केले आहे महान जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक शफीक अहमद...

चिंचोली रुद्रायणी येथे बँकेचा जनजागृती कार्यक्रम संपन्न......

Image
चिंचोली रुद्रायणी येथे बँकेचा जनजागृती कार्यक्रम संपन्न...... बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी भारतीय रिझर्व बँक ,बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून क्रिसील फाऊंडेशन च्या सहकार्य नि मानिवाईझ वित्तीय साक्षररता केंद्र पातूर अंतर्गत ग्राम चिंचोली रुद्रायणी येथील नागरिकांना बँकेबद्दल जनजागृती करण्यासाठी कॅम्प आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील लोकाना बचत आणि गुंतवणूक ,विमा ,पेन्शन कर्ज ,गो डिजिटल,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योति विमा योजना आदि बँकिंग सेवा सुविधा विषयी माहिती देण्यात आली.तसेच शेतकऱ्यांना नाबार्ड माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथम नागरिक सरपंच दुर्गाताई वर्गे होत्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्ड चे DDM श्रीराम वाघमारे सर ,LDM नयन सिन्हा सर नितीन घोरे सर व पॉल सर होते.प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार म्हणून श्रीराम वाघमारे व नयन सिन्हा सर यांनी गावातील नागरिकाना संबोधित केले. त्यामधील गावातील समस्या व त्यावर उपाय सुचविण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन पातूरचे मानिवाईझ वित्तीय साक्षररता केंद्र चे सेंटर मॅनेजर प्रशां...

अकोला जिल्ह्यात प्रहारला मोठा हादरा जिल्हा पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्षाचा वंचितमधे प्रवेश.....

Image
अकोला जिल्ह्यात प्रहारला मोठा हादरा जिल्हा पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्षाचा वंचितमधे प्रवेश..... अकोला :  वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी. जि. प‌. सभापती सौ. गावंडे यांचे पती तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट तालुकाप्रमुख तुषार पाचकोर तसेच प्रहार शेतकरी आघाडी चे संजय बुध यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज दिनांक 15 जून 2023 रोजी श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यालय मुंबई येथे जाहिर प्रवेश केला. प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अकोट तुषार पाचकोर तसेच जिल्हा अध्यक्ष प्रहार शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय बुध, ग्रा. पं. लोतखेळ उपसरपंच विशाल नागरे यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे विचार प्रत्येक बहुजन कुटुंबातील सदस्यांपर्यत पोहचवणार असुन आगामी सर्व निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जवाबदारी स्विकारू असे वचन ह्या ...

अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या अवैध वाहतुकीस थांबवा; मनसेचे तहसीलदारांना निवेदन....

Image
अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या अवैध वाहतुकीस थांबवा; मनसेचे तहसीलदारांना निवेदन.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : बार्शिटाकळी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अवैध उत्खनन आणि त्यामुळे होणारी अवैध वाहतुकीस आळा घालावा अशी मागणी करणारे निवेदन बार्शिटाकळी तहसीलदार यांना देण्यात आले .      एरंड गावातील रहिवासी अक्षय सुरेश ढवळे यांचा नुकताच कातखेड विजारा दरम्यान अपघातात मृत्यू झाला त्या रस्त्याचे असलेली दुरावस्था व या दुरुस्तीस कारणीभूत असलेले परिसरातील खदानीतून होणाऱ्या अवैध उत्खनन आणि त्यासाठी होणारी अवैध वाहतुक जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला.   सदर रस्ता छोटा असुन मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्षमतेपेक्षा अधिक खनिज संपत्ती वाहतूक होत आहे अनेकदा विनापरवाना वाहनधारक हे वाहन चालवतात आणि अवैध वाहतूक असल्यामुळे भरधाव वेगाने जातात त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे स्थानिक विझोरा,  गोरवा , एरंडा,  परंडा , कातखेड,  राहीत साहित व अजनी येथील नागरिकांना अकोला येथे जाण्यासाठी हा एकच मार्ग असून या भरधाव अवैध वाहतूक ना...

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यावर कारवाई करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी....

Image
शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यावर कारवाई करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : तालुक्यातील विद्युत रोहित व लवकरात असलेल्या दाराचे काम पूर्ण करण्यात यावे शेतकऱ्याकडून घेतलेले पैसे त्यांना परत करावे तसेच सदर प्रकरणाची सकल चौकशी करून जोशीवर कार्यवाही करावी अशा प्रकारचे तक्रार राज ठाकरेचे अभियंता यांच्याकडे वंचित बहुजन युवक आघाडी केली आहे.  धामणदरी गावातील विद्युत रोहित्र तथा डीपी मधील फ्युज व केबल बदलून देण्यात यावे , गावातील अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असल्याने एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे . या गावात सहा वर्षापासून एकच विद्युत कर्मचारी काम करत आहे त्यांनी डीपी मधील फ्युज बदलण्यासाठी पंधरा ते वीस शेतकऱ्याकडून पैसे स्वीकारलेले आहेत . त्याची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना सदर पैसे परत करण्यात यावेत , त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी विद्युत विभागाने कामे पूर्ण करावीत व दोषींवर कार्यवाही करावी अशा प्रकारची तक्रार १३ जूनला अभियंता विद्युत वितरण कंपनी बार्शीटाकळी यांच्याकडे वंचित बहुजन युवक आघाडीचे त...

प्रभाग क्र.14 व प्रभाग क्र.4 मधील खाई नदीच्या संरक्षक भिंतीच्या अधुरे बांधकाम पुर्ण रहिवाशी नागरिक यांच्या घरा पर्यंत घ्या एलीसपुर वेसीवरील महीला वर्ग आक्रमक महीलांनी आमदार व मुख्यअधीकारी व सार्वजनीक बाधकाम विभागास दिले निवेदन....

Image
प्रभाग क्र.14 व प्रभाग क्र.4 मधील खाई नदीच्या संरक्षक भिंतीच्या अधुरे बांधकाम पुर्ण रहिवाशी नागरिक यांच्या घरा पर्यंत घ्या एलीसपुर वेसीवरील महीला वर्ग आक्रमक महीलांनी आमदार व मुख्यअधीकारी व सार्वजनीक बाधकाम विभागास दिले निवेदन.... प्रभाग क्र.14 व प्रभाग क्र.4 मधील एलीसपुर वेस येथील सर्व महीला वर्ग व नागरीक यांनी संबंधित अधिकारी यांना खाई नदीच्या संरक्षक भीती चे काम जे सुरु आहे ते पुर्ण घरा पर्यंत करा या संदर्भात निवेदन उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट व मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन दिले निवेदन मध्ये मागणी अशी होती की पावसाळा सुरु असतांना खाई नंदीच्या संरक्षक भीतींचे चे जे काम सुरु केले आहे त्यामुळे बाकीच्या घरात पाउस जाण्याची शक्कता आहे त्यामुळे जनजीवण उद्वस्त होण्याची शक्कता आहे तरी संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही निधीत हे काम पुर्ण करा तरच मंजुरात असलेले काम पुढे सुरु करा व आज जे काम बाकी आहे ते कामाचे नियोजन काय असा प्रश्न पडला आहे तरी आपण आपल्या स्तरावर आमदार निधीतून चालु असलेले अर्ध्या थोपण भिंतीचे काम बंद करावे व निधी वाढून देऊन थोपण भ...

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने विवेक सोनूने धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांची चौकशी सुरु बदलीचा अर्ज नामंजुर....

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने विवेक सोनूने धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांची चौकशी सुरु बदलीचा अर्ज नामंजुर.... बार्शिटाकळी येथील समाज सेवक तथा व्हिस्टल ब्लोअर अब्दुल समद शेख यांनी अकोला येथील धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांचे विरूद्ध मुंबई उच्च न्यायालय आणी धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कड़े तक्रार केली होती त्या तक्रारीचे अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयचे न्यायधीश यांनी धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या आधारे सदर चौकशी अमरावती विभागाचे सह आयुक्त तथा न्यायधीश यांचे कड़े चौकशी देण्यात आली होती परंतु अमरावतीचे सहआयुक्त तथा न्यायधीश यांनी बार्शिटाकळी येथील समाज सेवक अब्दुल समद शेख यांचे अमरावती येथे बयाण घेतले होते व अकोला येथील धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मध्य येवुन चौकशी केली होती परंतु चौकशी व कारवाई चे भीतीने धर्मदाय उप आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांनी आपली बदली व्हावी महणुन महाराष्ट्र राज्य ...

बार्शिटाकळी शहरातील १९ हज यात्रेकरूंना वैद्यकीय किटचे वाटप.....

Image
बार्शिटाकळी शहरातील १९ हज यात्रेकरूंना वैद्यकीय किटचे वाटप..... ∆डॉ. तनवीर जमाल यांच्या केबी मेमोरियल हॉस्पिटलचा उपक्रम... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे... बार्शिटाकळी 8 जून केबी मेमोरियल क्लिनिकचे अध्यक्ष डॉ सय्यद तन्वीर जमाल आणि जमियत-ए-उलामा-ए-हिंदचे तालुकाध्यक्ष व मिनारा मशिदीचे इमामखतीब मौलाना अब्दुल सलाम मजहेरी यांच्या हस्ते वैधकिय किट चे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अब्दुल सलाम मजाहेरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हज यात्रेकरूंना हजविषयी माहिती दिली, तर प्रवासादरम्यान डॉ. सय्यद तनवीर जमाल यांनी यांनी आपल्या शैलीत सामान्य आजार कसे टाळावेत तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी व कोणती औषधे घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले, मौलवी एजाज मजाहेरी साहब व मोहम्मद कौसर सेठ, नसरुल्ला खान यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोहम्मद अजीम हरुनी यांनी केले. मौलवी एजाज मजाहेरी यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बार्शी टाकळी शहरातील 19 हज यात्रेकरू उपस्थित होते.त्यामध्ये नियामत उल्...

वाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून एक दिवसीय धरणे आदोलन......

Image
वाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून एक दिवसीय धरणे आदोलन.....  कांदा पिकाला हेक्टरी ५० हजार रूपये मदत मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन  वाडेगाव:- आज दि. 7 जुन 2023 रोजी दुपारी 12:00 वाजता वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलींद इंगळे व ओबीसी नेते गोपाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत शासनाने द्यावी या मागणीसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील टि पॉईंट येथे आयोजित करण्यात आले होते. अस्मानी संकट व त्यांनतर कांद्याला मिळत असलेला मातीमोल भावाने शेतकरी हा मोठ्या आशेने शासनाची मदत मिळेल म्हणून बघत असतांना शासन हि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याने आज आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी आपला कांदा हा रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला.    या धरणे आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, ओबीसी नेते गोपाल राऊत, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ....

नुकतेच निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार वेतन निश्चित करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याची शिक्षेकेत्तर कर्मचारी संघटनेची मागणी.....

Image
नुकतेच निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार वेतन निश्चित करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याची शिक्षेकेत्तर कर्मचारी संघटनेची मागणी..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे   नुकतेच महासंघाचे सरचिटणीस मा.डॉ.आर. बी. सिंग साहेब यांच्या आदेशान्वये पुणे येथे उच्च शिक्षण संचालक मा. शैलेंद्र देवळणकर साहेब यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मिटिंग आयोजित करण्यात आली होती. प्रथम महासंघाच्या वतीने मा. देवळणकर साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर दि 31 मे 2023 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्या करीता शिबाराचे आयोजन करावे अशी मागणी करण्यात आली यावर साहेबानी सांगितले की पुढील दोन दिवसात सर्व विभागीय सहसंचालकांची मीटिंग अयोजित करून त्यांना वेतन निश्चिती शिबीर बाबत सूचना देऊन लवकरात लवकर वेतन निश्चितीचे काम पूर्ण करण्यास सांगतो असे सांगितले. तसेच सरळ सेवेने प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक व ग्रंथालय सहाय्यक यांची पद भरतीची फाईल वित्त विभागात मंजुरीसाठी आहे मंजुरी मिळाल्यावर त्वरित भरती प्रक्रिया सुरू होईल असे अश्वस...

राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांची पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट.....

Image
राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांची पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट.....   बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  पिंजर येथे दि,६ जुनं रोजी मंगळवारी राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ, दुर्योधन चव्हाण यांनी पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आकस्मिक भेट दिली,  सदर भेटी दरम्यान त्यांनी डिलिव्हरी रुम आणि औषधी भांडर गृह यांची पाहणी व परिसर स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले.तसेच मागील २५/१०/२०२२ रोजी दिलेल्या सुचनाचे अनुपालनाची पळतानी केली,तसेच उर्वरित कामे पूर्ण करण्याचे सुचना दिल्या तसेच साथरोग नियंत्रण कक्ष तसेच मागील भेटीच्या पाठपुरावा तसेच शासनाच्या मार्फत रावीला जाणाऱ्या सर्व आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच जनतेला गुन्हातमक आणि दर्जेदार आरोग्य सेवा वेळीच उपलब्ध होईल याकरिता योग्य नियोजन करण्याचे सूचना दिल्या, यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रणाली मॅडम श्रीमती देशमुख मॅडम (आ,सा) आरोग्य सहाय्यक,घावट सर आरोग्य सहाय्यक सोळंके सर आरोग्य सेविका अनु सिरसाठ परिचर,जौजाळ सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते....

पर्यावरण सप्ताहानिमित्ताने बार्शिटाकळी येथील विद्रुपा नदी सफाई करणे बाबत मुख्याधीकारी यांना निवेदन....

Image
पर्यावरण सप्ताहानिमित्ताने बार्शिटाकळी येथील विद्रुपा नदी सफाई करणे बाबत मुख्याधीकारी यांना निवेदन.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शीटाकळी : ६ जून जमाते इस्लामी हिंद शाखा बार्शिटाकळी विद्रुपा नदी काठाजवळील शेतकरी,नागरीकांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत बार्शिटाकळी यांना निवेदन सादर करण्यात आला, बार्शिटाकळी शहरातून विद्रुपा नदी वाहते, मात्र सदर नदीवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली आहे ज्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदीचे पाणी अवरुध्द होऊन ते वार्शिटाकळी शहरातील नदी काठी असलेल्या दहेंडबेस, काजीपुरा, माळी पुरा, मुजावर पुरा, अशोक नगर तथा हालोपुरा मध्ये शिरून त्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग व इतरही प्रकारची हानी होण्याची दाट शक्यता आहे किंबहुना दरवर्षी ह्या अडचणींचा सामना या भागातील नागरीकांना करावा लागतो. तसेच सदर नदीच्या काठावर असलेल्या शेतामध्ये सुध्दा नदीचे फुटलेले पाणी शिरुन पिकाची दरवर्षीच नासाडी होते. तसेच विद्रुपा नदीकाठावर दोन स्मशान भूमी आहेत. नदीचे साचलेले पाणी बरेच दिवस साचून राहत असल्याने म्हणजे ते...

आरोग्य केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न......

Image
आरोग्य केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न... बार्शीटाकळी ( श्रावण भातखडे )         जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन पर्यावरण समतोल ठेवण्याकरीता झाडे लावा झाडे जगवा हा उद्देशाप्रमाणे अकोला जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी  यांचा आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी सरप येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. सदर  कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ मंगेश गमे , यांच्या मार्गदर्शनाखाली दवाखाना परिसरात विविध प्रजातीचे १५ झाडांची लागवड करण्यात आली. सदर झाडांच्या संवर्धनासाठी लोखंडी जाळी तसेच त्यांना पाणी देण्याची जबाबदारी डॉ सचिन राठोड यांनी   घेतली . या वेळी डॉ मंगेश गमे यांनी पर्यावरणाचे  मानव जिवनात किती महत्व आहे त्या बद्दल माहिती दिली . त्या साठी प्रत्येक घरात एक व्यक्ती एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे अशी शपथ उपस्थितांना देण्यात आली. सदर कार्यक्रमाध्ये श्री शेळके ,  रेखा ऊजाडे , विद्या तायडे ,शोभा नागे ,गणेश पारेकर ,गोविद कटरिया , आरोग्य सेवक राम बायस्कर ठाकूर , लिंक वर्कर बाळकृष्ण...

ओबीसी, बंजारा, आदिवासी समाजाचा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश......

Image
ओबीसी, बंजारा, आदिवासी समाजाचा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश...... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बार्शीटाकळी तालुक्यातील ओबीसी, बंजारा आदिवासी समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव आद. राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनात, वंचित बहुजन युवा आघाडीचे बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष अमोल जामनिक तालुका महासचिव अक्षय राठोड कोषाध्यक्ष नितेश खंडारे यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये आज ओबीसी बंजारा आदिवासी समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रमांमध्ये धाबा येथील स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे महासचिव राजकुमार दामोदर, कोष्याधक्ष तथा पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, सचिव पंचायत समिती स...

∆गोर बंजारा विमुक्त जाती (VJA)प्रवर्गातील आरक्षणातील खोटे (बोगस) राजपूत भामटांची अवैध घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी....... ∆गोर सेनेच्या वतीने म्हणून महाराष्ट्रत तीनशेच्यावर तालुक्यात दिले निवेदन........

Image
∆गोर बंजारा विमुक्त जाती (VJA)प्रवर्गातील आरक्षणातील खोटे (बोगस) राजपूत भामटांची अवैध घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी.... ∆गोर सेनेच्या वतीने म्हणून महाराष्ट्रत तीनशेच्यावर तालुक्यात दिले निवेदन....  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  -महाराष्ट्रातील गोर बंजारा विमुक्त जाती (VJA) प्रवर्गातील आरक्षणात मूळ राजपूत भामटा सोडून इतर बिगर मागास समाजातील उदा. राजपूत,छप्परबंध, मीना, परदेशी जातीचे खोटे प्रमाणपत्र जोडून विमुक्त जाती (VJA) मोठ्या प्रमाणात घुसखोरी करीत आहे. त्यामुळे मूळ गोर बंजारा विमुत जाती (अ) यांच्यावर अन्याय होत आहे.आरक्षणातील ही घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी म्हणून महाराष्ट्रात जिल्हा, तालुक्यात 300 च्या वर तहसीलदार, जिल्हाधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना एकाच दिवशी दिले निवेदन विमुक्त जातीतील घुसखोरी थांबवली नाही तर गोर सेना आक्रमक भुमीका घेईल असे प्रतिपादन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वातील गोर सैनिक यांनी केले आहे. या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी दिनांक ११ मे २०२२ रोजी गोर सेनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे गोरसेन...

ग्रामीण रुग्णालयात जागतिक तंबाखु विरोधी दिवस साजरा....

Image
ग्रामीण रुग्णालयात जागतिक तंबाखु विरोधी दिवस साजरा.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमाचे मुंख्य मार्गदर्शक ग्रामिण रुग्णालय बार्शिटाकळीचे वैधकीय अधिक्षक डॉ महेश राठोड होते  आज आपण सर्व सार्वजनिक ठिकानी पाहतो नागरिका मध्ये तंबाखु व्यसनाचा कल वाढला आहे त्या बदल यावेळेस तंबाखुने होणारे आजार जसे की मुखाचा , अन्ननलिकेचा , फुफुसांचा कर्करोग , उच्च रक्तदाबामुळे हजारो नागरिक  या आजाराचे बळी पडत आहे त्यामध्ये सध्या युवा वर्ग तंबाखु व्यसनाच्या जास्त आधीन आहे त्यासाठी तंबाखुचे  व्यसन जिवघेणे असून त्या   तंबाखु - व्यसन  पासून नागरिकांनी कोषो दुर रहावे अशी माहिती  रुग्णांना व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली त्यावेळी सर्वाना सुचना करून तंबाखुचे सेवन न करण्या साठी शपथ देण्यात आली याप्रसंगी रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश राठोड , दंत रोग तज्ञ शितल मस्के , यांनी मार्गदर्शन केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर तिड...