Posts

Showing posts from May, 2022

बार्शिटाकळी तालुक्यातील किनखेड येथे आग लागून नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबियांची आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी घेतली भेट देऊन केली आर्थिक मदत

Image
बार्शिटाकळी तालुक्यातील किनखेड येथे आग लागून नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबियांची मा. आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी घेतली भेट देऊन केली आर्थिक मदत  प्रतिनिधी बार्शिटाकळी --दिनांक 30 मे च्या मध्यरात्री बार्शीटाकळी तालुक्यातील किनखेड येथिल श्री सुमित साहेबराव आंधळे यांच्या घराला आग लागली यामध्ये त्यांचे बरेच नुकसान झाले घरातील साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या सदर घटनेची माहिती मिळताच नुकसानग्रस्त कुटुंबियांची माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी राजु पाटील काकड तालुका अध्यक्ष बार्शीटाकळी, योगेश कोंदनकार भाजयुमो तालुकाध्यक्ष बार्शीटाकळी, सुनील ठाकरे, गणेश महल्ले, गोपाल महल्ले, जोंगदड गुरुजी, संजय आंधळे, संदीप आंधळे,बाबाराव आंधळे,आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

प्रकल्प व्यवस्थापन समितीला देयके देण्याच्या वादात पाणी पुरवठा योजना वांद्यात ! बार्शिटाकळी नगर पंचायतची सभा वादळी; सत्ताधारी - विरोधकांत खडाजंगी

Image
प्रकल्प व्यवस्थापन समितीला देयके देण्याच्या वादात पाणी पुरवठा योजना वांद्यात !                       बार्शिटाकळी नगर पंचायतची सभा वादळी; सत्ताधारी - विरोधकांत खडाजंगी  बार्शिटाकळी : येथील पाणीपुरवठा योजना सत्ताधारी व विरोधी पक्ष नगरसेवक यांच्या भांडणात मंगळवार दिनांक 31 मेच्या सगळे मुले स्पष्ट झाले आहे नगरपंचायत भाषण सभा वादळी ठरली पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीला देण्यात येणाऱ्या सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे एखादा करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आणि दुसरीकडे वेळ काढून ठेवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे उदाहरण दिले गेले पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी वाढीव निधी मंजूर करण्याबाबत आग्रही असल्याने सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवायचे ठरले याला 12 नगरसेवकांचा गटाने तीव्र विरोध दर्शविला आग्रह आहे की शहरातील जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी ताबडतोब निविदा बोलावण्यात या यावरून बारा नगरसेवकांनी सभागृहात शब्दांचा भडीमार केला कारण एक...

अकोट पंचायत समीतीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Image
अकोट पंचायत समीतीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी  आकोट प्रतिनिधी  आज पंचायत समिती आकोट येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली पंचायत समिती सभापती लताताई नितोने आकोट व शेत्रुघन नितोने यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले करीता कार्यक्रमात उपस्थित ता.अध्यक्ष संदीप आग्रे भारीप बहुजन महासंघ आकोट बबन तेलगोटे माजी शहर अध्यक्ष भारीप आकोट लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट विक्की तेलगोटे अध्यक्ष पहेलवान ग्रुप आकोट मयूर सपकाळ विलास तेलगोटे श्रीकृष्ण वाघ ज्ञानेश्वर दहिभात पंचायत समिती सदस्य मंगेश वासेकर बाबुराव धांडे विश्वास वासेकर यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली 

न.प.आकोट मधील संबंधित अधिकारी व पालकमंत्री यांच्या चुकामुळे दलित वस्तीचे कामे रद्द होण्याच्या मार्गांवरसंबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा लखन इंगळे यांचा इशारा

Image
न.प.आकोट मधील संबंधित अधिकारी व पालकमंत्री अकोला यांच्या चुकामुळे दलित वस्तीचे कामे रद्द होण्याच्या मार्गांवर संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा लखन इंगळे यांचा इशारा  आज लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी साहेब अकोला  मा.मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन देण्यात आले निवेदन असे होते कि नगर परिषद आकोट मध्ये अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना मध्ये अकोला पालकमंत्री यांनी निधी देणार असल्याचे खोटे आश्वासन दिले पण आज कित्येक महिन्या पासुन निधी दिला /वळती केला नाही या वरून असे लक्षात येते कि अकोला पालकमंत्री यांनी त्यांच्या जऊळील ठेकेदार यांना कामे मिळावे म्हणुन निधी तोरीत न देता कामे पुढे ढकलण्याचे काम करून अशी शेटिंग झालेली असावी या शेटिंग मध्ये नगर परिषद आकोट चे संबंधित अधिकारी आहेत या वरून लक्षात येते याची चौकशी करावी कारण प्रशासकीय मान्यता ही आर्थिक वर्ष 2021/2022 या वर्षी प्रदान करण्यात आलेली आहे परंतु निविदा प्रकाशित आर्थिक वर्ष 2022/2023 करिता प्रसिद्ध करण्यात आली तसेच या संबंधित मंजूर कामाचा निधी हा अद्य...

भव्य आरोग्य शिबीर घेऊन मनसेने केल्या दोन शाखेचा शुभारंभ

भव्य आरोग्य शिबीर घेऊन  मनसेने केल्या दोन शाखेचा शुभारंभ  बार्शीटाकळी                बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम परंडा व गोरव्हा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेची स्थापना बार्शीटाकळी तालुक्यातील गाव तेथे शाखा मोहिमेंतर्गत संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व उपजिल्हाध्यक्ष सतिष फाले यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष सचिन गालट यांनी केली .           यावेळी परंडा शाखा अध्यक्ष म्हणून पवन वानखडे पाटिल यांची तर  शाखा उपाध्यक्ष म्हणून वैभव इंगोले यांची तर सचिव म्हणून शंकर काटोले व कोषाध्यक्ष म्हणून चंद्रकांत वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर गोरव्हा शाखाध्यक्ष पदी वैभव भांगे , उपाध्यक्ष पवन खांबलकर , सचिव म्हणून योगेश खांबलकर तर कोषाध्यक्ष म्हणून दत्ता बारड यांची नियुक्ती करण्यात आली .               यावेळी सिया उमेश कोकाटे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर आरोग्य शिबिरात...

समर्पित मागास वर्ग आयोगाला वंचित बहूजन आघाडी च्या वतीने ओबीसी आरक्षण बाबत ड्राफ्ट सादर

Image
समर्पित मागास वर्ग आयोगाला वंचित बहूजन आघाडीच्या वतीने ओबीसी आरक्षण बाबत ड्राफ्ट सादर  अमरावती -  राज्यात तीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास म्हणजेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती जमातींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एका समर्पित आयोगाला आज वंचित बहूजन आघाडी च्या वतीने अमरावती विभागीय कार्यालयात ओबीसी आरक्षणा बाबत प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्यांचे स्वाक्षरीने ड्राफ्ट सादर करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश महीला उपाध्यक्ष डॉ निशाताई शेंडे, जिल्हाध्यक्ष प्रा शैलेश गवई प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य सरकारने समर्पित आयोग स्थापन केलेल्या आयोगाने.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दौरा जाहीर केला आहे.२८ मे २०२२ या कालावधीत समर्पित आयोग अमरावती विभागात भागात दौ-यावर   आहे.अमरावती येथे शनिवारी २८ मे सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभ...

वंचित बहुजन आघाडीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन केला निषेध

Image
वंचित बहुजन आघाडीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन केला निषेध  अकोला दि.२८ कारागृह समोरुन सुरूवात होणा-या उड्डाणपूलाला भाजपाने स्वर्गवासी विनयकुमार पाराशर यांचे नाव न देता उद्घाटन करण्यात येणार आहे ह्या अवमानाचा निषेध वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन करण्यात आला. आज सकाळी ०८.०० वाजता वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, अकोला पुर्व चे अध्यक्ष शंकरराव इंगळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,मनोहर बनसोड, मनोहर पंजवानी,एड आकाश भगत, संगीताताई खंडारे, सचिन गोरले (पाटील) प्रामुख्याने उपस्थित होते. 

चौथ्या अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे रविवार २९ मे रोजी संतनगरी शेगावमध्ये आयोजन

Image
चौथ्या अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे रविवार २९ मे रोजी संतनगरी शेगावमध्ये आयोजन  प्रतिनिधी बार्शिटाकळी संमेलनाध्यक्ष पदी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. राजेश मिरगे तर स्वागताध्यक्ष पदी उद्योजक विनायक भारंबे यांची निवड शेगांव जि. बुलडाणा (दिनांक २७ मे ) : वऱ्हाडी साहित्य आणि बोलीभाषा संवर्धन संस्था बार्शीटाकळी जि. अकोला द्वारा संचालित अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच शाखा बुलडाणा यांच्या वतीने चवथ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. भगवान ठग साहित्य नगरी मथुरा लॉन शेगाव येथे रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी करण्यात आले आहे. चवथ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनायक भारंबे ( प्रसिद्ध उद्योजक) असून संमेलन अध्यक्षपदी जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक डॉ. राजेश मिरगे यांची निवड झाली आहे. संमेलनाचे उद्घाटन डॉ. सतिश तराळ (विश्वस्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.         उदघाटन सत्राला आमदार संजय कुटे, पुष्पराज गावंडे सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, सौ शकुंतला बूच (नगराध्यक्ष शे...

मंगरुळपीर नगर पालिकेचा मुख्याधिकारी वाशीम ACB च्या जाळ्यात…वाशीम जिल्ह्यात खळबळ…

Image
मंगरुळपीर नगर पालिकेचा मुख्याधिकारी वाशीम ACB च्या जाळ्यात…वाशीम जिल्ह्यात खळबळ…    वाशीम – मंगरुळपीर नगरपरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांना माध्यस्ताचे मार्फत एक लाख रुपये लाच स्वीकारताना वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिपक नारायण इंगोले वय 42 वर्ष मंगरुळपीर मुख्याधिकारी, वर्ग 2, नगर परिषद कार्यालय,येथे कार्यरत तर त्यांचा मध्यस्ती असलम जमिल सिद्दिकी वय-55 खाजगी इसम रा.मंगरुळपिर जि. वाशिम याने लाचेची रक्कम स्वीकारली. तक्रारदार यांच्या मंगरुळपिर शहरातील सर्वे क्र 227अ मधील प्लॉट क्रं.52 मध्ये काही लोकांनी कॅबिन टाकून अतिक्रमण केले होते, सदरचे प्लॉट वरील अतिक्रमण काढून देण्याकरिता अर्जदार यांनी आ.लो.से यांचे कडे रीतसर अर्ज केला असता आ.लो.से क्रं.1 यांनी अतिक्रमण काढून देण्याच्या बदल्यात आ.लो.से क्रं.2 खाजगी इसम यांचे मार्फतिने पडताळणी कार्यवाही दरम्यान 100000/- रु. ची लाचेची मागणी करून सापळा कार्यवाही दरम्यान आ.लो.से क्रं 2 नमूद खाजगी इसम यांनी 100000/-रु लाचेची रक्कम आ.लो.से क्रं .1 यांच्या करीत पंचासमक्ष स्वीकारले वरून...

नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार

Image
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार  मे २३, २०२२  नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार  बार्शीटाकळी -पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कान्हेरी सरपला लागून वाहणाऱ्या विद्रुपा नदीजवळ 7 ते 8 दिवसांपूर्वी जन्मलेल्या बालकाला अज्ञात व्यक्तीने प्लास्टिकच्या पिशवीत फेकून दिले. दरम्यान, मुलाच्या अंगावरून अज्ञात वाहन गेले, घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी झाली होती.नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार असल्याचे बार्शीटाकळी पोलिसांनी यावेळी सांगितले बार्शीटाकळी पोलीस घटनास्थळी पोचून पंचनामा करून पुढील .तपास बार्शीटाकळी पोलीस यांनी सुरू केला आहे. ================================

शिक्षणावर काळिमा फासण्याची घटना अकोल्यात खळबळ.....

Image
शिक्षणावर काळिमा फासण्याची घटना अकोल्यात खळबळ मे २२, २०२२   शिक्षणावर काळिमा फासण्याची घटना अकोल्यात खळबळ  अकोला - विद्यार्थीनिवर विनयभंग केल्याप्रकरणी चौधरी कोचिंग क्लासेस संचालक वसीम चौधरी याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,चौधरी क्लासेसच्या संचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याने अकोला परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चौधरी क्लासेसमधील विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या पालकांनी वसीम चौधरीविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकारामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट पोलिस ठाण्यात गर्दी करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वसीम चौधरीविरोधात गुन्हा दाखल आणि कठोर कारवाई करण्याचा मागणीसाठी आमदार नितीन देशमुख यांच्यासहित शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली. त्यानंतर या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी सायबर पोलिसां च्या मदतीने पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.विद्यार्थिनीच्या तक्रार नोंद केली आहे. त्यानुसार पोलिसांनी वसीम चौधरीवर भादंवि कलम ३५४ (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, १० अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आ...

बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. उद्धव गाडेकर महाराज यांच्या परिवाराचे सांत्वन

Image
बाळासाहेब आंबेडकर यांनी केले उद्धव गाडेकर महाराज यांच्या परिवाराचे सांत्वन  अकोट  बाल अवस्थेपासून मुलांमध्ये संस्कार घडविणे आवश्यक असून राष्ट्रनिर्मितीकरीता महत्वाचे आहे. डॉ. उद्धवजी गाडेकर यांनी संत तुकडोजी महाराजाचे विचार बालअवस्थेपासूनच मुलांमध्ये रुजविण्याचे काम केले. त्यांचे हे काम मोलाचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा.बाळासाहेब आंबेडकर यांनी पाटसूल येथे केले.  अकोट तालुक्यातील पाटसूल येथे डॉ. उद्धवजी गाडेकर महाराज यांच्या परिवारास बाळासाहेब आंबेडकर यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांचे समवेत प्रदिप वानखडे, प्रमोद देंडवे, काशीराम साबळे, अशोक दारोकार, विकास पवार,मो.सलिमभाई, सुरेंद्र भोजने. आदी उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी डॉ. उद्धवजी गाडेकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रद्धाजंली वाहिली. डॉ. उद्धवजी गाडेकर महाराजांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार व मुलांमध्ये संस्कार घडविण्याचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी केले. Balasaheb Ambedkar  #VBA 

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा  मे २१, २०२२             अकोला,दि. 21 (जिमाका)- माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात ही प्रतिज्ञा सामुहिकपणे घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सूचना प्रचारण अधिकारी अनिल चिंचोले तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते 

नांदेड उत्तरच्या ग्रामीण भागाशी वंचितची नाळ मजबूत करू- फारूक अहमद नांदेड उत्तरची प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न

Image
नांदेड उत्तरच्या ग्रामीण भागाशी वंचितची नाळ मजबूत करू- फारूक अहमद नांदेड उत्तरची प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न   नांदेड:- 2019 च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीसह यापूर्वीसुद्धा नांदेड ग्रामीण भागातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी अॅड बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ सांभाळली. अलीकडच्या काळात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवादामध्ये अंतर पडले होते त्याला अनेक कारणेही असू शकतात. परंतु यापुढे वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तरच्या ग्रामीण भागातील जनतेशी आपली नाळ अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे. शहरातील जनतेचे जीवन हे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर यांच्या सेवा व सुविधा यावर अवलंबून आहे. याची जाणीव वंचित बहुजन आघाडीला आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी अनेक संकटाच्या काळात सुद्धा वंचितच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहण्याची निर्भिडपणे भूमिका घेतली. येत्या काळात गाव तिथे शाखा, व घर तिथे कार्यकर्ता निर्माण करण्याच्या दृष्टीने संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षाची मजबूत बांधणी करून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न वंचित आपल्यापरीने उचलणार आहे. ...

अकोला जिल्ह्याचे वाढत असलेले तापमान कमी करण्याचा निसर्ग कट्टा व गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचा एक प्रयत्न

Image
अकोला जिल्ह्याचे वाढत असलेले तापमान कमी करण्याचा निसर्ग कट्टा व गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचा एक प्रयत्न. बार्शी टाकळी (तालुका प्रतिनिधी) वनाबद्दलच्या प्रेमातून वृक्षलागवडीच्या संकल्पनेतून तसेच जिल्ह्यातील वाढत चाललेले तापमान जर कमी करायचे असेल तर देशी झाडांची भरपूर प्रमाणात लागवड केल्याशिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन तापमान कमी करण्यासाठी निसर्ग कट्टा व वनस्पतीशास्त्र विभाग, गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शी टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल बनवून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करण्यात केला. यामध्ये अर्जुन, कांचन, सागवान, कडू बदाम, चिंच, सीताफळ, सुबाभूळ, चिकू, व लिंब अशा अनेक देशी झाडांच्या बिया विद्यार्थ्यां मार्फत जमा करण्यात आल्या. निसर्ग कट्टा चे संस्थापक श्री. अमोल सावंत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक माती, शेणखत आणि झाडाचा पाला पाचोळा यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून सिड बॉल बनवण्यात आले. या कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागातील 44 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जवळपास 1000 सीड बॉल ची निर्मिती केली. येणाऱ्या पावसाळ्यात पावसाची ओल अर्धा...

44 डिग्री सेल्सियस उष्ण तापमाना मध्ये दगडपारवा येथील शेतकऱ्यांचा मिश्र शेतीचा अनोखा प्रयोग

Image
44 डिग्री सेल्सियस उष्ण तापमाना मध्ये दगडपारवा येथील शेतकऱ्यांचा मिश्र शेतीचा अनोखा प्रयोग   अकोला जिल्ह्यांमध्ये माहे एप्रिल व मे महिन्यामध्ये 44 व 45 डिग्री सेल्सिअस उष्णतामान गेले. अशा उष्ण तापमानामध्ये शेती कशी करावी अशा प्रकारचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर पडतो. त्यामध्ये आमच्या दगडपारवा तालुका बार्शीटाकळी येथील शेतकरी.शंकरराव कावरे व पुरुषोत्तम घोगरे   यांनी मिश्र शेतीचा एक अनोखा प्रयोग याठिकाणी करून आपले केळीचे व टरबुजाचे पीक जगवून एक आदर्श निर्माण केल्याचे आपल्याला पाहायला मिळते  दगडपारवा तालुका बार्शिटाकळी येथे एक मध्यम स्वरूपाचे धरण आहे त्या धरणामध्ये पाणी साठा उपलब्ध आहे त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला मुबलक स्वरूपाचं पाणी पाहायला मिळते त्याच पाण्याचा वापर करून आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची शेती करू शकतो अशा प्रकारचा संकल्प श्री शंकरराव कावरे आणि.पुरुषोत्तम घोगरे  यांनी केला. त्यांनी या शेतामध्ये केळीचे व टरबुजाचे पीक व जगवून भर उन्हाळ्यामध्ये शेतीचे पीक जिवंत ठेवलेले पाहायला मिळतात. श्री शंकरराव...

हातरुण पोटनिवडणुकीसाठी वंचित कडुन लीना शेगोकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल....

Image
हातरुण पोटनिवडणुकीसाठी वंचित कडुन लीना शेगोकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल.... बाळापूर दि. २० जिल्हा परिषदेच्या हातरुण गटाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी कडुन सौ लीना शेगोकार यांचा उमेदवारी अर्ज आज वंचित बहूजन आघाडीच्या प्रमुख उपस्थिती दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश पुरी ह्यांचे दालनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ह्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,हातरुण ग्रा पं सरपंच, गजानन दांदळे, पं स सभापती रुपालीताई गवई,सचिन शिराळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. वंचित कडुन लीना शेगोकार यांच्या उमेदवारीमुळे हातरुण जि प गटातील कार्यकर्ते आणि नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सिद्धार्थ वानखडे, प्रा. समाधान सावदेकर, सभापती रुपाली ताई गवई, मंगेश गवई, सरपंच हातरून वाजिद खान,भास्कर डोंगरे, समद गुरुजी, काशीमभाई, राजूभाई व्यापारी, मुमताजभाई, सुभान खान, पं. सदश्...

बार्शीटाकळी ची पाणी पुरवठा योजनेचे टेंडर (निवीदा) लावण्यास नगर पंचायत प्रशासना कडुन दिरंगाई "बार्शीटाकळीच्या जनतेला हक्काचे पाणी केव्हा मिळणार" ?

Image
"बार्शीटाकळी ची पाणी पुरवठा योजना चे टेंडर (निवीदा) लावण्यास नगर पंचायत प्रशासना कडुन दिरंगाई " बार्शीटाकळीच्या जनतेला हक्काचे पाणी केव्हा मिळणार ? बार्शीटाकळी: नगर पंचायत बार्शीटाकळी प्रशासनाची जबाबदारी आहे की नागरिकांना दैनंदिन सोईसुविधा पुरवणे क्रमप्राप्त आहे. याच अनुषंगाने नगर पंचायत बार्शीटाकळी यांनी पाणीपुरवठ्याचा विषय ठरावाद्वारे पारित केला . त्याबाबत सतत पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली. आता ह्या घटनेला ५६ दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे आणि आता आज पासून फक्त ३४ दिवस ऊरले आहेत या ३४ दिवसा मध्ये टेंडर प्रकिया पुर्ण करुन ज्या कोणत्याही ठेकेदार चे टेंडर खुलेल त्या ठेकेदार ला कार्यारंभ आदेश द्यावा लागेल असे बार्शीटाकळी पाणी पुरवठा मंजुर योजणे च्या जी आर मध्ये नमुद आहे.   वास्तविक पाहता प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ७ दिवसांत सदर कामाची निविदा निघायला पाहिजे. पण तसे झाले नाही म्हणून बार्शीटाकळीच्या ११ नगरसेवकांनी, मुख्य्याधिकारी ,जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे माहितीस्तव तक्रार दाखल केली. त्यामध्ये १) सुरेश जामनिक उपाध्यक्ष २)...

गोठाण जवळील श्मशान भुमित अनुजाती-जमातीतील लोकांना प्रेत जाळण्यास मज्जाव....

Image
गोठाण जवळीत अनुजाती जमातीतील लोकांना प्रेत जाळण्यात मज्जाव  प्रतिनिधी , बार्शिटाकळी , बार्शिटाकळी तालुक्यातील गांव लोहगड येथील गोठाण जवळीत पिढयान पिढया अनुजाती - जमातीच्या पारंपारिक स्मशान भुमी मध्ये प्रेत दहन करीत असत परतुं दि , २४ , ४ ,२०२२ ला गावातीलं रमाबाई  सुलताने नामक महिलेचे दुःखद निघन झाले असता गांवकरी यांनी  अंत्य विधी साठी अडथळा आणून अंत्य वीधी न करण्यासाठी मज्जाव केला.  लोहगड गांवातील सर्व अनु -जाती जमातील नागरिकांनी पालकमंत्री बच्चुभाऊ कंडू  कडे सदर प्रकरणाची तक्रार केली लोहगड येथील गोठाण जवळ पिढया पिढया अनु जाती जमाती पांरपारिक स्मशान भुमी मध्ये मृत  प्रेताचे अंत्य विघी करत होते ,परतुं दि , २९ , ४ ,२०२२ ला गावातील रमाबाई मद्युकर सुलताने नामक महिलेचे दुःखद निघन झाले असता अनु ,जाती जमाती लोकांनी प्रेतचे अंत्यवीघी साठी लाकडे टाकले असता गांवातील उपसरपंच जाधव त्याच स्मशान भुमी जवळ सहा महिना पूर्वी अवैध दारूच्या विक्री साठी अतिक्रमण करून झोपडी बाघणाऱ्या सुनिल जाधव व्यवसाय हातभट्टीची दारु काढून विकणे हे दोघे जण आले . प्रेताच्या अंत्यविधी ...

लखन इंगळे यांच्या नेतृत्वात घरकुलाच्या लाभार्थी सह न.प.मुख्यअधिकारी आकोट वर विविध मागण्यासाठी हल्ला बोल आंदोलन........

Image
लखन इंगळे यांच्या नेतृत्वात घरकुलाच्या लाभार्थी सह न.प.मुख्यअधिकारी आकोट वर विविध मागण्यासाठी हल्ला बोल आंदोलन  आज लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्यअधिकारी आकोट यांना आकोट शहारातील पेंडिंग असलेले कामांच्या विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले  आकोट नगर परिषद मध्ये बऱ्याच वर्षां पासुन रमाई घरकुल /प्रधानमंत्री घरकुल हे राबविली जात असुन पण ही योजना राबवित असतांना निधी नसल्याने किंवा काही आणखी अडचण असल्यामुळे गरीब लाभार्थी यांना फार अडचण निर्माण होत आहे करिता आमच्या खालील मागण्या वरील आपल्या स्तरावर पूर्ण करण्यात याव्या 1) प्रधानमंत्री घरकुल योजनेचा मंजूर DPR 514,180,206,101,याचा निधी उपलब्ध करून लाभार्थी यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा . 2) रमाई घरकुल चे लाभार्थी यांचे अर्ज 2011पासुन तर आज 2022 परियंत निधी अभावी रखडून पडले आहेत त्या करिता नवीन निधी मागवुन गरजु लोकांना घरकुलचा लाभ देण्यात यावा. 3) गुंठेवारी धारक लाभार्थी यांचे अर्ज निकाली काढण्यात यावे कारण त्यांना घरकुल योजनेचा लाभ तोरीत घेता यावा. 4) आकोट शहारातील नि...

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या "तृतीय रत्न" नाटकाच्या प्रयोगाला अलोट गर्दी......शिक्षण हेच सामाजिक उन्नतीचे साधन...........गुलाबराव गावंडे

Image
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या "तृतीय रत्न" नाटकाच्या प्रयोगाला अलोट गर्दी...... शिक्षण हेच सामाजिक उन्नतीचे साधन........... गुलाबराव गावंडे अकोला प्राचिन काळापासून समाज हा अनेक अनिष्ट रूढी परंपरा या बंधनात जखडून आपल्या सर्वांगीण उन्नती पासून कोसो दूर होता,अश्या परिस्थितीत त्या त्या काळात शिक्षणा मुळे समाजाला नवसंजीवनी मिळाली नेमके हेच चित्र महात्मा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकातुन दर्शविली आहे, समाज बांधवांनी या तृतीय रत्न नाटकाचे अवलोकन करून आपली उन्नती साधावी असे आवाहन माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केले ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महा ज्योती ) नागपुर या संस्थेच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिना निमित्त, लोक जागृती संस्था चंद्रपुर प्रस्तुत, महात्मा ज्योतिबा फुले लिखित, अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित, "तृतीय रत्न" या नाटकाच्या अकोल्याच्या प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित प्रयोग प्रसंगी बोलत होते, या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्धाटक आमदार अमोल मिटकरी तर प्रमुख अतिथी माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हर...

शाहिद इक्बाल खान यांची अकोला जिल्हा सह कोषाध्यक्ष पदी निवड....महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना अकोला जिल्हा कार्यकारणी जाहीर....

Image
शाहिद इक्बाल खान यांची अकोला जिल्हा सह कोषाध्क्षय पदी निवड.... महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना अकोला जिल्हा नवीन कार्यकारणी जाहीर....  बार्शीटाकळी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना अकोला जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये अकोला जिल्हा सह कोषाध्यक्षपदी महान जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक व खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्थेचे उपध्यक्ष शाहिद इकबाल खान यांची नुकताच निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना चे राज्य अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांचे आदेशान्वये अकोला जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा नुकताच पार पाडली यामध्ये सर्वानुमते सर्वसमावेशक अशी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा अकोला ची कार्यकारणी गठित करण्यात आली सभेला जेष्ठ नेते अ मा वानखडे पंत संस्था अध्यक्ष शशिकांत गायकवाड , अंबादास वानखडे, प्रमोद काळपांडे , बा का तायडे यांच्या उपस्थितीत अकोला जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये अकोला जिल्हा अध्यक्षपदी रवींद्र सुखदेव चौथमाल , कार्यध्यक्षपदी राहुल सुधाकर रोकडे , तसेच सचिव पदी...

पाथर्डी सेवा,सह.निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बिनविरोध विजय....!

Image
पाथर्डी सेवा,सह.निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बिनविरोध विजय....!  तेल्हारा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणारी पाथर्डी सेवा सह,सोसा.ची निवडणुक लागली तेंव्हापासुन चुरस निर्माण झाली होती,बहुजन विकास आघाडीचे प्रमुख जि.प.सदस्य अनंत अवचार यांच्या नेतृत्वात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने १३ ऊमेदवार रींगणात ऊतरवुन नामनिर्देशन पत्र भरन्याच्या अखेरपर्यंत विरोधी पॅनलच्या ऊमेदरांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता आले नाहीत,नामनिर्देशन पत्र सादर करन्याची वेळ संपल्यामुळे बहुजन विकास आघाडीचे १३ ऊमेदवार अविरोध निवडुन आले... या निवडणुकीत ३कुणबी,३ पाटील,१माळी १बौद्ध १ मुस्लिम,१भोई,१ईटवाले कुंभार,१तेली,१ झाडीवाले कुणबी, अशाप्रकारे उमेदवार असुन हि प्रक्रिया पार पाडन्यासाठी,मा.पं.स.सदस्य श्रीकृष्ण गोडबोले,अनिल मोहोड,पं.स.सदस्य प्रकाश ऊगले,सरपंच प्रदिप तेलगोटे,दिवाकर कुकडे,विजय नेरकर,अशोक चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले...!!

आकोट शहरामध्ये बुद्ध जयंती निमित्त लखन इंगळे यांच्या हस्ते शरबत चे वाटप

Image
आकोट शहर मध्ये बुद्ध जयंती निमित्त लखन इंगळे यांच्या हस्ते शरबत चे वाटप  अकोला : प्रतीनिधी  बुद्ध जयंती निमित्त आकोट शहरात लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट व सर्व मित्र मंडळी मिळून यांच्या मार्गदर्शनात धम्म शांती ज्योत मध्ये येणाऱ्या आकोट शहारातील सर्व बौद्ध उपासक उपासिका व बहुजन वर्ग यांना शरबत चे वाटप करण्यात आले उपस्थित भारीप बहुजन महासंघाचे अकोला जिल्हाअध्यक्ष प्रदिपभाऊ वानखडे यांच्या हस्ते बुद्ध प्रतिमेचे पूजन करण्यात आले सोबत उपस्थित ऍड.संतोषभाऊ रहाटे , दिवाकरभाऊ गवई , सुभाषभाऊ तेलगोटे, आकोट शहर अध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट चेंदू बोरोडे , दिनेश घोडेस्वार , विशाल तेलगोटे,  तालुका उपाध्यक्ष भारीप देवेंद्र माकोडे, मिर्जा साहेब, नितीन तेलगोटे ,शिवाजी भदे ,प्रमोद खंडारे , विक्की तेलगोटे, सदानंद तेलगोटे, आनंद तेलगोटे, विकास तेलगोटे ,रोशन तेलगोटे ,अक्षय वानखडे, नवनीत तेलगोटे, कैलास मोरोदे ,प्रतीक तेलगोटे, सुगत तेलगोटे, सोप्निल तेलगोटे ,धीरज पळसपगार ,अनिल तेलगोटे, आनंदा तेलगोटे ,दिनेश तेलगोटे, देवा गवारगुरू ,आनंद पळसपगार , व वंचित बहुज...

नरवीर शिवाजी काशीद व छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचा 20 वा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा संपन्न

Image
नरवीर शिवाजी काशीद व छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचा 20 वा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा संपन्न.  नांदेड: छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षक प्रतिशिवाजी म्हणून ओळखणारे नरवीर शिवाजी काशिद व छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच *अखिल भारतीय जिवा सेना* या सामाजिक,पुरोगामी संघटनेचा 20 वा वर्धापन दिन सोहळा श्री सेना महाराज सभागृह नवीन कवठा, नांदेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.राजकुमार गाजरे होते.सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेश प्रवक्ते प्रा.गोविंद दळवी तसेच फुले शाहू आंबेडकरी विचारवंत अक्षयकुमार ढोके,माजी नगरसेवक नगरपरिषद मुखेड अडवोकेट कमलेशकुमार चौदंते हे होते.तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय सचिव प्रा. ड...

यशवंत भवन येथे बुध्दपोर्णिमानिमीत्ताने वंदना सुत्रपठण संपन्न

Image
यशवंत भवन येथे बुध्दपोर्णिमानिमीत्ताने वंदना सुत्रपठण संपन्न  15, 2022 यशवंत भवन येथे बुध्दपोर्णिमानिमीत्ताने वंदना सुत्रपठण संपन्न प्रतिनिधीअकोला दि १६ बुध्द पोर्णिमेनिमित्त वंदना सुत्रपठणाचे आयोजन श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी 'यशवंत भवन'कृषी नगर, अकोला येथे दि. १६ डिसेंबर २०२२ मंगळवार सकाळी ०८.०० वा. करण्यात आले होते. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास, आणि भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून आणि वंदना सुत्र पठणाने बुध्द पोर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वंदन केले.यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, बोध्दाचार्य राहुलजी अहिरे, रमेश गवई गुरुजी, एस पि वानखडे, महीला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक,दिपक गवई,अशोक शिरसाट, सुशांत बोर्डे, सरलाताई मेश्राम, किरणताई बोराखडे,रामाभाऊ तायडे, मनोहर पंजवानी,सचिन शिराळे,सिमांत तायडे,लखन घाटोळे...

ग्रामीण रुग्णालय आकोट येथे पेशंटसाठी चांगली सुविधा अभावी सामान्य लोकांचे जात आहेत बळी*

Image
*ग्रामीण रुग्णालय आकोट येथे पेशंटसाठी चांगली सुविधा अभावी सामान्य लोकांचे जात आहेत बळी*   गरीब गरजु सामान्य लोकांची पुरेशी सोय करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोटचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले असून  उपजिल्हा रुग्णालयाचे काम त्वरित मार्गी लावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी मा. पालकमंत्री अकोला , मा. उपविभागीय अधिकारी आकोट , मा.वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय आकोट , यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी यांना इशारा दिला आहे आकोट शहारातील आंबोडीवेश येथील भिमराव बुलाजी तेलगोटे वय 53 त्यांची तब्बेत अच्यानक बिघडली असतांना त्यांना ताबडतोब नवनीत तेलगोटे, व  सुगत तेलगोटे यांनी ग्रामीण रुग्णालय आकोट येथे ऍडमिट केले असता आकोट ग्रामीण रुग्णालय येथे पेसेंट ची गैरसोय होत असल्या कारणाने तेथील डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे रेफर करण्यास सांगितलं कारण कोणते पण असो पेसेंटला सो ग्रामीण रुग्णालय आकोट येथील डॉक्टर अकोला येथे रेफर करण्यास सांगतात कारण जशी सुविधा पाहिजे तशी सुविधा पेशंट साठी आकोट ग्रामीण रुग्णालय येथे उपलब्ध नाही ...

बार्शिटाकळी येथे स्व. गाडेकर महाराजांना श्रद्धांजली अर्पण........

Image
बार्शिटाकळी येथे स्व. गाडेकर महाराजांना श्रद्धांजली अर्पण........  प्रतिनिधी , बार्शिटाकळी , अखिल मानवाला बंधुत्वाचा, सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता तत्वज्ञानाचा गावोगावी जाऊन प्रचार प्रसार करणारे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजिवन प्रचारक, राष्ट्रीय किर्तनकार प्रबोधनकार श्री उद्धवराव गाडेकर महाराज यांचे ११ मे रोजी देहावसान झाले. त्या मुळे श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.स्व उद्धवराव गाडेकर महाराज हे आपल्या स्पष्ट वक्ता व निर्भीडपणे कीर्तनातून समाजाला जागृत करण्यासाठी आजिवन धडपडत होते त्याचप्रमाणे दरवर्षी पाटसुल आश्रम येथे बाल सुसंस्कार शिबिर घेऊन त्यांनी हजारो विद्यार्थी सुसंस्कारीत केले आहेत. आजही त्यांचा मुलगा डॉ शिवदास गाडेकर ही परंपरा चालवत आहे. दि. १२ मे गुरुवार रोजी बार्शिटाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना मंदिरामध्ये बार्शिटाकळी तालुका कार्यकारिणी चे वतीने त्यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरुवातीला सामुदायिक प्रार...

मंत्री छगन भुजबळ व पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांचे वितरण नाशिककर कवी शिरवाडकर, प्रा.कानेटकर, नटश्रेष्ठ सावंत यांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय याचा आनंद - मंत्री छगन भुजबळ

Image
मंत्री छगन भुजबळ व पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांचे वितरण नाशिककर कवी शिरवाडकर, प्रा.कानेटकर, नटश्रेष्ठ सावंत यांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय याचा आनंद - मंत्री छगन भुजबळ *देशात नाट्य क्षेत्रात महाराष्ट्रातील कलाकार अधिक - मंत्री छगन भुजबळ* *नाशिक,दि.१२ मे :-* देशात नाट्य क्षेत्रात सर्वाधिक कलाकार हे महाराष्ट्र व त्या पाठोपाठ बंगाल या पुढे आले असून या दोनही राज्यात नाट्यप्रेमी अधिक असल्याचे सांगत नाशिककर कवी वि.वा. शिरवाडकर, प्रा.वसंत कानेटकर व नटश्रेष्ठ बाबुराव सावंत यांच्या नावाने नाट्य पुरस्कार दिला जातोय याचा आनंद आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात नाट्य पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ.जब्बार पटेल, पद्मश्री डॉ.मोहन आगाशे, लेखक संजय पवार, ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक गिरीश सहदेव, मराठी नाट्य ...

विद्रूपा नदीपात्रात सोडण्यात आले पाणीपंचायत समिती सदस्य बेबीताई जनार्धन गायकवाड यांचे प्रयत्नाला यश

Image
विद्रूपा नदीपात्रात सोडण्यात आले पाणी पंचायत समिती सदस्य बेबीताई जनार्धन गायकवाड यांचे प्रयत्नाला यश  बार्शीटाकली प्रतिनिधी *सौ.बेबीताई जनार्दन गायकवाड* यांनी दि.१९/०४/२०२२ *रोजी विद्रुपा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांना निवेदन देण्यात आले होते*  बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप आळंदा येथील नदी कोरडी झाल्याने या भागातील जनावरांचे हाल होत होते त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत ना होते सदर समस्या बाबत जानवी ठेवून या भागातील पंचायत समिती सदस्य बेबीताई जनार्धन गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांनी दखलघेतली व कान्हेरी सरप पंचायत समिती सर्कल मधील गावे *आळंदा ,रुस्तमाबाद , कान्हेरी सरप ,* या गावांनमधुन वाहनारी विद्रुपा नदी कोरडी वाहत होती *त्यामुळे गुर ढोर यांना पाण्यासाठी वनवन हिंडावा लागत होत* ही समस्या लक्षात घेता *सौ.बेबीताई जनार्दन गायकवाड पं.स.सदस्य कान्हेरी सरप* यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांच्या समस्या लक्षात आणून दीली व वेळोवेळी पाठपुरावा करून दगडपारवा प्रकल्पातुन विद्रुपा नदी पात्र...

आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते यांना मरणोत्तर स्वाभिमानी कार्यकर्ता पुरस्कार.... बहुजनाचे आधारस्तंभ अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले

Image
आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते यांना मरणोत्तर स्वाभिमानी कार्यकर्ता पुरस्कार.... बहुजनाचे आधारस्तंभ अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले  आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते यांना मरणोत्तर स्वाभिमानी कार्यकर्ता पुरस्कार.... बहुजनाचे आधारस्तंभ अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले .          अकोला प्रतिनिधी -- श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ज्या कार्यकर्त्या नि बहुजन महासंघ या पक्षात काम करून पक्ष बळकट करण्याचे व वाढीचे काम करून ज्यांच्या मुळे आज पक्ष जेवढा वाढलेला आहे .  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांचा स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा अकोला येथे पार पडला. असे स्वाभिमानी कार्यकर्ते यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार .वंचित बहुजन आघाडीच्या ध्क्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ना प्रा.अजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते. व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धैर्यवर्धन पुंडकर,  राजेंद्र पातोडे, अरूूंधत ताई सिरसाठ, बालमुकुदजी भिरड, ऑड संतोष रहाटेेेेे , प्रमोद देंडवे, प्रदिप वानखडे, प्रतिभाताई भोजने, प्रभाता...

आकोट कृ.ऊ.बा.स. प्रशासक मंडळ चौकशीच्या जाळ्यात. माजी आमदार संजय गावंडे व सहकाऱ्यांच्या तक्रारीचा परिणाम

Image
आकोट कृ.ऊ.बा.स. प्रशासक मंडळ चौकशीच्या जाळ्यात. माजी आमदार संजय गावंडे व सहकाऱ्यांच्या तक्रारीचा परिणाम  आकोट, प्रतिनिधी आकोट कृऊबासवर सहा महिन्यांपूर्वीच पदारुढ झालेल्या अशासकिय प्रशासक मंडळाच्या गैरकारभारावर शेतकरी पॕनेल नेते तथा माजी आमदार संजय गावंडे व पॕनेलचे अन्य नेते यानी आक्षेप घेवून या संदर्भात चौकशी करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक अकोला याना केली होती. त्यानुसार त्यानी आकोट कृऊबास प्रशासक मंडळाच्या कारभार चौकशीचा आदेश दिला आहे. आकोट कृऊबास संचालक मंडळाचा कार्यकाल दि. २२.०४.२०२१ रोजी संपुष्टात आला. त्यामूळे दि. २३.०४.२०२१ ते ०७.१०.२०२१ पर्यंत प्रशासकिय प्रशासकानी कार्यभार वहन केला. त्यानंतर दि. ०७.१०.२०२१ पासून अशासकिय प्रशासकांची कारकिर्द सुरु झाली. राज्य शासनात सामिल असलेल्या भारतिय राष्ट्रिय काँग्रेसकडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन, शिवसेनेकडून दोन तर प्रहारकडून चार अशा एकूण दहा जणांची येथे प्रशासकपदी नेमणूक करण्यात आली. यामध्ये पक्षिय विसंगतीने व अननुभवी लोकांची वर्णी लागल्याने या प्रशासक मंडळाबाबत प्रहार वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ...

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात फळ वाटप......

Image
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात फळ वाटप आकोट प्रतीनिधी  आज श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा रुग्णालय अकोला येथे लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या मार्गदर्शनात माजी सैनिक मेजर कमलेश राजकुमार रायबोले यांच्या हस्ते रुग्णांना फळ फ्रुट बिस्कीट चे वाटप करून श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला १०मे स्वाभिमानी दिवस वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीयनेते स्वाभिमानी नेतृत्व ,  मागर्दशक बहुजन हृदयसम्राट शोषितपीडित वंचित घटकांचे आधार स्तंभ  आदरणीय नेते माजी खासदार  ऍड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना करतो असे लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी कळविले सोबत मेजर कमलेश रायबोले लवलीताई रायबोले नितीन तेलगोटे नवनीत तेलगोटे अशोक इंगळे व मित्र मंडळी मिळून वाढदिवस साजरा करण्यात आला

ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निम्मीत लोहगड येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले

Image
ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निम्मीत लोहगड येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले  बार्शिटाकळी ता. प्रतिनिधी  वंचीत बहुजन आघाडीचे व सामाजिक कार्यकर्त्या मा.अनुराधाताई ठाकरे यांच्या सुचनेनुसार पक्षात प्रवेश घेतलेल्या लोहगड येथील युवा श्री प्रदिप बहादूर राठोड यांच्या आयोजनात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमीत्त व स्वाभिमान दिवसानिमित्त दिनांक १० में २०२२ ला लोहगड येथील असंख्य तरुणांनी रक्तदान केले.  सामाजिक कार्यकर्त्या मा.अनुराधाताई ठाकरे,पक्षाचे नवनिवार्चीत सदस्य कृष्णा दहात्रे लोहगड येथील सरपंच सौ.ताई प्रभाकर धाडसे यांच्या प्रमूख उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली. प्रशांत धाडसे,जगण राठोड,दिनकर धाडसे,केशव खंडारे ,दिपक इंगळे,अजय सरकटे,निलरत्न सरकटे,राजेश मारोटकार,रुस्तम सरकटे इत्यादी तरूणांनी रक्तदान केले. ठाकरे ब्लड बॅंक अकोला यांच्या माध्यमातुन हे शिबिर पार पडले.

बार्शिटाकळी येथे ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला

Image
आज दिनांक 10 मे रोजी बार्शिटाकळी शहर तथा तालुक्याच्या वतीने ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवनिमीत्त ग्रामीण रूग्णालय बार्शिटाकळी येथे शहराच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. तसेच तहसील कार्यालय बार्शिटाकळी येथे ऑक्वा पाण पोईचे उद्घाटन करण्यात आले. असुन पंचायत समिती बार्शिटाकळी येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या 67 वाढदिवसानिमित्त 67 राशन कार्ड धारकांना राशन कार्डाचे वाटप करण्यात आले यावेळी जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन , प्रभारी तालुकाध्यक्ष दादाराव सुरडकर, पचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, भारत भाऊ निकोसे माजी तालुकाध्यक्ष, रागीब हाजी साहेब, गोबा शेठ, जमीर मिस्त्री, सै रियासत, नगरपंचायत बार्शिटाकळी चे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, आरोग्य सभापती सुनील विठ्ठलराव सिरसाठ, नसीम खान नगरसेवक, श्रावण रामदास भातखडे नगरसेवक,रूग्ग कल्याण सदस्य ईमरान खान, दादाराव पवार प.स.सदस्य. रोहिदास राठोड प.स., सैय्यद अबरार, अनिल भाऊ धुरंधर, अजहर पठाण, अमोल जामनिक, आशीक हाजी,ईस्माईल भाई, अमीत तायडे, मनिष वाहुळे,संतोष डोंगरे, शेख नसीर, सबदरखान, सैय्यद रफीक, रक्षक जाधव,  ऋषीकेश खंडारे, सुनील वानखडे,अफु ठेकेदार, नवाज भाई, ...

बार्शिटाकळी शहरात रास्त धान्य दुकानात केशरी व पिवळे शिधा पत्रीकाचे गरजू नागरिकांना वाटप

Image
प्रतिनिधी , बार्शिटा कळी , संध्या शासकीय योजनेचा लाभ व धान्या पासून कोणी ही गरजू नागरिक वंचीत राहीला पाईजे नाही त्या अनुषंगाने अकोला  जिल्हातील पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आणी जिल्हा अधिकारी निमा अरोरा यांचा आदेशा प्रमाणे बार्शि टाकळी तहसिलदार गजानन हामद यांच्या मार्गदर्शनात  स्थानिक बार्शिटाकळी शहरात रास्त धान्य दुकानात केशरी व पिवळे शिधा पत्रीका चे गरजू नागरिकांना वाटप करण्यात आले  अकोला जिल्हाघिकारी निमा आरोरा यांचा आदेशा प्रमाणे कोणीही गरजू नागरिक शासकीय धान्य पासून वंचीत रहावे न पाईजे त्या पार्श्वभूमीवर  स्थानिक बार्शिटाकळी  अकोली बेस येथील , तालुका  रास्त धान्य दुकानदार चे तालुका अध्यक्ष एम , एम , हुशेन यांची रास्त धान्य दुकान नंबर ९१ , आणी ९२ मध्ये दिनांक ९ मे २०२२ सोमवार रोजी शिधा पत्रिका गरजू नागरिकांना वाटप अभियान कार्यक्रम घेण्यात आला . त्या शिघापत्रीका नागरिकाना वाटप मध्ये केशरी कार्ड ५० आणी पिवळे कार्ड १०० ,गरजू नागरिकांना नायब तहसिलदार आर.बी.डाबेराव , आणि पुरवठा विभाग चे कैलाश ढौरे , व  रास्त धान्य दुकानदार एम , एम , हुसैन यांचे शुभ हस...

प्रधानमंत्री आवास योजनेचे आणुदान त्वरित द्या अन्यथा...तीव्र आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा....

Image
प्रधानमंत्री आवास योजनेचे आणुदान त्वरित द्या अन्यथा... तीव्र आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा....  हिंगोली नगरपरिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचे अनुदान प्रलंबित असल्याने ...घरकुल धारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरकुलाचे बांधकाम करायचे असल्याने व घरकुलाचे वर्क ऑर्डर नगर परिषदे मार्फत मिळाल्याने नागरिकांनी आपले राहते घर पाडून...राहण्यासाठी किरायच्या घराचा आधार घेतला...आणि आपले बांधकाम सुरू केले....परंतु नगर परिषदेमार्फत अनुदानाचा चेक मिळण्यास विलंब होत असल्याने घरकुल धारक अडचणीत सापडले आहेत...एकीकडे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले असताना...किरायाच्या घरात राहणे आम्हाला कसे परवडणार असा सवाल घरकुल धारक करत आहेत  नगर परिषद प्रशासनाला विचारणा करायला गेले तर...अजून आम्हाला शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाहीत अशी उत्तरे मिळत आहेत. या बाबतीत आज दिनांक 09/05/2022 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर पालिका प्रशासनास निवेदन देऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी लवकरात लवकर लाभार्थ्यांना द्यावा अशी मागणी करण्यात आली. ...