Posts

Showing posts from September, 2022

उत्तराखंड मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बार्शिटाकळी युवक काँग्रेसचा कॅण्डल मार्च....

Image
उत्तराखंड मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बार्शिटाकळी युवक काँग्रेसचा कॅण्डल मार्च बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी युवक कॉंग्रेस विधानसभा मुर्तीजापुर यांच्या कडुन उत्तराखंड राज्यात घडलेल्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च बार्शिटाकळी शहरात काढण्यात आला      नुकतीच उत्तराखंड राज्यामध्ये 19 वषीर्य तरुणी अंकिता भंडारी ची हत्त्या करण्यात आली .अंकिताताईस भंडारी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .तसेच निषेधार्थ कॅण्डल मार्च सुद्धा काढण्यात आला स्थानिक प्रशासनाने कठोरपणे कारवाई केली नसुन आरोपी वर योग्य कारवाई करावी व संबंधित युवती चा न्याय मिळाला पाहिजे करीता हा कॅण्डल मार्च बार्शिटाकळी शहरात काढण्यात आला युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष मुर्तीजापुर गोपाल पाटील ढोरे तसेच बार्शिटाकळी शहर अध्यक्ष मो. शोहेब व कार्यकर्त्यांनी पुढाकार येऊन अब्दुल अतीक सोहेल खान मनसाब खान नईम खान मो रिजवान सैयद अदनान mohd सैद मो शहबाजशैख अली अब्दुल तौसीफ परीझीत पाटील अजय जामनिक ,  प्रतिक काळे, आदी आदी कार्यकर्ते उपस्थित होते 

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड शाखा बार्शी टाकळी तर्फे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर ईसलाहे मशेरा व सिरत्तुंनाबी (स) सप्ताह चे आयोजन.....

Image
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड शाखा बार्शी टाकळी तर्फे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर ईसलाहे मशेरा व सिरत्तुंनाबी (स) सप्ताह चे आयोजन. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.       स्थानिक मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड व इस्लाहे माशेरा तर्फे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या सात दिवस सिरत्तूनंबी (स) हजरत मोहम्मद पैगंबर च्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले असून दिनांक 1 ऑक्टोबर रोजी मौलवी मोहम्मद अय्युब मजाहेरी है मस्जिद इंदिरा नगर येथे प्रवक्ते महणून तर 2 ऑक्टोबर रोजी मस्जिद दहेंड बेस येथे परवकते महणुन मौलवी मोहम्मद निसार नदवी हे हजर राहणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी मस्जिद 21 मैलं महान येथे मुफ्ती अजफार मुजतबा खान मजहेरी,4 ऑक्टोबर रोजी मरकज जामा मस्जिद बार्शी टाकळी येथे तोसिफ ईशाती,5 ऑक्टोबर रोजी मस्जिद अबुबकर येथे मुफ्ती हूफैज कासमी,6 ऑक्टोबर रोजी इद गाह बार्शी टाकळी येथे मदरसा इशातुल उलूम अक्कल कुआ चे मुफ्ती अफजल इशाती व दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जामा मस्जिद पिंजर येथे मौलवी मोहम्मद अय्युब मजाहिरी हे प्रवक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे.तरी वरील प्रमाणे कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक ...

बार्शीटाकळीच्या पुरातन कालंका माता मंदिर रस्त्यावर भलामोठा खड्डा..

Image
बार्शीटाकळीच्या पुरातन कालंका माता मंदिर रस्त्यावर भलामोठा खड्डा स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष बाहेरून येणाऱ्या भाविकांना अपघात होण्याची दाट शक्यता बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )       बार्शीटाकळी येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीखाली येणाऱ्या पुरातन,एका अखंड दगडावर हेमाडपंथी बांधकामाचा अद्भुत नमुना असलेल्या कालंका माता मंदिरात नवरात्रोत्सवात हजारो भाविक हे बाहेरून एक दगड व आत गेले तर अप्रतिम अशा शिल्पकलेचा नमुना असलेल्या मंदिरात दर्शनासाठी येतात. मागील काही वर्षे कोरोनाच्या कालखंडात मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही. परंतु आता सर्वच मंदिरे उघडलेली आहेत. म्हणून यावेळी भाविकांचा ओघ वाढलेला दिसून येत आहे . या मंदिरात सुद्धा गेल्या चार दिवसापासून भक्तांची गर्दी होतांना दिसून येत आहे परंतु मंदिरात पोचण्याच्या मार्गावर भला मोठा खड्डा असल्यामुळे वाहन चालवताना खुप कठीण जाते. खोलेश्वर रस्त्यापासूनच कालंका माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झालेली पहायला मिळते.याबाबतीत स्थानिक प्रशास...

इस्लाहे माशेरा व सिरत्तूंनबी (स) निमित्त मस्जिद अक्सा मध्ये कार्यक्रम संपन्न...

Image
इस्लाहे माशेरा व सिरत्तूंनबी (स) निमित्त मस्जिद अक्सा मध्ये कार्यक्रम संपन्न... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. ऑल इंडिया मुस्लिम. पर्सनल लॉ बोर्ड व इसलाहे माशेरा कमिटी बार्शी टाकळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिरतूंनबी (स) हजरत मोहम्मद पैगंबर च्या जीवनावर आधारित व्याख्यान स्थानिक मस्जिद अक्सा खडक पुरा येथे हुसैनिया मदरसा चे शेखुल हदीस मौलाना नाजिम साहेब यांनी सादर केले.      कार्यक्रमा ची सुरूवात तीलावत ए कुराण ने करण्यात आली असून सदर कार्यक्रमात अध्यक्ष पदी जामा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अजीज उल्लाह खान तर प्रमुख अतिथी मध्ये मस्जिद अक्सा चे इमाम व खतिब मौलाना एजाज साहेब,हाजी सय्यद रागिब,हाजी सय्यद आशिक,हाजी तहसिनोड्डीन, सय्यद इरफान पहिलवान,हाफीज खलिदुर्र रहमान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.    सदर कार्यक्रम पार पडले या साठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे मुफ्ती साद खान,मेजर अकलिमोड्डीन,आदर्श शिक्षक नाशीत अली,मास्टर शकील आदी नी परिश्रम घेतले. 

माता सुरक्षित तर घर सुरक्षित* या अभियाना अंतर्गत महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर ,

Image
*माता सुरक्षित तर घर सुरक्षित* या अभियाना अंतर्गत महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर ,  प्रतिनिधी , बार्शिटाकळी , दिनांक 26/09/2022 ते 05/10/2022 पर्यंत महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मार्फत नवरात्र उत्सव 2022 निमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे आज दि.30 /09 /22 रोजी आरोग्य तपासणी शिबीर सुरू करण्यात आले आहे. दररोज शेकडो महिला सदर शिबिराचा लाभ घेत आहेत.आरोग्य तपासणी शिबिरामधे शुगर, बीपी,हिमोग्लोबिन, एचआयव्ही तसेच विविध रक्त तपासणी सोबतच तज्ञ डॉक्टर मार्फत माता बघिणीची तपासणी व विविध आजरा विषयी माहिती तसेच समुपदेशन करण्यात येत आहे. सदर शिबिरामध्ये ग्रा.रु.बार्शीटाकळीच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. लहाने मॅडम, श्री गजानन हामद तहसीलदार साहेब , रूग्णालय अधिक्षक डॉ महेश राठोड, डॉ.स्वेता वानखडे, डॉ.मृणाल वरोकर, डॉ.सपना बाठे, डॉ.स्नेहल वानखडे, रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान, डॉ.मनीष मेन,डॉ.पंकज इंगोले आपली सेवा देत आहेत तर श्रीमती अर्चना शर्मा , श्रीमती शीतल राहणे,श्रीमती खाडे श्रीमती हिरुळकर ,श्रीमती माने, श्रीमती ...

वंचित बहुजन आघाडीची रांजदा सर्कल मधील शिंदखेड येथे र्बैठक संपन्न

Image
*वंचित बहुजन आघाडीची रांजदा, शिंदखेड येथे सर्कल बैठक संपन्न*  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29 /9/ 2022 गुरुवारी बार्शीटाकळी तालुक्यातील जि.प. राजंदा सर्कल मधील पंचायत समिती राजंदा सर्कलमध्ये शिंदखेड येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यात आले. यामध्ये तालुकास्तरावर किंव्हा सर्कल स्तरावर काम करणाऱ्यांची नावे सुद्धा घेण्यात आली. त्याचप्रमाणे यामध्ये तरुण तडफदार कार्यकर्ते राजदीप वानखडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले ज्यावेळी प्रथमत बाळासाहेब आंबेडकर अकोला आले असता  सगळ्यात आधी सभा झाली ती शिंदखेड मध्ये. त्याचप्रमाणे शिंदखेड या गावात 700 ते800 आसपास बौद्धांचे मतदान असून पण या गावात अकराशे च्या वर लोकसभा आणि विधानसभेला आजही मतदान होते म्हणजे आजही ओबीसी समाज हा पक्षाला जोडलेला आहे दिसून येते .ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत सुचवले यामध्ये प्रामुख्याने एक विषय निघाला बरेच ...

माता सुरक्षित तर घर सुरक्षित महिला ना मोफत आरोग्य तपासणी शिबीर ,

Image
*माता सुरक्षित तर घर सुरक्षित*  महिला ना मोफत आरोग्य तपासणी शिबीर ,  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी , दिनांक 26/09/2022 ते 05/10/2022 पर्यंत महाराष्ट्रशासन आरोग्य विभाग मार्फत नवरात्र उत्सव 2022 निमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे दि.26/09/22 पासून आरोग्य तपासणी शिबीर सुरू करण्यात आले आहे. दररोज शेकडो महिला सदर शिबिराचा लाभ घेत आहेत.आरोग्य तपासणी शिबिरामधे शुगर, बीपी,हिमोग्लोबिन, एचआयव्ही तसेच विविध रक्त तपासणी सोबतच तज्ञ डॉक्टर मार्फत माता बघिणीची तपासणी व विविध आजरा विषयी माहिती तसेच समुपदेशन करण्यात येत आहे. सदर शिबिरामध्ये ग्रा.रु.बार्शीटाकळी चे वैधकीय अधिकारी डॉ.स्वेता वानखडे, डॉ.मृणाल वरोकर, डॉ.सपना बाठे, डॉ.स्नेहल वानखडे,डॉ.मनीष मेन,डॉ.पंकज इंगोले आपली सेवा देत आहेत तर श्रीमती अर्चना शर्मा , श्रीमती शीतल राहणे,श्रीमती खाडे श्रीमती हिरुळकर ,श्रीमती माने, श्रीमती वीर, श्री.अरविंद पारस्कर, श्री.प्रभाकर तिडके,श्री.अनंत जाधव, श्री.किशोर वर्गे श्री.मोहन लोणकर, ग्रामिण रुगणालय चे रुग्ण कल्याण सम...

खेर्डा खुर्द येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाला सुरुवात

Image
*खेर्डा खुर्द येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाला सुरुवात*  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर च्या वतीने खेडॉ खुर्द येथे नवरात्रोत्सवात शासनाने १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविले जात आहे. या अभियानातून गुरुवारी २९सप्टेंबर रोजी खेडॉ खुर्द येथे ७० महिलांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी गरोदरपणात महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अत्यल्प आढळत असते. ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात तर महिलांच्या आरोग्य तपासणीकडे कुटुंबाकडून बऱ्याचदा दुय्यम स्थान देण्यात येत असते. प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्यदृष्ट्या सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येत आहे. पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, तसेच अंगणवाडी केंद्रात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून व...

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले..,

Image
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने  शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.., आज दि. 28/9/2022 रोजी बार्शिटाकळी येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बार्शीटाकळी तालुक्याचे नियोजन काय आहे, त्याबद्दल मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यासंदर्भात मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे शहीद वीर भगतसिंग यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने शहीद वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय बौद्ध महासभा बार्शीटाकळी तालुक्याचे महासचिव म्हणाले दिनांक सहा ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम अकोला जिल्ह्याचे वतीने राबविण्यात येत आहेत त्यात आपली उपस्थिती असणे अत्यंत गरज आहे त्यात आपण भाग घेतला पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या जाहीर सभेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी सं...

बार्शीटाकळी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी मोहम्मद शोएब मोहम्मद सिद्दिक यांची फेर निवड.

Image
बार्शीटाकळी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी मोहम्मद शोएब मोहम्मद सिद्दिक यांची फेर निवड. बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी.      स्थानिक युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पदी मोहम्मद शोएब मोहम्मद सिद्दिक यांची फेर निवड अकोला येथील सौराज्य भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली.      यावेळी अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निनाद मानकर, माजी विरोधी पक्ष नेता म न पा साजिद खान पठाण, जिल्हा महासचिव तथा नगरसेवक सै. जहांगीर, गोपाल ढोरे, सय्यद असद अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते.       सदर नियुक्ती बद्दल बार्शी टाकळी शहरा मध्ये अभिनंदन व्यक्त केला जात आहे.

निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण गडावर वसलेली श्री रुद्रायणी देवी●रामविजय ग्रंथ व देवी भागवतामध्ये देवीची नोंद

Image
निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण गडावर वसलेली श्री रुद्रायणी देवी ●रामविजय ग्रंथ व देवी भागवतामध्ये देवीची नोंद  बार्शिटाकळी ( मुफिज खान )             अकोला जिल्ह्यामधील बार्शिटाकळी तालुक्या मध्ये नैसर्गिक वारसा लाभलेले व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे चिंचोली येथील गोल आकाराच्या गडावर विराजमान रुद्रायणी देवी आदीशक्ती नावानेही संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे.           या आदीशक्ती देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह संपुर्ण भारतामधून मोठ्या संख्येने भाविक भक्त येथे येतात. या रुद्रायणी देवीचा तसा खूप जुना इतिहास असून ; रामविजय ग्रंथ व देवी भागवतात रुद्रायणी देवीचा उल्लेख आहे.             नैसर्गिक सान्निध्यात टेकडीवर विराजमान रुद्रायणी देवी गडावर नवरात्रात नऊ दिवस दर्शनासाठी भाविक भक्त मोठी गर्दी करत असतात. या देवीचे मंदिर तसे शेकडोवर्षे पूर्वीचे असून, याचा इतिहास फार मोठा आहे. अजंठाचे शेवटचे ठिकाण हे रुद्र टेकडी असून, या टेकडीच्या नावावरून रुद्रायणी देवीचे नाव पडले , अशी देवी भागवतामध्ये नोंद आ...

कीटकनाशक फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी जनजागृती अभियान......

Image
*कीटकनाशक फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी जनजागृती अभियान* महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व एफएमसी प्रा ली. यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी हा जनजागृती अभियान सोहळा दिनांक 22/8/22 रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांच्या हस्ते पार पडला होता. या उद्घाटन सोहळ्याला मुख्ये उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार गट नेते गोपाल भाऊ दातकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शाह कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे जिल्हा परिषद मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ जिल्हा परिषद विभागाचे संजय गवळी  या सर्वांच्या उपस्थिती मध्ये एफ एम सी कंपनीचे एरिया मार्केटिंग मॅनेजर हिरामण मंडळ सर तसेच अकोला जिल्हा कृषी प्रतिनिधि शत्रुघ्न उपरवट यांनी शेतकरी कीटकनाशक फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले होते तसेच वरील सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये या संदर्भात मार्गदर्शन केले होते. 2017 मध्ये यवतमाळ जिल्हा मध्ये खूप मोठ्या प्...

भेंडीमहाल येथे जल जीवन मिशन योजनेचे भूमिपूजन ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण.....

Image
*भेंडीमहाल येथे जल जीवन मिशन योजनेचे भूमिपूजन; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण* बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम भेंडीमहाल येथे जल जीवन मिशन योजनेच्या भुमिपूजन सोहळा सोमवारी संपन्न झाला.भेंडीमहाल. येथे जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत भेंडीमहाला गावातील पाणी पुरवठा योजने साठी ४७ लक्ष रुपये मंजूर झाले असून यामध्ये पिण्याच्या पाण्याची एक नवीन टाकी बांधकाम क्षमता ४८ हजार लिटर पाण्याची जुनी टाकी दुरुस्ती क्षमता ४० हजार लिटर गावातील अंतर्गत नवीन पाईप लाईन चेंबर दुरुस्ती वॉल बसविणे तसेच पाण्याच्या टाक्या पासून ते पाणी पुरवठा विहीर पर्यंत पाईप लाईन व जल जीवन मिशन योजनेच्या भुमिपूजन सोहळा संपन्न यावेळी जनुना सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य रामसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच भेंडीमहाल ग्रामपंचायत चे सरपंच उमिता संदीप राठोड उपसरपंच दिनेश राठोड ग्रामपंचायत सदस्य देवकाबाई दशरथ राठोड ग्रामपंचायत सदस्य मधुकर घनगांव ग्रामपंचायत सदस्य नितेश जाधव ग्रा.सदस्य सुधाकर चव्हाण ग्रा.सदस्य वैशाली देशमुख ग्रा.सदस्य शितल राठोड,दशरथ राठोड , संदीप राठोड,रोहीदास जाधव ,सहदे...

जनता लॅब तथा खान क्लिनिक च्या फ्री हेल्थ चेकअप कॅम्पला उत्तम प्रतिसाद....

Image
जनता लॅब तथा खान क्लिनिक च्या फ्री हेल्थ चेकअप कॅम्पला उत्तम प्रतिसाद.... बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी. स्थानिक खडकपुरा चौक स्थित खान क्लिनिक येथे नुकतेच घेण्यात आले ल्या फ्री हेल्थ चेक अप कॅम्प ला नागरिका कडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून सदर कॅम्प मध्ये कंपलेट ब्लड काऊंट, रेंडम ब्लड शुगर,ब्लड ग्रुप आदी सेवा देण्यात आले होते.     कॅम्प ला डॉ शोएब खान यांना जनता लॅब चे शेख सलीम कुरैशी व असरार अहमद यांचे सहकार्य लाभले.

कै. अण्णासाहेब पाटील यांची जयंती - मराठा महासंघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन

Image
कै. अण्णासाहेब पाटील यांची जयंती - मराठा महासंघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. आज दिनांक 25/09/2022 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक व माथाडी कामगार नेते कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री विनायकराव पवार, अमरावती विभागीय अध्यक्ष श्री कृष्णा भाऊ अंधारे, महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. जिल्हा अध्यक्ष मधुसूदन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश दादा नाकट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात कै.स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आल्या यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष तसेच पातुर आणि बार्शीटाकळी तालुका यांची कार्यकारणी जाहीर करून नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरविंद दादा नाकट यांनी तर आभार प्रदर्शन श्री डॉ श्रीकांत काळे सर यांनी मानले.यावेळी महिलाअध्यक्षा सौ.बिडवे ताई,जिल्हासरचिटणिस शंतनु ...

बार्शिटाकळी नगरपंचायत चे प्र .मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शिवहरि थोंबे साहेब यांच्या हस्ते व्हिलचेअरचे वाटप

Image
बार्शिटाकळी नगरपंचायत चे प्र .मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शिवहरि थोंबे साहेब यांच्या हस्ते व्हिलचेअरचे वाटप          मा.रतनसिंग पवार साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बार्शिटाकळी व विशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनामार्फत व समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध योजना लाभ दिव्यांनी विद्यार्थ्यांना मिळुन देत असतात. त्यांच अनुषंगाने दिनांक 24.12.2022 वार शनिवार रोजी समुह साधन केंद्र समावेशीत शिक्षण विभाग बार्शिटाकळी येथे विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण करतांना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये यासाठी विशेष विद्यार्थ्यांला व्हिलचेअर वाटप करण्यात आली  मा.शिवहरि थोंबे साहेबांनी व मा.केंद्र प्रमुख अरूण धांडे ,रिज़वान काझी  मा.मुख्याध्यपक सर्व बार्शिटाकळी केंद्र,,यांच्या हस्ते वाटप करण्यात आली तसेच मा.प्र.मुख्अधिकारी नगर पंचायत बार्शिटाकळी शिवहरी थोंबे  साहेबांनी विशेष विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली तसेच सर्वांना मार्गदर्शन केले तसेच विशेष ...

सेवा पंधरवाडा निमित्त भाजपा तालुका कार्यालयात विवीध कार्यक्रम संपन्न

Image
सेवा पंधरवाडा निमित्त भाजपा तालुका कार्यालयात विवीध कार्यक्रम संपन्न  प्रतिनिधी , बार्शिटाकळी , पंतप्रधान नरेद्र मोदी जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन बार्शिटाकळी भारतिय जनता पार्टीच्या वतीने जल ही मिशन भाजपा तालुका कार्यालय बार्शि टाकळी येथे घेण्यात आला , त्या कार्यक्रमाच अध्यक्ष बार्शिटाकळी प. समिती सदस्य महान चे किशोर देशपाडे होते , तऱ प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाणी फाऊन्डशन तालुका अध्यक्ष संघपाल वाहूरवाघ होते , मुख्य अतिथी गणेश झळके उपस्थित होते , कार्यकमाचे आयोजन भाजपा युवा आघाडी तालुका अध्यक्ष योगेश कोदनकारने यांनी केले , त्यावेळी जल ही जीवन आहे , पाणी बचाव पाणी झिरवा आणी शेतात बंधारात बाध बाघुन पावसाच्या  पाणी अडवा त्या पाणी बदल त्याचे महत्वचे सविस्तर माहिती पाणी फाऊन्डेशन ता. अध्यक्ष संघपाल वाहूरवाघ ने  माहिती दिली , त्यावेळी सर्व अतिथी पाहूणेचे हार अर्पण करुन सन्मान करण्यात आले , सदर कार्यक्रमा मध्ये भाजपा युवा आघाडी ता , अध्यक्ष योगेश कोदनकार , तालुका अध्यक्ष राजु काकड पाटील, भाजपा शहर अध्यक्ष श्रीराम येळवनकार , रमेश वाटमारे , गोपाल वाटमारे , संजय ...

शाहिद इक्बाल यांची अमरावती विधान परिषद पदवीधर मतदार नोंदणी निरीक्षक म्हणून नियुक्ती. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना राज्य कार्यकरणी चा निर्णय

Image
शाहिद इक्बाल यांची अमरावती विधान परिषद पदवीधर मतदार नोंदणी निरीक्षक म्हणून नियुक्ती *अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना राज्य कार्यकरणी चा निर्णय* प्रतिनिधी बार्शीटकली  महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने नुकताच अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी करिता निरीक्षक मणहून नियुक्ती करण्यात आली आहे राज्य अध्येक्ष ईलहजोद्दीन फारुकी यांच्या आदेशान्वये त्यांची सदर पदा वर नियुक्ति करण्यात आली आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या पदवीधर नोंदणी सुरू आहे त्यामुळे मोठया प्रमाणात पदवीधराणी नोंदणी करावे तसेच पदवीधर मतदार नोंदणी पासून कोणी ही वंचीत राहू नये या करिता शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांची अकोला जिल्हा निरीक्षक मानहून नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने सध्या अकोले जिल्ह्यात शिक्षकांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केल्या जात आहे शिक्षकांच्या समस्या मार्गी लागावी व त्याचे तेवरीत निराकरण व्हावी या करिता संघटनेच्या पदाधिकारी विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे अत्यंत अल्पकाळात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे ...

गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.....

Image
गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न प्रतिनिधी बार्शीटाकळी बार्शिटिकळी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीटाकळी तालुका उर्दू शिक्षकांतर्फ त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे निवास स्थानी संपन्न झाला यावेळी उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफिक अहमद खान शाहिद इकबाल खान काझी रिजवानुद्दीन राहुलला खान इमरान अली गुलाम अली मुजीब बेग मोहम्मद बेग मराठी शिक्षक संघटनाचे नेते व गुरुदेव सेवक मोहन भाऊ तराळे प्रकाश राठोड श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांच्याकडे सध्या बार्शीटाकळी सहित अकोला पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभार आहे अत्यंत कमी वेळेत गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांनी बार्शीटाकळी सह अकोला पंचायत समिती शिक्षण विभागात आपल्या कर्तव्यदक्ष कार्यभाराने आपले ठसा उमटविले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरावरून त्यांना भरभरून शुभेच्छा मिळाले आहे या अभिष्टचिंतन सोहळ्य...

अकोला गुन्हे शाखेचे प्रमुख संतोषजी महल्ले साहेब यांच्या हस्ते आकोट शहरातील जय भारत पॉलीक्लिनिक चे उदघाटन मोठया उत्साहात साजरे

Image
संतोषजी महल्ले साहेब अकोला गुन्हे शाखा प्रमुख यांच्या हस्ते आकोट शहरातील जय भारत पॉलीक्लिनिक चे उदघाटन मोठया उत्साहात साजरे  अकोट तालुका प्रतिनिधी  अंजनगाव रोड आंबोडीवेश येथील नवीन जय भारत मेडिकल व भारत पॉलीक्लिनिक चे उदघाटन मोठया आंनदाने अकोला स्थानिक पोलीस शाखे चे पोलीस निरीक्षक संतोषजी महल्ले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आकोट शहरातील चांगली सुविधा डॉ.अक्षय बोरोडे B.H.M. S./C.C.H. व डॉ.अंकिता बोरोडे B.A.M.S./C.G. O. स्त्री रोग तज्ञ् हे देणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित ऍड.दिपक तेलगोटे वंचित बहुजन आघाडी चे वरिष्ठ नेते सदानंद तेलगोटे शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट लखन इंगळे विक्की तेलगोटे अध्यक्ष पहेलवान ग्रुप आकोट नितीन तेलगोटे शासकीय ठेकेदार अमोल तेलगोटे नवनीत तेलगोटे व शहरातील प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग उपस्थित होते आणि आजूबाजूला असलेले सर्व नागरिक यांच्या मध्ये चांगले आनंदाचे वातावरण असुन यांना दवाखाना चांगला जवळ व सोईस्कर झाला

जन्म घेणं आपल्या हातात नाही, पण परिस्थिती बदलणे नक्कीच आपल्या हातात आहे :- उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे गोर सेनेच्या विद्यार्थी सत्कार समारंभ यशस्वीपणे संपन्न....

Image
जन्म घेणं आपल्या हातात नाही, पण परिस्थिती बदलणे नक्कीच आपल्या हातात आहे :- उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे  गोर सेनेच्या विद्यार्थी सत्कार समारंभ यशस्वीपणे संपन्न  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवतं कठोर मेहनत केली पाहिजे. जन्म घेणं जरी आपल्या हातात नसले तरी परिस्थिती बदलणं नक्कीच आपल्या हातात आहे असे प्रतिपादन अकोला जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले आहे. ते आज गोर सीकवाडी पुरस्कृत रायसिना फाउंडेशनच्या तर्फे आज आयोजित जुने शहरातील खंडेलवाल महाविद्यालयात बोलत होते.  रायसीना फाउंडेशन यांच्या वतीने अकोला जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा पार पडला, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात इयत्ता दहावी बारावी मधील उत्कृष्ट टक्केवारी कमवणारे विद्यार्थी तसेच जेईई, निट, एमएचटी - सीईटी मधील प्राविण्य कमवणारे विद्यार्थी, यात सोबत युपीएससी, एपीएमसी,एसएससी नेट-सेट तसेच पीएचडी मधी...

मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी काॅंग्रेस...वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर...

Image
मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी काॅंग्रेस... वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर... राज्यसभेत नुक्तेच पारित झालेल्या शेतकरी विरोधी तीन बीलां नंतर मोदी सरकारवर अनेक बाजूंनी टिका होत आहे. ही बिले पारित होण्यासाठी केंद्रात अनेक वर्षे कृषी मंत्री राहिलेले राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेत गैरहजर राहुन दिलेल्या अप्रत्यक्ष सहकार्या बद्दलही टीका होत आहे. आणि राष्ट्रवादी ने भाजपाला असा पाठिंबा देण्याची ही काही पहिलीच घटना नाही. असे सहकार्य राष्ट्रवादी पक्षाने मोदींना ट्रिपल तलाक, CAA, NRC बिलांच्या वेळेस, कलम 370 हटवण्याच्या वेळेस मोदी सरकारला अशी अनेक वेळा अप्रत्यक्ष मदत केलेली आहे. यावेळी त्या बदल्यात राज्यसभेत पुरेसे संख्या बळ नसतानाही राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांना उपसभापती पदाचे बक्षिस मिळाले आहे. परंतू त्याची चर्चा मात्र माध्यमांतून अनुल्लेखाने दाबून टाकण्यात आली आहे.      संसदीय लोकशाही मध्ये लढाऊ विरोधी पक्षाचे अस्तित्व आणि त्याने बजावण्याच्या जनवादी भूमिका याला खूप...

अखील भारतीय मराठा महासंघाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेशराव पाटील थोरात यांची निवड.

Image
अखील भारतीय मराठा महासंघाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेशराव पाटील थोरात यांची निवड. बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी  अखिल भारतीय मराठा महासंघाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश राव थोरात पाटील यांची नियुक्ती झाली आहे ते बार्शिटाकळी तालुक्यातील गोटखेड जलालाबाद या गावचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आहेत त्यांचे कार्य खुप मोठे आहे ते त्यांच्या निवडीचे श्रेय अखील भारतीय मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे व विनायकराव पवार आणि अविनाश नाकट यांना दिले आहे.त्यांच्या या निवडी मुळे तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

अकोट मध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा सर्कल समिती व शहर प्रभाग समिती मेळावा थाटामाटात संपन्न

Image
अकोट मध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा सर्कल समिती व शहर प्रभाग समिती मेळावा थाटामाटात संपन्न  अकोट तालुका प्रतिनिधी   दिनांक 23/9/2022 ला पंचायत समिती सभागृह येथे वंचित  बहुजन महिला आघाडीची तालुका  सर्कल व शहर प्रभाग शाखा अकट येथे आढावा बैठक संपन्न झाली अकोट येथील मेळावा कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव अरुंधती ताई शिरसाट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाट कार्यक्रमाच्या उद्घाटक, जिल्हा उपाध्यक्षा मंदाताई कोल्हे , कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या जिल्हा महासचिव तथा मा सभापती जि प शोभाताई शेळके जिल्हा परिषद सदस्या तथा महासचिव संगीता ताई अढाऊ निलोफर शाहिन झीया शाह जिल्हा महासचिव माजी जिल्हा अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा निरीक्षक प्रदीप भाऊ वानखडे  दीपक भाऊ बोडखे ,तालुका अध्यक्ष चरन भाऊ इंगळे तालुका महासचिव रोषन पुडंकर संघटक सुरेंद्र ओइंबे प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे उपस्थित होते .

रिफा फाउंडेशन च्या वतीने नीट परीक्षा मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाचा सत्कार

Image
*रिफा फाउंडेशन च्या वतीने नीट परीक्षा मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाचा सत्कार* प्रतिनिधी बार्शी टाकली रिफा फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे सदर उद्देशाला समोर ठेवून फाउंडेशनच्या वतीने रेड क्रॉस सोसायटी मध्ये एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सन 2022 23 मध्ये नीट परीक्षा मध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची सुरुवात नाईम गोहर यांनी तीलावत ए कलाम पाक पठन करून केले या नंतर अनस नबील यांनी नाते पाक पठन केले तसेच रिफा फौंडेशन चे अध्येक्ष नाईम फराज यांनी प्रास्ताविक केले या वेळी अकोला शहरातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती ज्यांच्या हस्ते नीट परीक्षा मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बॉण्ड इन्स्टिट्यूट चे साबीर अली सर ब्राईट इन्स्टिट्यूट चे हरणीत सिंग सर ब्रिलियंट इन्स्टिट्यूट चे सजाद अहमद खान यांनी अकरावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या तसेच नीट परीक्षेचे अभ्यास करत असलेल्य...

जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेबाबत चौकशीसाठी समिती...चोवीस तासांत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश...

*जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेबाबत चौकशीसाठी समिती* *चोवीस तासांत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश* अमरावती, दि. 25 : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगीच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ नवजात बालकांना तातडीने विशेष संदर्भ रूग्णालय व इतर रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेत कोणीही जखमी नाही किंवा कोणतीही जिवीतहानी नाही. घटनेबाबत माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तत्काळ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. याप्रकरणी समिती गठित करून चौकशी करण्याचे व तसा अहवाल २४ तासांत सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी स्वतंत्र आदेश निर्मगित करून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अ...

आकोट सोडले वाऱ्यावर…मुख्याधिकारी गेल्यात रजेवर…परस्पर बदली करून घेण्याची शक्यता…तेल्हारा पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविला…

Image
आकोट सोडले वाऱ्यावर…मुख्याधिकारी गेल्यात रजेवर…परस्पर बदली करून घेण्याची शक्यता…तेल्हारा पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविला… अकोट तालुका प्रतिनिधी  आकोट नगर परिषदेचा कारभार पराकोटीचा ढेपाळला असून त्याद्वारे आम नागरिक व कंत्राटदार अगदी मेटाकुटीला आलेले असताना आकोट पालिका मुख्याधिकारी डॉक्टर मेघना वासनकर या दिनांक १७ ऑक्टोबर पर्यंत रजेवर गेल्या आहेत. आकोट पालिकेत आल्यापासूनच बदलीकरिता धडपडणाऱ्या ह्या मुख्याधिकारी रजा काळातच परस्पर बदलीवर जाण्याची तजवीज करणार असल्याचेही वृत्त आहे. त्यांच्या अनुपस्थितीत तेल्हारा पालिका मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्याकडे आकोट पालिकेचा प्रभार देण्यात आला आहे. आकोट पालिका मुख्याधिकारी डॉक्टर मेघना वासनकर ह्या मुळात आकोट येथे येण्यासच नाखुश होत्या. परंतु शासनाने तंबी दिल्याने त्या पाच महिन्यांपूर्वी आकोट पालिकेत रुजू झाल्या. याच दरम्यान पालिका कार्यकारणी बरखास्त झाल्याने उपविभागीय अधिकारी प्रशासक पदी आले. त्याने ही नव्या दमाची जोडगोळी शहराकरिता काहीतरी भरीव करणार अशा आशा पल्लवीत झाल्या. परंतु आकोटात येताना मेघनाताई बदलीचे स्वप्न सोबत घेऊ...

आगामी नवरात्र उत्सव, धम्म चक्र प्रवर्तन दिन , तसेच इद ए मिलाद निमीत्त बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन

Image
आगामी नवरात्र उत्सव, धम्म चक्र प्रवर्तन दिन , तसेच इद ए मिलाद निमीत्त बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी आगामी नवरात्र उत्सव, धम्म चक्र प्रवर्तन दिन , तसेच इद ए मिलाद निमीत्त बार्शिटाकळी शहरात शांतता रहावी यासाठी व कुठल्याही प्रकारे शहरात शांतता भंग होणार नाही यासाठी बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन केले यावेळी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक यांनी व त्यांच्या सोबत एस आर पी एफ दलाच्या तुकडी सह, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन मधुन अकोली वेस मज्जीद मार्गे ढोरे वेटाळ, खिडकी पुरा मज्जीद, काळा मारोती, जामा मज्जीद चौक, बाजार लाईन, खडकपुरा चौक, नगरपंचायत चौक मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत पथसंचलन केले असे खुपिया विभागाचे प्रमुख श्री कीशोर पिंजरकर यांनी कळविले 

दगडपारवा येथे जनावरांना लंम्पी या आजारावर औषधीचे लसीकरण

Image
दगडपारवा येथे जनावरांना लंम्पी या आजारावर औषधीचे लसीकरण बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी तालुक्यांतील ग्राम दगडपारवा येथे लंम्पी या रोगावर लसीकरण व औषध उपचार डॉ गणेश डिगांबर महल्ले जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अकोला याचां उपस्थित करण्यात आला.आज महाराष्ट्रभर लंबी या रोगाने प्रचंड दहशत निर्माण केली आहे तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये या रोगाचा प्रार्दुभाव होत आहे या रोगाची लागण आज खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान या रोगाने होत आहे बरेच गुरेढोरे या रोगाला बळी पडत आहेत हा रोग विषाणूजन्य असल्याकारणाने याचा प्रादुर्भाव वाढत आहे शेतकऱ्याने बाधित झालेले गुरेढोरे चांगल्या जनावरांपासून वेगळे बांधावे तसेच त्यांचे चारा पाणी वेगळेतसेच त्यांचे चारापाणी वेगळे करावे व या रोगाने मरण पावलेले जनावरं जमिनीमध्ये आठ फूट गड्डा करून त्यामध्ये त्यांच्या अंगावर चुना टाकून तो गड्डा पूर्णपणे पुरून टाकावा जेणेकरून विषाणूंचा प्रादुर्भाव रोखता येईल या रोगासाठी सतत अहोरात्र प्रयत्न करणारे आमच्या बाजूच्या कडी मधील पशुचिकित्सालय मधील सर्व पथक प्रयत्न करीत आहे 2 सप्टेंबर20...

देगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांसह विविध समाजबांधवांनी केला वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Image
*देगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांसह विविध समाजबांधवांनी केला वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश*  बाळापुर प्रतिनिधी   ऑड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळापूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या हस्ते देगाव येथे भव्य जाहिर प्रवेश सोहळा आयोजित करुन आपल्या समर्थकांसह प्रवेश केला.   या जाहिर प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी. पं. स. सभापती गोविंदराव कोगदे हे होते तर या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देडवे जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, तालुकाध्यक्ष अनंतराव फाटे, देगाव जि.प. सर्कलचे जि. प. सदस्य रामभाऊ गव्हाणकर, प.स. सभापती सौ. रूपालीताई गवई, मा. जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, पं. स. सदस्य सौ.शारदाताई सोनटक्के, ता. संघटक ज्ञानेश्वर पाचपोहे, ता. कोषाध्यक्ष सादिक भाई, ता.प्रसिद्धी प्रमुख सुमेध अंभोरे, प.स. गटनेते अफसर खान, मंगेश गवई, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पल्ह...

गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे आयोजित हिंदी दिनानिमित्त हिंदी अभ्यास मंडळाची स्थापना....

Image
गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे आयोजित हिंदी दिनानिमित्त हिंदी अभ्यास मंडळाची स्थापना.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  बार्शिटाकळी येथील गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे आयोजित हिंदी दिनानिमित्त हिंदी अभ्यास मंडळाची स्थापना, अनुवाद स्पर्धा पुरस्कार कार्यक्रम डॉ.मधुकरराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. स्थानिक बार्शीटाकळी येथील गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ. मधुकरजी पवार, डॉ. संतोषकुमार गाजले यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटनप्रसंगी डॉ. व्हर्च्युअल पद्धतीशी संबंधित कार्यक्रम., लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ, विशेष अतिथी डॉ. तारेश आगाशे, शारीरिक संचालक व कला विभाग प्रमुख, प्रमुख पाहुणे श्री. सुधीर राऊत, वाणिज्य विभाग, कार्यक्रम समन्वयक आणि हिंदी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण देशमुख, समन्वयक सौ.वैशाली सोनोने व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्या प्रमुख...

गुलाम नबी आझाद महाविद्यालयात रक्त दानावर कार्यशाळा संपन्न...

Image
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात रक्त दानावर कार्यशाळा संपन्न बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  बार्शीटाकळी : स्थानीक गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शीटाकळी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व मा. प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांच्या प्रेरणेने रक्त गट समज- गैरसमज व रक्त दानाचे फायदे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवसाचे औचीत्य साधुन, शासकीय रक्त पेढी,  जि एम सी अकोला येथील तज्ञ टीम च्या मदतीने या कार्यक्रमाचे  मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. एस के राऊत हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख मार्गदर्शक  शासकीय रक्तपेढी टिम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला हे लाभले होते. मार्गदर्शक टिम मध्ये डॉ. अमोल शेंडे, डॉ. शुभम भोसले, डॉ अभीशेख देशमुख व श्रीराम राठोड यांचा समावेश होता. मान्यवरांनी मार्गदर्शनामधे भारतात एकुण डोनर कीती व रक्ताची आवशकता कीती यामधील फरक स्पष्ट केला. सोबतच  रक्त गट तपासणी व रक्त दानाचे मानवी जीवनात असलेले अनन्यसाधारण महत्त्व या विषयावर सखोल प...

जिवरक्षक दीपक सदाफळे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित... श्री.दत्तात्र्यय अर्बन मल्टीस्टेट को ऑप, क्रे.सो.लि. अकोलाचा उपक्रम....

Image
जिवरक्षक दीपक सदाफळे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित... श्री.दत्तात्र्यय अर्बन मल्टीस्टेट को ऑप, क्रे.सो.लि. अकोलाचा उपक्रम  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  बँक क्षेत्रातील व्यवसाया सोबत संस्थेच्या विवीध उपक्रमात सामाजिक कार्याची जोड असणारी श्री.दत्तात्रेय बँकेच्या एमआयडीसी परीसरातील वेअर हाऊस मध्ये आज 24 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 23 वर्ष झाले निरंतरपणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात गरज असेल तीथे मदतीसाठी हाक देणा-या संकट ग्रस्तांच्या संकटांशी दोन हात करुन अनेकांना जिवनदान देण्यासाठी आपले अख्खे जिवन समर्पित करणारे दीपक सदाफळे यांना सन्मान करतांना आमच्या संस्थेने आज पुण्यकर्म केल्याची भर पडल्या सारखे जाणवत आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यमाच्या अध्यक्षीय भाषणातुन जिवरक्षक दिपक सदाफळे यांना समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करतांना संबोधले आहे. यावेळी संस्थेचे ठेवीदार आणी सर्व शाखा पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वंचित बहुजन आघाडी जी.प.सर्कल कान्हेरी सरप येथे आढावा बैठक संपन्न

Image
*वंचित बहुजन आघाडी जी.प.सर्कल कान्हेरी सरप येथे आढावा बैठक संपन्न*  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप सर्कल महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम महापुरुष्याच्या प्रतिमाचे पूजन करून व नवनिर्वाचित बार्शीटाकळी तालुक्यातील पदाधिकारी यांचे स्वागत केले यामध्ये घराघरात वंचित बहुजन आघाडी.आणि श्रध्देय ऍड बाळासाहेब आंबेडकर याचे विचार पोहोचले पाहिजे. आज obc, लहान लहान समूह साहेबांच्या आशीर्वादाने सत्तेत बसलाय, सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडी करते अश्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर तालुका स्तरावर काम, किंव्हा सर्कल स्तरावर काम करणाऱ्याची नावे घेण्यात आले आहेत.या बैठकीला उपस्तित कार्यकर्ते व पदाधिकारी, ता. अध्यक्ष रतन भाऊ आडे, महासचिव अजय अरखराव, संघटक हरीश रामचवरे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, पं स सदस्य दादाराव पवार, माजी सभापती तथा तालुका अध्यक्ष भारत भाऊ निकोशे,त्र्यंबक गवई, रमेश गवई, धर्मवीर गवई, अस्वजित गवई, सुभाष गवई, किशोर जाधव, गोकुळ आडे, अविनाश जंजाळ, उमेश पवार, प्रवीण जाधव, धम्म...

चांदूर सर्कल मधील लोणी येथे महत्वापूर्ण आढावा बैठक संपन्न....,

Image
चांदूर सर्कल मध्ये लोणी येथे महत्वापूर्ण आढावा बैठक संपन्न..... अकोला प्रतिनिधी  वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुकाच्या  वतीने आढावा बैठक संपन्न झाली चांदूर सर्कल मधील लोणी गावात श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हाध्यक्ष मा. प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलींदभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुक्याच्या वतीने चांदूर सर्कल मध्ये लोणी या गावी आढावा मीटिंग घेण्यात आली. मिटींगकिला अकोला तालुका महासचिव शरद भाऊ. इंगोले तालुका प्रसिद्धी प्रमुख मोहन भाऊ तायडे. देवानंद भाऊ तायडे शीलवंत भाऊ शिरसाट आढावा मीटिंग चे अध्यक्ष भारत भाऊ इंगळे हे होते. मीटिंग गावाचे सरपंच दुर्गा ताई आनंदा इंगळे ह्या होत्या. कार्यक्रमात मोहन इंगळे. मधुकर इंगळे. कैलास इंगळे, नाजूक इंगळे,अरुण इंगळे, संजय इंगळे,शांताराम इंगळे, मनोहर इंगळे,शंकर इंगळे, पंजाब खेडकर, विजय पेटकर, सागर इंगळे सर्कल अध्यक्ष सुमेध जाधव, निवृति काळे, प्रदीप जाधव, धोंडीराम झाबा ले,शिवा खंडागळे, विक्की इंगळे, बेबाताई इ...

चांदूर सर्कल मधील म्हैसपुर येथे वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक संपन्न....

Image
चांदूर सर्कल मधील म्हैसपुर येथे वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक संपन्न.... अकोला प्रतिनिधी  वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुका निहाय सर्कल च्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये आज चांदुर सर्कल मधील मैसपुर या गावात   श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हाध्यक्ष मा.प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुका कार्यकारणीचा विस्तार करणे व चांदूर सर्कल मधील मैसपूर गाव येथे नवीन कार्यकारिणी करणे संदर्भात सदर मीटिंग आयोजीत करण्यात आली. मीटिंग मीटिंग करता गावातील असंख्य लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भास्कर भाऊ गाय गोल हे होते सूत्रसंचालक दिनेश भाऊ इंगळे प्रास्ताविक म्हणून म्हणून दिलीप वानखडे यांनी केले प्रमुख पाहुणे तालुका महासचिव शरद भाऊ इंगोले तालुका प्रसिद्धीप्रमुख मोहन भाऊ तायडे तालुका संघटक शंकर भाऊ राजूरकर देवानंद भाऊ तायडे, विनोद भाऊ काळे,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक नंदू शेगावकर नंदू भाऊ शेगोकार गज...

तायक्वांदो स्पर्धेमध्ये कु. प्रतीक्षा चे घवघवीत यश महाराष्ट्रातून सुवर्णपदाची मानकरी .......

Image
तायक्वांदो स्पर्धेमध्ये कु. प्रतीक्षा चे घवघवीत यश महाराष्ट्रातून सुवर्णपदाची मानकरी ....... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी   दिनांक 16 ते 19 /09/2022 या दरम्यान सुरू असलेल्या सातवे संयुक्त भारत खेळ फाउंडेशन च्या विद्यमाने इंदोर येथे सुरू असलेल्या नॅशनल गेमचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातून एकूण 20 राज्यांचा समावेश होता त्यापैकी महाराष्ट्राचे बरेच खेळाडू सहभागी झाले. या खेळामध्ये कुमारी प्रतीक्षा विजय वानखडे सिंदखेड मोरेश्वर तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला या विद्यार्थिनीने अत्यंत गरीब परिस्थिती मधून कष्ट करून तायक्वांदो या खेळामध्ये आसामच्या खेळाडूला चित करून सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी सिंदखेड वासियान तर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. 

सरसगट बार्शिटाकळी तालुक्याला पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन

Image
सरसगट बार्शिटाकळी तालुक्याला पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन   बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  बार्शीटाकळी तालुक्यामध्ये फक्त बार्शीटाकळी मंडळ मध्येच पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे म्हणून फक्त बार्शीटाकळी मंडळ करिता पिक विमा मंजूर करण्यात आला शासनाच्या निर्देशानुसार त्याची नुकसान भरपाई म्हणून 25 टक्के रक्कम देण्याचे शासनाचे आदेश आले परंतु वस्तुस्थिती वेगळीच असून कृषी विभागामार्फत प्रत्येक मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवलेलं असते आणि ते पर्जन्यमापक यंत्र मोकळ्या जागेवरती ठेवून पावसाची सरासरी मोजली जाते परंतु कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते पर्जन्यमापक यंत्र खेडॉ मंडळांतर्गत दोनद शिवारात ए ईकलास जमिनीवरती ठेवलेला आहे त्याच्या आजूबाजूला पूर्णतः गाजर गवत आणि जंगली गवत वाढला त्यामुळे तेथील पर्जन्यमान नेमकं किती झाल हे कृषी अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले त्यानंतर बार्शीटाकळीचे कृषी अधिकारी वाशिमकर साहेब यांनी दोनद ला जाऊन पाहणी केली बार्शीटाकळी तालुक्याच्या वतीने तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना संपूर्ण बार्शीटाकळी...

बार्शिटाकळी येथील खडकपुरा परिसरात अवैधरित्या गांजा विक्री करणारे अरोपितावर छापा 1किलो गांजा सह 12000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

Image
बार्शिटाकळी येथील खडकपुरा परिसरात अवैधरित्या  गांजा विक्री करणारे अरोपितावर छापा 1किलो गांजा सह 12000 रूपयांचा मुद्देमाल जप्त  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  आज दि, 21,09,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की बरषिताक़ली खड़कपूरा परिसरात आरोपी शेख फिरोज शेख ईस्माइल हा आपालया राहात्या घरात मादक अमली पदार्थ गांजाचे विक्री करीत आहे अशा खात्रिशिर खबरे वरुन 2 पंचासमक्ष त्यांच्या राहते घरिच छापा मारला असता अरोपिच्या जवळ ताब्यात 1 किलो गांजा कीमत 10,000 रुपये एक तराजू काटा कीमत 2000 रुपये असा एकुन 12,000 रूपयांचा गाँजाचा मुद्देमाल अरोपिता जवळून जप्त करण्यात आल्याने आरोपी शेख फिरोज शेख इस्माइल रा खडकपुरा यांच्या विरुद्ध पो स्टे बरषिताक़ली येथे NDPS एक्ट कलम 20B अनवये गुन्हा नोंदविन्यात येवून अरोपितास अटक करण्यात आलेली आहे  सदर कार्यवाही मा पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने बार्शिटाकळी येथे आज 2 वाजता दुपारी केली आहे.

सण उत्सव शांततेत साजरे करा... अप्पर पोलीस अधीक्षक मोनीका राऊत

Image
सण उत्सव शांततेत साजरे करा... अप्पर पोलीस अधीक्षक मोनीका राऊत  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी          आज दिनांक 22. 9 .2022 रोजी सायं.5.30 ते 6.10 वापर्यंत पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अकोला, तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापुर यांच्या मार्गदर्शनाखाली नवदुर्गा उत्सव स्थापना व विसर्जन संदर्भात शांतता समिती सभा घेण्यात आली त्यामध्ये शांतता समिती सदस्य व नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असे 60 ते 65 नागरिक हजर होते. त्याचप्रमाणे 6.15 ते 7.00 वाजे पर्यंत धम्मचक्र मिरवणूक संदर्भात शांतता समिती सदस्य व धम्मचक्र चे अध्यक्ष पदाधिकारी यांची मीटिंग घेण्यात आली त्यामध्ये 40 ते 50 नागरिक हजर होते.तसेच 7.01 ते 7.20 वाजे पर्यंत ईद-ए-मिलाद संदर्भात शांतता समिती सदस्य व ईद चे पदाधिकारी यांची मीटिंग घेण्यात आली योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.  त्यावेळी त्यांनी संबंधित सार्वजनिक नवरात्र मंडळ तसेच धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध बांधवांना सण उत्सव शांततेत साजरे करा व शोशल मिडीयावर जे अपहरणाचे...