Posts

Showing posts from October, 2022

युवक कॉंग्रेसच्या बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी गिरीश जाधव यांची निवड..

Image
युवक कॉंग्रेसच्या बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी गिरीश जाधव यांची निवड.. बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरीष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. यशोमतीताई ठाकुर, आ.प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये ,अकोला जिल्हा भारत जोडो यात्रेच्या नियोजना संदर्भात ,अकोला जिल्हा दौऱ्यावर असतांना ,मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष पदी गिरीश जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी त्बा माजी मंत्री  आ. बाळासाहेब थोरात , आ. यशोमती ताई ठाकुर आ.प्राणितीताई शिंदे यांच्या हस्ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि अकोला जिल्हा युवक कॉंग्रेस राष्ट्रीय सचिव तथा प्रभारी महाराष्ट्र युवक कॉंग्रेस प्रतिभाताई मुगदल, मज्ष्ट्र महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत ,युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे ,प्रदेश सचिव सागर भाऊ कावरे , युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोपाल ढ...

कॉग्रेसच्या नवनिर्वाचित तालुका अध्यक्षांचा सत्कार संपन्न......

Image
कॉग्रेसच्या नवनिर्वाचित तालुका अध्यक्षांचा सत्कार संपन्न... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी स्थानिक लिटील स्टार इंग्लिश स्कुल बार्शिटाकळी येथे नुकतेच तालुका कॅाग्रेस कमिटीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष रमेश पाटील बेटकर यांचा सत्कार कार्यक्रम माजी जि.प.सदस्य श्री. आलमगीर खान यांनी आयोजीत केला होता. यावेळी अकोला जिल्हा ग्रामिण कॅाग्रेस सरचिटणीस ॲड. भूषण गायकवाड, जिल्हा सचिव डॅा. तनविर जमाल, गिरीश जाधव तालुकाध्यक्ष युवक कॅाग्रेस , बाळुभाऊ ढोरे शहराध्यक्ष , भारत बोबडे तालुका महासचिव , मासुम खान माजि सरपंच, गोपाल ढोरे मुर्तिजापुर विधानसभा अध्यक्ष युवक कॅाग्रेस, सै फारुक माजी उपसभापती, अकील भाई नगरसेवक, अन्सारउल्ला खान शहराध्यक्ष उद्योग व व्यापार, संतोष राऊत, जाकीरउल्ला खान इनामदार, गुड्डुभाई समाज सेवक , जैनुभाई लिडर, आशिक अली सर, नियामतउल्ला खान, अजिज खान , गाजीखान खुर्रम, वसीम सर यांच्यासह ईतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचलन व आभार प्रदर्शन आलमगीर खान यांनी केले.

सलून व्यवसायिकाच्या मुलीची गरुड झेप....... उद्या परदेशात रवाना.......

Image
सलून व्यवसायिकाच्या मुलीची गरुड झेप.. उदया परदेशात रवाना आजकाल इतर समाजाप्रमाने पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत नाभिक समाजातील मुलीही सर्वच क्षेत्रात आगेकूच करताना पहावयास मिळत आहेत.कुणी परीक्षेत पहिली आली म्हणून, तर कुणी स्पर्धा परीक्षा द्वारे सरकारी अधिकारी,इंजिनीयर अथवा डॉक्टर, झाली म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.समाजातील कराडच्या अपेक्षाने तर सलून व्यवसायात ऐतिहासिक असे धाडसी पाऊल टाकून संपूर्ण सलून व्यवसायात क्रांती घडविली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या रणरागिणीनी कुठंही आपल्या खडतर परिस्थितीच भांडवल न करता केवळ अफाट मेहनत आणि चिकाटीच्या जिद्दीवर समाजातील मुली यशाचे नवनवीन शिखरांना गवसणी घालताना समाजाचा स्वाभिमान दिवसेंदिवस उंचावत आहे. अशाच एका जिद्दी आणि कष्टाळू सलून व्यवसायिकाच्या मुलीने आपल्या बेताच्या परिस्थितीवर मात करून आणि रात्रंदिवस अभ्यास करून नाभिक समाजाचा झेंडा अटकेपार नेण्याचा नावलोकिक मिळविला आहे. अहमदनगर जिल्हा पारनेर तालुक्यातील कळस या छोट्या खेड्यात वाढलेल्या प्रगती साहेबराव वाघमारे या मुलीने आपल्या खडतर परिस्थिवर मात करून हे यश संपादन केले ...

विझोरा - कुंभारी रस्त्याचे काम थांबविले ! खड्डे न भरता माघारी : प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

Image
विझोरा - कुंभारी रस्त्याचे काम थांबविले !  खड्डे न भरता माघारी : प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी : सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोला क्रमांक १ अंतर्गत विझोरा- साखर कारखाना कुंभारी रस्त्याचे काम झाले परंतु तीन महिन्यातच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे हे खड्डे भरण्याचे काम सुद्धा निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत शनिवार 29 सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी काम बंद पाडले. विझोरा कुंभारी रस्त्याचे नियोजन महिन्यात मजबुतीकरण डांबरीकरण करण्यात आले होते परंतु डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता अल्पावधीतच उघडला या रस्त्यावर घडले पडले आहेत दरम्यान खड्डे व त्याचेच भरण्याचे काम शुक्रवारपासून करतात कत्राटटदारांनी सुरू केले होते ते सुद्धा काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी काम थांबविले. या कामाचे अभियंता स्वतः कामावर हजर राहत नाहीत, तोपर्यंत काम बंद करण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. अखेर अभियंता घोडस्कर यांनी कंत्राटदाराला काम बंद करण्याचे सांगितले. " विझोरा - साखर कारखाना कुंभारी रस्त्याबाबत ९ जुन रोजी लेखी तक...

पंचायत समीतीचे उपसभापती संदीप चौधरी यांनी घेतला पदभार

Image
पंचायत समीतीचे उपसभापती संदीप चौधरी यांनी घेतला पदभार  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी पंचायत समितीचे उपसभापती संदीप चौधरी यांनी शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडणुका झाल्या उपसभापती भारतीय जनता पक्षाचे संदीप चौधरी विजयी झाले होते संदीप चौधरी यांनी शुक्रवारी उपसभापतीच्या दालनात पलवार स्वीकारला यावेळी उपसभापती संदीप चौधरी यांचे भाजपचे तालुकाध्यक्ष राजू काकड व इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी भाजप युवा मोर्चा आघाडी तालुका अध्यक्ष योगेश कोंदणकर, गोवर्धन सोनटक्के, संजय इंगळे, सुनिल ठाकरे, सुनिल जानोरकर, गजानन मलगे, विठ्ठल वाघ, विकास गोरले, पिंटु काकड, विजय खिरडकर, शुभम चौधरी, गणेश महल्ले, राधेश्याम खरतडे, संघपाल वाहुरवाघ, प्रकाश काटे, कैलास तेरोने , भाजप महिला शहराध्यक्ष पुष्पा रत्नपारखी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प.स.सभापती , उपसभापतीचा पदग्रहण सोहळा संपन्न

Image
प.स.सभापती , उपसभापतीचा पदग्रहण सोहळा बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी पंचायत समितीच्या बहुचर्चित सभापती व उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा दिनांक 28 ऑक्टोबरला सकाळी पंचायत समीतीमध्ये सभापती व उपसभापती यांच्या दालनात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित सभापती सौ. सुनंदा संजय मानतकर यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतीमांना पुष्पहार अर्पण करून संपन्न झाला. या पदग्रहण सोहळ्याला कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश गांवडे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मानतकार, जि. प. सदस्य गोपाल भटकर, डॉ गणेश बोबडे, बंडु राऊत, राहुल गायकवाड, जावेद खान, तांबारे, शहराध्यक्ष उमेश राऊत, अरविंद काकड उपतालुकाप्रमुख, पिंटु ठाकरे, गणेश काळे, अशोक इंगळे, नितीन इंगळे, प्रदिप खाडे, किशोर घुगे, योगेश लाहोडकर, निखिल ठाकरे, अनिल आंबेकर, शंकरराव आंबेकर, निलेश मानतकार, आत्माराम सरोदे, रमेश ढोरे, महादेव इंगळे, नरेंद्र मते, अनिल काळे, भागवत हातोलकर, भास्कर काळे, यांच्या सह आजी माजी पदाधिकारी, सदस्य व महाविकास आघाडीच्या विचाराला मानणारे बहुसंख्य कार्...

मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या सचिव पदी उमेश डाबेराव तर मुर्तिजापूर युवती तालुकाध्यक्ष पदी गौरी मालठाणे यांची निवड.....

Image
मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या सचिव पदी उमेश डाबेराव तर मुर्तिजापूर युवती तालुकाध्यक्ष पदी गौरी मालठाणे यांची निवड.... बार्शितकळी - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या कार्याध्यक्षा आ.प्राणितीताई शिंदे भारत जोडो यात्रेच्या नियोजना संदर्भात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असतांना मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या सचिव पदी उमेश डाबेराव तर मुर्तिजापूर युवती तालुकाध्यक्ष पदी गौरी मालठाने यांची आ.प्राणितीताई शिंदे यांच्या हस्ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर , प्रदेश सचिव सागर भाऊ कावरे , यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोपाल ढोरे पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात अली. या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर , महेश गणगणेे, सुनिल पाटील धाबेकर , तालुका अध्यक्ष रमेश बेटकर , शहर अध्यक्ष बाळु भाऊ ढोरे , नगराध्यक्ष महेफूस खान , सै जहांगीर , शेख अझहर, युवक शहर अध्यक्ष मो शोहेब , गिरीश जाधव , सागर गोळे , जयत मालठाणेे, भारत बोबडे , सै मिरसाहेब , ...

राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांची प्रा,आ, केंद्र पिंजर येथे आकस्मिक भेट

Image
*राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांची प्रा,आ, केंद्र पिंजर येथे आकस्मिक भेट* बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. गेल्या काही दिवसांपासून सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती तपासणी मोहीम हाती घेतली, आहे मंगळवारी २५आक्टोबर रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी  डॉ, दुर्योधन गोपाजी चव्हाण यांनी भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेतला कर्मचाऱ्यांची माहिती घेतली, सर्व कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी राज्यस्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ, दुर्योधन गोपाजी चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती मोहीम सुरू केली.आहे, यापूर्वी,मा,आयुक्त श्री,तुकाराजी मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून लगेच काही दिवसात वरीष्ठ अधिकारी यांच्या आकस्मिक भेटी सुरु झाल्या त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, सुरेश आसोले, सीईओ,सौरभ कटीयार डॉ,तरंग तुषार वारे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, पवार यांनी भेटी दिल्...

गुलाम नबी आजाद महाविद्यालयात स्वच्छता अभियान संपन्न....

Image
गुलाम नबी आजाद महाविद्यालयात स्वच्छता अभियान संपन्न बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. बार्शिटाकळी स्थानिक गुलाब नबी आझाद महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत नुकतेच प्राप्त झालेल्या आदेशान्वये, स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आदेश प्राप्त झाले. सोबतच राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सुचनेप्रमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एकुनच अशा निर्देशाप्रमाणे स्थानिक गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शीटाकळी परिसर व लगतच्या परिसरामध्ये असलेले वेस्टेज, प्लास्टिक व इतर कचरा जमा करण्यात आले. महाविद्यालयाचे . प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत या स्वच्छता अभियानाला सुरवात झाली. सदर अभियानामध्ये महाविद्यालयाचे जवळपास 60 ते 70 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. यामध्ये मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये व इतर लगतच्या ठिकाणी असलेला कचरा, प्लास्टिक व इतर वेस्...

अकोल्यातील इसमाने बायकोला फोन करुन केली आत्महत्या

Image
*अकोल्यातील इसमाने बायकोला फोन करुन केली आत्महत्या*  *माहीती मिळताच (जिवरक्षक) दिपक सदाफळे हे आपल्या सहका-यासह अवघ्या पंधरा मिनटात घटनास्थळी पोहचले* बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  ...घरुन आपल्या मोटारसायकलने निघुन गेलेले रवी बाबाराव निखाडे रा.कृषीनगर अकोला वय अंदाजे (35) वर्ष यांनी मी दोनदला काटेपुर्णानदीत आत्महत्या करत आहे असा फोन पत्नीला केल्याची माहिती नातेवाईकांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देताच क्षणाचाही विलंब न करता अवघ्या 15 आपल्या सहका-यासह जिवरक्षक दिपक सदाफळे घटनास्थळी पोहचले परंतु काहीही दिसुन आले नाही परत दिपक सदाफळे यांनी नातेवाईकांकडे बारकाईने विचारपुस केली असता रवी निखाडे हे आपली ज्युपीटर दुचाकी ने दोनदलाच गेले असेल अशी खात्री दिली यावेळी दिपक सदाफळे यांनी रवी निखाडे यांच्या मोबाईल वर वरचेवर फोन करन चालुच ठेवले रींग जात होती परंतु फोन उचलल्या जात नव्हता दोनद वरुनच शंका बळावली आणी इतर ठीकाणी तर गेले नसतीलना अशी शंका दिपक सदाफळे यांना आली यामुळे महान धरणावर दोन सहकारी ठेवले आणी ...

राजंदा शेतशिवारात वन्यप्राण्यांच्या धडकेत शेतमजुर गंभीर जखमी *उपचारासाठी नागपूर येथे हलवले

Image
राजंदा शेतशिवारात वन्यप्राण्यांच्या धडकेत शेतमजुर गंभीर जखमी  *उपचारासाठी नागपूर येथे हलवले  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा शेत शिवारात कापशी रोड येथील शेतमजूर सोयाबीन सोंगण्या साठी गेले होते सोयाबीन सोगत असतांना अचानक नीलगायच्या (रोहिट )धडकेत एक शेतमजूर महिला गंभीर जखमी झाली असून तिला अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना  पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवले आले आहे कापशी रोड येथील शेतमजूर गोविंद नरसिंग डाबेराव व त्यांची पत्नी आशा गोविंद डाबेराव  हे राजंदा  शेतशिवारात सोयाबीन सोंगण्याकरिता गेले होते सोयाबीन सोंगत असताना अचानक नीलगाय आल्याने नीलगाईने शेतमजुर महिला आशा डाबेराव   हिला जब्बर धडक दिली धडक दिल्याने शेतामध्ये असलेल्या मजुरांनी कापशी रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमिक उपचार करण्यासाठी आणले असता येथील डॉक्टरांनी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले तेथे उपचार करत असताना त्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना तत्काळ नाग...

जमीअत ए उलमा च्या वतीने आयोजित केलेल्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित परीक्षेस उत्तम प्रतिसाद. सुमारे संपूर्ण तालुक्यात 750 मुलामुलींनी घेतला भाग. बक्षीस वितरण 9 नोव्हेबर रोजी.

Image
जमीअत ए उलमा च्या वतीने आयोजित केलेल्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित परीक्षेस उत्तम प्रतिसाद. सुमारे संपूर्ण तालुक्यात 750 मुलामुलींनी घेतला भाग. बक्षीस वितरण 9 नोव्हेबर रोजी.   प्रतिनिधी. बार्शिटाकळी ,      सिरत्तूंनाबि च्या निमित्ताने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नावर नुकतेच जिमिअत ए उलमा च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेस तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून सदर परीक्षेस तालुक्यातील 21 मदरसा (मकतब) चे 750 मुलामुलींनी भाग घेतला.       सदर परीक्षा ही जिमिअत ए उलमा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष मौलाना सय्यद वसी उल्लाह, तालुका सचिव हाजी सय्यद आशीक , मौलाना अजीज उल्लाह खान , मौलाना मोहम्मद एजाज व शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान , ज्येष्ठ पत्रकार मुफिज खान यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.      तालुक्यातील महान,पिंजर,जमकेश्वर व बार्शिटाकळी येथे आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित 200 प्रश्नाची प्रश्पत्रिका...

वऱ्हाडी कट्टा फेसबुक समूहाचा सहावा स्नेहमिलन सोहळा यावर्षी अकोल्यात........

वऱ्हाडी कट्टा फेसबुक समूहाचा सहावा स्नेहमिलन सोहळा यावर्षी अकोल्यात---- वऱ्हाडी कट्टा फेसबुक समूहाचे साहित्य संमेलन तथा स्नेहमिलन सोहळा दि.३०/१०/२०२२ रोजी स्व.अण्णासाहेब रोकडे मिलन सभागृह अकोला नगरीत पार पडणार आहे.. या सोहळ्याला संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक नरेंद्र इंगळे, उदघाटक श्री किशोर बळी सर,माजी अध्यक्ष अँड अनंत खेळकर, स्वागताध्यक्ष रजनीताई बावस्कर, प्रमुख अतिथी श्री पुरुषोत्तम आवारे पाटील राहाणार आहेत. सम्मेलनात जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक श्री तुळशिराम मापारी यांना, स्व उज्ज्वल विभूते वऱ्हाडी कट्टा साहित्य गौरव पुरस्कार श्री अरविंद शिंगाडे यांना, वऱ्हाडी कट्टा काव्य गौरव पुरस्कार सौ मधुराणी बन्सोड यांना, वऱ्हाडी कट्टा गझल गौरव पुरस्कार गझलकार अरविंद उन्हाळे यांना तर स्व.विनोद बाबू अग्रवाल अकोटीया पुरस्कार प्रसिद्ध कवी वैभव भिवरकर यांना देण्यात येणार आहे.   सदर कार्यक्रमाची सुरूवात ही उद्घाटन सोहळा आणि पुरस्कार वितरणाने सुरू होणार आहे..  सकाळी सकाळी १० ते १२:३० उद्घाटन सोहळा आणि पुरस्कार वितरण... १२:३० ते २ पर्यंत स्नेहभोजन... दुपारी २ ते ३ ज्येष्ठ कथाक...

आकोट येथील युवा वर्गाने रुग्णां सोबत केली दिवाळी साजरी....

Image
*आकोट येथील युवा वर्गाने रुग्णां सोबत केली दिवाळी साजरी*  ग्रामीण रुग्णालय आकोट येथे ज्या रुग्णांची दिवाळी  घरी होत नाही अशा रुग्णांन करीता सर्व युवक वर्ग धावून आला युवा मित्र परिवार फुले आंबेडकर नगर समता ग्रुप चे सर्व मित्रा तर्फे रुग्णांना फळ फ्रुट फराड चे वाटप करून दिवाळी पेसेंट सोबत साजरी केली गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले समाजसेवक लखन इंगळे व समता ग्रुप फुले आंबेडकर नगर अकोट येथील युवा साहिल शिरसाट , अवि फुंडे , पवन फुंडकर , विशाल फुंडकर , अनिल आढाव , रवी तेलगोटे, अनिकेत इंगळे, चेतक जामने, आकाश जुनगरे , शिवशंकर सावरकर , पंकज तेलगोटे ,  राहुल वानरे , गोपाल दिघेकर , अनिकेत फुंडे , राजु भोंडे , शुभम गवई  या मध्ये असेच कार्यक्रम युवा वर्गाने केले तर काही चांगले बदल घडतील व यामुळे चांगले बोध मिळतील असे मत लखन इंगळे यांनी मांडले सर्व मित्र परिवार मिळून कार्यक्रम चांगल्या प्रकारे करण्यात आला 

माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांची त्वरित भरती करा अन्यथा आंदोलन...... विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड....

Image
माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांची त्वरित भरती करा अन्यथा आंदोलन  विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने त्वरीत माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेले जागा भरावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांनी दिला आहेत शासन गुणवत्तेच्या गप्पा करीत असून मोठ्या प्रमाणावर शाळा-महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याकरता महत्त्वाचे शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्यामुळे फार मोठे कसब काय oचाललंय दिसताना संस्था आणि मुख्याध्यापकांना येत असून ह्या जागा त्वरित भराव्यात लवकरच माध्यमिक शाळांच्या परीक्षांचा टाईम टेबल सुद्धा शासनाने जाहीर केला आहे परंतु शाळांमध्ये मोठ्याप्रमाणावर जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षकच नाहीत या शिक्षकांच्या जागा त्वरीत भराव्यात अन्य था आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ मुख्याध्यापक संघाने नुकताच गोंदिया येथे झालेल्या सभेमध्ये जिल्हा याप्रसंगी विद...

बार्शिटाकळी मुस्लिम कब्रस्थान येथे जिल्हाधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण.....

Image
बार्शीटाकली मुस्लिम काब्रिस्तान येथे जिल्हाधिकारी यांचे हस्ते वुक्ष रोपण   प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,   सध्या वाढत्या पदुषणावर नियत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड ची हम खास जरूरत असून त्या अनुषगाने  बार्शिटाकळी येथे नगर पंचायतच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी वुक्ष रोपण कार्यक्रम घेण्यात आले या वेळी अकोला चे जिल्हाधिकारी निम्मा अरोरा यांचे शुभ हस्ते वुक्ष रोपण करण्यात आले या वेळी अकोली बेस येथील मुस्लिम काब्रिस्तान येथे विविध प्रजातींचे वृक्षांचा वृक्षरोपण करण्यात आले यावेळी कब्रस्तान कमिटीचे बार्शिटाकळी नगरपंचायत चे नगराध्यक्ष माहेफुज खान बार्शिटाकळीचे तहसीलदार गजानन हामंद, नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवहरी थोंबे बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाऊ, सय्यद आलम ,सय्यद नक्कीम काजी रिजवान ,नगर पंचायत उपाध्यक्ष सुरेश जामनीक, नगरसेवक नसीम खान अमजद खान, शाहीद इकबाल खान, आदी प्रमुख्याने उपस्थित होते या वेळी बाबासाहेब धबेकर विधालाय बालकक्षा बाबा काब्रस्नान येथे वुक्षारोपण करण्यात आले या वे...

न.प.आकोट मधील रखडलेले जनतेचे कामे व इतर कामे त्वरित करा नाहीतर ठिय्या आंदोलन करू लखन इंगळे यांचा उपजिल्हाअधिकारी व मुख्यअधिकारी यांना इशारा

Image
*न.प.आकोट मधील रखडलेले जनतेचे कामे व इतर कामे त्वरित करा नाहीतर ठिय्या आंदोलन करू लखन इंगळे यांचा उपजिल्हाअधिकारी व मुख्यअधिकारी यांना इशारा*  अकोट तालुका प्रतिनिधी गोरगरीब लोकांच्या हितासाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आकोट यांनी मा.उपजिल्हा अधिकारी अकोला  मा.मुख्यअधिकारी साहेब नगर परिषद आकोट यांना गोरगरीब लोकांचे विविध रखडलेले कामे व संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य कारवाही करण्या संदर्भात निवेदन देऊन ठिय्या आंदोलना चा इशारा दिला आहे आंदोलनात प्रमुख मागण्या अश्या होत्या की 1)अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल /जागा नियेमानुकूल करीता केलेला प्रभागातील अधुरा सर्वे पुर्ण करण्यात यावा 2)प्रधानमंत्री घरकुल चे लाभार्थी यांना कित्येक महिन्यापासुन बांधकाम परवानगी दिली त्यांच्या खात्यात तोरीत चेक जमा करा 3)रमाई घरकुल योजनेचे रखडून पडलेले अर्ज याचा निधी मागवून नवीन यादी अपडेट करा. 4)राहुल नगर 100 % टक्के दलित वस्ती मधील मंजुर कामे वर्क ऑर्डर देऊन तोरीत चालु करा 5)गुंठेवारी लाभार्थी यांचे रखडून पडलेले अर्ज तोरीत निकाली काढा 6)न.प.आकोट यांनी आकरलेले मनमानी घर...

बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी वृक्षारोपण संपन्न..............

Image
बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी वृक्षारोपण संपन्न.............. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. स्थानिक जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील भाऊ धाबेकर यांच्या उपस्थितीत बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी येथे आज दिनांक 21-10- 2022 रोजी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी निमाताई अरोरा, बार्शीटाकळी तहसीलदार गजानन हामंद, मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शिवहरी थोंबे, मुख्याध्यापक गजेंद्र काळे, यांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.     सर्व प्रथम जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनीलभाऊ धाबेकर यांनी जिल्हाधिकारी निमाताई अरोरा यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आदरणीय जिल्हाधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले       दिनांक 15- 10- 2022 रोजी नेहरू युवा केंद्र अकोला अंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय उत्सव 2022 मध्ये शाळेमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम ,चित्रकला स्पर्धेमध्ये यश प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धा करता निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अ...

सिरत्तूंनाबि निमित्त हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित (सीरत कुविज्) चे जमिअत ए उलमा च्या वतीने आयोजन.

Image
सिरत्तूंनाबि निमित्त हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित (सीरत कुविज्) चे जमिअत ए उलमा च्या वतीने आयोजन. तालुक्यांत तीन ठिकाणी परीक्षा. मकतब (मदरसा) चे सुमारे ७०० विद्यार्थी चा समावेश बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. स्थानिक जमिअत ए उलमा च्या वतीने सिरत्तूनाबी चे औचित साधून हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नन ची परीक्षा येत्या २३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असून त्या मध्ये तालुक्यातील सुमारे ७०० विध्यर्थी भाग घेणार असल्याचे जमिअत ए उलमा चे शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान यांनी सांगितले आहे.      सदर परीक्षा ही जमिअत ए उलमा चे तालुका अध्यक्ष व मिनारा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अब्दुल सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून या मध्ये सुमारे दोन शे प्रश्न राहणार आहे.       सदर परीक्षा ही मिनारा मस्जिद बार्शिटाकळी, प्लॉट मस्जिद महान, जामा मस्जिद पिंजर या तीन ठिकाणी होणार आहे. याचा टाइम सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असून आपल्या पाल्यांना वेळे वर परीक्षा केंद्रावर जाऊन बसविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.    ...

परतीच्या पावसात नुकसान झालेल्या जिल्ह्याच्या यादीतुन अकोला जिल्हा वगळण्यात आला असल्याने तो समाविष्ट करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीची मागणी...

Image
परतीच्या पावसात नुकसान झालेल्या जिल्ह्याच्या यादीतुन अकोला जिल्हा वगळण्यात आला असल्याने तो समाविष्ट करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीची मागणी... अकोला जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्यात परतीच्या प्रवासाने नुकसान झालेल्या २५ जिल्ह्याच्या यादीतुन अकोला जिल्हा वगळण्यात आला आहे. वास्तविक अनेक जिल्ह्यांत एखाद्या मंडळाला परतीच्या प्रवासाने नुकसान केले असले तरी आपण त्या   जिल्ह्यात नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु संपूर्ण अकोला जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार करून सोडला असतांना तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा व पातुर भागात ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले असतांना परतीच्या प्रवासाने नुकसान झालेल्या जिल्ह्याच्या यादीतुन अकोला जिल्हा वगळण्यात आला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नुकसान पाहता सदर जिल्ह्याला नुकसानग्रस्त जाहिर करून तात्काळ नुकसानाचा सर्वे करून सरस...

अकोट अकोला महामार्गावरील गोपालखेळ पुलावरून रहदारी सुरू करा वंचित बहुजन आघाडीची मागणी.....

Image
अकोट अकोला महामार्गावरील गोपालखेळ पुलावरून रहदारी सुरू करा. अकोट अकोला रेल्वे पुन्हा सुरू करा अकोला प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीग्राम येथील वाहतूक होणाऱ्या पुलाला भेगा पडल्या आहेत त्यामुळे ह्या रोडवरील सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अकोट अकोला रेल्वे तात्काळ चालु करण्यात यावा व पुलाची दुरुस्ती करून अकोला अकोट मार्ग पुर्वी प्रमाणे वाहतूकीसाठी चालू करण्यात यावा तसेच अंदुरा येथील पुलाचेही काम चालू करण्यात यावे या मागण्यांसाठी मा. जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले की, इंग्रज कालीन असलेला अकोट अकोला रोडवरील गांधीग्राम येथील पुलाला भेगा पडल्या असुन तो पडण्याच्या अवस्थेत असल्याने प्रशासनाने तातडीने या प्रकाराची दखल घेतली व हा रस्ता रहदारी करीता पुर्णपणे बंद केल्यामुळे येथील अनपेक्षितपणे घडणारी दुर्घटना टळली. खरोखरच या निर्ण...

~~गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे तीन खेळाडू अमरावती विद्यापीठाच्या संघात~~

Image
~~गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे तीन खेळाडू अमरावती विद्यापीठाच्या संघात~~  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी बार्शीटाकळी दिनांक 11. 10. 22 ते 13. 10. 22 पर्यंत झालेल्या कबड्डी महिला निवड चाचणी मध्ये गुलाम नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी च्या तीन खेळाडूची निवड अमरावती विद्यापीठाच्या संघात झाली आहे. त्यामध्ये कु. प्रगती इंगळे, कु. पायल श्रीनाथ तर राखीव खेळाडू म्हणून कु.अंजली धानोरकर यांची निवड झाली आहे. अमरावती विद्यापीठात होणाऱ्या वेस्ट झोन स्पर्धेकरिता तीनही खेळाडू रवाना होत आहेत. या तिनही विद्यार्थिनींची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. तारेश आगाशे, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिघींचे अभिनंदन केले. तसेच श्री अरुण इंगोले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

नेहरु युवा केंद्र तथा बाबासाहेब धाबेकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शिटाकळी येथे स्वच्छता अभियान संपन्न

Image
नेहरु युवा केंद्र तथा बाबासाहेब धाबेकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शिटाकळी येथे स्वच्छता अभियान संपन्न  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी नेहरू युवा केंद्र युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकार तथा बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी शहरात  जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक गजेंद्र काळे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी यांचे स्वप्न स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानाची माहिती मुख्याध्यापक गजेंद्र काळे तालुका समन्वयक कु. वैशाली गालट, सागर चौधरी, यांनी आपल्या मनोगता मधून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले नंतर स. अध्यापक गजानन जाधव, स अध्यापक .सय्यद शकील, यांनी विद्यार्थ्यासोबत शाळा ,नगरपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, या ठिकाणी जाऊन स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचे लोकांना महत्त्व पटवून दिले कार्यक्रमात पर्यवेक्षक अब्दुल सुबुरखान, स. अध्यापक साहेबराव शिंदे, सुनील कडू ,लिंक वर्कर स्कीम मार्गदर्शक बाळकृष्ण उताणे होते कार्यक्रमास बाबासाहेब धाबेकर विद्यालय...

मुर्तीजापुर युवक कॉंग्रेस तर्फे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला

Image
मुर्तीजापुर युवक कॉंग्रेस तर्फे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष  निनाद मानकर यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी येथील स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह बार्शीटाकळी येथे मा. निनाद मानकर युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींना वही पेन फराळाचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष. गोपाल ढोरे पाटील अधिक्षिका सौ.वनमाला महल्ले व वसतिगृह विद्यार्थ्यांनी पुनम शिंदे. किरण साखरे, पायल सोलंकेे, आनंदी, वैशाली, पूजा,  कांचन , दिव्या , निकिताा,  निशा, अश्मीताा, आस्था, प्रतिक्षा, परी, आचंल,  रुपाली,  पायल, वैशाली,  सपना, साक्षी, कोमल,  तन्व्वी, आकांक्षा,  इत्यादी मुली उपस्थित होते  तसेच मुर्तीजापर येथे दव्वाखाया फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

जी.एन.ए. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविले सुवर्णपदक......

Image
जी.एन.ए. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविले सुवर्णपदक  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी         स्थानिक बार्शीटाकळी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथील विद्यार्थ्यांनी नुकताच झालेल्या खंडेलवाल महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन तायकांडो स्पर्धेत गुलाम नबी आझाद कला व महाविद्यालय बार्शीटाकळी च्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आणि चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा हस्तगत केली. यामध्ये कुमारी रोहिणी फड कुमारी पूनम काशीद व कुमारी काजल वानखडे यांचा समावेश असुन अमृतसर येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेत तिन्ही खेळाडू लवकरच रवाना होत आहे त्यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांनी अभिनंदन करुन शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ तारेश आगाशे व श्री राहुल गजभिये यांनी केलेले उत्तम मार्गदर्शन पाहता यांचेही अभिनंदन केले. प्रथमच पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाची विद्यार्थीनी कु काजल वानखडे हीने तायकांडो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्या बद्दल समाजशास्त्र विभागाच्यावतीने डॉ दि...

मुर्तीजापुर विधानसभा युवक काँग्रेसची मागणी

Image
मुर्तीजापुर विधानसभा युवक काँग्रेसची मागणी  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  मुर्तीजापुर विधानसभा युवक कॉंग्रेस मार्फत मा. जिल्हाधिकारी अकोला यांना मा.तहसीलदार साहेब बार्शिटाकळी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.  बार्शिटाकळी व मुर्तीजापुर तालुक्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी करीता निवेदनं सादर करण्यात आले त्यावेळी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष मुर्तीजापुर गोपाल पाटील ढोरेे,  साहेबराव पाटील जाधव , प्रकाश नंदापुरे , भारत बोबडे ,  युवक कांग्रेस शहर अध्यक्ष मो शोोएब,  सैय्यद मुजम्मिल , शेख मकसद , सोहेल खान , शेख इमरान , सैय्यद गाजी ,  हरीश वनारे , विनोद नानोटे ,  योगेश कुरसेगे , राठोड व शेतकरी बांधव असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

जी एन ए महाविद्यालय चे दोन खेळाडू अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघात...

Image
जी एन ए महाविद्यालय चे दोन खेळाडू अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघात बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. दिनांक 11 10 22 ते 13 10 22 पर्यंत झालेल्या कबड्डी महिला निवड चाचणी मध्ये स्थानिक प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची निवड अमरावती विद्यापीठाच्या संघात झाली आहे त्यामध्ये कुमारी प्रगती इंगळे व कुमारी पायल श्रीनाथ यांची निवड झाली आहे.अमरावती विद्यापीठात दिनांक 6/11/22 ते 11/ 11/22 पर्यंत होणाऱ्या वेस्ट झोन स्पर्धेकरिता दोन्ही खेळाडू रवाना होत आहे निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकररावजी पवार ,शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर तारेश आगाशे प्राध्यापक रुंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच श्री अरुण इंगोले यांचे दोघींनाही मोलाचे मार्गदर्शन लाभले 

२० च्या आत पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद झाल्यास बालमजुरी, बाल विवाह वाढीचा धोका, निर्णय तातडीने परत घेण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी.

Image
२० च्या आत पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद झाल्यास बालमजुरी, बाल विवाह वाढीचा धोका, निर्णय तातडीने परत घेण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी. अकोला दि.१८ - २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या बहुतेक शाळा ह्या दुर्गम भागात व वाहतुकीच्या सोयी सुविधा नसणाऱ्या  शाळा सरसकट बंद झाल्यास लाखो गोरगरीब, वंचित, बहुजन व शेतकऱ्यांच्या मुले व खास करून मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातील. इथे शिकणारे लाखो विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती आहे. मुलींचे गळतीचे प्रमाण आधीच अधिक असताना या निर्णयाने प्राथमिक स्तरावरूनच हे गळतीचे प्रमाण वाढणे, बालमजुरी, बालविवाह अश्या इतरही सामाजिक समस्या उदभवून अनेक पिढ्याचे भयंकर नुकसान होणार आहे.सबब २० च्या आत पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने तत्काळ रद्द करावा अन्यथा राज्यभर युवा आघाडी तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायदयानुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याचा कायदा असूनही २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा स...

परतीच्या पावसाने हाल; सोयाबीन कपाशीत पाणी पिंजर परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Image
परतीच्या पावसाने हाल; सोयाबीन कपाशीत पाणी (पिंजर परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली) बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी पिंजर परिसरातील सोयाबीन पीक काढणीला आले असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.या पावसामुळे कपाशी पिकालाही फटका बसला असून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत या परिसरात पिंजर, भेंडीमहाल,खेडॉ भागई,भेंडीसुत्रक, वडगांव,निंबी, जनुना,टिटवा,खेडॉ खुर्द, पिंपळगाव,पाराभवानी, मोझरी खुर्द,उमरदरी,या भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले.आहे.अनेक ठिकाणी कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाली.सध्या शेतात सर्वत्र पाणी साचल्याने सोयाबीन काढवे कसे,अशा प्रश्न उभा ठाकला आहे.तर दुसरीकडे तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय,या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.१८ऑक्टोबर रोजी मंगळवारी झालेल्या पावसामुळे नदी ,नाले खळखळून वाहत असून कपाशीलाही फटका बसला आहे.सोयाबीन काढणीला आले अनेक ठिकाणी कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले.. _________________________                  चौकट भेंडीमहाल शिवारात याव...

तालुका पेन्शनर्स असोसिएशन बार्शिटाकळी ची सभा

तालुका पेन्शनर्स असोसिएशन बार्शिटाकळी ची सभा बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी पंचायत समिती सभागृहात दिनांक ३०/१०/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता तालुका पेन्शनर्स असोसिएशन च्या सभेचे आयोजन केले आहे. तरी सर्व शासकीय सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. सदर सभेमध्ये जिल्हाध्यक्ष मा. सुरजमल शर्मा हे मार्गदर्शन करुन निवृत्ती • बाबतच्या तक्रारी बाबतचे निवारण करणार आहेत. तरी सर्व सदस्यांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष हाजी गजनफर बेंग काजी युसुफ बेग व सचिव प्रल्हाद बुधाजी इंगळे यांनी केले आहे..

विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे - नंदकुमार राऊत

Image
विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे - नंदकुमार राऊत बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी      स्थानिक बार्शीटाकळी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे प्रा अरुण उमाळे ग्रंथपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती ग्रंथालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंचकावर प्रमुख उपस्थितीत प्रा अरुण उमाळे ग्रंथपाल, अधीक्षक नंदकुमार राऊत, डॉ. दिपक चौरपगार, प्रा सुधीर राऊत डॉ मोहन बल्लाळ, रवींद्र भटकर, ज्येष्ठ पत्रकार मुफिज खान उपस्थित हे होते कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी नंदकुमार राऊत यांनी आजचा विद्यार्थी हा पुस्तकापासून दुरावला आहे त्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीने मोबाईलचा विद्यार्थी आणि अभ्यास यामध्ये प्रवेश मिळवून दिला आहे परिणामी विद्यार्थ्यांना मोबाईलची मोठी सवय जडल्यामुळे तो वाचनापासून अलिप्त झाला आहे पुढे वाचनाची सवय बंद होईल क...

अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीची च्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे....

Image
अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीची च्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे.   अकोला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नुकतीस हॉटेल नैवेद्यम खडकी अकोला येथे जिल्हा बैठक होऊन त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक तथा निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक जिल्हा परिषद नगर खडकी येथील गजानन ओंकारराव हरणे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली. गजानन हरणे हे गेल्या 25 वर्षापासून सामाजिक तथा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोमाने करीत आहेत. चळवळीचा एक कृतीशील कार्यकर्ता म्हणून ते संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात सुपरीत आहेत . जिल्ह्यामध्ये बाबा ते बाबा हे अभियान गेला कित्येक वर्षापासून राबवले जातात त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहाला आहे. तसेच अकोला जिल्ह्यामध्ये अनेक बाबा, देवी अंगात आणणाऱ्या महिलांचा भाडाफोड करण्याकरता त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विचार गावागावात पोहोचवीण्याकरता जाहीर सभा, व्याख्याने व शाळा ,महाविद्यालय मध्ये कार्यक्रम घेऊन त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ जिल्ह्यामध्ये पसरवीण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त...

जि प उर्दू मुलींच्या शाळेतील मुलांचे नेत्र रोग तपासणी शिबिर संपन्न....

Image
जि प उर्दू मुलींच्या शाळेतील मुलांचे नेत्र रोग तपासणी शिबिर संपन्न... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  आज दिनांक १६ ऑक्टो रोजी डॉ श्रीराम लाहोळे यांचा नेत्र हॉस्पिटल येथे नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात बार्शी टाकळी जी. प.उर्दू मुलींच्या शाळे तील विद्यार्थ्यांचे नेत्र रोग तपासणी करून घेण्यासाठी येथील कन्या शाळेतील मुख्याध्यापक जावेद अथर खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक इमरान आली गुलाम आली, पालक फारुक खान यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरा मध्ये डॉ तरंग तुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक मैडम अकोला, डॉ भावना हाडोडे,वैद्यकीय अधीक्षक बार्शी टाकली डॉ महेश राठोड, सपना बाठे, वैद्यकीय अधिकारी दर्शना धावत,सिस्टर डॉक्टर धनंजय मनकर ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राम नागे, नोडल ऑफिसर शरवानी , डॉ मनीष मेन,डॉ स्नेहल वानखेडे,डॉ पंकज इंगोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.शिबिरास बार्शी टाकळी चे १० रूग्ण तसेच संपूर्ण जिल्ह्यातील एकूण ७० रूग्ण सहभागी यातील दोन रुग्णांचे ऑपरेशन करण्यात आले.

बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी राज्यस्तरावर निवड---------

Image
बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी राज्यस्तरावर निवड--------- बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी    दिनांक 15- 10 -2022 रोजी आबासाहेब खेडकर सभागृह रामदास पेठ अकोला येथे नेहरू युवा केंद्र अकोला युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हास्तरीय युवा उत्सव 2022 चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र भाषण प्रतियोगिता, सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजन करण्यात आले होते    सहभागी स्पर्धकांना जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलभाऊ धाबेकर यांचे मार्गदर्शन लाभले  मुख्याध्यापक गजेंद्र काळे यांच्या प्रेरणे मधून खालील विद्यार्थी ऋतुजा देशमुख, साक्षी जामनिक, साक्षी बलखंडे, निकिता आकोत, रक्षा पळसकार, आकांक्षा वाटमारे, मीनाक्षी करपे ,महिमा पापडकर, नेहा बिडवे, पल्लवी आगलावे ,यांनी झालेल्या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेमंटो, ५००० रूपये, बक्षिस मिळाले    चित्रकला स्पर्धेमध्ये तनिश खोपे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला विजय स्पर्धकांस प्रमाणपत्र, मेमंटो, ७५०रूपये, बक्षिस मिळाले स्प...

बार्शीटाकळी पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये तालुक्यातील रोजगार सेवकांचे तीन दिवसाचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सपन्न..

Image
बार्शीटाकळी पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये तालुक्यातील रोजगार सेवकांचे तीन दिवसाचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सपन्न.. बार्शिटाकळी  पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी रोहित सोनोने , तांत्रिक सहाय्यक अधिकारी राहुल पागृत , संदीप पंकज तायडे, चव्हाण मॅडम, पंथक तायडे व संगणक परिचालक संतोष इरछे,  ज्योती वाहूरवाघ, रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर फाळके ज्ञानेश्वर मते सुभाष काकड सुनील गायकवाड ज्ञानेश्वर काकड पंजाबराव भाऊ सुडके भाऊ व तालुक्यातील विविध गावातील रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते  तालुक्यातील प्रत्येक गावात विविध सार्वजनिक योजना व गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना कशा प्रकारे पोहोचतील व त्याकरिता आपणाला उत्तम प्रकारची सेवा कशी देता येईल तसेच समृद्धी बजेट कसे तयार करता येईल विविध प्रकारचे नरेगाची कामे तसेच रोजगार सेवकांच्या समस्या व जनहिताची कामे मोठ्या प्रमाणावर कसे करून प्रत्येक गावाचा विकास साधावा अशा प्रकारचे मार्गदर्शन मनोज ठाकूर व अम लेश मोरले यांनी तीन दिवसाच्या सदर प्रशिक्षणातून रोजगार सेवकांना म...

रात्री 3:00 वाजता 35 फुट खोल पाण्यातुन शोधुन काढला मृतदेह

Image
रात्री 3:00 वाजता 35 फुट खोल पाण्यातुन शोधुन काढला मृतदेह  ▶️ *पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथकाची धाडसी कामगिरी*   बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी ▶️ *घटनाक्रम*.. *बार्शीटाकळी पो.स्टेशन हद्दीतील येळवण ते विझोरा रोडवरील शेतातील विहीरीत नातेवाईकांच्या सांगण्यावरून आळशी प्लाॅट ता.जी.अकोला येथील संतोष भाऊराव यमगवळी अंदाजे वय (35)* वर्ष यांचा ॲटोरीक्षा, मोबाईल आणी चप्पल विहीरी जवळ आढळून आल्यामुळे हे विहरीत असल्याची दाट शक्यता असल्याने बार्शीटाकळी पो.स्टेशन चे ठाणेदार संजय सोळंके सर यांनी पिंजर येथील मा.आ.व्य. फांउडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर कळसकार,महेश वानखडे,विकास सदांशिव, निलेश खंडारे,गोपाल कुसदकर आणी शोध व बचाव साहीत्य व रेस्क्यु वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले आणी ठाणेदार संजय सोळंके सर यांच्या आदेशाने सर्च ऑपरेशन चालु केले विहिरीत 35 फुट खोल पाणी असल्याने कपारीमुळे स...

प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांच्या सारख्या संघटकांची आज गरज_आमदार किरण सरनाईक

Image
*प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांच्या सारख्या संघटकांची आज गरज* आमदार किरण सरनाईक  प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांच्या यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बळीराम झांमरे प्रमुख अतिथी आमदार किरन सरनाईक विजूक्टा अध्यक्ष डॉ.बोर्डे व्ही.मा.सी चेअध्यक्ष विजय ठोकळ जिल्हा क्रीडा अधिकारी उपलवार तालुका क्रीडा अधिकारी यादव प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते याप्रसंगी विविध संघटनांनी प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांचा सत्कार केला आपल्या भाषणात जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा क्षेत्रात बिरकड यानी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगितले याप्रसंगी बळीराम झामरे विजय ठोकळ यांची यांची भाषणे झालीत कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापक जाधव प्रास्तविक दिनेश तायडे तर आभार प्रदर्शन अरुन दातकर त्यांनी केले याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष माधव विखे सहसचिव दिनकर गायकवाड जिल्हा पदाधिकारी रमेश चव्हाण,कापरे, अकोला शहर अध्यक्ष सरफराज खान,अकोला तालुका अध्यक्ष नितीन भांडे सचिव साबळ, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष राजेश पातोडे सचिव सचिव गजान...

विदर्भाच्या पार्श्वभूमीवर आगळीवेगळी प्रेम कथा सांगणारा "तू फक्त हो म्हण" हा चित्रपट 14 आक्टोबरला प्रदर्शित होणार...

Image
विदर्भाच्या पार्श्वभूमीवर आगळीवेगळी प्रेम कथा सांगणारा "तू फक्त हो म्हण" हा चित्रपट 14 आक्टोबरला प्रदर्शित होणार... ============== बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी प्रेमामध्ये काहीजण यशस्वी होतात, तर काहींना अपयश येते, अशाच प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या प्रेमविराची कथा उलगडून दाखवणारा "तू फक्त हो म्हण" हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. प्रेमासाठी त्याग संघर्ष आणि काहीही करण्याची तयारी असणाऱ्या या प्रेमविरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, नंतर त्यांचे प्रेम कोणते वळण घेते ? हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळे करणार ? यासोबतच प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सुद्धा या चित्रपटात मांडण्यात आलेला आहे. या संगीतमय प्रेम कथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. गणेश कुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. या चित्रपटात मोनालीसा आणि निखिल ही जोडी दिसणार असून नाळ व झुंड या चित्रपटानंतर गणेश देशमुख हे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत, तर विदर्भाचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व माजी आमदार तथा चित्रपट कलावंत प्रा. तुकाराम बिडकर हे आगळ...

डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान व सैय्यद अहेमद सन्मानीत...

Image
डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान व सैय्यद अहेमद सन्मानीत  प्रतिनिधी बार्शीटाकली ,,,,,,,,, कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतिभाताई भोजने उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांच्या हस्ते लसीकरण जिल्हा ब्रँड अँबेसिडर व अकोट तालुक्यातील युवा प्रसिद्ध पत्रकार सय्यद अहमद राहुल्लह खान मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू शाळा 21 मेल महान यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे कोरोना काळात स्वतःचे जीव धोक्यात टाकून नागरिकांचे हितासाठी संपूर्ण अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात व बार्शीटाकळी तालुक्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून सदर दोन्हीही सामाजिक कार्यकर्ता यांनी प्रयत्न केले व शासना तसेच लसीकरणाच्या वेळी सुद्धा निस्वार्थ भावनांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजून दिले व कोरोनाला हद्दपार करण्यात आरोग्य विभागात मदत केली शाहिद इक्बाल व सायद अहेमद हे नेहमी शासनाचे प्रत्यक कल्याणकारी योजना नागरिकांन पर्यंत पोहचविण्याचा मोला ची भूमिका बजवितात अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जि श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण अकोला जिल्ह्यात एक...

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश

Image
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी येथील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकाना पतधोरणात सहभागी करण्यासाठी न.प. परीसरातील व्यवसायीकाना शासन निर्णय 2014 नुसार फेरीवाला धोरण लागु आहे त्यामुळे बार्शिटाकळी मधील फेरीवाले व्यवसायीकाची जणगणना अजुन पर्यंत वंचित होते त्याची दखल म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा व प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, तसेच बार्शिटाकळी येथील वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नगरपंचायत ला निवेदन दिले होते त्या निवेदनाची नगरपंचायत ने दखल घेत आज दिनांक 12 आक्टोबंर रोजी फेरीवाले यांची जणगणना करण्यासाठी अकोला येथील विनोद सिरसाठ ,आकाश ईगळे, पियुश गवई हे बार्शिटाकळी येथील व्यवसायीकांची जणगणना करत असुन त्यांच्या सोबत वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, रक्षक जाधव, उमेश गवई, सनी धुरंधर, नगरपंचायत चे कर्मचारी युशुफ अली हे हजर राहून काम करत आह...