Posts

Showing posts from July, 2022

अकोट येथील गोरगरीब नागरीकांचे धान्य सुरू करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केली मागणी

Image
अकोट येथील गोरगरीब नागरीकांचे धान्य सुरू करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केली मागणी  अकोट प्रतिनिधी आज दिनांक 30 जुलै रोजी अकोट येथील नागरिकांचे जिल्हाधिकारी अकोला जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी अकोला यांना गोरगरीब लाभार्थी यांचे धान्य चालू न केल्यास आंदोलनाचा इशारा  गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट शहर यांनी आकोट शहरातील व ग्रामीण भागातील एपिएल राशेन कार्ड धारक विधवा,अपंग,वयोवृद्ध व इतर लाभार्थी यांना राशन कार्ड वर धान्य तोरीत चालू करा या संदर्भात मा.जिल्हाधिकारी साहेब अकोला  मा.जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी साहेब अकोला यांना निवेदन देऊन गोरगरीब लोकांच्या विविध समस्या मांडल्या शहरातील /ग्रामीण भागातील लाभार्थी यांना राशन कार्ड वर बऱ्याच वर्षा पासुन धान्य मिळत नाही काही गोरगरीब लाभार्थी असे आहेत कि या महागीच्या काळात त्यांना मोल मजुरी व लेकरांचे शिक्षण करून जिवन जगणे कठीण झाले आहे करीता अश्या गरीब गरजु लाभार्थी यांना एक सहारा म्हणुन धान्य चालु करण्यात यावे अगोदर दि.3.1.2022रोजी याच संदर्भात निवेदन दिले होते आता ज...

शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षरोपण करून केले नवनिर्वाचित मुख्याध्यापकांचा सत्कार अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा अनोखा उपक्रम

Image
*शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षरोपण करून केले नवनिर्वाचित मुख्याध्यापकांचा सत्कार* *अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा अनोखा उपक्रम* प्रतिनिधी बार्शीटाकळी बार्शीटाकळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने नुकताच अकोला जिल्हा परिषद च्या वतीने पदोन्नती प्राप्त उर्दू माध्यमा चे बार्शीटाकळी तालुक्यातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक व वाढीव पटसंख्या मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे बार्शीटाकळी येथे उर्दू मुलींची कन्या शाळेचे मुख्याध्यापक यांचे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन आज बार्शीटाकळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वतीने अकोला तालुका व बार्शीटाकळी तालुका अध्यक्षांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जावेद अथर खान शाफिक अहेमद खान आखतर उल अमीन मोहन तराळे आणीसोद्दिन शाहिद इक्बाल राईस अहेमद किरण हिवराळे हे होते या वेळी महान जिल्हा परिषद शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफिक अहमद खान बार्शीटाकळी जिल्हा ...

जय भोले मित्र मंडळाचा बार्शिटाकळी येथे पदग्रहण सोहळा संपन्न

Image
जय भोले मित्र मंडळाचा बार्शिटाकळी येथे पदग्रहण सोहळा संपन्न  आज शुक्रवार दिनांक 29 जुलै रोजी जय भोले मित्र मंडळ अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य पदग्रहण सोहळा राहुल भाऊ गायकवाड संस्थापक अध्यक्ष,आशिष भाऊ वरणकार उपाध्यक्ष, अविनाश भाऊ जाधव सचिव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे प्रकाशजी वाहुरवाघ पंचायत समिती बार्शिटाकळी सभापती, मनोज भाऊ जाधव पं.स. उपसभापती बार्शिटाकळी, गजानन मानतकर शिवसेना तालुकाप्रमुख, गणेश भाऊ बोबडे जि.प‌.सदस्य , रोहीदास भाऊ राठोड पं.स.सदस्य बार्शिटाकळी, दादाराव भाऊ पवार पं.स सदस्य बार्शिटाकळी, दिनेश भाऊ मानकर पं.स.सदस्य बार्शिटाकळी,रतन भाऊ आढे गोरसेना जिल्हा अध्यक्ष,उमेश भाऊ राउत शिवसेना शहर प्रमुख  यांच्या हस्ते योगेश आप्पा मानेकर जय भोले मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पदी तर वैभव भाऊ पाठे सोशल मिडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली बार्शिटाकळी तालुका कार्यकारिणी हरीष भाऊ रामचवरे तालुका अध्यक्ष बार्शिटाकळी, अमर भाऊ गावंडे ता.उपाध्यक्ष ,भरत भाऊ सौदागर ता.सचिव ,भोला भाऊ आखाडे ता.सहसचिव,पवन भाऊ उजाडे ता.कोषाअध्यक्ष ...

दगडपारवा स्मशानभूमी मध्ये जाण्यासाठी रस्त्याची केली मागणी

Image
दगडपारवा स्मशानभूमी मध्ये जाण्यासाठी रस्त्याची केली मागणी   आज दिनांक 29 जुलै रोजी दगडपारवा येथील नागरिकांनी ग्रामपंचायत दगडपारवा येथील ग्रामसेवक तथा सरपंच यांना निवेदन देऊन रस्त्याची मागणी केली असुन निवेदना मध्ये स्मशानभूमीत प्रेत घेऊन जात असतानी पाय घसरून चिखलात पडुन प्रेताची विंटबना होऊ शकते त्यामुळे या स्मशानभूमीचा रस्ता लवकरात लवकर करून देण्याची मागणी केली आहे . या आधीही बरेच वेळा स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी बरेच वेळा मागणी केली आहे पण ग्राम पंचायत दगडपारवा त्याकडे दुर्लक्ष केले असून, पण आता आठ दिवसांत रस्ता करून न देल्यास होणा-या दुष्परिणामास ग्रामपंचायत दगडपारवा जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन देते वेळी साहिल गवई ,प्रशांत इंगळे ,धमपालभाऊ कांबळे , पंकजदादा कांबळे ,शिरुभाऊ खंडारे , पिन्टूभाऊ जामणिक ,सुरेश घुगे , प्रविण तायडे ,रामलखन राठोड, बाळू गवई,विनायक पारेकर , अमोल वाकोडे,  प्रमोद इंगळे, रंजित तायडे, व गावातील नागरिक उपस्थित होते 

वंचित बहुजन युवक आघाडीने मिळवून दिला शेतकऱ्यांला न्याय

Image
वंचित बहुजन युवक आघाडीने मिळवून दिला शेतकऱ्यांला न्याय बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  आज दिनांक 22 जुलै 2022 रोजी बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम भेडगाव येथील मिलींद भगत व अनिताताई भगत यांचे पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये त्यांच्या खात्यात घेऊन पडले होते. त्यांना आपल्या शेतात फवारणी करण्यासाठी पैशाची गरज पडली म्हणून ते पैसे काढण्यासाठी बँकेत गेले तर बँक मॅनेजरने पैसे देण्यास मनाई केली व बराच वेळ वादविवादही केला. बँक मॅनेजर सांगितले तुमच्यावर आधीच शेतीचे कर्ज असल्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही गेले पंधरा दिवसांपासून त्र्थीी लाभार्थी  यांनी बँकेत चकरा मारून मारुुन थकलेे होते तरी पण  त्यांना पैसे मिळत नव्हते म्हणून त्यांनी वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक यांच्याशी संपर्क साधला वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिनांक 28 जुलै 2022 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंजर येथे जाऊन बँक मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांना विचारण्यात आले की पी एम किसान योजनेचे पैसे तुम्ही का देऊ शकत नाही त्याचं काही लेखी तुमच्याकडे आहे का पि. एम. क...

आर्थिक अर्थसहाय योजनेचे पेंडीग असलेले अर्ज मंजुर करून विधवा महिलांना 20 हजाराचा लाभ त्वरित द्या लखन इंगळे यांची मागणी

Image
*आर्थिक अर्थसहाय योजनेचे पेंडीग असलेले अर्ज मंजुर करून विधवा महिलांना 20 हजाराचा लाभ त्वरित द्या लखन इंगळे यांची मागणी*  आज दिनांक 28 जुलै 2022 रोजी अकोट तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट शहर यांनी मा.उपविभागीय अधिकारी साहेब आकोट मा.तहसीलदार साहेब आकोट यांना निवेदन दिले निवेदनात मागणी अशी होती कि आर्थिक अर्थ साहाय्य योजनेचे पेंडिंग अर्ज मंजुर करून विधवा महिला यांना तोरीत विस हजार रुपये चा लाभ देण्यात यावा शासनाने गरीब गरजु महिला लाभार्थी करीता ज्या महिले चे पती मरण पावले असेल अश्याना शासना तर्फे वीस हजार रुपये आर्थिक मदत मिळते पण गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आर्थिक अर्थसाहाय्य योजनेचे अर्ज पेंडिंग पडून आहेत करीता आपल्या स्थरावरून आपण तोरीत आर्थिक अर्थ साहाय्य योजनेच्या केसेस मंजूर करून लाभार्थी यांना लाभ देण्यात यावा कारण या मुळे महिला यांना थोडा सहारा मिळेल जर का आमची मागणी पुर्ण झाली नाही तर आम्ही संबंधित कार्यालय येथे लाभार्थी यांना सोबत घेऊन आंदोलन /मोर्च्या उपोषण करू काही अनुचित प्रकार घडल्यास ...

पाच लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते केले मिशन

Image
*पाच लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते केले मिशन. महिला पोलिस अधिकारी रितु खोखर यानी जातीने मोहीम राबवली*  अरुण काकड आकोट तालुक्यातील ग्राम आकोली जहागीर येथिल रहिवासी असलेल्या एका प्रसिद्ध व्यावसायीकास ५ लक्ष रुपयांची खंडणी मागणारास आकोट शहर व ग्रामिण पोलिसानी संयुक्त सापळा रचून फिल्मी स्टाईलने अवघ्या २४ तासात अटक केली आहे. आकोट उपविभागिय पोलीस अधिकारी रितु खोखर यानी या मोहिमेत जातीने सहभाग घेवून ही कामगिरी फत्ते केली आहे. ह्या द्रुतगती कारवाईने आकोट शहरात सर्वत्र पोलीसांच्या कर्तबगारीचे कौतुक होत आहे.   ह्या खळबळजनक घटनेची हकिगत अशी आहे कि, दि. २५ जुलै रोजी अकोली जहागिर येथिल प्रसिद्ध व्यावसायिक अशोक गोठवाड हे नेहमीप्रमाणे आकोट कृ. ऊ. बा. स. येथिल आपल्या धान्य अडत दुकानात आले. दुकान ऊघडताच एक प्लॕस्टिकची थैली त्यांच्या दृष्टीस पडली. ती ऊघडताच त्यात एक चिठ्ठी आढळून आली. ती वाचताच अशोक गोठवाल हादरुन गेले. चिठ्ठीत त्याना चक्क ५ लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती रकम न दिल्यास त्याना व त्यांचे मुलास जिवे मारुन...

लोणार व मेहकर येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष माननीय धैर्यवर्धन फुंडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पंचायत समिती संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या

Image
 लोणार व मेहकर येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष माननीय धैर्यवर्धन फुंडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पंचायत समिती संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या आज लोणार व मेहकर येथे   वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा प्रभारी माननीय डॉक्टर धैर्यवर्धनजी फुंडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव विधी सल्लागार अमर भाऊ इंगळे जिल्हा संघटक बाला भाऊ राऊत उपाध्यक्ष दत्ता राठोड सचिव विनायक मापारी जेष्ठ नेते महेंद्र पनाड यांच्या उपस्थितीत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून जास्तीत जास्त संख्येने उमेदवार निवडून कसे आणता येईल या बाबत मार्गदर्शन माननीय धैर्यवर्धन फुंडकर साहेब यांनी केले. संभाव्य उमेदवारांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, सुनील इंगळे महासचिव बळी मोरे, समाधान डोके सल्लागार, रामेश्वर धोटे, उपाध्यक्ष विलास ढाकरके, गौतम गवई मालती ताई कळंबे महिला नेत्या संगपाल पनाड सुदेश इंगळे, दशरथ इंगळे पवन अवसरमोल...

३१जुलै रोजी होणाऱ्या शिक्षक आघाडी महाअधिवेशना ला उपस्थित राहण्याचे आवाहन

Image
३१जुलै रोजी होणाऱ्या शिक्षक आघाडी महाअधिवेशना ला उपस्थित राहण्याचे आवाहन बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी स्थानिक बाबासाहेब धाबेकर विधालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनिलभाऊ धाबेकर शिक्षक आघाडी संस्थापक अध्यक्ष श्रीकांतदादा देशपांडे शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक गजेंद्र काळे सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सभेमध्ये माध्यमीक व उच्य माध्यमीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची पतसंस्था अमरावती,अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ येथे सुरू करण्या बाबत व संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे दि 31 जुलै रविवारी होणाऱ्या शिक्षक आघाडी महाअधिवेशनाला उपस्थित राहण्याचे मा.आ.प्रा.श्रीकांतदादा देशपांडे यांनी आवाहन केले अध्यक्षीय भाषणात आदरणीय सुनीलभाऊ धाबेकर यांनी होणाऱ्या अधिवेशनात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे विचार व्यक्त केले प्रास्ताविक गजेंद्र काळे यांनी सुत्रसंचलन सोनाली पाटील आभार प्रदर्शन गजानन जाधव यांनी केले

बार्शिटाकळी येथे कारगिल विजय दिवस साजरा

Image
बार्शिटाकळी येथे कारगिल विजय दिवस साजरा  बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी          बार्शीटाकळी येथे कारगिल विजय दिवस माजी सैनिक आणि शहीद परिवार यांच्या वतीने रॅली काढून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, मागच्या वर्ष प्रमाणे या वर्षी सुद्धा कौलखेड चौक येथून बार्शी टाकली बाय पास पर्यंत सर्व माजी सैनिक यांच्या वतीने शहीद अमर रहे, भारत माता की जय, या उद्धघोसह रैली काठण्यात आली होती या मुळे सर्व परिसर दना नुन गेला,यावेळेस संघटनेचे माजी सैनिक देविदास काजगे, अर्जुनराव बुधनेर, श्रीकृष्ण आखरे, संतोष च-हाटे, राहुल बोडखे, अनिल ठाकरे, विलासराव पतींगे, विजय सपकाळ, अवी खाडे, रवींद्र शित्रे, उमेश नागे, अकलिमोद्दीन, रंगराव जाधव, समस्त माजी सैनिक सदर रैली मध्ये सहभागी झाले होते. शेवटी छोटे खानी कार्यक्रम घेण्यात आला या मध्ये विशेष आमंत्रित एन सी सी कॅम्प चे अधिकारी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार, तहसील कर्मचारी उपस्थित होते, राष्ट्र भक्ती, देशभक्तीमय वातावरणात हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे पार पडला. 

बार्शिटाकळी येथे उपमुख्यकार्यपालन अधिकारी अकोला यांनी अहिल्यादेवी होळकर जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट

Image
बार्शिटाकळी येथे उपमुख्यकार्यपालन अधिकारी अकोला यांनी अहिल्यादेवी होळकर जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट    बार्शिटाकळी प्रतिनिधी  आज दिनांक 27 जुलै 2022 रोजी बार्शिटाकळी येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर मुलींची कन्या शाळा येथे उपमुख्य कार्यपालन अधिकारी अकोला यांनी शाळेच्या काही खोल्या शिकस्त झाल्या असल्यामुळे आणी तसे निवेदन अनंत केदारे बाशिटाकळी आणि उमेश राऊत यांनी दिल्या मुळे पाहणी केली असता  त्या वेळेस उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुभाष पवार, सुरज गोहाड ,  उपमुख्य कार्यपालन अधिकारी फडके साहेब यांनी लवकर समस्येवर निराकरन करण्यात येईल अशी ग्वाही दिली शिक्षण विभागाचे कर्मचारी केंद्र प्रमुख धांडे सर मुख्याध्यापिका नंदा मावळे मॅडम, संघमिञा तायडेे, विस्तार अधिकारी अनिल देशमुख आणी इतर अधिकारी आणी कर्मचारी हजर होते

नगर परिषद मधील भ्रष्टाचार केलेल्या संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाही करून निलंबित करण्याची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लखन इंगळे यांची मागणी

Image
*नगर परिषद मधील भ्रष्टाचार केलेल्या संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाही करून निलंबित करण्याची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लखन इंगळे यांची मागणी*  आज दिनांक 26 जुलै 2022 रोजी लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी जिल्हाधिकारी साहेब अकोला व जिल्हापोलीस अधीक्षक साहेब अकोला यांना आकोट नगर परिषद मध्ये बऱ्याच प्रभागात झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात तक्रार दिली आकोट नगर परिषद मध्ये काही कामे चुकीचे ठराव घेऊन करण्यात अली व काही एकाच कामांना दोन वेळ प्रशासकीय मान्यता घेऊन करण्यात आली त्याचे बिले सुद्धा काढण्यात आली काही कामे जे दलित वस्ती मध्ये बसत नाहीत असे बरेच कामे दलित वस्तीचे सुवर्ण वस्तीत टाकण्यात आली काही कामे फक्त कागदोपत्री करण्यात आली व त्याचे बिले काढण्यात आली काही प्रभागात कामे सार्वाजनिक बांधकाम विभागाने विशेष निधीतून केलेली असुन न. प.आकोट येथील संबंधित अधिकारी यांनी काम न करता बिले काढली या करीता याच्या अगोदर सुद्धा आम्ही प्रशासनाच्या व शासनाच्या निदर्शनास आणुन दिले होते करिता संबंधित अधिकारी यांनी शासनाची व जेनतेची दिशाभूल केली याची विभागीय ...

केंद्रीय तपास यंत्रनेच्या गैरवापराविरूध्द बार्शिटाकळी कॉंग्रेसचा शांतता पुर्ण सत्याग्रह

Image
केंद्रीय तपास यंत्रनेच्या गैरवापराविरूध्द बार्शिटाकळी कॉंग्रेसचा शांतता पुर्ण सत्याग्रह  प्रतिनिधी बार्शिटाकळी , केद्रीय सरकांर तपास य़त्रनेच्या गैर वापरा वरुन सुड बुद्धीने ज्येष्ठ नेते मंडळीना नाहक त्रास देऊन जाहिर नागरीकां मध्ये बदनामी केल्याच्या आरोप देशात व बार्शिटाकळी तालुका कॉग्रेसच्या वतीने निषेद करुन तहसिल कार्यांलया समोर दि २६ जुलै मंगळवारी शांतता पुर्ण सत्याग्रह आदोलन केले , बार्शिटा कळी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने केन्द्रीय सरकार राजकीय सुडबुंद्वीने राष्ट्रीय कॉग्रेसच्या अघ्यक्षा श्रीमती सोनिया गांधी याना लक्ष करीत असल्याने आज सर्पुण देशात पाहत आहे. केद्धीय सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व घोरणा वरुन सर्व सामान्य चे लक्ष वीच लीत करण्या साठी कॉग्रेस नेते मंडळीले नाहक त्रास देण्यात येत आहे.  हुकुशाही शासन केद्रीय तपास य़त्रणा करीत आहे , गैरवापर विरुद्ध कॉग्रस पक्ष जिल्हा ब तालुका . पदाधिकारी  मोठया सख्येने राष्ट्रीय कॉग्रेसच्या अध्यक्षा सोबत आहे , करिता शांततेने सत्याग्रह करुन तहसिलदार यांचेकडे  नीवेदन दिले , त्यावेळी मांन्यवरानी केद्धीय तपासा ...

शिक्षक आघाडी यांनी महाअधिवेशनाला उपस्थित राहण्याचे मा.आ.प्रा.श्रीकांतदादा देशपांडे यांचे आवाहन

Image
शिक्षक आघाडी महाअधिवेशनाला उपस्थित राहण्याचे मा.आ.प्रा.श्रीकांतदादा देशपांडे यांचे आवाहन  बार्शिटाकळी प्रतिनिधी  दिनांक 25-7-2022 सोमवारी दुपारी 12-30 वाजता बाबासाहेब धाबेकर विधालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनिलभाऊ धाबेकर शिक्षक आघाडी संस्थापक अध्यक्ष श्रीकांतदादा देशपांडे शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक गजेंद्र काळे सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सभेमध्ये माध्यमीक व उच्य माध्यमीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची पतसंस्था अमरावती,अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ येथे सुरू करण्या बाबत व संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे दि 31 जुलै रविवारी होणाऱ्या शिक्षक आघाडी महाअधिवेशनाला उपस्थित राहण्याचे मा.आ.प्रा.श्रीकांतदादा देशपांडे यांनी आवाहन केले अध्यक्षीय भाषणात आदरणीय सुनीलभाऊ धाबेकर यांनी होणाऱ्या अधिवेशनात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे विचार व्यक्त केले प्रास्ताविक गजेंद्र काळे यांनी सुत्रसंचलन सोनाली पाटील आभार प्रदर्शन गजानन जाधव यांनी केले

अखेर वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी च्या मागनीला यश

Image
अखेर वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी च्या मागनीला यश  बार्शीटाकळी प्रतिनिधी  बार्शिटाकळी तालुक्यातील निबी येथील सतीश भाऊराव शिरसाट हा युवक अकोला कडुन निंबी कडे येत असतांना आळंदा फाट्या जवळ 1 जुन रोजी वादळात रस्त्यावरील निंबाच झाड सतीश भाऊराव शिरसाट याच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या घरात एकुलता एक कमावता व्यक्ती गेल्याने त्याच्या मृत्यूची दखल वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी ने घेत त्याला आर्थिक मदतीची मागणी केली होती त्या निवेदनाची दखल घेत शासनाने सतीश भाऊराव शिरसाट याच्या परीवाराला 4 लाख रुपयांची मदत बार्शिटाकळीचे तहसीलदार श्री गजानन हामद साहेब यांनी त्यांच्या बॅक खात्यात जमा केली यावेळी सतीश भाऊराव शिरसाट याच्या परीवाराने वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, गोबा शेठ, न. प. उपाध्यक्ष सुरेश जामनिक, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर, सै. अबरार, संदेश ईगळे, रक्षक जाधव, गणेश दहात्रे,मो. तौफिक, दिनेश जामनिक आदि मान्यवरांचे आभार मानले 

बार्शीटाकळी येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न१८३ रुग्णानी घेतला शिबिराचा लाभ

Image
बार्शीटाकळी येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न १८३ रुग्णानी घेतला शिबिराचा लाभ  बार्शीटाकळी प्रतिनिधी             स्व.संजय पुंडलिकराव वाघमारे यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त आज दिनांक 24 जुलै 2022 रोजी बार्शीटाकळी येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात अकोला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर यांनी सेवा दिल्या. त्यात प्रामुख्याने डॉ. विनय खंडेलवाल ( MD med,मधुमेह व दमारोग तज्ञ ) डॉ.प्रतीक लढ्ढा ( Uro Surgon,मूत्रपिंड शल्यचिकित्सक ) डॉ.अभिजीत शिरसाट ( MBBS,D.Orthoअस्थीरोग तज्ञ ) सुविधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्जिकल,क्रिटीकल केअर सेंटर अकोला यांचा समावेश होता. यावेळी भागोदय आरोग्य व शिक्षण बहुद्देशीय संस्था चे लिंक वर्कर बाळकृष्ण उताने , महेंद्र वानखडे , किशोर राठोड , अंकुश अंभोरे यांनी सेवा दिली.         सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ.सै.तनवीर जमाल , डॉ. रवि कापकर यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उदघाटन श्रीमती निर्मलाताई संजय वाघमारे यांनी केले . सदर शिबिरामध्ये 183 रूग्णनी लाभ घेतला ....

वंचित बहुजन आघाडी ने मिळवून दिला शेतकऱ्यांला न्याय...

Image
वंचित बहुजन आघाडी ने मिळवून दिला शेतकऱ्यांला न्याय बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  आज दिनांक 22 जुलै 2022 रोजी बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम चिंचोली रुद्रायणी येथील दुर्गा सिंग मदन सिंग राठोड यांचे पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये त्यांच्या खात्यात घेऊन पडले होते. त्यांना आपल्या मुलीच्या एडमिशन साठी पैशाची गरज पडली म्हणून ते पैसे काढण्यासाठी बँकेत गेले तर बँक मॅनेजरने पैसे देण्यास मनाई केली बँक मॅनेजर सांगितले तुमच्यावर आधीच शेतीचे कर्ज असल्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही गेले आठ दिवस त्या इसमाने बँकेत चकरा मारून त्यांना पैसे मिळत नव्हते म्हणून त्यांनी वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक यांच्याशी संपर्क साधला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिनांक 21 सात 2022 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा धाबा येथे जाऊन बँक मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांना विचारण्यात आले पी एम किसान योजनेचे पैसे तुम्ही का देऊ शकत नाही त्याचं काही लेखी तुमच्याकडे आहे का पि. एम. किसान योजनेचे पैसे कोणी अडवू शकत नाही या गोष्टीचा पाठपुरवठा करून बॅक मॅनेजरला दुर्गा सिंग राठोड यांच...

बॅक राष्ट्रीयकरण दिना निमित्त बॅक ऑफ महाराष्ट्र बार्शीटाकली मध्ये वृक्षारोपण

Image
*बॅक राष्ट्रीयकरण दिना निमित्त बॅक ऑफ महाराष्ट्र बार्शिटाकळी मध्ये वृक्षारोपण* प्रतिनिधी बार्शीटाकली  आज दिनांक २२/७/२०२२ रोजी सकाळी १० वाजता बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बार्शीटाकळी येथे बॅक राष्ट्रीय करण दिना निमित्त वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक बँक ऑफ महाराष्ट्राचे ब्रांच मॅनेजर विजय शालिग्राम इंगळे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शीटाकळी नगर पंचायत चे उपाध्यक्ष सुरेश जामनिक,  आरोग्य सभापती तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव सीरसाठ, जल व पर्यावरण मित्र डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान , जेष्ठ पत्रकार जेठा भाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांचे हस्ते तसेच शाखाधिकारी विजय ईंगळे यांचे हस्ते बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बार्शीटाकळी च्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र बार्शीटाकळी शाखा चे व्यवस्थापक विजय शालिग्राम इंगळे यांनी विविध माध्यमातून वृक्षरोपण व त्याचे संवर्धना बाबत उपस्थितांना माहिती दिली तसेच बँकांचे र...

वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने नुकसान ग्रस्त भागाचा दौरा

Image
वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने नुकसान ग्रस्त भागाचा दौरा  बार्शिटाकळी प्रतिनिधी आज दिनांक 21 जुलै 2022 रोजी वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने बार्शिटाकळी शहरा सह तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाचा दौरा करण्यात आला त्यामध्ये बार्शिटाकळी शहरातील गौतम नगर, रमेश नगर,न्हावी पुरा, सादिक नगरा सह काजळेश्वर येथील संदीप मोहन जाधव यांच्या घरा सह त्यांच्या खाण्याच्या (जीवनावश्यक वस्तू ) वस्तू सह गहु, ज्वारी,तुर दाळ, मोबाईल, पलंग, दोन बक-याचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा सह काजळेश्वर येथील ब-याच नागरिकांचे नुकसान झाले आहे दौरा करते वेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक यांच्या सह बार्शिटाकळी नगरपंचायतचे आरोग्य सभापती सुनील विठ्ठलराव सिरसाठ, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे से, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर, काजळेश्वर येथील माजी जिल्हा प.सदस्य विजय रामदास चव्हाण, मिलींद करवते, अमित तायडे, नितेश राठोड , सनी धुरंधर, निलेश शिरसाट. सौदागर क्षिरसागर.भूषण सरकटे, भूषण खंडारे, पावसामुळे झालेल्या नुकसान ग्...

शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना सरसावली.... एकाच दिवशी सहा अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची करण्यात आली मागणी....

Image
*शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना सरसावली* *एकाच दिवशी सहा अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची करण्यात आली मागणी* प्रतिनिधी बार्शिटाकळी   अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वतीने मंगळवारी शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत अकोला चे जिल्हाधिकारी अकोला जी प चे अध्येक्षा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक मुख्यालेखा वित्त अधिकारी शिक्षण सभापती जी प अकोला यांना निवेदन देऊन सदर समस्या त्वरीत सोडविण्या बाबत विनंती करण्यात आली यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे अकोला जिल्हा अध्यक्ष अनीसोद्दिन कुतबोद्दिन , जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद इक्बाल खान सरफराज खान, जिल्हा सचिव रईस अहेमद निसार अहेमद , प्रसिध्दी प्रमुख मो अश्फाक , मुख्याध्यापक राहुल्लह खान सरफराज खान,  आदी जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी निवासी उप जिल्हा अधिकारी डॉ प्रा संजय खडसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉ वैशाली ताई ठग मुख्यालेखा वित्त अधिकारी विद्या  पवार ...

सततधार पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने मागणी

Image
संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने मागणी बार्शिटाकळी प्रतिनिधी आज दिनांक 20/जुलै 2022 रोजी बार्शिटाकळी चे तहसीलदार श्री गजानन हामद यांना वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली. अतिवृष्टी मुळे बार्शिटाकळी शहर व तालुक्यातील शेतकरी व पूरग्रस्त शेतकरी घराची झालेली पडझड पाणी पुसून झालेले नुकसान या सर्व पूर परिस्थितीची पाहणी व सर्वेक्षण करून पूरग्रस्त लाभार्थ्यांना तात्काळ भरपाई मिळण्याकरिता वंचित बहुजन आघाडी तालुका वतीने मागणी करण्यात येत आहे गेल्या सात आठ दिवसापासून बार्शीटाकळी तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे तसेच नदी नाल्यांना पुराचे पाणी सुद्धा वाढत आहे अतिवृष्टी आणि सतत धार पावसामुळे 19 जुलै पर्यंत तालुक्यात अंदाजे 40 ते 50 घराची पडझड झाली असून पाण्याखाली गेलेल्या पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे यामध्ये सोयाबीन कपाशी टूर आदी पिकाचा समावेश आहे तालुक्यातील रविवार रात्रीपासून सुरू झालेला सतत धार पाऊस सोमवार संध्याकाळपर्यंत चालू होता त्यामुळे नदी व नाल्य...

बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शिवभक्त कावड मंडळाची आढावा बैठक सपन्न.... श्रावण मास शांततेत पार पाडण्याचे ठाणेदार संजय सोंळके यांचे आवाहन.....

Image
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शिवभक्त कावड मंडळाची आढावा बैठक सपन्न श्रावण मास शांततेत पार पाडण्याचे ठाणेदार संजय सोंळके यांचे आवाहन  प्रतिनीधी , बार्शिटाकळी , सद्या श्रावण मास सुरु होणार त्यावेळी शिवभक्त विविध ठीकानाहुन कावड द्वारे पवित्र जल आणून शहरात  मिरवणूक काढत जलाभिषेक करतात त्या मिरवणूक वेळी कायदा सुव्यवस्था अबाधीत राहीली पाईजे त्यासाठी पोलीस स्टेशन द्वारे प.समीती सभागृहात कावड धारी अघ्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य समवेत आढावा बैठक घेण्य़ात आली , सदर बैठकीचे मार्गदर्शक बाशिटाकळी पोलीस स्टेशन . चे ठाणेदार संजय सोंळके होते , सदर बैठक चे अध्यक्ष स्थानिक न.प.चे मुख्याधीकारी शिवहरी थोंबे होते , प्रमुख अतिथी म्हणून रमेश वाटमारे , श्रीराम येळवनकार , गजानन मानतकर , प.स.रोहिदास राठोड , मंचावर उपस्थित होते , कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रर्दशन गोपनीय पोलीस विभागचे किशोर पिजंरकर यांनी केले , कार्यक्रमाचे सुत्र संचालन अनंत केदारे नेकेले , शिव भक्त कावडघारी ने मिरवणूक वेळी डी जे च्या वापर व बॅन्ड 'बाजाचा वापर करू नका . आणी लाब झडा गोल फिरवू नका धार्मीक स्वातंत्र्याचा गैर...

भारत सरकारने " अशोक स्तंभ" या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याबद्दल त्यांचा वंचित बहुजन आघाडी तालुका बार्शिटाकळीच्या वतीने जाहीर निषेध

Image
भारत सरकारने " अशोक स्तंभ" या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याबद्दल त्यांचा वंचित बहुजन आघाडी तालुका बार्शिटाकळीच्या वतीने जाहीर निषेध बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी आज दिनांक 19/7/2022 रोजी वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने तहसीलदार श्री गजानन हामद यांना भारत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. 26 जानेवारी 1950 साली भारत सरकारने सम्राट अशोक यांनी सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावरील " सिंह शीर्ष" हे स्वतंत्र भारताची " राष्ट्रीय मुद्रा " म्हणून स्वीकारले होते. मुळात हे शिल्प आणि त्यांच्या खाली असलेले हत्ती, बैल, दौडणारा घोडा आणि सिंह यांची कोरीव शिल्प हे भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अधोरेखित करते. मानवतावादी, संपुर्ण प्राणी मात्रा विषयी करूणा व मंगल कामना असलेला बुद्ध विचार म्हणजेच धम्म याचे प्रतीक हा सिंह आहे.  तो शांत आहे स्वतंत्र आहे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहे व डोळ्यात धुऊन निश्चय त्याचा जवळ नैसर्गिकरीत्या उघडलेला आहे शिल्पकारांना तसेच तन्मयतेने संपूर्ण बुद्ध विचाराचे भाव या संपूर्ण शिल्पात कोरलेले पाहायला म...

नगर परीषद व नगर पंचायत अध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार…राज्यपालांनी जारी केला अध्यादेश…अध्यक्षावर अडिच वर्षे अविश्वास आणता येणार नाही.

Image
नगर परीषद व नगर पंचायत अध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार…राज्यपालांनी जारी केला अध्यादेश…अध्यक्षावर अडिच वर्षे अविश्वास आणता येणार नाही. गत काही दिवसांपासून जबर चर्चिल्या जाणा-या नगर परीषद व नगर पंचायत अध्यक्षपदाबाबत अखेर राज्यपालानी अध्यादेश जारी केला असून आता ह्या अध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. तर यानंतर अडिच वर्षेपर्यंत ह्या अध्यक्षांवर अविश्वास आणता येणार नाही. राज्यात नवे सरकार सत्तारुढ होताच निकट भविष्यात होणा-या नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर ह्यांच्या अध्यक्षपदाबाबत नागरीकांमध्ये ऊलट सुलट चर्चासत्रे झडत होती. त्या चर्चासत्राना राज्याचे राज्यपालानी पूर्णविराम दिला असून आता नगर परिषद व नगर पंचायतचा अध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा आध्यादेश त्यानी पारीत केला आहे. ह्या अध्यादेशात म्हटले आहे कि, महा. नगर परिषदा, नगर पंचायती अधिनियम १९६५ मधिल कलम ५१ अ-१ अ मधिल तरतुदींच्या अधिन राहून प्रत्येक नगर परिषद व नगर पंचायतीचा एक अध्यक्ष असेल. जो कलम ११ अन्वये तयार केलेल्या न.प. व न.पं. च्या मतदार यादीत ज्यांची नावे आहेत अशा व्यक्तींद्वारे निवडण्यात येईल...

बार्शीटाकळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील रस्ते व नाली बांधण्याची नागरिकांची मागणी

Image
*बार्शीटाकळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील रस्ते व नाली बांधण्याची मागणी* बार्शिटाकळी प्रतिनिधी  बार्शीटाकळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील रस्ते व नाल्या गेल्या 20 वर्षापासून बांधण्यात आले नाही त्यामुळे या भागातील नागरिकाना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करून पाऊलवाट काढावी लागत आहे तसेच घाण , चिखल, यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे संबंधित नगरपंचायत प्रशासनाने तेवरीत  दखल घेऊन नागरिकांची समस्या सोडवून या भागात रस्ते  व नाली बांधकाम करण्याची मागणी बाबत चे निवेदन बार्शीटाकळी येथील प्रभाग क्रमांक आठ व नऊ माधील रहवासी नागरिक यांनी बार्शीटाकळी चे मुख्याधिकारी व बार्शीटाकळी नगरपंचायत चे नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन सदर काम त्वरित करण्याची मागणी केली आहे सदर काम त्वरित  न केल्यास पंधरा दिवसानंतर नगरपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याची चेतावणी सुद्धा निवेदना मध्ये देण्यात आली आहे बार्शीटाकळी नगरपंचायत च्या कुचकामी धोरणामुळे सध्या संपूर्ण बा...

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा. जिल्हा व सत्र न्यायालयचा निकाल

Image
मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयचा निकाल अकोला प्रतिनिधी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी.पिंपळकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल शनिवारी देण्यात आला. बार्शीटाकळी पो. स्टे. येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) श्री V D पिंपळकर साहेब यांच्या न्यायालयात भा. द. वी. कलम ३७६(२)(j) मध्ये आजन्म कारावास, रू ५००००/- दंड, दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा व पॉक्सो कायदा कलम ३ (A) ४ मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा रू ५०,०००/- दंड, दांड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने शिक्षा व पीडिता व कुटुंबीयांना धमक्या दिल्या बद्दल भा. द. वी. कलम ५०६ मध्ये ७ वर्षे शिक्षा रू १००००/- दांड, दांड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली विविध कलमा मध्ये एकूण रू १,१०,०००/- दंड ठोठावण्यात आला, सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणा...

बार्शिटाकळी पोलिसांची ची कार्यवाही सहा गोवांशांना जीवदान पीकअप सह 5,68,000 रुपयाचा माल जप्त.

Image
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन ची कार्यवाही सहा गोवांशांना जीवदान पीकअप सह 5,68,000 रुपयाचा माल जप्त. बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी     बार्शीटाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम धानोरा ते साखरविरा रोड वर दिनांक १५ जुलै च्या रात्री ९ वाजता च्या दरम्यान पीक अप क्र एम एच १२ एल टी १२७४ मध्ये  ६ गोवांसशांना कोंबून घेऊन जात असताना मिळून असल्याने सदर ची कार्यवाही करून अप नम ३५५/२२ कलम ५,५ आ,५ ब ९महा प्राणी संरक्षण अधी सह नुसार गुन्हा दाखल करून आरोपी सूरज भारसकले, सोनलाल देवकर,अशोक धाडसे,विकी गवई,कृष्णा ठाकरे, सर्व रा आस्टुल ता. पातूर असे ५आरोपींना अटक करण्यात आली.       सदर कार्यवाही पी आय संजय सोळंके यांच्या मार्गद्शनाखाली पोलिस कर्मचारी नागसेन वानखेडे आदींनी केली.

महान केंद्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण मोहीम केंद्र प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थिती राबविण्यात येत आहे

Image
*महान केंद्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण मोहीम* केंद्र प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थिती राबविण्यात येत आहे  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  बार्शीटाकली महाराष्ट्र शासनाचे 23 जून 2022 या शासन परिपत्रकांवर अन्वये दिनांक पाच जुलै ते 20 जुलै 2022 पर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण मोहीम राबविल्या जात आहे बार्शीटाकळी तालुक्यात सुद्धा बार्शीटाकळी चे तहसीलदार गजानन हांमंद गटविकास अधिकारी के आर तापी गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम बार्शीटाकली तालुक्यात सुरू आहे त्या अनुषंगाने शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत केंद्र महान व जिल्हा परिषद उर्दू  केंद्र शाळा महान चे केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सर्वेक्षण मोहीम संपूर्ण महान  केंद्रात सुरू असून शुक्रवारी दिनांक 15 जुलै  रोजी महान केंद्रातील केंद्र प्रमुख विनोद पिंपळकर उच्च श्राणी मुख्याध्यापक शाफिक अहमद खान महेबूब खान राही डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष शाळाबाह्य मुला...

गाव तिथे वंचित बहुजन युवक आघाडीची शाखा स्थापन करू. अमोल जामनिक तालुकाध्यक्ष वंचित बहुजन युवक आघाडी......

Image
गाव तिथे वंचित बहुजन युवक आघाडीची शाखा स्थापन करू. अमोल जामनिक तालुकाध्यक्ष वंचित बहुजन युवक आघाडी  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी       आज बार्शिटाकळी तालुक्यांतील ग्राम पूनोती बु. येथे वंचित बहुजन युवा आघाडी ची सभा घेण्यात आली असून सभे मध्ये वंचित बहुजन युवक आघाडी चे तालुका अध्यक्ष अमोल जामणिक हे प्रमुख पाहुणे महणुन उपस्थित होते.यावेळी गाव तिथे वंचित बहुजन युवक आघाडी ची शाखा निर्माण करू व युवकाचे न्याय हक्का साठी लढू असे उदगार काढले.सभे मध्ये  दिनेश भाऊ मानकर,जगन्नाथ देवकुंनबी,दिनकर देवकुंणबी,गोपाल मोहकार,नारायण देवकुंणबी,श्रीकृष्ण देवकुंणबी,.सुमित निशानराव,सुबोध गवई,सुरेश इंगळे,विशाल खाडे,अक्षय इंगळे,निखिल मोहोळ,शुभम वाघ,आकाश वरठे,गणेश वरठे,रुपेश निशांनराव,शालिग्राम वसतकार,अभय बजर,अमोल वरठे,शिवदास मोहोळ,विजय मोहोळ,सागर माने,वैभव मोहोळ, शिवम मोहोळ,अजय इंगळे,प्रफुल वरठे,वैभव गोपनारायण,भीमराव निशांनराव,संदीप मोहोळ,विजय मोहोळ,संदेश गवई,अमोल वरठे ,रक्षक जाधव, सनी धुरधर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

प्रती पंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या पिंजर येथे आषाढी पोर्णिमेनिमित्त भव्य यात्रा , महाप्रसाद व दहीहंडी

Image
प्रती पंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या पिंजर येथे आषाढी पोर्णिमेनिमित्त भव्य यात्रा , महाप्रसाद व दहीहंडी  बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )          आषाढी पौर्णिमेच्या दिवसापासून विठ्ठल- रूख्मिणीचा अडीच दिवस मुक्काम पिंजरला राहतो, असे येथील अध्यत्म आहे , त्यामुळे पिंजरच्या विठ्ठल रुख्मिणीचे सतत तीन वेळा दर्शन घेतल्यानंतर एका वेळेस पंढरपरचे दर्शन घडते, असा येथील एक इतिहास आहे, त्यामुळे पिंजरला महात्म्य प्राप्त झाले आहे आणि सर्व वयोवृद्ध मंडळी पिंजरला प्रति पंढरपूर म्हणून ओळखतात. आषाढी पोर्णिमे निमित्त येथे गुरुवारी व शुक्रवारी अशी दोन दिवस भव्य यात्रा भरणार असून दहीहंडी व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.          गेली दोन वर्षे कोरोना असल्यामुळे येथील यात्रा भरली नव्हती. गेल्या दोन वर्षांपासून जिर्णोद्धाराचे काम सुरू होते ते आता पूर्ण झाले आहे. जीर्णोद्धार झाला असल्याने मंदिर परिसरात नवं चैतन्य निर्माण झाले आहे . आषाढ पौर्णिमा ची यात्रा बुधवार 13 जून पासून सुरू होईल. सायंक...

*कानडी येथील गावठी दारू अड्ड्यावर पिंजर पोलिसांचा छापा*

Image
*कानडी येथील गावठी दारू अड्ड्यावर पिंजर पोलिसांचा छापा* बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी. बार्शी टाकळी तालुक्यांतील पिंजर पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम कानडी बाजार येथील गावठी हातभट्टी दारूअड्ड्यावर,पिंजर पोलिसांनी छापा मारला असता तेथून आरोपी पळून गेले, पोलिसांनी,३३ हजार ४००रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारू साहित्याची तोडफोड केली,गावठी हातभट्टी दारू उध्वस्त केली,कानडी बाजार येथील एका राहत्या घरात गावठी दारू गाळणे आणि त्याची विक्री होत असल्याची माहिती पिंजर पोलिसांनी मिळताच ठाणेदार अजयकुमार वाढवे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय बंन्डू मेश्राम कानडी बीटचे इन्चार्ज राजु वानखडे अशोक देशमुख अभिजित शिरसाट, होमगार्ड शरद पवार दिनेश सावळे नजिर हुसेन मनिष सातरोटे निखील चांदुरकर अयाज खान यांनी जाग्यावरच २० डब्बे फोडफाड केले, गावठी दारू ३४ लिटर आणि मोहमाच ३०० लिटर व इतर साहित्य असा एकूण ३३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले,या कारवाही मुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

बार्शिटाकळी येथे बकर ईद (ईद उल अजहा) मोठ्या उत्साहाने साजरी

Image
बार्शिटाकळी येथे बकर ईद (ईद उल अजहा) मोठ्या उत्साहाने साजरी.  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.        बार्शिटाकळी शहरा मध्ये आज बकरी ईद (ईद उल अज हा) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.        काल सायंकाळ पासून आभाळ चे वातावरण होते व सकाळी पाऊस पण सुरू झाला होता परंतु ईद च्या नमाज पठण च्या वेळेस पाऊसा ने विश्रांती दिली व ईद गाह वर जामा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अजीज उल्लाह खान यांनी नमाज अदा केली.      पाऊसाचे वातावरण असल्याने अधिक तर लोकांनी मस्जिद मध्ये ईद ची नमाज पठण केले. मिनारा मस्जिद आकोली बेस येथे जमिअत ए उलमा चे तालुका अध्यक्ष व इमाम व खतीब मौलाना अब्दुल सलाम यांनी तर मस्जिद अक्सा खडक पुरा येथे मौलाना एजाज यांनी नमाज पठण केले तसेच मस्जिद रहमत इंद्रा नगर येथे मौलाना सईद बेग यांनी तर मस्जिद अबुबकर हालोपुरा येथे हाफीज खालिद उर रहेमान यांनी,मस्जिद दहेंड बेस येथे अब्दुल समद इमाम यांनी,मस्जिद गुलजारी अहमदीं बाजार लाईन येथे मास्टर इरफानोद्दिन यांनी,मस्जिद खिडकी पुरा येथे काझी नझिमोद्दिन यांनी यांनी व मस्जिद दरुस स...

आगामी बकरी ईद या सणाच्या अनुषंगाने बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन

Image
आगामी बकरी ईद या सणाच्या अनुषंगाने बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन    बार्शिटाकळी प्रतिनिधी  आज दिनांक 9/7/20220रोजी   आगामी बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दंगली, रास्तारोको अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेसह ईतर आपत्कालीन यंत्रणा वेळेत हजर होण्यास विलंब होणार नाही याची दक्षता व काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकोली वेस मज्जीद चौक ,जामा मज्जीद चौका,समोर प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके साहेब यांनी प्रात्यक्षिकाव्दारे तत्परतेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पथसंचलना मध्ये उपनिरीक्षक निलेश तारक यांच्या सह 20 पोलीस अधीकारी,महीला पोलीस, खुपिया विभाग प्रमुख किशोर पिंजरकर, असा लवाजमा दिनांक 09 जुलै संध्याकाळी 5:00 वाजता सुमारास पोलीस स्टेशन मधुन डोक्यावर हेल्मेट,हातात लाठी, संरक्षण जाळी, आदि साहीत्य घेऊन अकोली वेस चौक,जामा मज्जीद चौक,गजरी लाईन, नगरपंचायत चौक मार्गे पोलीस स्टेशन ला पथसंचलन करण्यात आले

कुषी भुषन मधुकरराव सरप यांच्या मधुरत्न जैविक कुषी फार्म ,कान्हेरी सरप येथे प्रधान सचिव मा.श्री सौरभ विजय सर पालक सचिव, मंत्रालय, मुंबई यांची सदिच्छा भेट

Image
कुषी भुषन मधुकरराव सरप यांच्या मधुरत्न जैविक कुषी फार्म ,कान्हेरी सरप येथे प्रधान सचिव मा.श्री सौरभ विजय सर पालक सचिव, मंत्रालय, मुंबई यांची सदिच्छा भेट  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. तालुक्यातील कान्हेरी सरप येथील मधुरत्न जैविक कूर्षी फार्म येथे सेंद्रिय धान्य, सोयाबीन बियाणे विक्रीस मिळालेला प्रतिसाद तसेच,उडीद बियाणे अकोला सफेद कादा बियाणे  ,प्रकिया बाबत गटाने व कंपनीने तयार केलेले बियाणे  व सर्व मालाची विक्री व्यवस्था यावर बरीच चर्चा झाली स्वता साहेबांनी  आधुनिक दाल मिल,मसाला प्रकिया युनिट ,कुषी औजारे  यांची सुध्दा पाहणी करून समाधान व्यक्त केले  यावेळी अकोला  निवासी जिल्हा अधिकारी मा.श्री संजय खडसे साहेब, उपविभागीय अधिकारी अकोट मा.श्री.देशपांडे सर, जिल्हा कुषी अधिक्षक  डॉ.कांन्ता आंप्पा खोत साहेब ,तालुका कुषी अधिकारी श्री.विलास वाशीमकर साहेब, कुषी भुषन मधुकरराव सरप , श्री दिपक सरप, श्री योगेश सरप, मंडळ कुषी अधिकारी श्री अंभोरे साहेब, कुषी साह्यक तुप्ती वावकार मॅडम, वैभव ढोरे , नानाजी देशमुख , आदी प्रामुख्याने उपस्थित होत...

बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शांतता समीतीची अढावा बैठक सपन्न......

Image
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शांतता समीतीची अढावा बैठक सपन्न......  प्रतिनीधी , बार्शिटाकळी  प्रत्येक नागरिकांनी आपले सण ऊत्सव साजरे करते वेळी इतर समाजा सोबत शांतता सलोखा व बंधुभाव ठेवून सण साजरे केले पाहीजे सण उत्सव हा सर्व समाजाची भुमीके नुसार सर्वाचे मना प्रमाणे सण उत्सव कायदा सुव्यवस्थाा ठेवून साजरे केले पाइजे  बार्शिटाकळी पोलिंस स्टेशन येथे शांतता समीतीची अढावा बैठकीत मुर्तीजापुरचे उपविभागीय पोलीस अघिकारी संतोष राऊत यानी प्रती प्रादन केले , बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे दि , ८ , जुलै रोजी आगामी येणारे सण ऊत्सव शांततेने पार झाले पाहिजे त्या अनुषंगाने शांतता समीती सदस्याची अढावा बैठक घेण्यात आली , सदर अढावा बैठकीच मार्गदर्शक उप विभागीय पोलीस अधीकारी संतोष राऊत होते तर प्रमुख पाहूणे म्हणून नगर अध्यक्ष हाजी महेफुज खान होते , कार्यक्रम चे सुत्र संचालन ठाणेदार संजय सोळ के ने केले , त्या प्रसंगी पोलीस अघिकारीं यांनी शांतता समिती सदस्य सोबत चर्चा करुन त्याच्या समस्यां जाणून घेतल्या सण साजरे करता वेळी कायदा सुव्यवस्था अबाघीत राहीले पाहीजे त्याबद्दल पोलिस विभागा...

वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी न प चे आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांची नगरपंचायत बार्शिटाकळी च्या गटनेते पदि निवड

Image
*वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी न प चे आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ  यांची नगरपंचायत बार्शिटाकळी च्या गटनेते पदि निवड*  बार्शिटाकळी प्रतिनिधी  आज दिनांक 08/07/2022 रोजी बार्शीटाकळी शहरा मध्ये वरीष्ठ नेता नईमोददीन भाई यांचे घरी पक्षाची मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते, सदर मिटिंग ला वंचित बहुजन आघाडी चे अकोला जिल्हा अध्यक्ष आद. प्रमोदजी देंडवे तसेच प्रदिप ऊर्फ बबलु भाऊ शिरसाठ... किशोर भाऊ जामणीक... शरद भाऊ इंगोले..प्रभारी तालुका अध्यक्ष दादारावजी सुरडकर... जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, युवा तालुका अध्यक्ष अमोल जामणीक.. शहर अध्यक्ष अझहर पठाण.. गोबा सेठ.. रागीब हाजी साहेब.. आशीक हाजी साहेब.. सै. रियासत.. ईमरान खान.. नगर सेवक नसीम खान मास्टर... न. प. उपाध्यक्ष सुरेश जामनिक.. आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ.. नगरसेवक श्रावण भातखडे... अनिल धुरंधर.. सैय्यद अबरार..तसेच सनी धुरंधर.. मिलिंद करवते.. मनिष वाहुळे.. तसेच पक्षाचे आजी माजी पदाधिकारी तथा कार्यकर्ते हे हजर होते... तेव्हा बार्शीटाकळी न. प. चे वंचित बहुजन आघाडी चे उपाध्यक्ष तथा गटनेते...

रात्री एक वाजता विहरीत उतरुन विस फुट खोलपाण्यातील मृतदेह काढला बाहेर🏊🏻‍♂️....

Image
*रात्री एक वाजता विहरीत उतरुन विस फुट खोलपाण्यातील मृतदेह काढला बाहेर*🏊🏻‍♂️........... बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.                ▶️ 7 जुलै 2022 रोजीची मंगरूळपीर शहरालगतची घटना.... ▶️ बार्शी टाकळी तालुक्यांतील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीर येथील जवानांची जिगरबाजी🏊🏻‍♂️🏊🏻‍♂️... ▶️  काल रात्री 10:00 वाजता मंगरूळपीर पो.स्टेशन चे ठाणेदार हुड साहेबांनी पथकाच्या जवानांना माहीती देत नविन सोनखास जांबरोड मंगरूळपीर येथील एका शेतातील विहीरीत मृतदेह असल्याची दाट शक्यता आहे या करीता आपण सर्च ऑपरेशनसाठी तात्काळ येण्याचे सांगितले. लगेचच पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना अतुल उमाळे यांनी याबाबतची माहिती दीली आणी सर्च ऑपरेशन करीता रवाना होण्यासाठी सांगितले तेव्हा पथकाचे स्वयंसेवक शाखा प्रमुख अतुल उमाळे,गोपाल गीरे,गोपाल जयस्वाल, अजय डाके,अपूर्व चेके, लखन खोडे,सुमित मुंधरे,हे आपल्या शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी रवाना झाले.यावेळी विहीर ही 70 फुट खोल आणी त्यात विस फुट खोल पाणी असल्याने फरम्या...

बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे बकरी ईदची परिस्थिती लक्षात घेऊन मौलाना व प्रतिष्ठित नागरिकांची सभा

Image
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे बकरी ईदची परिस्थिती लक्षात घेऊन मौलाना व प्रतिष्ठित नागरिकांची सभा. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. येणारा बकरी ईद सण शांतता पूर्ण पार पाडण्यासाठी स्थानिक इमाम,मौलवी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा आज सायंकाळी पाचच्या सुमारास बार्शिटाकळी पोलिस स्टेशन चे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.             सभे मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त असे प्रतिपादन ठाणेदार संजय सोळंके यांनी केले. सभे मध्ये नगरअध्यक्ष हाजी मेहफुज खान, जमिअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष तसेच मिनारा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अब्दुल सलाम, उपाध्यक्ष तसेच जामा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अजीज उललाह खान,मौलाना एजाज,मौलाना तौफिक,समाज सेवक मोहम्मद सलीम महक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.        सभेचे सूत्र संचालन व आभारप्रदर्शन खुफिया विभाग चे किशोर पिंजरकर यांनी केले तर टाऊन चे नागसेन वानखेडे यांनी परिश्रम केले.

अर्धवट रस्ता बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे बेमुदत उपोषण सोडण्यात आले

Image
अर्धवट रस्ता बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे बेमुदत उपोषण सोडण्यात आले  बार्शिटाकळी प्रतिनिधी  बार्शीटाकळी शहरात वार्ड नंबर १३ व १४ मधील महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत झालेल्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन हे वार्ड क्रमांक 13 व 14 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राम मंदिरापर्यंत रस्त्यासाठी झाले होते सदर काम कापकर गुरुजी ते हातपंप चौक व पुढे राम मंदिरापर्यंत होण्यासाठीचा ठराव झाला होता परंतु हे काम करावंनुसार न होता अर्धवट मधातुन करण्यात आले मग प्रश्न निर्माण होतो उर्वरित कामाचा निधी कुठे गेला ? कापकर गुरुजी यांच्या घरापासून ते काम सुरू केले होते त्या ठिकाणापर्यंत आणि तेथपर्यंत रस्ता झाला तेथपासून राम मंदिरापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे असे अर्धवट व नियमबाह्य काम का केले याची सखोल चौकशी करण्यात यावी आधीच रस्त्याच्या जागेसाठी खोलेश्वर संस्थांना निबंध कार्यालयाचे रीतसर परवानगी न घेता सदर रस्त्याला लागणारे बांधकामाचा मंजूर रस्ता हा नियमबाह्य बेकायदेशीर रेकॉर्ड नसताना फॅशन प्लॉट क्रमांक 16 64 सीट नंबर 2 व खल...

अर्धवट रस्ता बांधकामाची चौकशी व्हावी यासाठी नागरिकांचे बेमुदत उपोषण

Image
अर्धवट रस्ता बांधकामाची चौकशी व्हावी यासाठी नागरिकाची बेमुदत उपोषण  बार्शिटाकळी प्रतिनिधी  बार्शीटाकळी शहरात वार्ड नंबर १३ व १४ मधील महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत झालेल्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन हे वार्ड क्रमांक 13 व 14 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राम मंदिरापर्यंत रस्त्यासाठी झाले होते सदर काम कापकर गुरुजी ते हातपंप चौक व पुढे राम मंदिरापर्यंत होण्यासाठीचा ठराव झाला होता परंतु हे काम करावंनुसार न होता अर्धवट मधातुन करण्यात आले मग प्रश्न निर्माण होतो उर्वरित कामाचा निधी कुठे गेला ? कापकर गुरुजी यांच्या घरापासून ते काम सुरू केले होते त्या ठिकाणापर्यंत आणि तेथपर्यंत रस्ता झाला तेथपासून राम मंदिरापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे असे अर्धवट व नियमबाह्य काम का केले याची सखोल चौकशी करण्यात यावी आधीच रस्त्याच्या जागेसाठी खोलेश्वर संस्थांना निबंध कार्यालयाचे रीतसर परवानगी न घेता सदर रस्त्याला लागणारे बांधकामाचा मंजूर रस्ता हा नियमबाह्य बेकायदेशीर रेकॉर्ड नसताना फॅशन प्लॉट क्रमांक 16 64 सीट नंबर 2 व खलेश्वर संस्थान क्रमांक 16 65 सीट नंबर 15 यामधून गैरकायद...

गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न 🚩2022 - अकोला🚩

Image
*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न*        *🚩2022 - अकोला🚩* अकोला प्रतिनिधी  "गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा" आज रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. शिवाजी महाविद्यालय अकोला. येथे बेलदार समाज संघटना अकोला, च्या वतीने आयोजित केला होता या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव, माता, भगिनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित दर्शवली . व कार्यक्रमाला 300 मुला मुलींनी उपस्थिती दर्शवली त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये समाजाचे सर्वच नेते मंडळी उपस्थित होते राज्यातून आलेले व बाहेर जिल्ह्यातून आलेले सर्वच मंडळी उपस्थित होते अकोला जिल्हा बेलदार समाज संघटना यांच्या अठत प्रयत्नाने हा कार्यक्रम संपन्न झाला बेलदार समाज अकोला जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ सुलताने त्यांनी सर्व आलेल्या समाज बांधवांचे आभार व्यक्त केले त्या मध्ये सहयोग म्हणून जिल्ह्याचे महासचिव सुरज भाऊ भगेवार व युवक जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ मेंगे व युवक जिल्हा उपाध्यक्ष हरीश भाऊ रामचवरे युवक महासचिव अविनाश भाऊ थोप बाळापुर तालुका अध्यक्ष निलेश भाऊ बिलेवार पवन भाऊ घाटे शुभम भाऊ जांभ...