Posts

Showing posts from August, 2022

शिंदे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुख पदी उमेश कोकाटे तर संघटक पदी दिनेश रत्नपारखी

Image
शिंदे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुख पदी उमेश कोकाटे तर संघटक पदी दिनेश रत्नपारखी  बार्शिटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )                  हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांना अभिप्रेत होऊन आज अकोला जिल्हा बार्शीटाकळी तालुका येथे आमदार संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया व आमदार विप्लवजी बाजोरिया यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी उपजिल्हाप्रमुख ललित वानखडे यांच्या नेतृत्वात उमेश कोकाटे यांची बार्शीटाकळी तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली तर दिनेश रत्नपारखी यांची तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली . यावेळी अकोला पश्चिम चे उपजिल्हाप्रमुख शशिकांत , सचिन आगाशे ,सचिन पाचपोर , निखिल बोरीकर हे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते . याप्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.             सदर कार्यक्रमास रामेश्वर नानोटे , चंद्रशेखर ग्...

भेंडीमहाल येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी बळीराम हरीभाऊ राठोड यांची निवड

Image
भेंडीमहाल येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी बळीराम हरीभाऊ राठोड यांची निवड  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर नजीक असलेले भेंडीमहाल ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ग्रामसभा घेण्यात आली. भेंडीमहाल ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बळीराम हरीभाऊ राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच होते.यावेळेस प्रथमच तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाची संधी तरुण तडफदार नेतृत्व असलेले सामान्य कुटुंबातील बळीराम हरीभाऊ राठोड यांना संधी मिळाली.यावेळी ग्रामसेवक,एस. पालवे साहेब सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नितेश जाधव मधुकर घनगांव वैशाली गावंडे दशरथ राठोड रोजगार सेवक सुभाष राठोड विध्यमान तंन्टामुक्ती अध्यक्ष नामदेव राठोड तंटामुक्ती समितीच्या सदस्य युवा चहरा व गोर सेना अध्यक्ष रोशन सुनील पवार ग्राम ग्रामपंचायत कर्मचारी शिपाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व गांवकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने सांत्वन पर भेट

Image
*वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने सांत्वन पर भेट* बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी   बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर येथे विकी वसंता कोकरे रा.जमकेश्वर वय 22वर्ष यांची गावातीलच प्रवासी निवारा मध्ये फोनवर बोलत असताना अंगावर स्लॅब कोसळून मृत्यू झाला मयत विक्की वसंता कोकरे यांच्या घरी जाऊन त्याचे आई वडील मोठा भाऊ यांची वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. व शासनाच्या वतीने योग्य तो पाठपुरवठा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी चे बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष रतन आडे, तालुका महासचिव अजय अरखराव, पंचायत समिती सभापती प्रकाशजी वाहुरवाघ साहेब, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड, पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, वंचित बहुजन आघाडी चे तालुका प्रसिद्धीप्रमुख मिलिंद करवते, माजी पिंजर सर्कल अध्यक्ष श्रीकृष्ण भगत,त्याचप्रमाणे गावातील काही प्रतिष्ठित नागरिक शेख समद, पांडुरंग खरतडे, पद्माकर उरकडे, अमोल देशमुख, सलीम खान, नासिर खान, बिस्मिल्ला खान आदी मंडळी उपस्थित होती

जी एन ए महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजराविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळ आवश्यक. रवींद्र भाटकर

Image
जी एन ए महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळ आवश्यक. रवींद्र भाटकर  बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी        स्थानिक गुलाम नवी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शी टाकळी  येथे आयोजित मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन क्रीडा दिनाच्या आयोजित या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक नंद कुमार राऊत ,डॉक्टर वैशाली कौटुंबे ,यांनी क्रीडा स्पर्धाचे महत्व विशद केले .डॉक्टर मोहन बल्लाळ यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर अध्यक्षीय भाषणात रवींद्र भटकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळाचे महत्व विशद केले यात आयोजित धावण्याच्या स्पर्धेत रुपेश कांबळे पहिला ,विकी राठोड दुसरा ,मोहन बागडे तिसरा ,तर लिंबू चमचा स्पर्धेत सुप्रिया गवई पहिली ,गायत्री राठोड दुसरी ,पल्लवी राठोड तिसरी ,क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले मनोरंजन या स्पर्धा प्रकारात श्री शिवाजी संघ प्रथम, तर श्री संभाजी संघ द्वितीय ,क...

गुलाम नबी आझाद महाविद्यालयचे प्रोफेसर डॉ कैलास नागुलकर यांच्या संत गाडगे बाबा विद्यापीठास इतिहास अभ्यास क्रमात पुस्तकाचा समावेश.

Image
गुलाम नबी आझाद महाविद्यालयचे प्रोफेसर डॉ कैलास नागुलकर यांच्या संत गाडगे बाबा विद्यापीठास इतिहास अभ्यास क्रमात पुस्तकाचा समावेश. बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.      प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित संत गाडगबाबां विद्यापीठ द्वारा सांगलीत नैक चा , अ , दर्जा प्राप्त गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शी टाकळी येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ कैलास नागुलकर यांचे नुकतेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यपीठाच्या इतिहास च्या अभ्यासक्रमात बी ए भाग १ चे १, व २ सेमीस्टर साठी निवड केली असून सदर भारत का इतिहास या पुस्तकात त्यांनी सिंधी संस्कुर्ती,वैदिक काळ,जैन धर्म,बौद्ध धर्म,गुप्त काळ वर्धन काळा ची संपूर्ण माहिती दिली असून तसेच बी ए भाग २ साठी भारत का राष्ट्रीय आंदोलन एव इतिहास त्या मध्ये भारताच्या सवतंत्र त चा इतिहास असून मवाळ, जहाल क्रांतीकारी तसेच सावतंत्र सैनिकांची विस्तृत माहिती दिली आहे. या दोन वर्गातील चार सेमीस्टर आणि संयुक्त रित्या समाविष्ट असलेल्या अभ्यास कर्मातील इतिहास विषयाचे विशेष यु जी सी व विद्यापीठाच्या कर्मिक अभ्यास क्रमाला अनुस...

वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी नवनिर्वाचित तालुका कार्यकारीणीचे जल्लोषात स्वागत

Image
वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी नवनिर्वाचित तालुका कार्यकारीणीचे जल्लोषात स्वागत  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.  अकोला जिल्हा व जिल्ह्यातील सातही तालुक्यातील कार्यकारीण्या दि.26/82022रोजी प्रसारित करण्यात आल्या. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये व प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात कार्यकरीण्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे रतन आडे, तालुका अध्यक्षपदी तर अजय अराखराव यांची महासचिव पदी, संघटकपदी हरीश रामचवरे, सै रियासत यांची कोषध्यक्ष पदी तर मिलिंद करवते यांची प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती झाली. यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले. नियुक्ती झालेले पदाधिकारी एका दमाचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असुन त्यांच्या निवडीचा जल्लोष वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी ने बायपास वर फटाके फोडुन नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे जल्लोषात स्वागत केले.   यावेळी बार्शिटाकळी वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जाम...

वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न

Image
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न अकोला प्रतिनिधी  श्रध्देय ऑड बाळासाहेब आंबेडकर आणि आद. अंजलीताई आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर यांनी काल दि. २६ ऑगष्ट रोजी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या आठही तालुका कार्यकारिणी जाहीर केल्या. तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आज नवनियुक्त तालुका पदाधिकारी यांची तातडीची बैठक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांनी बोलावली होती. या बैठकीत पक्षाध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर यांनी दिलेल्या निर्देशानुसार लवकरात लवकर उर्वरीत तालुका कार्यकारिणी व सर्कल कार्यकारिणी करण्याचे सोबतच पक्षाची शिस्त राखण्याचे आव्हान ह्या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले. त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छ्याही देण्यात आल्या. या बैठकीला भारतीय बौद्ध महास...

वंचित बहुजन युवक आघाडीची संवाद बैठक सपन्न

Image
वंचित बहुजन युवक आघाडीची संवाद बैठक सपन्न बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य युवा प्रदेश अध्यक्ष मा निलेशजी विश्वकर्मा आणि प्रदेश महासचिव मा राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवक आघाडी बार्शीटाकळी तालुका/सर्कल/ग्राम शाखा कार्यकारणी रांजदा सर्कल करीता , रविवार दिनांक 28ऑगस्ट रोजी मांगुळ, मिर्झापुर येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मा. अमोलभाऊ जामनिक वंचित बहुजन युवक आघाडी अध्यक्ष, मा. नितेश खंडारे वंचित बहुजन युवक आघाडी कोषाध्यक्ष , तालुका संघटक श्रीकृष्ण दहात्रे, तालुका निरीक्षक  श्रीकृष्णा देवकुणबी , सनी धुरंदर , रक्षक जाधव यांच्या कडून कार्यकारीणी गठित करण्यासाठी संवाद बैठक घेण्यात आली या बैठकीला भुषण सरकटे,राजू गोपणारायन,विक्की गोपणारायन,अतुल शिरसाठ,राजेश सरकटे,अमोल गोपणारायन,योगेश खडे, सुमेद गोपणारायन,  प्रदीप इंगोले,मंगेश सुरडकर,सूरज इंगोले,विनोद टोबरे,सिद्धार्थ गोपणारायन,अमित पहुरकर, सुरत शिरसाट, जनार्धन खंडारे, विशाल इंगळे, देवानंद सरकटे, नितीन सुरडकर, सनी धुरंदर, रक्षक जाधव, घनश्याम देवकर, गज...

∆बार्शीटाकळी शहरासह तालुक्यात पोळा साजरा ∆बदलत्या काळासोबत थोडासा आणि येणाऱ्या बैलजोड्या साल दर साल कमी - कमी होत आहेत ∆महागाव येथे चोक पोलीस बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार घडला नाही

Image
∆बार्शीटाकळी शहर असेल तालुक्यात पोळा साजरा ∆बदलत्या काळासोबत थोडासा आणि येणाऱ्या बैलजोड्या साल दर साल कमी - कमी होत आहेत  ∆महागाव येथे चोक पोलीस बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार घडला नाही  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात बैलपोळा सण , शेतकरी वर्ग दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरा करत असतात विदर्भातील शेतकरी या सणाला खूप महत्त्व देतात बैल शेतीच्या कामात खूप मदत करतात आज-काल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात पण पुरातन काळापासून शेतीची अवघड कामे जसे की पेरणी नांगरणी वखरणी बैलाच्या साहाय्याने केली जात असेल पूर्वीच्या कडील मोटर गड्या नव्हत्या तेव्हा दूरच्या गावी तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर बैलगाडीचा उपयोग होत होता अगदी नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांची वरात सुद्धा बैलगाडी मधूनच काढली जात असेल या काळात शेतकऱ्यांच्या आयुष्य खूप जडून होता त्यांचे आभार मानण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो . बार्शीटाकळी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहाने पोळा सण साजरा करण्यात आला स्थानिक वंजारी पुरा येथील श्री नामदेवराव भडांगे यांच्या मानाचे असलेल्य...

वंचित बहुजन युवक आघाडीची संवाद बैठक सपन्न

Image
वंचित बहुजन युवक आघाडीची संवाद बैठक सपन्न वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य युवा प्रदेश अध्यक्ष मा निलेशजी विश्वकर्मा आणि प्रदेश महासचिव मा राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवक आघाडी बार्शीटाकळी तालुका/सर्कल/ग्राम शाखा कार्यकारणी दगडपारवा सर्कल करीता , शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी संघमित्रा बुद्धविहार दोनद खुर्द येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मा. अमोलभाऊ जामनिक वंचित बहुजन युवक आघाडी अध्यक्ष,मा. नितेश खंडारे वंचित बहुजन युवक आघाडी कोषाध्यक्ष सामाजिक कार्येकर्ते  कृष्णा देवकुणबी , भूषण सरकटे, सनी धुरंदर , रक्षक जाधव यांच्या कडून कार्यकारीणी गठित करण्यासाठी संवाद बैठक घेण्यात  असंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन :सामाजिक कार्येकर्ते मा ता सचिव भूषणदादा खंडारे यांनी केले होते. तथा सूत्र संचालन सूरज प्रभे यांनी केले होते व आभार प्रदर्शन अभिषेक जामनिक यांनी केले. व विलास खंडारे,  गोकुळ खंडारे , मुकेश खंडारे,  अजय सरकटे , गजानन न. खंडारे, पवन खंडारे, अजय खंडारे, सुरज खंडारे, प्रफुल खंडारे, ज्ञानेश्वर खंडार...

ब्रेकींग*.... *गाव तलावात बैल धुत असतांना बुडत असलेल्या युवकाला गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या जवानाने वाचविले.*🏊🏻‍♂️

Image
*ब्रेकींग*.... *गाव तलावात बैल धुत असतांना बुडत असलेल्या युवकाला गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या जवानाने वाचविले.*🏊🏻‍♂️  *मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा जवान विकास सदांशिव या जवानाच्या हाताला त्याच्याच बैलाचा दोर बांधुन होता बुडणा-या युवकाचा शेवटचा क्षण पाहुन त्याने एक सेकंद वेळ सुद्धा वाया जाणार नाही याची काळजी घेत स्वतःच्या हाताच दोर न सोडताच या सगड जाऊन त्या बुडाणा-या युवकाला सुखरुप बाहेर काढले*🏊🏻‍♂️ ▶️ *घटनाक्रम*... आज दुपारी बोरगाव मंजु पो.स्टे. हद्दीतील देवळी ता.जी. अकोला येथीलच गाव तलावात देवळी येथीलच चेतन विष्णू गुजर अंदाजे वय 17 वर्ष हा बैल धुत असतांना अचानक बैलासह तो 15-20 फुट खोलपाण्यात गेला असता यावेळी दोरासह बैल सटकला आणी तो बुडु लागला एवढयातच आरडाओरडा सुरु झाली आणी योगायोग शेजारीच येथीलच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा कानशिवणीचा देवळी येथील सेवक विकास सदांशिव हा तेथेच बैल धुत होता यावेळी क्षणाचाही विलंब न करता विकासने बैलासह पाण्यात जाऊन अगदी शेवटच्या क्षणी मृत्यूच्या दार...

बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांची अवैध देशी दारू तसेच जुगार अड्ड्यावर छापा

Image
बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांची अवैध देशी दारू तसेच जुगार अड्ड्यावर छापा बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी  आज दिनांक 26 ऑगस्ट 2012 रोजी पोळा उत्सव साजरा करत असताना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक व पोलीस स्टेशनच्या अंमलदार यांनी गोपनीय माहिती वरून ग्रामवता विजोरा एरंडा परंडा येथे अवैध देशी दारू तसेच गावठी दारू तसेच जुगारावर धाड टाकून एकुण 16 इसमांवर कलम 65 (ई) महा. दारूबंदी कायदा तसेच कलम 12(अ) महा. जुगार प्रतीबंधक कायद्या नुसार कारवाई करण्यात आली आहे.   तसेच अवैध दारू विक्री करणारे विकास दिपला राठोड वय ४४ वर्षे, निशांत अरुण मेश्राम वय ३२ वर्षे, रा. एरंडा (पसार झालेला) शायदा सैय्यद बाबन वय ५८ वर्षे रा. परंडा, श्रीपाल वसंत जंजाळ वय ५० वर्षे रा. विझोरा, सुनील श्रीकृष्ण ढवळे वय ३४ वर्षे रा. विझोरा, बाबुलाल भानुदास गवई वय ३८ वर्षे रा विझोरा, अक्षय कैलास जंजाळ वय २६ वर्षे रा विझोरा, रामकृष्ण भगवान चौरीपगार वय ६६ वर्षे रा येवता, तसेच जुगार खेळणारे ...

जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली भारतीय स्टेट बँक मधील कारभाराची माहिती

Image
*जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली भारतीय स्टेट बँक मधील कारभाराची माहिती* शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट प्रतिनिधी बार्शिटाकळी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सोबतच आपल्या परिसरातील महत्त्वपूर्ण बाबीची महिती व्हावी व विध्यर्थी परिपूर्णपणे सक्षम व्हावी याकरिता बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान येथील विज्ञान अध्यापिका शगुफ्ता जमाल व उपक्रमशील शिक्षक शाहिद इक्बाल खान यांनी गुरुवारी केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर व मुख्याध्यापक शफीक अहमद खान राही यांच्या मार्गदर्शनाखाली महान येथील भारतीय स्टेट बँक शाखा येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेटीचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय स्टेट बँक शाखा महानचे ब्रांच मॅनेजर मयूर तेलगोटे यांनी बँकिंग व्यवहाराबद्दल चालू खाता बचत खाता सुकन्या समृद्धी योजना इत्यादी महत्त्वपूर्ण योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना आपल्या भावी जीवनात बँकिंग व्यवहार करताना कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच स्कॉलरशिप इत्यादी अकाऊंट साठी बँक...

बार्शीटाकळी पंचायत समिती येथे जॉली फोनिक साहित्याचे वितरण

Image
*बार्शीटाकळी पंचायत समिती येथे जॉली फोनिक साहित्याचे वितरण* बार्शिटाकळी प्रतिनिधी  बार्शीटाकळी पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत नुकताच बार्शीटाकळी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना जेली फोनिक साहित्याचे वितरण करण्यात आले बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर साहित्याचे वितरण बार्शीटाकळी पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांना जोलीफॉनिक साहित्य व विद्यार्थ्यांची पुस्तिका चे वितरण करण्यात आले यावेळी गणेश राठोड शरद राठोड उज्वला बनाईत मैडम यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद इकबाल खान यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळा बिहार माता महान येथील मुख्याध्यापक प्रकाश राठोड यांना शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांचे साहित्य व पुस्तक देण्यात आली यावेळी काजी रिजवनोद्दी राहुलला खान वकार खान नदीम खान मुजीब बेग मोहम्मद बेग रिजवाण अहेमद इम्रान अली आदी ...

बारा बलुतेदार महासंघाचे अकोट तालुकाध्यक्ष पदी संजय भट्टी

Image
बारा बलुतेदार महासंघाचे अकोट तालुकाध्यक्ष पदी संजय भट्टी अकोट:- नाभिक महामंडळाचे अकोला जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले युवा नेतृत्व संजय भट्टी यांची बारा बलुतेदार महासंघाचे अकोट तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे बारा बलुतेदाराच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नासाठी शासन आणि व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देऊन ग्राम पातळी पर्यंत राज्यातील सामाजिक आर्थिक, शैक्षणिक व राजकीय हक्काच्या ऐतिहासिक लढ्याचे सेनानि म्हणून संजय भट्टी यांच्या कडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे संजय भट्टी यांचा बारा बलुतेदार समजासाबोत दांडगा जनसपर्क आहे ग्रामीण भागामध्ये एकट्या घराणीशी राहणारा न्हावी,धोबी, बेलदार, सोनार, सुतार,लोहार, कोळी,कोष्टी आदी मागासर्गीय समाज यांच्या विकासासाठी सर्वांगीण कार्य करणार असे मत संजय भट्टी यांनी आपल्या नियुक्ती दरम्यान व्यक्त केले आहे ते आपल्या नियुक्तीचे श्रेय बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे व कार्याध्यक्ष गजानन वाघमारे यांना देतात त्यांच्या नियुक्ती मुळे बारा बलुतेदार समजा मध्ये आनंद व्यक्त होत आहे तसेच सर्वस्त्रमधून अभिनंदन करण्यात येत...

महान गावात अवैध धंदे सुरुच विशेष पथकाचा आणखी एका अड्ड्यावर छापा

Image
महान गावात अवैध धंदे सुरुच  विशेष पथकाचा आणखी एका अड्ड्यावर छापा  बार्शिटाकळी प्रतिनिधी जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर  यांच्या आदेशा नुसार जिल्ह्यात व पिंजर पोलिस ठाण्याअंतर्गत महान येथे अवैध धंदे करण्याचे प्रयत्न केले.आहेत मात्र पिंजर पोलिस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे सुरुच असल्याचा पुरावाच विशेष पथक देत आहे. या पथकाला दरोज शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकतरी अवैध धंदा सुरू असतांना दिसून येत आहे.त्यामुळे त्या धंद्यांवर कारवाई करुन संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.तरीही आपल्या पोलिस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे बंद असल्याचे ठाणा अधिकारी यांचेकडून सांगण्यात येत.असेल तरीही विशेष पथक सुरू असलेल्या अवैध धंदे रंगेहाथ पकडत असल्याने संबंधित महान पोलिस चौकीच्या जमादारवर कोण कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज२४ऑगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली  वस्तापुर व महान बस स्थानक चोकात जुगारावर छापा टाकला असता पांच संशयित ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करून जुगार प्रतिबंधक कायद्या...

रेल्वे स्टेशनवर बचत गटांना त्यांचा माल विक्रीसाठी दिले दुकान (जागा) उपलब्ध करून

Image
*महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम रेल्वे स्टेशनवर बचत गटांना त्यांचा माल विक्रीसाठी दिले दुकान (जागा) उपलब्ध करून रेल्वे स्थानका वर सदर खाद्यपदार्थ विक्री केंद्रामुळे प्रवाशांना लाभ होणार तहसीलदार गजानन हांमंद प्रतिनिधी बार्शीटाकळी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अकोला द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शीटाकळी व नांदेड डिव्हिजन ऑफ साउथ सेंट्रल रेल्वे प्रॉऊडली प्रेझेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आसरा माता महिला बचत गट विक्री केंद्र करिता बार्शीटाकळी रेल्वे स्टेशनवर जागा उपलब्ध करून दिली असता दिनांक 23 8 2022 रोजी खाद्यपदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पाडले बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर विक्री केंद्र मिळण्या करिता भारतीय साउथ रेल्वेचे पवार साहेब व महिला आर्थिक विकास महामंडळाचे अकोला जिल्हा डि सी ओ वर्षाताई खोब्रागडे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. अकोला जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांवर महिला आर्थिक विकास महामंडळाचे खाद्यपदार्थांचे विक्री केंद्र व्हावे याबाबत चे सूचक जिल्हाधिकारी निमा अरोरा हे आहेत.    बार्शीटाकळी रेल्...

वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व महासचिव यांचा जंगी सत्कार करण्यात आला

Image
वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व महासचिव यांचा जंगी सत्कार करण्यात आला  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर यांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी पत्राद्वारे अकोला जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित अकोला जिल्हा अध्यक्ष मा. प्रमोद भाऊ देंडवे तथा महासचिव मिलींद भाऊ ईगळे यांच  निवड करण्यात आली त्यामुळे त्यांचे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने त्यांच  सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बार्शिटाकळच्या पक्ष निरीक्षक प्रतिभा ताई अवचार व वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाट, उपाध्यक्ष सुरेश जामनिक, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर,  नगरसेवक श्रावण रामदास भातखडे , राजु भाऊ धुरंधर, अजहर पठाण, मिलींद करवते, प.स.सदस्य रोहिदास राठोड, प.स. सदस्य दादाराव पवार, महासचिव अक्षय राठोड, संतोष वनवे , साहील ...

बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली

Image
बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली बार्शिटाकळी प्रतिनिधी  आज बार्शिटाकळी येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या पुण्यतिथी सोहळ्याला प्रथम नागोराव रामदास भातखडे व आदिवासी समाजाचे नेते शंकरराव म्हरसकोल्हे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या कार्याबद्दल विचार मांडण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, लक्ष्मण धानोरकर, यशवंत पुडगे,धनराज राठोड, सुनील गाडगे, शुभम भातखडे,  राजेश राऊत, विजय भातखडे, सुनील पळसकार, भोला भातखडे, अक्षय भातखडे, व नाभिक समाज बांधव उपस्थित होते*

वंचित बहुजन आघाडी तर्फे कावडधारी शिवभक्तांना फळ वाटप व मंडळाचे अध्यक्ष यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य स्वागत

Image
*वंचित बहुजन आघाडी तर्फे कावडधारी शिवभक्तांना फळ वाटप व मंडळ चे अध्यक्ष यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य स्वागत* आकोट शहरात दरवर्षी प्रमाणे वंचित बहुजन आघाडी तर्फे या वर्षी सुद्धा आकोट शहरातील सर्व कावडधारी मंडळाच्या अध्यक्ष यांचे शाल श्रीफळ देऊन भव्य स्वागत केले व सर्व कावडधारी शिव भक्तांना फळ वाटप केले करीता या कार्यक्रमाला सर्व वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व महिला आघाडी उपस्थित होते आकोट शहरातील शिव भक्तांची कावड मोठ्या उत्सवात व शांत पणे काढण्यात आल्या व या कावड मध्ये वेगवेगळ्या प्रकारे सर्व मंडळ यांनी देखावे प्रदर्शित केले या मध्ये पोलीस बंदोबस्त चांगल्या प्रकारे लावण्यात आला पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभले 

*लखन इंगळे यांच्या मागणीला यश वडगाव रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅकचे कामाची संबंधित अधिकारी यांनी तीन दिवसात दखल घेऊन ठेकेदारा कडून काम त्वरित करून काम सुरू*

Image
*लखन इंगळे यांच्या मागणीला यश वडगाव रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅकचे कामाची संबंधित अधिकारी यांनी तीन दिवसात दखल घेऊन ठेकेदारा कडून काम त्वरित करून काम सुरू* गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांना दि.18.8.22 रोजी निवेदन देण्यात आले होते निवेदनात मागणी अशी होती कि राहुल नगर लगत वडगाव रोड चे आमदार निधी अंतर्गत झालेले डांबरीकरण ला लागून पेव्हर ब्लॅक चे काम हे निकृष्ट दरज्याचे झालेले आहे दबाई न करता पेव्हर बसविले म्हणुन येथील पेव्हर ब्लॅक उखडल्या गेले व काही नाल्यात वाहून गेले करीता हे काम पुन्हा ठेकेदार कडून करून घेण्यात यावे नाहीतर आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे यांनी निवेदन देते वेळी संबंधित अधिकारी यांना दिला होता संबंधित अधिकारी यांनी तीन दिवसात निवेदनाची दखल घेत ठेकेदारा पासुन काम पुन्हा करून घेतले करीता या कामाला येश आले ते आमचे सर्व पत्रकार यांनी लावलेल्या बातमी मुळे व सोबत सर्व मित्रांच्या सहकार्या मुळे करीता स...

अमृत महोत्सवामध्ये जि एन ए महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय सहभाग

Image
अमृत महोत्सवामध्ये जि एन ए महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय सहभाग बार्शिटाकळी प्रतिनिधी  बार्शीटाकळी: आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाचा सहभाग दिसून आला. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळा व महाविद्यालयात हा महोत्सव १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्याचे सूचित केले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशाप्रमाणे हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी अनेक महाविद्यालय मोठ्या उत्साहाने वेगवेगळ्या कार्यक्रमामधुन सामील झाले. महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग यामध्ये सामील झाला. याचाच एक भाग म्हणून बार्शिटाकळी येथील गुलाब नबी आझाद महाविद्यालयांमध्ये अनेक कार्यक्रम यानीमीताने संपन्न झाले. महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत प्रामुख्याने वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गायन स्पर्धा, स्थानिक ठिकाणी काही घरी जाऊन तिरंगा लावण्याचे आव्हान, तालुका आणि जिल्हास्तरीय रॅलीमध्ये सहभाग यासारख्या उपक्रमांमध्ये...

बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक सपन्न

Image
बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक सपन्न बार्शिटाकळी प्रतिनिधी आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक सपन्न झाली या बैठकीत  बार्शीटाकली तालुक़ा व शहर वंचित बहुजन महिला आघाडीचे वतिने पक्षाचे आदेशावरुन आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये ऑन लाईन महिला सभासद नोंदणी,प्रभाग समित्या,सर्कल समित्या,ग्राम समित्या,बुथकमिट्या,स्थापन करणे बाबत आढावा घेण्यात आला व मार्गदर्शन करण्यात आले  तरी तालुक्यातील तसेच शहरातील महिला पदाधिकारी व महिलांनी हजेरी लावली होती प्रमुख मार्गदर्शिका तथा निरिक्षक प्रतिभाताई अवचार , निर्मलाताई खाडे, छायाताई तायडे , जिल्हा अध्यक्षा प्रभाताई सिरसाठ, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई इंगळे, तालुकाध्यक्षा वैशाली कांबळे, तालुका महासचिव उज्वला ताई गंडलीग, नगरसेविका कमला शंकर धुरंधर, प. समीती सभापती प्रकाश वाहुरवाघ, पंचायत समिती सदस्या प्रणितीताई दिनेश मानकर, प्र. तालुकाध्यक्ष दादाराव सुरडकर, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, शहर अध्यक्षा सुन...

बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या हस्ते प्रभाग क्रमांक 1 मधील महात्मा फुले नगर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले

Image
बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या हस्ते प्रभाग क्रमांक 1 मधील महात्मा फुले नगर मध्ये वृक्षारोपण    बार्शिटाकळी प्रतिनिधींनी बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या हस्ते आज प्रभाग क्रमांक 1 मधील महात्मा फुले नगर मध्ये वृक्षारोपण  आज दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी  वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हा अध्यक्षा आद. प्रभाताई शिरसाट, जि प सदस्य पुष्पाताई इंगळे, मुर्तीजापुर व बार्शीटाकळी तालुका निरीक्षक प्रतिभाताई अवचार, यांच्या हस्ते महात्मा फुले नगर मधील बुध्द विहार मध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत बार्शिटाकळी तालुका महिला अध्यक्षा कांबळे ताई , महासचिव गडलींग ताई शहर अध्यक्षा सुनिता धुरंधर तसेच पंचायत समिती बार्शीटाकळी चे सभापती वाहुरवाघ साहेब, प्रभारी ता. अध्यक्ष दादाराव सुरडकर, जेष्ठ नेते नईमोददीन, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, न. प. उपाध्यक्ष सुरेश जामनिक, आरोग्य सभापती तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ., नगरसेवक श्रावण भातखडे, दिनेश मानकर , अनिल धुरंधर, ईमरान खान, फिरोज खान, देवेंद्र खाडे.. प्रभाकर वाहुळे.. विकास...

गौण खनिज प्रकरणी मुख्यमंत्री यांच्या कडुन दोषींवर कारवाईची मागणी.... म.रा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन

Image
म.रा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन  गौण खनिज प्रकरणी मुख्यमंत्री यांच्या कडुन दोषींवर कारवाईची मागणी....   म.रा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन  बार्शिटाकळी       बार्शिटाकळी तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने  मुख्यमंत्री म. रा यांना  तहसीलदार कार्यालय बार्शीटाकळी द्वारे निवेदन देण्यात आले.       या बाबत सविस्तर वृत्त असे की वर्धा,यवतमाळ, नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाचे उत्खननातील गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणात तक्रारदारावर भ्रष्ट दोषी अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडून प्रचंड दबाव आणला जात आहे.एवढेच नाही तर दोन वर्षापासून दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे.मात्र तक्रारदार पत्रकार अमोल ओमप्रकाश कोमावार यांचे जीवाशी खेळण्याचा प्रकार भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.रेल्वेप्रकल्पातील उत्खननातील गौणखनीज कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय शासनाचा महसूल बुडून रेल्वे कंत्रांटदार खुल्या बाजारात विक्री करत असल्याची ...

सामूहिक राष्ट्रगीत मोहीमे मध्ये मनसेचा सहभाग

Image
सामूहिक राष्ट्रगीत मोहीम मध्ये मनसे चा सहभाग बार्शीटाकळी               भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित सामूहिक राष्ट्रगीत मोहीमे मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आपला सहभाग नोंदविला . स्थानिक विदर्भ मेडिकल येथे मनसे पदाधिकारी,कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिक ह्यांनी एकत्रित पणे येऊन ह्या मोहीमेमध्ये आपला सहभाग नोंदविला. मनसे उपतालुकाध्यक्ष उमेश पाटिल कोकाटे ह्यांनी नियोजन केले . ह्यावेळी श्याम ठक ,लिंक वर्कर बाळकृष्ण उताने पाटिल , सचिन आगाशे , शुभम राजुरकर , शैलेश ढेंगळे , गोपाल कापकर ,सतिष खोपे , शुभम मानेकर ,अक्षय आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बार्शिटाकळी येथे महानायक वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

Image
बार्शिटाकळी येथे महानायक वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी प्रतिनिधी , बार्शिटा कळी , महानायक वसंतराव नाईक यांची पुण्यतिथीनिमित्त बार्शिटाकळी तालुका वतीने महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचा उपक्रम नुसार बार्शिटाकळी शहरात प्रभु पार्वती मंगल कार्यालया सभागृह येथे भव्य संत्कार समारंभ व तालुक्यातील विधार्थी व विध्यार्थीनी यांचे गुणगौरव सोहळा कार्यक्रम बंजारा समाजाचे पोहरा देवी संस्थानचे प्रमुख अतिथी सतगुरू जितेद्र जी महाराज यांची उपस्थिती आणी अध्यक्ष स्थानी हिंरासिंग राठोड प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे गोर बंजारा सेवा संघाच्या ची उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला , कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदिप राठोड यांनी केले , प्रारंभी बंजारा समाज चे महिला व पुरुष यांनी आपली पंरमपरांगत वेशभुषा धारण करून कळश डोक्यावर धारण कंरुन पिपळखुटा रोड ते मंगल कार्याल्र्त पर्यंत वाजते गाजते मिरवणुक काढली , त्यावेळी मंचावर अध्यक्ष हिरासिंग राठोड , प्रा. मघुकर पवार , मनोहर राठोड , गोर. ब.स. जिल्हा अध्यक्ष रतन आडे , महादेव जाधव , माजी प. सभापती अशोक राठोड , नगरसेवक तथा माजी आरोग...

*गुलाम नबी आझाद महाविद्यालयात महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रा प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान संपन्न झाले*

Image
*गुलाम नबी आझाद महाविद्यालयात महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रा प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान संपन्न झाले* प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनूना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी, जिल्हा अकोला येथे महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान दिनांक १८/०८/२०२२ रोजी ठीक १२.०० वाजता संपन्न झाले.   राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेचे प्रामुख्याने तीन टप्पे असून त्यातील एक टप्पा तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान हा टप्पा महाविद्यालयामध्ये उत्तमरीत्या पार पडला. स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन (मोबाईल व्हॅन) महाविद्यालयात आली होती. वाहनासोबत आलेल्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना यात्रेबाबतची माहिती दिली.  हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांच्या व श्री. द.ल. ठाकरे सहाय्यक आयुक्त तथा सद...

क्रांतिकारी चळवळीचे महानायक ----राष्ट्रसंत सेना महाराज

Image
क्रांतिकारी चळवळीचे महानायक ----राष्ट्रसंत सेना महाराज   ------------------------------- हरिहर एम पळसकर             आकोट जि अकोला (9922361188 ) ------------------------------ भारत देश हा असंख्य नररत्नाची खाण आहे.या खाणीतील हिरे आपल्या अलौकिक कर्तृत्वाने जनसामान्यांच्या हृदयात कायम घर करून बसले आहेत. त्यात महाराष्ट्र भूमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे  या भूमीने संपूर्ण भारत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. ही दिशा देतांना समाजाला एकत्रित ठेवण्याचा मोठा संदेश महाराष्ट्र भूमीतूनच उदयास आला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. समाजसुधारना व समाज जागृती या क्षेत्रात महाराष्ट्रातील साधुसंत जणांचे मोठे योगदान आहे. अशा अलौकिक साधू- संतांमध्ये मध्य प्रदेशातील बांधवगड येथे जन्मलेल्या राष्ट्रसंत सेना महाराजांचे नाव मोठया आदराने घेतल्या जाते त्यांचे समाजप्रबोधन त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. सेना महाराजांच्या काळात समाजात मोठया प्रमाणात अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा याचे प्रस्थ वाढले होते समाजात या माध्यमातून अनिष्ठ रूढी ,परंपरांचा उदय झाला  त्याने ...

वडगाव रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅक चे काम ठेकेदारा कडून पुन्हा करून न घेतल्यास लखन इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा

Image
*वडगाव रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅकचे काम ठेकेदारा कडून पुन्हा करून न घेतल्यास लखन इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा* अकोट तालुका प्रतिनिधी  गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी अशी होती कि राहुल नगर लगत वडगाव रोड चे आमदार निधी अंतर्गत झालेले डांबरीकरणला लागून पेव्हर ब्लॅकचे काम हे निकृष्ट दर्ज्याचे झालेले आहे दबाई न करता पेव्हर बसविले म्हणुन येथील पेव्हर ब्लॅक उखडल्या गेले व काही नाल्यात वाहून गेले करीता हे काम पुन्हा ठेकेदारा कडून करून घेण्यात यावे नाहीतर आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे यांनी निवेदन देते वेळी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना दिला सोबत नितीन तेलगोटे ,अमोल तेलगोटे , अक्षय तेलगोटे , राजु भोंडे, संदिप पोटे , रामेश्वर दाभाडे, प्रतीक तेलगोटे, योगेश दवंडे नवनीत तेलगोटे,  सुगत तेलगोटे , अंकुश इंगळे , नितेश दामोदर , सुमेध तेलगोटे , रोहन दामले,...

बार्शिटाकळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसीलदार यांना निवेदन, शासनाने जाहिर केलेली मदत शेतकऱ्यांना सरसगट मिळावी...

Image
बार्शिटाकळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसीलदार यांना निवेदन, शासनाने जाहिर केलेली मदत शेतकऱ्यांना सरसगट मिळावी  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्शिटाकळी यांच्या वतीने शासनाने जाहीर केलेली मदत सरसकट मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले. कारण पेरणी पासुन पाऊस नित्यनेमाने चालू आहे त्यामुळे शेतातील पिकांचे भंयकर नुकसान झाले आहे ह्या मदतीने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल म्हणून शेतकऱ्यांना सरसकट मदत मीळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने मा.तहसीलदार बार्शिटाकली गजानन हमंद यांना निवेदन दिले त्यावेळी गणेश पाटील थोरात तालुका उपाध्यक्ष व धनंजय खिरडकार ,मोहन मते, प्रकाश खाडे, प्रकाश मानीकराव, विनोद कोगदे ,प्रमोद भाऊ, भावराव पाटील ,वसुदेव कुचर, विजय थोरात,विजय वर्हाडे ,बंडु पाटील, मोहन दिक्षित, प्रशांत पन्हाळकर,निरूती थोरात, मोहन मते,अजय नावकार,आदी बरेच शेतकरी या वेळी उपस्थित होते.

धाबा येथील मंडळ अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळीचे धरणे आंदोलन...!

Image
धाबा येथील मंडळ अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळीचे धरणे आंदोलन...!  आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी  धाबा या गावातील मंडळ अधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यालय येथे सामान्य शेतकर्यांचे होत असलेले शोषणा विरोधात व अधिकाऱ्यांची सतत कार्यालयात अनुपस्थिती ,ओला दुष्काळ जाहीर होऊन देखील सर्व्हे न करणे, पिकांची पाहणी न करणे , तसेच इतर समस्या - विहीर खचने इ. यांची दखल न घेणे व टाळाटाळ करने हे धाबा येथे सुरू होते. तेथील स्थानिक शेताऱ्यांनी फोन करून त्यांचे होत असलेले शोषण यांची कल्पना देऊन मदत मागितली. सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुका यांच्या वतीने व अनुराधा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी कार्यालय धाबा येथे धरणे आंदोलन करण्यात आले. उपस्थितांमध्ये दादाराव सुरडकर (तालुकाध्यक्ष ), अमोल जामणीक (युवक आघाडी तालुकाध्यक्ष) , कृष्ण दहात्रे ( तालुका संघटक), प्रदीप राठोड, डॉक्टर शिवा राठोड , सृष्टि अनुराधा ठाकरे, अनिल दहात्रे ,संजय दहात्रे, भूषण खंडारे, श्रीकृष्ण देवकुंभी ,गणेश इंगळे, भूषण सरकटे, देवयानी...

बार्शिटाकली येथे आजादी च्या अमृत म्होत्सावानिमित्त आजादि मध्ये हिंदुस्थानी यांचा योगदान या विषयावर कार्यक्रम संपन्न

Image
बार्शिटाकली येथे आजादी च्या अमृत म्होत्सावानिमित्त आजादि मध्ये हिंदुस्थानी यांचा योगदान या विषयावर  कार्यक्रम संपन्न  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.            स्थानिक दयावान फंक्शन हॉलमध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता"आजादीच्या अमृत महोत्सव" निमित्त "इस्लाहे माशेरा कमिटी, "ऑलइंडिया मुस्लिम पर्सनला बोर्ड बार्शीटाकली" द्वारा "वतन की आजादी मे हिंदुस्तानीयों का किरदार" या शीर्षका खाली एक भव्य कार्यक्रम घेण्यात आला  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलवी अजीज उल्ला खान( इमाम व खतीब, मरकज जामा मस्जिद, बार्शीटाकळी हे होते तर प्रमुख वक्ता" मालवी जुनैद आझाद कास्मी साहेब, (सदस्य आल इंडिया मुस्लिम प्रसनल्ला बोर्ड, मराठवाडा " हे होते.  प्रमुख पाहुणे म्हणून  श्री गजानन हामंद साहेब (तहसीलदार बार्शीटाकळी)   संजय सोळंके साहेब, (थानेदार बार्शीटाकळी)   मेहफूस खान साहेब (नगराध्यक्ष, नगरपंचायत  बार्शीटाकली) अर्जुन बुधनेर साहेब, अनील ठाकरे साहेब, विजय पळसकार साहेब (माजी मेजर सुबेदार, इंडियन आर्मी) मालवी अब...

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देवळीत मोठ्या उत्साहात साजरा आर्मी मधील जवानांच्या हस्ते ध्वजारोहणाची परंपरा कायम

Image
*भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देवळीत मोठ्या उत्साहात साजरा* *आर्मी मधील जवानांच्या हस्ते ध्वजारोहणाची परंपरा कायम* भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट हर घर झेंडा अभियान अकोला तालुक्यातील देवळी गावात सरपंच सौ वैशालीताई विकास सदांशिव व ग्रामसेवक अमोलजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार गावकऱ्यांनी प्रत्येक घरावर स्वतः तिरंगा ध्वज विकत घेऊन फडकवला. अमृत महोत्सव निमित्ताने जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांसह आर्मीतील जवान, सरपंच व गावातील मान्यवर मंडळींनी गावात उत्साहात रॅली काढून स्वतंत्राचे जयघोष दिले विशेषत: ग्रामपंचायत देवळी कार्यलया परिसरात प्रथमतः झेंडा उभारून ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला. देवळी गावच्या सरपंच सौ वैशालीताई सदांशिव ह्या सरपंच झाल्यापासून त्यांनी सरपंचाचा ध्वजारोहण करण्याचा अधिकार हा आर्मी मधील जवानांच्या हस्ते करण्याची जी परंपरा चालू केली ती या ७५ व्या स्वतंत्र दिनाला भारतीय सैन्यातील सैनिक मा. शुभम विजय सदांशिव व सैनिक मंगेश बाळू सदांशिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन ...

बार्शिटाकळी येथे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्त डॉक्टर असोसिएशन तर्फे शहरात बाईक रॅली

Image
बार्शिटाकळी येथे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्त डॉक्टर असोसिएशन तर्फे शहरात बाईक रॅली  बार्शिटाकळी प्रतिनिधी  आज बार्शीटाकळी येथे 75 व्या स्वातंत्र्यदिवस आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त वेल केअर डॉक्टर असोसिएशन बार्शीटाकळीचे अध्यक्ष डॉक्टर सैय्यद तन्वीर जमाल सर यांच्या नेतृत्वात बार्शिटाकळी शहरात तिरंगा बाईक रॅली काढुन असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे,व शहर वासीयांना शुभेच्छा देत तहसील येथे जाऊन झेंडा वंदानामध्ये सहभागी झाले, यावेळी डॉ सैय्यद तनवीर जमाल, डॉ सैय्यद मजीद अली, डॉ डी.एम काकड ,डॉ नासिर काज़ी ,डॉ शोएब खान, डॉ खालिद काजी,डॉ सैय्यद जुनेद अली, डॉ वासिल शेख,डॉ गुलाम रसूल इनामदार, डॉ तेहसिन शेख, डॉ गजानन हटेले, डॉ मुजाहिद खान,डॉ सलमान खान, असरार अहमद, मो.सलीम कुरेशी, मो.राहील कुरेशी,अजीम खान, यांची उपस्थिती होती. 

दगडपारवा येथे स्वातंत्र्य सैनिकांचा व त्यांच्या परीवारीचा सत्यशिल ग्रुपच्या वतीने सत्कार

Image
दगडपारवा येथे स्वातंत्र्य सैनिकांचा व त्यांच्या परीवारीचा सत्यशिल ग्रुपच्या वतीने सत्कार  आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  दगडपारवा येथे जगदंबा देवी संस्थानावर, गावातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचा, 15 ऑगस्ट निमित्त सत्यशील ग्रुप दगडपारवा यांनी शाल व संविधानाचा फोटो देऊन, त्यांच्या सन्मानार्थ, त्यांना संपूर्ण गावकरी मंडळी समोर, गावातील प्रतिष्ठित लोकांच्या हातून,त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडपारवा, संपूर्ण विद्यार्थ्यांना, नोटबुक,पेन्सिल, व चॉकलेट याचे वितरण करण्यात आले, दगडपारवा येथे पहिल्यांदा असा सामूहिक तथा संस्कारीत कार्यक्रम, बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला, तरी सदर कार्यक्रमाचे आयोजन.. सत्यशील ग्रुप दगड पारवा समस्त युवकवर्गांनी यामध्ये अथट प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी केला....

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणाला कोणत्या विभागाचे मंत्री पद..

Image
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणाला कोणत्या विभागाचे मंत्री पद.. राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणाला कोणत्या विभागाचे मंत्री पद... मुंबई: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत: सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास , सुधीर मुनगंटीवार-वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय,चंद्रकां...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुलाम नबी आझाद महाविद्यालयाची अभुतपुर्व रॅली

Image
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुलाम नबी आझाद महाविद्यालयाची अभुतपुर्व रॅली  बार्शीटाकळी: स्थानिक बार्शिटाकळी गुलाम नबी आझाद महाविद्यालयाची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभूतपूर्व रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. भारत सरकार यांच्या निर्देशानुसार व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानाअंतर्गत अद्भुतपूर्व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण तीन महाविद्यालयांचा समावेश होता. सोबतच ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी सुद्धा सामील झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकरराव पवार यांच्या नेतृत्वाखाली या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य संख्येने विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नर्सिंग कॉलेज कान्हेरीसरप व महात्मा फुले कनिष्ठ विद्यालयाचे सर्व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हातात दोनशे राष्ट्रध्वज घेऊन महाविद्यालयाच्या प्रांगणातुन रॅलीची सुरूवात करण्यात आली. सर्वप्रथम तहसील ...

राजकीय हेवेदावे दूर ठेवून झाले रक्षाबंधन.धर्म जात इतर राजकीय भेदभाव ला मिळाला दुरावा सुशांत दादा बोर्डे यांची अनोखी माणूसकी ची रक्षाबंधन.......

Image
राजकीय हेवेदावे दूर ठेवून झाले रक्षाबंधन. धर्म जात इतर राजकीय भेदभाव ला  मिळाला दुरावा  सुशांत दादा बोर्डे यांची अनोखी माणूसकी ची रक्षाबंधन.      हिंदू संस्कृती मध्ये प्रत्येक नात्याला सण उत्सवाचा स्पर्श आहे .माणुसकीतला  दुरावा दूर व्हावा या अनुषंगाने  प्रत्येक सण उत्सवाला या देशात वेळोवेळी प्राधान्य दिले आहे .यामुळे जाती धर्म इतर भेदभाव  च्या पलीकडे अनोख नात निर्माण करणार बहीण भावाचे नात आहे. -- हिंगणी गावात स्थायिक असलेले एकेकाळी काँग्रेस पक्षाची  निष्ठा राखणारे हारून शहा यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाला आहे . अर्धांग वायूच्याअवस्थे मधे मा.तालुका अध्यक्ष हारून शहा सध्या हालकीच्या परिस्थिती चा सामना करत असून परिवाराची धुरा याही परिस्थतीत सांभाळत आहेत . तसेच त्यांच्या परिस्थितीची   जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी  महिला आणि बाल कल्याण सभापती पती सुशांत दादा बोर्डे यांना माहिती मिळताच  रक्षाबंधन चा सण हारून शहा यांच्या घरी साजरा करण्याचा मानस सुशांत दादा बोर्डे यांनी धरला . यावेळी मा. तालुका अध्यक्ष हारून शहा यांच्...