Posts

Showing posts from April, 2022

डॉ . ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालय पातुर परिसरातील बगिच्यामध्ये गांजाची 142 झाड़े 40 किलो गांजा कीमत 400000 रूपयांचा गांजा जप्त, विशेष पथकाची पातुर मध्ये कार्यवाही

Image
डॉ. ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालय पातुर परिसरातील बगिच्यामध्ये गांजाची 142 झाड़े 40 किलो गांजा कीमत 400000 रूपयांचा गांजा जप्त, विशेष पथकाची पातुर मध्ये कार्यवाही  पातुर - रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की ढोने आयुर्वेदिक कॉलेज मधील बगिच्यात असलेला रखवालदार हा कोलेजच्या बगिच्यात गांजाची झाड़े लावून त्याचा गांजा काढून विक्री करीत आहे अशा खात्रिशिर ख़बरेवरुन पंचासमक्ष छापा मारला असता ढोने आयुर्वेदिक कोलेजच्या बगिच्यात ज्यात रखवालदार प्रकाश सुखदेव सौंधले वय 48 रा नानासाहेब नगर पातुर हा रखवाली करीत असताना मिळून आला त्याचे सोबत सदर बगिच्याची झड़ती घेतली असता सदर बगिच्यात एकूण 142 नग गानजाची झाड़े ज्यांची ऊंची 1 फुट ते 7 फुटा पर्यंतचे ज्यांचे वजन 40 किलो असलेले कीमत 4 लाख रूपयांचा गांजा आरोपी प्रकाश सुखदेव सौंधले याच्या ताब्यातुंन जप्त करण्यात आला अरोपिताचे कृत्य कलम 20 बी  एन डी पी एस  NDPS एक्ट अनवये गुन्हा होत असल्याने पो स्टे पातुर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे सदर कार्यवाही...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मार्च चे आयोजन

वंचित बहुजन आघाडी आयोजित शांतता मार्च जिल्ह्यातील शांतता आणि सामाजिक एकोपा कायम टिकावा म्हणून वंचित बहूजन आघाडीच्या वतीने सर्व धार्मिक स्थळांना अभिवादन करण्यासाठी उद्या सकाळी ९.३० वाजता पासून शांतता मार्च आयोजित केला आहे. श्री राज राजेश्वर मंदिर येथे सकाळी ०९.३० वाजता श्री राज राजेश्वरांची पुजा अर्चा करून सुरुवात.जामा मस्जिद येथे भेट। जुने शहर स्थीत काळा मारोती मंदिर येथे पुजा करणे.न्यु रीगल टॉकीज जवळील राम मंदिर येथे पूजन. रेल्वे स्टेशन जवळील गुरुद्वारा येथे अभिवादन. बस स्टॅंड येथील चर्च येथे प्रार्थना. टिळक चौक येथे जैन मंदिर येथे पूजन. अशोक वाटीका येथे आदर्शांचे पुजन करुन समारोप.... आयोजक वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा/ महानगर महिला आघाडी युवा आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्वत सभा जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकारी सदस्य सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते वंचित बहूजन आघाडी. ************************** 

रामदास पेठ पोलिसांनी अट्टल चोरट्यास केली अटक

Image
रामदास पेठ पोलिसांनी अट्टल चोरट्यास केली अटक रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून अवघ्या काहीच दिवसात चोरी गेलेला मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. अकोला शहरात चोरीच्या घटनेत अचानक वाढ झाली असून "नजर हटी तो दुर्घटना घटी" याच म्हणी प्रमाणे चोऱ्यांचे सत्र अकोला शहरात सुरू आहे पण जर पोलिसांनी चंग बांधला तर "सुतावरून स्वर्ग गाठत" आरोपीच्या मुसक्या आवल्या जातात याची प्रचिती रामदास पेठ पोलिसांनी दिली आहे. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात राहणारे ४५ वर्षीय चंद्रकांत रामेश्वर बोडदे हे वॉटर प्यूरी फायर, ऐसी, तसेच आरो रीपेरींग चे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात ते दिनांक १३ एप्रिल रोजी काही कामानिमित्त टिळक रोड येथील अलंकार मार्केट येथे गेले असता अज्ञात इसमाने त्याची बॅग पळवली बॅगेत त्याच्या कामाचे टूल्स असल्याने तीच बॅग चोरट्याने लंपास केली सदर घटनेची तक्रार चंद्रकांत बिदडे यांनी रामदास पेठ पोलिस स्टेशनला दिली. रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कि...

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर जिल्ह्यातील 125 ग्रामपंचायतीतील 207 रिक्तपदांसाठी होणार पोटनिवडणूक

Image
ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर जिल्ह्यातील 125 ग्रामपंचायतीतील 207 रिक्तपदांसाठी होणार पोटनिवडणूक एप्रिल ३०, २०२२  ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर जिल्ह्यातील 125 ग्रामपंचायतीतील 207 रिक्तपदांसाठी होणार पोटनिवडणूक अकोला दि.30 राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार,निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबवावयाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्‍हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर या तालुक्‍यातील एकूण 125 ग्रामपंचायतीमधील 207 रिक्‍तपदाच्‍या पोट निवडणूका घेण्‍यात येणार आहे.             त्‍याचा तपशिल याप्रमाणे निवडणूक असलेल्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणुक कार्यक्रम लागल्‍यापासुन आचारसंहिता लागू झाली असून;आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्‍तित्‍वात राहील.    तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्‍याचा दि.5 मे 2022 असुन नामनिर्देशनपत्र ...

उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटने ने केला सन्मान

Image
उत्तम काम  करणाऱ्या अधिकाऱ्यांचा  राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटने ने केला सन्मान   बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवार दिनांक 30 एप्रिल ला सायंकाळी सहा वाजता प्रभु पार्वती मंगल कार्यालयामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व धर्म समभाव या कार्यक्रमाचे  आयोजन बार्शिटाकळी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके तथा पोलीस कर्मचारी यांनी केले होते यावेळी उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना जिल्हा अकोला च्या वतीने माननीय अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांचा दक्षता समितीच्या महिला पदाधिकारी पुष्पाताई रत्नपारखी , पोलीस पाटील सविताताई भोंगळे , यांनी शाल  देऊन सत्कार केला व पेन भेटवस्तू दिली कोरोनाच्या कठीण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची उत्तम प्रकारे सेवा करणारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी महेश राठोड साहेब , बार्शीटाकळी चे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन हामद साहेब व चांगल्या प्रकारे कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे व चांगला उपक्रम राबविणारे बार्शीटाकळी ...

समाधान जाधव यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान... गटशिक्षणाधिकारी रतनशिंग पवार

Image
समाधान जाधव यांचे शिक्षण क्षेत्रात                मोठे योगदान               गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार शिक्षण विस्तार अधिकारी समाधान जाधव यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न बार्शीटाकळी शिक्षण विस्तार अधिकारी समाधान जाधव यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे असे प्रतिपादन बार्शीटाकळी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी रतन सिंग पवार यांनी केले ते समाधान जाधव यांची निवृत्ती कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून बोलत होते पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी समाधान मखराम जाधव हे 30 एप्रिल 2022 रोजी आपल्या नियमित वयामाना नुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचे सेवा निवृत्ती बाबत कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी बार्शीटाकळी पंचायत समिती सभागृहामध्ये करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शीटाकळी पंचायत समितीचे उपसभापती संगीता मनोज जाधव बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रमेश चव्हाण कक्ष अधिकारी दिलीप शिरसाठ हे होते यावेळी कार्यक्रमाचे प्रा...

बार्शिटाकळी तालुका मुख्याध्यापक संघातर्फे सेवानिवृत्त समाधान जाधव यांचा सत्कार

Image
पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी समाधान जाधव यांचे सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा बार्शीटाकळी तालुका मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड विदर्भ सहसचिव गजेंद्र काळे बार्शी टाकली तालुका अध्यक्ष दिनकर गायकवाड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला बार्शीटाकळी तालुक्याला अतिशय चांगल्या प्रकारे मुख्याध्यापक माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना केलेल्या सहकार्याबद्दल शत्रुघ्न बिरकड यांनी समाधान जाधव यांचे आभार मानले दहावी आयुष्याकडे त्यांना शुभेच्छा दिले तर दिनकर गायकवाड यांनी पोरांसोबत हितगुज करून संघटनेचे प्रश्न सोडून गेल्याचे सांगितले उमेश चव्हाण यांनी भविष्य आयुष्य करिता त्यांना शुभेच्छा  दिल्यातसत्काराला उत्तर देताना यांना समाधान जाधव येणे मुख्याध्यापकांनी संघटनेची मुला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले त्यामुळे मी यशस्वी होऊ शकेल असे सांगितले 

नायब तहसिलदार हरिश गुरव यांच्या एसीबी ची कारवाई

Image
नायब तहसीलदार हरिश गुरव यांच्या वर एसीबी ची कारवाई .  29, एप्रिल 2022 नायब तहसीलदार वर एसीबी ची कारवाई       अकोला जिल्हा प्रतिनिधी = अकोट अकोला जिल्ह्यातील एक असे शहर ज्यामध्ये मोठे विषयी उदयास येतात. त्यामध्ये राजकारण असो की कायदा सुव्यवस्था किंवा भ्रष्टाचार अकोट तहसील कार्यालयात कार्यरत असलेले व न.प. प्रशासकीय पदाचा कार्यभार असलेले हरीश गुरव नायब तहसीलदार या अधिकाऱ्याने वाळूच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितली तक्रारदार या बाबीला बळी न पडता थेट लाचलुचपत विभाग कडे जाऊन तक्रार केली. आज रोजी सायंकाळी 10000 रुपयाची तडजोड करून 8 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात या अधिकाऱ्याला पकडले.     नायब तहसीलदार हरीश गुरव यांच्याकडे आज रोजी तहसील कार्यालयात चार अन्य विभागाचा नायब तहसीलदार पदाचा चार्ज आहे..    नायब तहसीलदार गुरव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई मा. विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लप्रवि. अमरावती मा. अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक लप्रवि अ...

"अत्यंत गरीब परिस्थिती वर मात करून देश सेवेत रूजू झालेल्या कबड्डी खेळाडू शुभांगी घनसावध हिचा वंचित बहुजन युवा आघाडीने केला सत्कार"

Image
अत्यंत गरीब परिस्थिती वर मात करून देश सेवेत रूजू झालेल्या कबड्डी खेळाडू शुभांगी घनसावध हिचा वंचित बहुजन युवा आघाडी ने केला सन्मान" प्रतिनिधी अकोला दिनांक २६ सहावेळा कबड्डी मध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या कु शुभांगी उत्तमराव घनसावध हिने सशक्त सीमा बलाचे प्रशिक्षण पुर्ण करून बिहार मधील जय नगर येथे नियुक्ती मिळवली आहे.अत्यंत कठीण परिस्थितीत तिने साध्य केलेल्या यशाबद्दल वंचित बहुजन युवा आघाडी चे वतीने आज तिचे कौलखेड येथील निवासस्थानी जाऊन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शुभांगी हीची आर्थिक परिस्थिती बेताची असुनही तिने मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर हे यश संपादन केले.राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या हस्ते तिचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी सचिन शिराळे,जीवन डिगे,रवि वानखडे, प्रविण अहीर, अभिजीत तायडे, उत्तमराव घनसावध,मिलिंद इंगळे, अमोल कदम, सागर तायडे, गणेश घनसावध आदी लोक उपस्थित होते.

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दक्षता व जनजागृती अभियान मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Image
अँटी करप्शन व मीडिया  इन्वेस्टीगेशन अकोला द्वारा दिनांक १ मे २०२२ वार रविवार ला महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त दक्षता जनजागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन अकोला बस स्टँड जवळ विश्रामगृहामध्ये सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक तथा पत्रकार गजानन हरणे, विशेष उपस्थिती म्हणून श्री राजू गुल्हाने सहाय्यक कामगार आयुक्त, अनंतराव गणोरकर सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता, दिनकर नागे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता, बंडूभाऊ देशमुख अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर असोसिएस ,अंबादास ऊमाले सरपंच कापसी , राजेश भाऊ राजूरकर समाजसेवाक अदी मान्यवर उपस्थित  राहाणार आहे. या कार्यशाळे मध्ये दारूबंदी, दप्तर दिरंगाई, सेवा अधिनियम कायदा, रेशनिंग गॅस यासंबंधीचे कायदा, माहितीचा अधिकार आदी विषयांवर गजानन हरणे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत .तरी जागरूक नागरिक महिला युवक-युवतींनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान अँटीकरप्शन व मिडीया इन्वेस्टीगेशन अकोला यांनी केले आहे. 

शाहु-आंबेडकराच्या वैचारीक वारसदारांना साथ देण्यासाठी सज्ज व्हा......

Image
 इतिहास कुस बदलतो आहे...!!  ---------------------------------------------                  माणगांवच्या महार परिषदेत  छत्रपती शाहू महाराजांनी डॉ भिमराव रामजी आंबेडकर हे तुमचे नेते आहेत असे महारांना बजावून सांगितले आणि यांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहण्यातच तुमचं उज्वल भविष्य दडलेलं आहे हेही अधोरेखित केले...!!     त्याच बरोबर ब्राम्हण्यवाद्यांशी लढण्यासाठी खंबीर साथीदार म्हणून छत्रपती शाहू महाराजांना विद्वान डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांची साथ हवी होती...!!   इतिहास  आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आंबेडकरांनी महाराचेच नव्हे तर तमाम उपेक्षित वर्गाचं नेतृत्व केलं आणि इथल्या रंजल्या गांजलेल्या समुहाला समतेचा हक्क आणि अधिकार मिळवून दिला, त्यांच्या जीवनाचं सोनं केलं...!!             छत्रपती शाहू महाराजांच्या अपेक्षेप्रती  डॉ भिमराव रामजी आंबेडकर हे खरे उतरले त्याच बरोबर ब्राह्मण्यवादी छावणीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उध्वस्त करीत समतेचा जागर जागतिक पातळीवर नेऊन ...

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग का "राष्ट्रीय गौरव सम्मान समारोह 2022" देश की जानी मानी दिग्गज हस्तियों की उपस्थिति में भव्य उत्साह के साथ सम्पन्न हुआ

Image
अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग का "राष्ट्रीय गौरव सम्मान समारोह 2022" देश की जानी मानी दिग्गज हस्तियों की उपस्थिति में भव्य उत्साह के साथ सम्पन्न हुआ सातारा : विश्व विख्यात अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग का दि. 24 अप्रैल रविवार को "राष्ट्रीय गौरव सम्मान समारोह 2022" आयोग के राष्ट्रीय अध्यक्ष तथा सेलेब्रिटी डॉ. संतोष बजाज की अध्यक्षता तथा देश की जनि मानी दिग्गज हस्तियो की उपस्थित में महाराष्ट्र के सातारा जिल्हे में भव्य सफलता के साथ सम्पन्न हुआ, इस भव्य समारोह में उन चुनिंदा सितारों को जो देश के प्रति समर्पित होकर हर क्षेत्र में ऐसे सेकड़ो लोग है जो कि अपने अपने स्तर पर अपनी निस्वार्थ भावनओ से देश की सेवा के लिए समाजिक कार्य, जनसेवा कार्य व मानवीय सेवा कार्यों के साथ अपने अच्छे कर्म करके योगदान देते आ रहे है और हमेशा जिनके कार्यो से सीखते हुए सेकड़ो लोगो ने प्रेरणा हासिल की है ऐसे लोगो को आयोग द्वारा उनका सर्वेक्षण कर इस विशाल अंतरराष्ट्रीय मंच पर उन्हें आमंत्रित कर अवार्ड, मैडल व अंतरराष्ट्रीय प्रशस्ति पत्र व शाल श्रीफल से सम्मानि...

पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे शांतता समीतीची सभा पार पडली... पवित्र रमजान ईद शांततेने साजरी करा ठाणेदार संजय सोंळके यांचे आवाहन......

Image
. प्रतिनिधी , बार्शिटाकळी , संध्या मुस्लीम बांधवाच्या रमजान महिना शुरु असून आगामी काळात काही दिवसात रमजान ईद सण येणार आहे तो सण साजरा करते वेळी शहरात कायदा सुव्यवस्था अंबाधीत रहीली पाहिजे त्या संर्दभात बार्शिटाकळी पोलिसाना शहरात शांतता ठेवण्यासाठी सहयोग म्हणून . बार्शिटाकळी पोलिस स्टेशन प्रागणात शांतता समिती सदस्य ची आढावा बैठक घेण्यात आली . बार्शिटाकळी शहरात आगामी येणारे मुस्लीम बांधवाचे रमजान ईद सण साजरी करता वेळी शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावा पाईजे आणी सण शांतता ने साजरी केला पाईजे त्या अनुषंगाने बार्शिटाकळी पोलिस स्टेशनला शांतता समिती सदस्य ची अढावा बैठकीचे मुख्य मार्गदर्शक आणी अध्यक्ष म्हणून ठाणेदार संजय सोळ के होते , तर प्रमुख पाहूणे म्हणून नगर अध्यक्ष हाजी महेफुज खान ची उपस्थिती होती , प्रत्येक सण साजरी करता वेळी आपसात बंधुभाव , सहयोग आणी शांतता मार्गाने व शासनाच्या नियमानुसार साजरी केले पाहिजे , बार्शिटाकळी शहर वासीयाचे सण शांततेने साजरी करण्याची परंपरा कायम ठेवण्याची प्रयत्न करावे , सण उत्सव आहे , त्याच्या प्रत्येकाने आनंद घ्यावा , असे ठाणेदार संजय सोळके यांनी मार्गदर्शन...

देशी दारूचा 55 हजार रूपयांचा अवैध साठा जप्त ! बार्शिटाकळीत विशेष पथकाची कारवाई

Image
बार्शिटाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील टी - पॉईंट पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवर देशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून केलेल्या कारवाईत ५५ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.  सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षकाच्या विशेष पथकाद्वारे करण्यात आली आहे. बार्शिटाकळी येथुन पिंपळखुटा येथे एक इसम अवैधरित्या देशी दारूची विक्री करीता दुचाकीवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहीतीवरून केलेल्या कारवाईत देशी दारू टॉगो प्रिमीयम, सखु संत्रा, जॅक पॉट,बडी शेप,अशा विविध कंपन्यांचे ४८ नग असा एकूण २ हजार ८८० रूपयांचा तसेच दुचाकी किंमत अंदाजे ५० हजार रुपये असा एकूण ५२ हजार ८८० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला.तर अमोल बबन धाईत (२४) रा.वंजारी पुरा बार्शिटाकळी या आरोपींवर बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ इ कायद्याच्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख तथा पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.

अवघ्या वयाच्या सहा वर्षीच अकसा तय्यबा यांनी ठेवला प्रथम रोजी (उपवास)

Image
सहा वर्षीय अकसा तय्याबा यांनी ठेवले प्रथम रोजा उपवास  प्रतिनिधी बार्शिटाकळी         सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिम बांधव अल्लाह ताला ची श्रद्धा साठी दिवसभर काही न खाता पिता उपवास रोजा ठेवतात व रात्री तराबी ची नमाज पाठन करतात बार्शीटाकळी शहरातील खडकपुरा येथील केवळ सहा वर्षीय वय असलेल्या अकसा तय्याबा आरिफ खान यांनी अत्यंत कमी वयातच रोजा उपवास ठेवल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे सध्या पवित्र रमझान महिन्या चा पंचविस वा रोजा सुरू असून,अकसा तय्याबा यांनी आज आपल्या जीवनातील प्रथम उपवास रोजा ठेवले होते अकसा तय्याबा आरिफ खान हे बार्शिटाकळी तंटामुक्ती अध्यक्ष यांची मुलगी असून माजी ग्राम पंचायत सदस्य ताहेर आली खान मेम्बर यांची नात आहे मुस्लीम बांधव पवित्र रमजान महिन्यात संपूर्ण तीस दिवस रोजा उपवास ठेवतात व तिसव्या दिवशी रमजान ईद साजरी करतात सद्या उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अश्यातच सुद्धा अल्लाह ची श्रद्धा साठी संपूर्ण मुस्लीम बांधव महिनाभर उपवास ठेऊन अल्लाह ताला ची प्रार्थना करतात अकसा तय्याबा य...

थेट मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ पालकमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या अडचणीत चांगलीच वाढ

Image
अकोला:-थेट मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत चांगलीच वाढ नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेल्या रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दाखल करण्यात आली होती. राज्यमंत्री अकोला व जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर अकोला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते कामात अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. त्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करून बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला. या अगोदर  पोलिसांनी कारवाई न केल्याने डॉ. पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत अकोला न्यायालयात प्रकरण दाखल केले. पालकमंत्री लोकसेवक असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी ९० दिवसांच्या आत...

बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज यांची जयंती साजरी

Image
बार्शिटाकळी येथील संत सेना महाराज नगर येथे नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीला नाभिक समाजाचे जेष्ठ समाजसेवक डॉ महादेव भातखडे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक समाजाचे नगरसेवक श्रावण रामदास भातखडे यांच्या सह, बार्शिटाकळी शहरातील गोपाल निबोकार, विनायक पळसकार, नागोराव महाराज भातखडे, राजेंद्र पळसकार, नागोराव भातखडे,लक्ष्मण आंबेकर, विजय भातखडे,उमेश आप्पा मानेकर, प्रविण पांडे, अरविंद भातखंडे, अंकुश पळसकार, कृष्णा भातखडे, राजेंद्र धाईसकर, शुभम भातखडे, अक्षय बोपुलकर ,अक्षय भातखडे, वैभव निबोकार, सुनील पळसकार, सुनील भातखडे,लखन भातखडे,शिवा भातकर, गजानन इंगळे, सचिन निबोकार, सचिन भातखडे, गजानन चतरकार,रवि भातखडे,शुभम मानेकर, भोला भातखडे, सौरभ निबोकार, पंकज पळसकार, विठ्ठल भातखडे, सोपान अंबुलकर, अनील भातखडे, अशोक धाईसकर, विनोद गवळी, गणेश पळसकार, अक्षय भातकर, रामेश्वर पळसकार, गोपाल भातखडे, व नाभिक समाज महिला मंडळी व संपूर्ण नाभिक समाज उपस्थित होते 

भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतांना केंद्राचे वेगळे धोरण कशाला ? 'वंचित ' चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सवाल; १ मे रोजी काढणार शांती मार्च

Image
अकोला: भोग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही केंद्र सरकारकडे धोरण ठरवण्याची मागणी कशासाठी करावी, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऑड प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.  भोंग्यांच्या अनुषंगाने ३ मे पर्यंतची दिलेली मुदत लक्षात घेता राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कट असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली तसेच राज्यात शांतता राहावे यासाठी १ मे रोजी करू ठीक ठिकाणी शांती मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भोंग्याच्या प्रश्नावरुन राज्य सरकारतर्फे 25 एप्रिल रोजी सर्व विरोधी पक्ष नेत्या बैठक आयोजित केली होती बैठकीत भोंग्याशिवाय अन्य कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही ३ मे रोजी राज्यात कुठे तरी काहीतरी घडण्याची शक्यता आहे याबाबतचा विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता राज्य सरकारकडूनही देण्यात येत असलेल्या सूचना वरून गांभीर्य लक्षात घेता येते असे " एडवोकेट आंबेडकर "म्हणाले. राज्य सरकारने भोंग्याबाबत नवीन धोरण तयार करण्यासाठी केंद्र सरकारला आयता विषय दिल्याचा आरोपही त्यांनी केला त्यामुळेच शंकेला वाव आहे केंद्रीय तपास यंत्रणा...

ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांची लोकसेवा कॅरीयर अकॅडमीला अकोला भेट विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

Image
 ऑड. बाळासाहेब आंबेडकर  यांची "लोकसेवा करियर अकॅडमीला,अकोला" भेट विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन*  दि.२६ एप्रिल अकोला. व्याळा तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील आदर्श शिक्षक  मा. सदाशिवराव वाकोडे यांचे चिरंजीव तथा व्याळा येथील शेतकरी व वंचित बहुजन आघाडी  श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे एक निष्ठ कार्यकर्ते मा.नंदकिशोर वाकोडे यांचे लहान बंधू उच्च विद्याविभूषित प्रा्डॉ .गजानन सदाशिवराव वाकोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बहुजन समाज हा शिक्षण क्षेत्रात पुढे जावून प्रगती केली पाहिजे शिक्षणाचे बाजारीकरण न करता खरोखर लोकांची सेवा घडावी या उद्देशाने *लोकसेवा अकॅडमी* सुरू केलेली आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे. *शिकेल तो टिकेल* या तत्त्वावर शिक्षणाचे महत्त्व प्रत्येकांना सांगितले त्याच तत्त्वप्रणाली नुसार डॉ. गजानन वाकोडे यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे    भारतातीलच नव्हे तर जगातील ही एकमेव अकॅडमी आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सुरू झाली आहे.या अकॅडमी ला आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज *ॲड. बा...

गुजरात मधील वडगाम कॉंग्रेस पक्षाचे आमदार श्री जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेच्या निषेधार्थ बार्शिटाकळी कॉंग्रेस पक्षाचे निवेदन

Image
गुजरात मधील वडगामचे कांग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसानी गुजरात मधील पालनपुर सर्किट हाऊस येथुन तीन दिवसांपूर्वी रात्री ११ वाजुन ३० मि. बेकयदेशीर पणे अटक करून आसामला घेउन गेल्यावर त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आमदार जिग्नेश मेवाणीची  सुटका करावी अशी मागणी निवेदनाद्वारे आज बार्शिटाकळीचे तहसीलदार श्री गजानन हामद साहेब याांना र्ली शहर कांग्रेस ने केली आहे यावेळी निवेदन देतानी बार्शिटाकळी नगरपंचायत चे नगरअध्यक्ष महफूज खान रसुल खान, ज़िला महासचिव तथा नगरसेवक सै जहाँगीर , ज़िला सचिव अनीस इकबाल , ज़िला सहसचिव डॉ तनवीर , तालुका महासचिव भारत बोबडे, समाजसेवक सै.ईमदाद उर्फ गुडडू भाई , समााजसेवक  संतोष राउत , ता उपाध्यक्ष जाकिर इनामदार , अब्दुल अतीक , अल्पसंख्याक कांग्रेस शहर अध्यक्ष शेख अजहर ,  युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मो शोएब आणि तालुक्यातील कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते

पुंडा (नंदीग्राम) येथे गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लालपरीचे आगमन

Image
पुंडा नंदीग्राम मध्ये आज 11 वाजून 10 मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर लाल परी आस्थापन झाली. गेल्या 2 वर्षा पासून लाल परीचा चेहरा बघण्यासाठी  गावातील आप्तेगंन मंडळी आतुर होऊन वाट बघत होती शेवटी गावकऱ्यांची आतुरता संपली मंडळाने कळवता गावकर्यांचा आनंद मावेनासा झाला आणि मनातलं लाल परी बद्दल चे प्रेम बाहेर आले लाल परीचे पूजन करण्यात आले व बस चालक ,तथा वाहक याना टिक्के बुक्के लावून नास्ता चहा पाणी देऊन स्वागत करण्यात आले गावकऱ्यांचा आनंद सुखदायक पाहण्याजोगा होता असे ड्रायव्हर मन भरून म्हणत राहिले , आता फक्त एकच अपेक्षा आहे न थांबणारी लाल परी कधीच बंद पडली नाही पाहिजे  पुंडा वासी 

उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय बार्शिटाकळीचा गलथान कारभार प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील नमुना 8 अ (अतिक्रमण ) धारक घरकुला पासुन वंचितच

Image
उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय बार्शिटाकळीचा गलथान कारभार प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील नमुना 8 अ (अतिक्रमण ) धारक घरकुला पासुन वंचितच  बार्शिटाकळी येथील प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील (नमुना 8 आ) अतिक्रमण धारकांनी प्रधानमंत्री घरकुल आवास योजने मध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी अर्ज दाखल केले होते. त्याकरिता नगरपंचायत कार्यालय बार्शिटाकळी ने त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून (नमुना 8 अ)अतिक्रमण धारकांची आखिव पत्रीका ( मोजणी शिट) तयार करण्यासाठी मोजणी फी भरूनही तीन वर्षांपासून (नमुना 8 अ) अतिक्रमण धारक मोजणी शिटची प्रतिक्षा करत असुन भुमिअभिलेख कार्यालय बार्शिटाकळी हे घरकुल धारकांची निराशा करत असुन त्यांची दखल घेण्यास कोणीच तयार नाही. अतिक्रमण (नमुना 8 अ) धारक भुमी अभिलेख कार्यालयात चकरा मारून मारून थकले परंतु उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे थापा मारत आहे हे जर असेच सुरू राहिले तर अतिक्रमण( नमुना 8 अ) धारकांना घरकुलाचा लाभ कधी मिळेल  प्रधानमंत्री आवास योजना 2022 पर्यंतच होती परंतु नगरपंचायत बार्शिटाकळी येथील अतिक्रमण(नमुना 8 अ) धारक उपअधीक्षक भुमी...

निराधार परिवाराला मदतीचा आधार, जिल्हा परिषद सदस्य शंकर ईगळे यांनी घेतला पुढाकार , ग्रामपंचायत चा मिळाला आधार

Image
निराधार परीवाराला मदतीचा आधार, जि. प. सदस्य शंकर इंगळे यांनी घेतला पुढाकार, ग्रामपंचायतचा मिळाला आधार अकोला दि. 25 एप्रिल :- पतीचे दुर्धर आजाराने निधन झालं पतीच्या अचानक निघून जाण्याने श्रीमती सीमा बाबुलाल घोडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कर्ता पुरुष गेल्याने बेसहारा झालेल्या सीमाताई यांना पती गेल्यानंतर एक 8 वर्षीय मुलगा व दोन लहान - लहान गोंडस मुले त्याचे पालन पोषण कसे करावे हा मोठा प्रश्न, राहण्यासाठी असलेले ताट्टयाच्या घराचा आसरा उन, वारा, पाऊस यापासून घरासह परीवाराचे संरक्षण महत्त्वाचे त्यातच स्वतः चे व मुलांचे संगोपन, उदरनिर्वाह, शिक्षण, आरोग्य, याची काळजी त्यातच घराच्या चार भिंती व छत कसे उभारावे हा प्रश्न कर्ता पुरुष गेल्याने मुलांसह निराधार झालेल्या श्रीमती सीमा बाबुलाल घोडे यांच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न....!  अशातच गट ग्रामपंचायत आपातापा सचिव संजय डी. श्रीवास, सरपंच सौ. स्वाती सतिष टोबरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी चर्चा विचारविनिमय करून अशातच फुल नाही फुलाची पाकळी या नात्याने गट ग्रामपंचायत आपातापा ने या निराधार परीवाराला मदतीचा प्रयास करीत असल्य...

बार्शिटाकळीत कुटार गोदामाला आग

Image
शहरातील नवीन बस स्थानकाजवळ कोहीनुर ट्रेडर्सचे सोयाबीन कुटाराचे दोन मोठे गोदाम आहे. या सोयाबीन कुटाराच्या गोदामास सोमवार 25/ एप्रिल सकाळी 8:00 वाजताच्या सुमारास आग लागली. पातुर आणि अकोला येथुन अग्निशमन दलाची वाहने बोलावुन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक गोदाम आगीपासून वाचवण्यात यश आले आहे तर दुस-या गोदामातील कुटार जळुन खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरात नवीन बस स्थानकाजवळ कोहीनुर ट्रेडर्स हे मो. इकबाल मो.सादिक यांच्या मालकीचे दोन मोठे गोदाम आहेत. या गोदामाला आग लागल्याने गोदामात साठवुन ठेवलेल्या सोयाबीन कुटाराने पेट घेतला. सोमवारी सकाळी 8 घ्या सुमारास शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते. आगीचे रूद्र रूप धारण केल्याने अकोला व पातुर येथुन अग्निशमन बंब बोलावण्यात आले.  अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या परिश्रमामुळे एक गोदाम आगीपासून वाचवण्यात आला. तर दुस-या गोदामातील सोयाबीन कुटार जळुन खाक झाले. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आगीची माहिती मिळताच बार्शिटाकळीचे तहसीलदार श्री गजानन हामद साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी नागरीकांनी मोठी गर्दी केल...

समाज विघातक व्यक्ती व संघटना वर करडी नजर ठेवावी आणि त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा...रेखाताई ठाकुर प्रदेश अध्यक्षा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र

Image
समाज विघातक व्यक्ती व संघटनांवर करडी नजर ठेवावी आणि त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. सर्व पक्षीय बैठकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका.                              मुंबई - राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारने विचार विनिमय करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावून सुचना व उपाय योजना मागविल्यात त्याबद्दल सरकारचे स्वागत आहे. सध्यस्थितीत महाराष्ट्रातील वस्त्यांमध्ये भितीदायक व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आणि भडकावू भाषणांमधून वातावरण बिघडवत आहे. परंतू देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या भाषणातून समोर आलेली गंभीर गोष्ट ही आहे की ते म्हणाले की, 'त्यांना काही पोलीस वाले कानात सांगत आहेत की काही मशिदीत व मदरशात समाज विघातक कामे चालू आहेत.'                     तर मग आमची अशी मागणी आहे की सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन झाडाझडती घेतली पाहीजे व यात काही तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई पण केली ...

मुर्तीजापुर मतदारसंघांचे आमदार हरीश आप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारनियमानाच्या निषेधार्थ बार्शिटाकळी येथे आंदोलन

Image
#मुर्तिजापुर मतदारसंघाचे आमदार_हरीश भाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारनियमनाच्या निषेधार्थ आंदोलन बायपास बार्शिटाकळी येथे करण्यात आले.          आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे  संपूर्ण महाराष्ट्र विद्युत भारनियमन (लोडसेडिंग) होत आहे, याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी बार्शिटाकळी तालुक्याचे वतीने आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या सह राजू पाटील काकड भाजपा तालुका अध्यक्ष बार्शिटाकळी, योगेश भाऊ कोदनकार , संजय काका इंगळे, गणेश भाऊ झळके जि.प.सदस्य, रमेश भाऊ वाटमारे, पुष्पाताई रत्नपारखी,गोपाल भाऊ वाटमारे, विनोद भाऊ राठोड गजानन भाऊ नेमाडे, गोपाल भाऊ महल्ले,मो.सादीक लिडर,महेफुज खान पठाण, वैभव भाऊ हातोलकर, गोपाल भाऊ काकड, राधेश्याम भाऊ खरतडे,रोशन भाऊ राठोड, रमेश आप्पा खांबेरे, संदिप भाऊ वनारे,अमोल भाऊ काळे, शंकर भाऊ काळे, विनायक भाऊ टेकाडे,कीशोर भाऊ देशपांडे पं.स.सदस्य, संतोष भाऊ पागृत,अनंता भाऊ गरजे, गोपाल भाऊ गरजे,अजय भाऊ पंडित, दत्ता भाऊ साबळे, ऋषिकेश भाऊ जाधव, संजय भाऊ चौधरी पं.स.सदस्य,धिरज भाऊ घुले,रामा भाऊ ठाकरे, प्रदिप भाऊ देशमुख,रोशन भाऊ राठ...

शेती आणि उद्योगधंदा हाच आपला खरा धर्म.....कवि विठ्ठल कुलट

Image
शेती आणि उद्दोगधंदा हाच आपला खरा धर्म  जगातील सर्वच धर्मात प्रेम,दया,शांती,सत्य आणि अहिंसा सांगितली आहे.परंतू  सध्या काही स्वार्थी विध्वंसक समाजकंटक याउलट सांगून लोकांमध्ये ताण तणाव निर्माण करीत आहेत.त्यांचे अपकृत्य  हाणून पाडावे आणि आपण आपल्या शेती आणि उद्दोगधंद्यात लक्ष घालून आपली व देशाची प्रगती करावी,त्यातच आपलं हित आहे आणि तोच आपला खरा धर्म आहे.असे विचार प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष,कवी विठ्ठल कुलट यांनी व्यक्त केले. पणज येथे अकोला पोलिस दल,अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन तथा ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्म समभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी रितू खोकर,ठाणेदार नितिन देशमुख, तहसीलदार हरीश गुरव,संदीपपाल महाराज,अक्षय राऊत,सदस्या सौ.सुवर्णा संजय देशमुख,अरूण काकड,पञकार दिनेश बोचे,रतन भोइराज,सरपंच मधुकर कोल्हे,सदस्य गजानन आकोटकर,सचिन कुलट यांची उपस्थिती होती.याप्रसंगी उ.वि.पो.अ.रितू खोकर,तहसीलदार हरीश गुरव,सिराज मौलवी,शीलधम्म भंते,संदीपपाल महाराज,वक्ते अक्षय राऊत,रामपाल महाराज,लेखक शफाकतअली देशमुख,अजमद बेग,इमायत...

जिल्हा परिषद मराठी शाळा बिहाड माथा येथे शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न

Image
जिल्हा परिषद मराठी शाळा बिहाड माथा महान येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न बार्शिटाकळी जिल्हा परिषद मराठी शाळा बिहाड माथा महान येथे शाळा पूर्व तय्यारी मेळावा संपन्न झाला या वेळी शाळा चे मुख्याध्यापक प्रकाश राठोड यांनी गट शिक्षण अधिकारी रत्नसिंग पवार , केंद्र प्रमुख विनोद पिंपळकर , शाहिद इक्बाल खान , यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्मचे आयोजन केले होते या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राजकुमार ससाने ग्रामपंचायत सदस्य, रेखाबाई इंगळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , किशोर ससाने सदस्य , सिंधुताई डाबेराव सदस्य , महादेव ससाने सदस्य , हे होते या वेळी शाळा दाखल पत्र विध्यार्थी शाळेत दाखल करून घेण्या बाबत विविध उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले या वेळी मुख्याध्यापक प्रकाश राठोड यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले या वेळी सुनंदा तायडे अंगणवाडी ताई , प्रकाश राठोड मुख्याध्यापक , राजेंद्र नवलकार शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बिहाड माथा शाळापूर्व तयारी साजरी करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र नवलकार यांनी केले य...

राष्ट्रीय बिरसा क्रांती दलचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ जी मडावी यांची बार्शिटाकळी येथे सभा सभेत तालुकाध्यक्ष पदि योगेश कुरशेंगे,तर बार्शिटाकळी शहर अध्यक्ष पदि शंकर म्हरसकोल्हे यांची नियुक्ती

Image
राष्ट्रीय बिरसा क्रांती दल चे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांची बार्शीटाकली येथे सभा संपन्न                                 प्रतिनिधी , बार्शि टाकळी , बार्शिटाकळी शहरातील गवारी पुरा येथे  आदिवासी समाज कल्याणा करिता शनिवारी  सभा पार पडली.या सभेला राष्ट्रीय बिरसा क्रांती दलचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दशरथ मडावी  उपस्थित होते.त्यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले.  ९ जुन २०२२ रोजी बिरसा मुंडा यांच्या स्मृतिपित्यर्थ आदिवासी सन्मान परिषद यवतमाळ आयोजीत केली आहे , तेंव्हा या परिषेदेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आदिवासी समाजाचे नेते  दशरथ मडावी यांनी केले.सोबतच बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी.अंबुरे,विदर्भ संघटक अतुल कोवे होते. यावेळी आदिवासी समाजाची विकास बाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी बिरसा क्रांती दलाची  शाखा स्थापना करण्यात आली बार्शीटाकली तालुका अध्यक्ष पदी योगेश कुरसेंगे, यांना तसेच  शंकरराव मरसकोल्हे यांना शहर अध्यक्ष, म्हणून व...

..... म्हणून हे राजकीय 'भोंगे' वाजताहेत! महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र तर शेतक-यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार अपयशी: शेतकरी - सर्वसामान्यांचा सुर

महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरले आहे केंद्र सरकार राज्य सरकार यांचे अपयश यावर चर्चा नको म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत असा सूर आता राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांतून उमटू लागला आहे.  महागाईवर नियंत्रण अन्यथा केंद्र सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरले आहे शेतकऱ्यावर गेल्या दोन वर्षांत महापुर,कोरोनासह अनेक आपत्ती आल्या त्यामध्ये पिक विमा योजना राबवणाऱ्या कंपन्या कर्जबाजारी होऊन दिवाळखोरीत निघाले पाहिजे होत्या . मात्र, कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमावला आहे त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना फसवले केंद्र सरकार ,राज्य सरकार यांचे अपयश यावर चर्चा नको म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असा सूर आता शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्यांतून उमटू लागला आहे . "शेतमाल शेतकऱ्याच्या घरात असतो तेव्हा शेतमालाला योग्य दर नसतो , तीन एकरातील पपई आणि दीड एकरातील उसाचा ट्रॅक्टर फिरवावा लागला .पेट्रोल डिझेलने शंभरी तर घरगुती गॅस सिलेंडरने हजारी पार केली , खाजगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थी प्रवेश शुल्कात वाढ केली त्यांचे केंद्र आणि...

सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचेतात्कालीन पोलीस निरीक्षक दिनकर महाजन यांना न्यायालयाने एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा

रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका डॉक्टरला शिवीगाळ केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक दिनकर महाजन यांना न्यायालयाने एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शहरातील वनविभागा जवळ 2009 मध्ये सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक दिनकर महाजन यांनी डॉ. मेहरे यांना अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणाची तक्रार रामदास पेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 294 नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायाधीश बनसोड यांनी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक श्री दिनकर महाजन यांना दोषी ठरवत एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

पिंजरच्या मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या सतर्कतेने पुढिल अनर्थ टळला

Image
 ➡️पिंजरच्या मानवसेवा  आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आमच्या जवानांनी रोडवर दगड ठेवून ये-जा करणारे वाहने वळते केले आणी डायरेक्शन देत पेट घेतलेले झाड अतिशय शिताफीने रोडच्या कळेला पाडले पथक प्रमुख दीपक सदाफळे  (जिव-रक्षक) यांच्या फोनवरील योग्य मार्गदर्शनात ही मोहीम यशस्वी झाली. 23 एप्रिल 2022 ची घटना आहे 

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाउंडेशनच्या वतीने 25 हजार रुपयांची मदत

Image
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाउंडेशनच्या वतीने 25 हजार रुपयांची मदत  माझोड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विधवा महिला श्रीमती अर्चना लाहुडकर यांना नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनच्या वतीने 25 हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. ही मदत नामचे विदर्भ व खान्देश समनव्यक हरिष इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाऊंडेशनचे जिल्हा समनव्यक माणिक शेळके यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर, राजेश ठाकरे, डिगंबर लाहुडकर व दीपक देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

सलुन / पार्लर व्यवसायाला अत्यावश्यक दर्जा द्या..... राष्ट्रीय जनसेवा पक्षाची मागणी.......

Image
सलुन/पार्लर व्यवसायाला अत्यावश्यक दर्जा द्या.... राष्ट्रीय जनसेवा पक्षाची मागणी.. प्रतिनिधी : संजय पंडित  दि.२२ ठाणे : राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याबाबतची महत्वपूर्ण मागणी आज राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदना द्वारे करण्यात आली. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बारा बलुतेदारात नाभिक समाज वर्षानुवर्षे विविध मागण्यांपासून वंचित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.राज्यात जवळ जवळ ४२ लाखाच्या वर नाभिक समाज असून समाजातील ९० टक्के लोक आजही त्यांच्या पारंपरिक सलून व्यवसायात कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे आर्थिक दृष्ट्या मागासलेला हा समाज विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक आरक्षण,सलून व्यवसायाच्या आधुनिकते करीता केश शिल्पी बोर्ड, अट्रासिटी कायदा,या सोबतच सलून व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळणे या प्रामुख्याने समाजाच्या महत्वाच्या मागण्या प्रलंबित असल्याचे निवेदनाद्वारे म्हटले आहे. कोरोनाच्या लॉक डाऊन काळात सर्वात जास्त नुकसान सलून आणि पार्लर व्यवसायाचे झाल...

बार्शिटाकळी ग्रामीण रूग्णालयात आरोग्य शिबीर संपन्न तालुक्यातील हजारो रूग्णांनी घेतला शिबीराचा लाभ

Image
बार्शीटाकली ग्रामीण रुग्णालया मध्ये आरोग्य शिबीर संपन्न तालुक्यातील हजारो रूग्णांनी घेतला शिबीराचा लाभ मान्यवरांची होती उपस्थिती  बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालया मध्ये आज शुक्रवारी आजादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश राठोड ,‌तालुका आरोग्य अधिकारी भावना हाडोळे , यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्या मेळाव्यात विविध  22 प्रकारच्या रोगांची तपासणी करण्यात आली या मध्ये जिल्ह्या संह तालुक्यातील नामवंत डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली या मध्ये मोठ्या प्रमाणात तालुक्यातील रुग्णांनी  सदर मेळाव्याचा लाभ घेतला या वेळी सदर मेळाव्यास मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी भेट दिली रुग्ण कल्याण समिती सदस्य इम्रान खान , मो सादिक लीडर , जेष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल ,आरोग्या मित्र शाहिद इक्बाल खान सरफराज खान , मुक्तसिर खान , रुग्ण सदस्य पुष्पाताई रत्नपारखी , राजु काकड पाटील   यांनी ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा लेख लेखक: सोमनाथ कन्नर

चार दिवसांपूर्वी डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली. बाबासाहेबांना समर्पित केलेले बरेच लेख वाचनात आले; पण हा लेख थेट काळजात घुसला. Somnath Kannar  यांनी लिहिलेला हा लेख वाचला आणि अक्षरशः सुन्न झालो.कुणी एवढं वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष कसं लिहू शकतं. कुणाचेही मन न दुखवता  इतक्या सकारात्मक पद्धतीने इतका नाजूक विषय मांडण कसं जमलं असावं. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि शेअर करावा असा लेख... बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं....गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत. आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारवाडा जनावरांसारखा राबला....

शामराव वाहुरवाघ यांच्या एकसष्टी निमित्ताने देशसेवा करणा-यांचा सत्कार करण्यात आला

Image
शामराव वाहूरवाघ यांचे एकसष्ट निमित्ताने देशसेवा करणा-यांचा सत्कार करण्यात आला  अकोला -दि १७ जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ गतीमान करण्यासाठी करणारे शामराव जयराम वाहुरवाघ यांचे एकसष्ट निमित्ताने दि २०एप्रिल ला दुपारी एक वाजता शिवकल्याणम लाँन,, संत तुकाराम चौक, गोरक्षण रोड, अकोला येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  शामराव वाहुरवाघ ६१वा अभिष्ट चिंतन सोहळा समिती आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बळीराम शिरस्कार, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हरिदास भदे, बळीराम केले, दिवाकर गावंडे, दिनकर वाघ, सुषमा कावरे,राम मुळे, गजानन निंबोकार महाराज गोपाळ खटाळेई मान्यवर उपस्थित उपस्थित होते.  विविध क्षेत्रातील देशसेवा करणारे सैनिक, माजी सैनिक, विद्यानंद इंगळे, कुलदीप गवई,प्रदिप सावळे, पत्रकार  समाधान वानखडे, बाळासाहेब ठाकरे,  जयप्रकाश पाटील, डॉक्टर महेश लबडे, डॉ रुपेश कळसकर, डॉ राजरत्न वैद्य ,कलावंत समाधान खंदारे, बाबुराव खरात, जयकुमार कावळे, फोटोग्राफर ओलवे,संगम मोहोड सन्मा...

बार्शिटाकळी येथे अल फ्लाह उर्दू शाळेत जागतीक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला

Image
अल फ्लाह उर्दू शाळेत जागतिक वसुंधरा दिन साजरा      बार्शिटाकळी येथे आज खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्था व्दारा संचालित अल फ्लाह उर्दू शाळा खडकपुरा येथे जागतिक वसुंधरा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला  या वेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्राध्यापक बिस्मिल्ला खान हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ पत्रकार जेठाभाई  पटेल  संस्था उपाध्यक्ष शाहिद इक्बाल खान हे होते या वेळी शाहिद इक्बाल खान यांनी उपस्थितांना  माझी वसुंधरा अभियान बद्दल माहिती दिली या वेळी उपस्थित यांना वुक्ष भेट देऊन जल जमीन चे संवर्धना बाबत माहिती देण्यात आली वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याचा प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे ...

तहानलेल्या जीवला दोन घोटाची आस

Image
अकोल्याचा पारा दररोज वाढताच आहे. गुरूवारी दुपारीही उन्हाचा तडाखा जोरात होता, या भर उन्हात हरिहर पेठ भागात तयार झालेला सिमेंट रस्त्यावर पाणी मारण्याचे काम मजुर करत होते. यादरम्यान एक पादचारी थांबला व पाण्याची मागणी केली, जीवाची लाहीलाही होत असलेल्या या वातावरणात पाण्याच्या दोन घोटाने त्याचा जीव नक्कीच सुखावला असेल.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा निमित्ताने सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ने पटकावला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Image
सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा शुल्क चिकित्सक कार्यलय अकोला तर्फे संध्या युगात व्यसन मुक्ती अभियान अंतर्गत जनजागृती  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अतंर्गत बोधकथा चित्र कला प्रधापरिकक्षा घेण्यात आली , त्या तंबाखु नियत्रण बोध कथा ,चित्र कला स्पर्धेत, बरेच मुले ,मुली सहभागी झाले होते , त्यांमध्ये बार्शिटाकळी शहरात र्सावित्रीबाई फुले विद्यालय येथील शाळेची विद्यार्थीनी आणी बार्शीटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते जुगलकिशोर जामनीक यांची मुलगी अंन्जल जुगलकिशोर जामनीक चा त्या तंबाखु नियंत्रण बोघकथा, चित्र कलाा स्पर्धा परीक्षेत   स्ध्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्  प्रथम क्रमांक पटकवल्या बदल आणी जास्त गुण आल्याबद्दल प्रमाणपत्रर, परिषेताक व बॅग देण्यात आली . त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमात यावेळी प्राचार्य इंगळे, मंदा किनी खानझोडे मॅडम , प्राध्यापक काळे, बाहेकर, चिकटे , कोल्हे, जाधव मॅडम , लाटेकर , इतर शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी उपस्थित होते , छाया , कुं , अन्जल ले बक्षीस पत्र मुख्याघ्यापक व    शिक्षक वृद देताना,

बार्शिटाकळी ते अकोला रोडवर (पेट्रोल पंपाजवळ) हनुमान मंदिराजवळ निबांच्या झाडाला आग बार्शिटाकळी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मुळे पुढील अनर्थ टळला

अकोला ते मंगरूळपीर रोड वर पेट्रोल पंप जवळील हनुमान मंदीरा जवळ कुणी अज्ञात व्यक्तीने आजूबाजूच्या कचरा पेटुन दिल्या मुळे मोठ्या लिंबाच्या झाडाला सुद्धा आग लागली होती. ते झाड जर पडले असते तर मोठी दुघ्र्र्ना दुर्घटना घडली असती आणी झाड पडुन बार्शीटाकळी चा विद्युत पुरवठा सुद्धा खंडीत झाला असता. अशी माहिती मिळाल्यावर बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी Hc नागशेन जयकुमार काळे आणखी बाशिटाकळी येथील अनंत केदारे,  पुरुषोत्तमा अकोत, माणिकराव शिरसाट, खरारे , यांनी मिळेल त्या साधनाने आजू बाजू कडुन पाणी आनून आग आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टळला 

बार्शिटाकळी येथे अवैध जुगारावर बार्शिटाकळी पोलीसाची धाड

Image
➡️   पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे अवैध जुगारावर बार्शिटाकळी पोलीसाची धाड लाआज.दि.20.04.22 रोजी जुगार रेड करुण  गुन्हे दाखल केले  असुन 4 आरोपी वर कार्यवाही करण्यात आली.आरोपी जवळुन रोख 5900 रु सह एकुण  7100 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.    घटनास्थळ :- बाजार लाईन,बार्शिटाकळी➡️ आरोपी- 1. यासिन खां, 2. नासिर खान, 3.शेख राशिद शेख बशीर , 4. शेख यासिन ➡️ कार्यवाही-पोलीस निरीक्षक संजय सोळंके, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल मंगेश महाजन, npc नागसेन वानखडे यांनी ही कारवाई केली 

बार्शिटाकळी तालुक्यातील कान्हेरी (सरप) येथे अवैध गांजा विक्रेत्यावर बार्शिटाकळी पोलीसांची कार्यवाही

बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी येथे अवैध गांजा विक्रेत्यावर बार्शीटाकली पोलिसांची कार्यवाही    बार्शीटाकळी            बार्शीटाकली पोलिसांनी स्थानिक कान्हेरी सरप येथे अवैध गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताना दि  १२  एप्रिल २०२२ मंगळवारी रोजी गांव कान्हेरी सरप येथे आरोपीचे राहते घरी धाड टाकून कार्यवाही केली . बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील संजय झंगोजी इंगळे वय 50 वर्ष राहणार कान्हेरी सरप हे अवैधरित्या गांजा बाळगून आपले राहते घरी अवैद्य  विक्री करतांना मिळून आल्याने त्याना अटक करून  आरोपीविरुद्ध एनडीपीएस एक्ट२० . प्रमाणे कारवाई करण्यात आली .घटना स्थळ वरून पोलिसांनी 356 ग्राम गांजा अंदाजी किंमत 4950 रुपय मुद्देमाल संह जप्त केले . सदर अपराध न २४० / २२ प्रमाणे आरोपीना अटक करुन पोलिस स्टेशन बार्शि टाकळी  येथे गजाआड केले. सदर कार्यवाही बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पीएसआय तारक,  पोलीस हेडकॉन्स्टेबल नागसेन वानखडे, पोलिस कॉन्स्टेबल  ...

गावकऱ्यांनी रास्त धान्यासांठी तहसीलदारांकडे लेखी तक्रार

Image
प्रतिनिधी , बार्शि टाकळी , बार्शिटाकळी तालुक्या तील गांव आळदा येथे शासकीय धान्य दुकान दार कडून रास्त  घान्य वितरण बाबत गेल्या चार महिना पासून अनिमियता आणी रास्त धान्य वितरण कार्ड ग्राहकाना घान्य  न वितरण केल्या मुळे दि ,२० , एप्रिल २ ०२२ रोजी मौजे गांव आळदा येथील संपूर्ण रास्त कार्ड धारक गांवकरी मंडळी यांनी तहसिल दार गजानन हा मद ले लेखी  तक्रार अर्ज  दाखल केली , सदर तक्रार अर्ज मध्ये नमुद प्रमाणे मौजे गांव आळदा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदार यांनी गेल्या ४ , चार महिना पासून संपूर्ण गांवा तील लोकाना स्वस्त धान्य चे वाटप केले नाही संपूर्ण गाव करी कार्ड घारक मंडळी ले घान्य वाटप न करता वेठीस घरुन त्रास देत आहे ..स्वस्त घान्य दुकानदार गांवात रात्री बेरात्री आठ वाजता गांवात येते आणी काही वेळ दुकान उघडते व मोजक्या लोकाचे घरी जाऊन थंम्ब घेऊन वाटप केले असा दिखावा करते ,,  त्या इतर  लोकाना दिशा भुल माहिती म्हणजे ज्याना थंम्ब असेल त्या ना घान्य मिळणार इतर रास्त घान्य दुकान दार ग्राहकाना  घान्य वाटप मध्ये अनिमियता कामात दिरगाई वेळे वर रास्त घान्य द...

उन्हामुळे (उष्माघाताने) मृत्यू का होतो ?

_उष्माघात_ उन्हामुळे मृत्यू का होतो ? आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? *आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. - जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. *शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!) - *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*. *रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना* (विशेषतः ...

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संत कवर नगर येथील "यशवंत भवन'" समोर रोग निदान शिबिर संपन्न

Image
यशवंत भवण समोर आरोग्य शिबीर संपन्न  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संत कवर नगर येथील'यशवंत भवन' समोर रोग निदान शिबिर व औषध वाटपाचा लाभ स्थानिक नगरवासीयांनी घेतला. या शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या हस्ते झाले असून कार्यक्रमाचे आयोजन विशाल वानखडे यांनी केले होते. भाग्योदय आरोग्य शिक्षण संस्थे च्या वतीने Drp सुरजसिंग जाधव यांनी आरोग्य सेवा दीली यावेळी सचिन शिराळे,जिवन डीगे, डॉ सुनिल शिराळे,जय रामा तायडे,अमोल तिरपुडे, सचिन डोंगरे,गोलु खिल्लारे, नितीन प्रधान, श्रीकांत घोगरे हे उपस्थित होते.या शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबीर यशस्वीतेसाठी  भाग्योदय आरोग्य शिक्षण संस्थेच्या, Dhw जोती गवई sti कॉन्सलर, Clw अर्चना शेगावकर महेंद्र वानखडे, बाळा भाऊ उताणे, किशोर कॉव्हाण, सचिन इंगळे,तर विशालभाऊ वानखडे मित्र परिवार चे महेंद्र चोटमोल, अश्विन वानखडे, सुरज वानखडे,सुभाष तायडे, विनोद दामोदर, गौरव वानखडे,सचिन डोंगरे,रितेश यादव, संदीप नारवणे, महेश थोरात, सचिन सदानंशिव,  मयूर वानखडे,...